< यहेज्केल 44 >
1 १ नंतर त्या मनुष्याने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, मंदिराच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. ते घट्ट बंद होते.
他又带我回到圣地朝东的外门;那门关闭了。
2 २ परमेश्वर मला म्हणाला, “हे दार बंद केलेले राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही मनुष्य जाणार नाही. कारण परमेश्वर इस्राएलाचा देव यातून आत गेला आहे; म्हणून ते बंद केलेले राहीन.
耶和华对我说:“这门必须关闭,不可敞开,谁也不可由其中进入;因为耶和华—以色列的 神已经由其中进入,所以必须关闭。
3 ३ इस्राएलाचा राज्यकर्ता परमेश्वरासमोर त्या प्रवेशद्वारात बसून भोजन करील; या द्वाराजवळच्या द्वारमंडपाच्या वाटेने तो आत येईल व याच्याच वाटेने बाहेर जाईल.”
至于王,他必按王的位分,坐在其内,在耶和华面前吃饼。他必由这门的廊而入,也必由此而出。”
4 ४ मग त्याने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तो पाहा! परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते; हे पहिले व मी उपडा पडलो.
他又带我由北门来到殿前。我观看,见耶和华的荣光充满耶和华的殿,我就俯伏在地。
5 ५ मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला, परमेश्वराच्या मंदिराविषयीचे सर्व विधी व नियमाबाबत मी जे सर्व तुला सांगतो, त्याकडे लक्ष दे; आपले डोळे उघडून पाहा व कान देऊन ऐक आणि मंदिराच्या प्रवेशाकडे व पवित्रस्थानाच्या बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.
耶和华对我说:“人子啊,我对你所说耶和华殿中的一切典章法则,你要放在心上,用眼看,用耳听,并要留心殿宇和圣地一切出入之处。
6 ६ मग तू बंडखोरांना इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही सर्व घृणास्पद कृत्ये केली आहेत, ती तुम्हास पुरेशी होवो;
你要对那悖逆的以色列家说,主耶和华如此说:以色列家啊,你们行一切可憎的事,当够了吧!
7 ७ कारण तुम्ही माझी भाकर, चरबी व रक्त अर्पण करताना जे मनाने व शरीरानेही बेसुंती अश्या परक्या लोकांस माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यात भर टाकली आहे.
你们把我的食物,就是脂油和血献上的时候,将身心未受割礼的外邦人领进我的圣地,玷污了我的殿;又背了我的约,在你们一切可憎的事上,加上这一层。
8 ८ तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंची राखण जबाबदारीने केली नाही, तर तुम्ही आपणासाठी माझ्या पवित्रस्थानाची काळजी घेण्याचे काम दुसऱ्याला दिले.”
你们也没有看守我的圣物,却派别人在圣地替你们看守我所吩咐你们的。
9 ९ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल लोकांच्यात राहणाऱ्या मनाने व शरीराने बेसुंती असलेल्या परक्याने कोणी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करू नये.
“主耶和华如此说:以色列中的外邦人,就是身心未受割礼的,都不可入我的圣地。”
10 १० जेव्हा इस्राएल भरकटून दूर गेले, तेव्हा लेवीं माझ्यापासून दूर गेले, जे माझ्यापासून भरकटून दूर आपल्या मूर्तीच्या मागे गेले, आता ते आपल्या पापासाठी किंमत देतील.
“当以色列人走迷的时候,有利未人远离我,就是走迷离开我、随从他们的偶像,他们必担当自己的罪孽。
11 ११ ते माझ्या पवित्रस्थानातले सेवक आहेत, ते मंदिराच्या द्वारांचे पहारेकरी आणि मंदिरात सेवा करणारे आहेत. ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञबली याचे पशू कापतील; ते त्यांच्यापुढे त्यांची सेवा करायला उभे राहतील.
然而他们必在我的圣地当仆役,照管殿门,在殿中供职;必为民宰杀燔祭牲和平安祭牲,必站在民前伺候他们。
12 १२ पण त्यांनी त्यांच्या मूर्तीपुढे इस्राएल घराण्याची सेवा केली व ते त्यास पापांत पाडणारे अडथळे झाले म्हणून मी आपला हात त्यांच्याविरुद्ध शपथ घेऊन उंचावला आहे आणि ते आपल्या पापासाठी किंमत देतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
因为这些利未人曾在偶像前伺候这民,成了以色列家罪孽的绊脚石,所以我向他们起誓:他们必担当自己的罪孽。这是主耶和华说的。
13 १३ म्हणून माझ्याकडे याजकाचे काम करायला ते माझ्याजवळ येणार नाहीत किंवा माझ्या पवित्र वस्तुजवळ, परमपवित्र वस्तू आहेत त्यांजवळ ते येणार नाहीत; त्याऐवजी त्यांनी जे घृणास्पद कृत्ये केली आहेत त्याचा दोषीपणा व निंदा त्यांना सहन करावी लागेल.
他们不可亲近我,给我供祭司的职分,也不可挨近我的一件圣物,就是至圣的物;他们却要担当自己的羞辱和所行可憎之事的报应。
14 १४ पण मी त्यांना मंदिराची काळजी घेणारे, त्याच्या सर्व सेवेसाठी आणि त्यामध्ये जे काही काम करायचे त्यासाठी नेमीन.
