< यहेज्केल 44 >

1 नंतर त्या मनुष्याने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, मंदिराच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. ते घट्ट बंद होते.
こうして、彼はわたしを連れて、聖所の東に向いている外の門に帰ると、門は閉じてあった。
2 परमेश्वर मला म्हणाला, “हे दार बंद केलेले राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही मनुष्य जाणार नाही. कारण परमेश्वर इस्राएलाचा देव यातून आत गेला आहे; म्हणून ते बंद केलेले राहीन.
彼はわたしに言った、「この門は閉じたままにしておけ、開いてはならない。ここからだれもはいってはならない。イスラエルの神、主が、ここからはいったのだから、これは閉じたままにしておけ。
3 इस्राएलाचा राज्यकर्ता परमेश्वरासमोर त्या प्रवेशद्वारात बसून भोजन करील; या द्वाराजवळच्या द्वारमंडपाच्या वाटेने तो आत येईल व याच्याच वाटेने बाहेर जाईल.”
ただ君たる者だけが、この内に座し、主の前でパンを食し、門の廊を通ってはいり、またそこから外に出よ」。
4 मग त्याने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तो पाहा! परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते; हे पहिले व मी उपडा पडलो.
彼はまたわたしを連れて、北の門の道から宮の前に行った。わたしが見ていると、見よ、主の栄光が主の宮に満ちた。わたしがひれ伏すと、
5 मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला, परमेश्वराच्या मंदिराविषयीचे सर्व विधी व नियमाबाबत मी जे सर्व तुला सांगतो, त्याकडे लक्ष दे; आपले डोळे उघडून पाहा व कान देऊन ऐक आणि मंदिराच्या प्रवेशाकडे व पवित्रस्थानाच्या बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.
主はわたしに言われた、「人の子よ、主の宮のすべてのおきてと、そのすべての規定とについて、わたしがあなたに告げるすべての事に心をとめ、目を注ぎ、耳を傾けよ。また宮にはいることを許されている者と、聖所にはいることのできない者とに心せよ。
6 मग तू बंडखोरांना इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही सर्व घृणास्पद कृत्ये केली आहेत, ती तुम्हास पुरेशी होवो;
また反逆の家であるイスラエルの家に言え。主なる神は、こう言われる、イスラエルの家よ、その憎むべきことをやめよ。
7 कारण तुम्ही माझी भाकर, चरबी व रक्त अर्पण करताना जे मनाने व शरीरानेही बेसुंती अश्या परक्या लोकांस माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यात भर टाकली आहे.
すなわちあなたがたは、わたしの食物である脂肪と血とがささげられる時、心にも肉にも、割礼を受けない異邦人を入れて、わが聖所におらせ、これを汚した。また、もろもろの憎むべきものをもって、わが契約を破った。
8 तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंची राखण जबाबदारीने केली नाही, तर तुम्ही आपणासाठी माझ्या पवित्रस्थानाची काळजी घेण्याचे काम दुसऱ्याला दिले.”
あなたがたは、わが聖なる物を守る務を怠り、かえって異邦人を立てて、わが聖所の務を守らせた。
9 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल लोकांच्यात राहणाऱ्या मनाने व शरीराने बेसुंती असलेल्या परक्याने कोणी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करू नये.
それゆえ、主なる神は、こう言われる、イスラエルの人々のうちにいるすべての異邦人のうち、心と肉とに割礼を受けないすべての者は、わが聖所にはいってはならない。
10 १० जेव्हा इस्राएल भरकटून दूर गेले, तेव्हा लेवीं माझ्यापासून दूर गेले, जे माझ्यापासून भरकटून दूर आपल्या मूर्तीच्या मागे गेले, आता ते आपल्या पापासाठी किंमत देतील.
またレビ人であって、イスラエルが迷った時、偶像を慕い、わたしから迷い出て、遠く離れた者は、その罪を負わなければならない。
11 ११ ते माझ्या पवित्रस्थानातले सेवक आहेत, ते मंदिराच्या द्वारांचे पहारेकरी आणि मंदिरात सेवा करणारे आहेत. ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञबली याचे पशू कापतील; ते त्यांच्यापुढे त्यांची सेवा करायला उभे राहतील.
