< यहेज्केल 45 >

1 जेव्हा तुम्ही वतनासाठी चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी कराल तेव्हा परमेश्वरास अर्पायचा प्रदेश, देशाचा पवित्र विभाग, तुम्ही अर्पण कराल, त्याची लांबी पंचवीस हजार हात व रुंदी वीस हजार हात असावी. त्याच्या सभोवतालचा सर्व प्रदेश पवित्र होईल.
Når I udskifter landet ved lodkastning, skal I yde Herren en Offerydelse, en hellig Del af Landet, 25 000 Alen lang og 20 000 Alen bred; hellig skal den være i hele sin Udstrækning.
2 यापैकी पांचशे हात लांब व पांचशे हात रुंद एवढी चौरस जागा पवित्रस्थानासाठी ठेवून तिच्याभोवती पन्नास हात खुली जागा राखून ठेवावी, ती सभोवती चौरस असावी.
Deraf skal til Helligdommen fratages et firkantet Stykke på 500 Alen til alle Sider, omgivet af en åben Plads på 50 Alen.
3 त्या मोजलेल्या जमिनीतून तू पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जागा मोजून काढ.
Af denne Strækning skal du afmåle et Stykke på 25000 Alens Længde og 10000 Alens Bredde; der skal Helligdommen, den højhellige, ligge.
4 जे याजक पवित्रस्थानाचे सेवा करावयास परमेश्वराजवळ येतील त्यांना हा भूमीचा पवित्र प्रदेश होईल. तो त्यांना त्यांच्या घरासाठी जागा आणि पवित्रस्थानासाठी पवित्र जागा होईल.
Det er en hellig Gave af Landet og skal tilfalde Præsterne, som gør Tjeneste i Helligdommen, dem, som træder frem for at gøre Tjeneste for HERREN; og det skal give dem Plads til Boliger og Græsgang.
5 म्हणून ती पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद, एवढी जागा जे कोणी लेवी मंदिरात सेवा करतात त्यांची व्हावी. वस्तीसाठी हे त्यांचे वतन होय.
Et Stykke på 25000 Alens Længde og 10000 Alens Bredde skal som Grundejendom tilfalde Leviteme, som gør Tjeneste i Templet, til Byer at bo i.
6 अर्पिलेला पवित्र प्रदेशसुद्धा तुम्ही पाच हजार हात रुंद व पंचवीस हजार हात लांब प्रदेश नगराचा विभाग म्हणून नेमून द्याल; तो इस्राएलाच्या सर्व घराण्याला होईल.
Byens Grundejendom skal I give en Bredde af 5000 Alen og en Længde af 25000 Alen, samme Længde som den hellige Offerydelse; den skal tilhøre hele Israels Hus.
7 “अर्पिलेल्या पवित्र प्रदेशाच्या व नगराच्या विभागाच्या एकाबाजूस व दुसऱ्याबाजूस अर्पिलेल्या पवित्र प्रदेशासमोर आणि नगराच्या विभागासमोर पश्चिम सीमेपासून पश्चिमेकडे, आणि पूर्व सीमेपासून पूर्वेकडे अधिपतीस विभाग होईल.
Og Fyrsten skal på begge Sider af den hellige Offerydelse og Byens Grundejendom have et Område langs den hellige Offerydelse og Byens Grundejendom både på Vestsiden og Østsiden af samme Længde som en af Stammelodderne fra Landets Vestgrænse til Østgrænsen;
8 ही जमीन इस्राएलात अधिपतीचे वतन व्हावी म्हणजे यापुढे माझ्या अधिपतींनी माझ्या लोकांवर जुलूम करू नये; तर त्याऐवजी इस्राएल घराण्याला त्यांच्या त्यांच्या वंशाप्रमाणे जमीन द्यावी.
det skal tilhøre ham som Grundejendom i Israel, for at mine Fyrster ikke fremtidig skal undertrykke mit Folk; men det øvrige Land skal gives Israels Hus, Stamme for Stamme.
9 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, हे तुमच्यासाठी पुरे होवो. जबरदस्ती आणि जुलूम दूर करा! न्याय व न्यायीपण आचरा, माझ्या लोकांची हकालपट्टी करण्याचे सोडा.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Så siger den Herre HERREN: Lad det nu være nok, I Israels Fyrster! Afskaf Vold og Undertrykkelse, gør Ret og Skel og hør op med eders Overgreb mod mit Folk, lyder det fra den Herre HERREN.
10 १० तुम्ही खरी तागडी, खरी एफा, खरी बथ वापरा.
Vægt, som vejer rigtigt, Efa og Bat, som holder Mål, skal I have.
11 ११ एफा व बथ सारख्याच मापाचे असावे. याकरिता बथ होमराचा दहावा भाग; तशीच एफाही होमराचा दहावा भाग; या होमराच्या मापाप्रमाणे असाव्या.
Efa og Bat skal have ens Mål, så at en Bat holder en Tiendedel Homer, og en Efa ligeledes en Tiendedel Homer; efter en Homer skal Målet fastslås.
12 १२ शेकेल वीस गेराचा असावा. माने वीस शेकेलाचा, पंचवीस शेकेलाचा किंवा पंधरा शेकेलाचा असावा.