然而我要使他们看守殿宇,办理其中的一切事,并做其内一切当做之工。”
15 १५ आणि “पण जेव्हा इस्राएलाचे लोक भरकटून माझ्यापासून दूर गेले, तेव्हा लेवी याजकापैकी सादोकाचे वंशज माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये पूर्ण करीत होते. तेच माझी सेवा करायला माझ्याजवळ येतील; आणि मला चरबी व रक्त अर्पावे म्हणून माझ्यापुढे उभे राहतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
“以色列人走迷离开我的时候,祭司利未人撒督的子孙仍看守我的圣所。他们必亲近我,事奉我,并且侍立在我面前,将脂油与血献给我。这是主耶和华说的。
16 १६ ते माझ्या पवित्रस्थानात येतील. ते माझी आराधना करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझी कर्तव्ये पूर्ण करतील.
他们必进入我的圣所,就近我的桌前事奉我,守我所吩咐的。
17 १७ ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की त्यांनी तागाची वस्त्रे घालावीत. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे घालू नयेत.
他们进内院门必穿细麻衣。在内院门和殿内供职的时候不可穿羊毛衣服。
18 १८ त्यांच्या डोक्यास तागाचे फेटे असावेत व त्यांच्या कमरेची अंतर्वस्त्रेही तागाची असावीत. त्यांना घाम येईल अशी वस्रे त्यांनी घालू नयेत.
他们头上要戴细麻布裹头巾,腰穿细麻布裤子;不可穿使身体出汗的衣服。
19 १९ जेव्हा ते बाहेरील अंगणात लोकांकडे बाहेर जातील, तेव्हा त्यांच्या वस्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळेची वस्रे काढून पवित्र खोल्यात ठेवावी व दुसरी वस्रे घालावी.
他们出到外院的民那里,当脱下供职的衣服,放在圣屋内,穿上别的衣服,免得因圣衣使民成圣。
20 २० त्यांनी आपली डोकी मुंडन करू नयेत वा केस लांब वाढू देऊ नयेत तर त्यांनी आपले केस कातरुन बारीक करावे.
不可剃头,也不可容发绺长长,只可剪发。
21 २१ आतल्या अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षरस पिऊ नये.
祭司进内院的时候都不可喝酒。
22 २२ कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली वंशातील कुमारीकेशी लग्न करावे अथवा जी पूर्वी याजकाची पत्नी होती अशी विधवा, तिच्याशी लग्न करावे.
不可娶寡妇和被休的妇人为妻,只可娶以色列后裔中的处女,或是祭司遗留的寡妇。
23 २३ त्यांनी माझ्या लोकांस “शिक्षण द्यावे. पवित्र व सामान्य, आणि शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक त्यास दाखवून द्यावा.
他们要使我的民知道圣俗的分别,又使他们分辨洁净的和不洁净的。
24 २४ वादविवादाचा न्याय करण्यास त्यांनी तत्पर असावे. माझ्या निर्णयाप्रमाणे त्यांनी निवाडा करावा. ते माझ्या सर्व नेमलेल्या सणात माझे विधी व माझे नियम पाळतील, आणि माझे शब्बाथ दिवस पवित्र पाळावेत.
有争讼的事,他们应当站立判断,要按我的典章判断。在我一切的节期必守我的律法、条例,也必以我的安息日为圣日。
25 २५ मृताच्या जवळ जाऊन ते अशुद्ध होणार नाहीत, पण मृत पुरुष जर याजकाची स्वत: ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुद्ध झाले तरी चालेल.
他们不可挨近死尸沾染自己,只可为父亲、母亲、儿子、女儿、弟兄,和未嫁人的姊妹沾染自己。
26 २६ याजक शुद्ध झाल्यानंतर, लोकांनी त्याच्यासाठी सात दिवस मोजावे.
祭司洁净之后,必再计算七日。
27 २७ मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्रस्थानातील सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, त्यादिवशी त्याने आपले पापार्पण करावे.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
当他进内院,进圣所,在圣所中事奉的日子,要为自己献赎罪祭。这是主耶和华说的。
28 २८ आणि हे त्याचे वतन आहे, मी त्यांचे वतन आहे. म्हणून त्यांना इस्राएलामध्ये वाटा नाही. मी त्यांचा वाटा आहे.
“祭司必有产业,我是他们的产业。不可在以色列中给他们基业;我是他们的基业。
29 २९ त्यांना अन्नार्पण, दोषार्पण, पापार्पण ही त्यांनी खावी. इस्राएलांनी वाहिलेली हरएक वस्तू त्यांची व्हावी.
素祭、赎罪祭,和赎愆祭他们都可以吃,以色列中一切永献的物都要归他们。
30 ३० सर्वप्रथम फळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करावयाची प्रत्येक वस्तू याजकाची व्हावी; तुम्ही मळलेल्या पिठाचा पहिला भाग याजकाचा असेल. अशासाठी की, तुझ्या घरात आशीर्वाद राहावा.
首先初熟之物和一切所献的供物都要归给祭司。你们也要用初熟的麦子磨面给祭司;这样,福气就必临到你们的家了。
31 ३१ पक्ष्यातले किंवा पशूतले जे काही आपोआप मरण पावलेले किंवा फाडलेले असेल ते याजकांनी खाऊ नये.
无论是鸟是兽,凡自死的,或是撕裂的,祭司都不可吃。”