すなわち彼らはわが聖所で、仕え人となり、宮の門を守る者となり、宮に仕えるしもべとなり、民のために、燔祭および犠牲のものを殺し、彼らの前に立って仕えなければならない。
12 १२ पण त्यांनी त्यांच्या मूर्तीपुढे इस्राएल घराण्याची सेवा केली व ते त्यास पापांत पाडणारे अडथळे झाले म्हणून मी आपला हात त्यांच्याविरुद्ध शपथ घेऊन उंचावला आहे आणि ते आपल्या पापासाठी किंमत देतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
彼らはその偶像の前で民に仕え、イスラエルの家にとって、罪のつまずきとなったゆえ、主なる神は言われる、わたしは彼らについて誓った。彼らはその罪を負わなければならない。
13 १३ म्हणून माझ्याकडे याजकाचे काम करायला ते माझ्याजवळ येणार नाहीत किंवा माझ्या पवित्र वस्तुजवळ, परमपवित्र वस्तू आहेत त्यांजवळ ते येणार नाहीत; त्याऐवजी त्यांनी जे घृणास्पद कृत्ये केली आहेत त्याचा दोषीपणा व निंदा त्यांना सहन करावी लागेल.
彼らはわたしに近づき、祭司として、わたしに仕えることはできない。またわたしの聖なる物、および最も聖なる物に、近づいてはならない。彼らはそのおこなった憎むべきことのため、恥を負わなければならない。
14 १४ पण मी त्यांना मंदिराची काळजी घेणारे, त्याच्या सर्व सेवेसाठी आणि त्यामध्ये जे काही काम करायचे त्यासाठी नेमीन.
しかし彼らには、宮を守る務をさせ、そのもろもろの務と、宮でなすべきすべての事とに当らせる。
15 १५ आणि “पण जेव्हा इस्राएलाचे लोक भरकटून माझ्यापासून दूर गेले, तेव्हा लेवी याजकापैकी सादोकाचे वंशज माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये पूर्ण करीत होते. तेच माझी सेवा करायला माझ्याजवळ येतील; आणि मला चरबी व रक्त अर्पावे म्हणून माझ्यापुढे उभे राहतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
しかしザドクの子孫であるレビの祭司たち、すなわちイスラエルの人々が、わたしを捨てて迷った時に、わが聖所の務を守った者どもは、わたしに仕えるために近づき、脂肪と血とをわたしにささげるために、わたしの前に立てと、主なる神は言われる。
16 १६ ते माझ्या पवित्रस्थानात येतील. ते माझी आराधना करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझी कर्तव्ये पूर्ण करतील.
すなわち彼らはわが聖所に入り、わが台に近づいてわたしに仕え、わたしの務を守る。
17 १७ ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की त्यांनी तागाची वस्त्रे घालावीत. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे घालू नयेत.
彼らが内庭の門にはいる時は、麻の衣服を着なければならない。内庭の門および宮の内で、務をなす時は、毛織物を身につけてはならない。
18 १८ त्यांच्या डोक्यास तागाचे फेटे असावेत व त्यांच्या कमरेची अंतर्वस्त्रेही तागाची असावीत. त्यांना घाम येईल अशी वस्रे त्यांनी घालू नयेत.
また頭には亜麻布の冠をつけ、腰には亜麻布の袴をつけなければならない。ただし汗の出るような衣を身につけてはならない。
19 १९ जेव्हा ते बाहेरील अंगणात लोकांकडे बाहेर जातील, तेव्हा त्यांच्या वस्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळेची वस्रे काढून पवित्र खोल्यात ठेवावी व दुसरी वस्रे घालावी.
彼らは外庭に出る時、すなわち外庭に出て民に接する時は、務をなす時の衣服は脱いで聖なる室に置き、ほかの衣服を着なければならない。これはその衣服をもって、その聖なることを民にうつさないためである。
20 २० त्यांनी आपली डोकी मुंडन करू नयेत वा केस लांब वाढू देऊ नयेत तर त्यांनी आपले केस कातरुन बारीक करावे.