En Sekel skal holde tyve Gera; fem Sekel skal være fem, ti Sekel ti, og til halvtredsindstyve Sekel skal l regne en Mine.
13 १३ तुमची जे अर्पणे अर्पावयाचे ती अशी असावीः तुम्ही होमभर गव्हातून एफाचा सहावा भाग गहू व होमरभर जवातून एफाचा सहावा भाग जव द्यावा.
Dette er den offerydelse, I skal yde: En Sjetedel Efa af hver Homer Hvede og en Sjetedel Efa af hver Homer Byg.
14 १४ तेलाचा नियम हाच, तुम्ही तेलाच्या बथाचा म्हणजे खोरभर तेलातून बथाचा दहावा भाग अर्पावा; दहा बथांचा खोर म्हणजे एक होमर, कारण दहा बथ एक होमर आहेत;
Den fastsatte Ydelse af Olien: En Tiendedel Bat af hver Kor, ti Bat udgør jo en Kor;
15 १५ आणि इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणातील दोनशे मेंढरांच्या कळपातून एक कोकरू, अन्नार्पण व होमार्पण व शांत्यर्पणे म्हणून त्यांच्यासाठी प्रायश्चित करायला अर्पावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
et Lam fra Småkvæget af hver 200 som Offerydelse fra alle Israels Slægter til Afgrødeofre, Brændofre og Takofre for at skaffe eder Soning, lyder det fra den Herre HERREN
16 १६ देशातील सर्व लोकांनी इस्राएलातल्या अधिपतीस ही अर्पणे दिली पाहिजेत.
Alt Folket i Landet skal give Fyrsten i Israel denne Offerydelse.
17 १७ उत्सव, व चंद्रदर्शने, शब्बाथ आणि इस्राएलाच्या घराण्याचे सर्व सण यामध्ये अन्नार्पण, होमार्पण व पेयार्पण याची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे. इस्राएल घराण्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी त्याने अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावी.
Men Fyrsten skal det påhvile at udrede Brændofrene, Afgrødeofrene og Drikofrene på Højtiderne, Nymånefesterne og Sabbaterne, alle Israels Huses Fester; han skal sørge for Syndofrene, Afgrødeofrene, Brændofrene og Takofrene for at skaffe Israels Hus Soning.
18 १८ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पहिल्या महिन्यात, महिन्याच्या पहिल्या दिवशी, तू निर्दोष तरुण गोऱ्हा घेऊन पवित्रस्थानाची शुद्धी कर.
Så siger den Herre HERREN: På den første Dag i den første Måned skal I fage en lydefri ung Tyr og rense Helligdommen for Synd.
19 १९ तेव्हा याजकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीला, वेदीच्या बैठकीच्या चाऱ्ही कोपऱ्यांवर व आंतील अंगणाच्या दरवाजाच्या चौकटीला लावावे.”
Præsten skal tage noget af Syndofferets Blod og stryge det på Templets Dørstolper, Alterfremspringets fire Hjørner og Dørstolperne til den indre Forgårds Port.
20 २० पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, प्रत्येक चुकलेल्या किंवा भोळ्या मनुष्याकरता तू तसेच करशील आणि तुम्ही याप्रकारे मंदिरासाठी प्रायश्चित करावे.
Det samme skal han gøre på den første Dag i den syvende Måned for deres Skyld, som har fejlet af Vanvare eller Uvidenhed, og således skaffe Templet Soning.
21 २१ पहिल्या महिन्यात, महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्हास सात दिवसाचा वल्हांडण सण होईल, त्यामध्ये बेखमीर भाकर खावी.
På den fjortende Dag i den første Måned skal I fejre Påskefesten: syv Dage skal I spise usyret Brød;
22 २२ त्यादिवशी अधिपती आपणासाठी आणि देशातील सर्व लोकांसाठी पापार्पणासाठी एक गोऱ्हा सिद्ध करील.
og Fyrsten skal på den Dag for sig selv og for alt Folket i Landet ofre en Tyr som Syndoffer;
23 २३ परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी सणाचे सात दिवस त्याने सात निर्दोष गोऱ्हे व सात मेंढे सिद्ध करावे आणि पापर्पणासाठी रोज एक बोकड सिद्ध करावा.
på de syv Festdage skal han som Brændoffer for HERREN ofre syv Tyre og syv Vædre, lydefri Dyr, på hver af de syv Dage, og ligeledes daglig som Syndoffer en Gedebuk;
24 २४ मग अधिपती एका गोऱ्ह्यासाठी एफाभर व एका मेंढ्यासाठी एफाभर अन्नार्पण आणि एफासाठी हीनभर तेल सिद्ध करील, पापार्पण म्हणून बैल देईल.
og som Afgrødeoffer skal han ofre en Efa med Tyren og ligeledes een med Væderen, desuden en Hin Olie med Efaen.
25 २५ सातव्या महिन्यात, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, सणात, सात दिवसपर्यंत तो पापबली, होमबली, अन्नबली आणि तेल ही याप्रमाणेच सिद्ध करील.
På den femtende Dag i den syvende Måned skal han på Festen ofre lige så meget som Syndoffer, Brændoffer, Afgrødeoffer og lige så megen Olie; det skal han gøre syv Dage.

< यहेज्केल 45 >