彼らはまた頭をそってはならない。また髪を長くのばしてはならない。その頭の髪は切らなければならない。
21 २१ आतल्या अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षरस पिऊ नये.
祭司はすべて内庭にはいる時は、酒を飲んではならない。
22 २२ कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली वंशातील कुमारीकेशी लग्न करावे अथवा जी पूर्वी याजकाची पत्नी होती अशी विधवा, तिच्याशी लग्न करावे.
また寡婦、および出された女をめとってはならない。ただイスラエルの家の血統の処女、あるいは祭司の妻で、やもめになったものをめとらなければならない。
23 २३ त्यांनी माझ्या लोकांस “शिक्षण द्यावे. पवित्र व सामान्य, आणि शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक त्यास दाखवून द्यावा.
彼らはわが民に、聖と俗との区別を教え、汚れたものと、清いものとの区別を示さなければならない。
24 २४ वादविवादाचा न्याय करण्यास त्यांनी तत्पर असावे. माझ्या निर्णयाप्रमाणे त्यांनी निवाडा करावा. ते माझ्या सर्व नेमलेल्या सणात माझे विधी व माझे नियम पाळतील, आणि माझे शब्बाथ दिवस पवित्र पाळावेत.
争いのある時は、さばきのために立ち、わがおきてにしたがってさばき、また、わたしのもろもろの祭の時は、彼らはわが律法と定めを守り、わが安息日を、聖別しなければならない。
25 २५ मृताच्या जवळ जाऊन ते अशुद्ध होणार नाहीत, पण मृत पुरुष जर याजकाची स्वत: ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुद्ध झाले तरी चालेल.
死人に近づいて、身を汚してはならない。ただ父のため、母のため、むすこのため、娘のため、兄弟のため、夫をもたない姉妹のためには、近よって身を汚すことも許される。
26 २६ याजक शुद्ध झाल्यानंतर, लोकांनी त्याच्यासाठी सात दिवस मोजावे.
このような人は、汚れた後、自身のために、七日の期間を数えよ。そうすれば清まる。
27 २७ मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्रस्थानातील सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, त्यादिवशी त्याने आपले पापार्पण करावे.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
彼は聖所に入り、内庭に行き、聖所で務に当る日には、罪祭をささげなければならないと、主なる神は言われる。
28 २८ आणि हे त्याचे वतन आहे, मी त्यांचे वतन आहे. म्हणून त्यांना इस्राएलामध्ये वाटा नाही. मी त्यांचा वाटा आहे.
彼らには嗣業はない。わたしがその嗣業である。あなたがたはイスラエルの中で、彼らに所有を与えてはならない。わたしが彼らの所有である。
29 २९ त्यांना अन्नार्पण, दोषार्पण, पापार्पण ही त्यांनी खावी. इस्राएलांनी वाहिलेली हरएक वस्तू त्यांची व्हावी.
彼らは素祭、罪祭、愆祭の物を食べる。すべてイスラエルのうちのささげられた物は彼らの物となる。
30 ३० सर्वप्रथम फळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करावयाची प्रत्येक वस्तू याजकाची व्हावी; तुम्ही मळलेल्या पिठाचा पहिला भाग याजकाचा असेल. अशासाठी की, तुझ्या घरात आशीर्वाद राहावा.
すべての物の初なりの初物、およびすべてあなたがたのささげるもろもろのささげ物は、みな祭司のものとなる。またあなたがたの麦粉の初物は祭司に与えよ。これはあなたがたの家が、祝福されるためである。
31 ३१ पक्ष्यातले किंवा पशूतले जे काही आपोआप मरण पावलेले किंवा फाडलेले असेल ते याजकांनी खाऊ नये.
祭司は、鳥でも獣でも、すべて自然に死んだもの、または裂き殺されたものを食べてはならない。

< यहेज्केल 44 >