< यहेज्केल 43 >

1 नंतर त्या मनुष्याने जे दार पूर्वेकडे उघडते त्याकडे मला नेले.
फिर वह मुझे फाटक पर ले आया, या'नी उस फाटक पर जिसका रुख़ पूरब की तरफ़ है;
2 तेव्हा पाहा! पूर्वेकडून इस्राएलाच्या देवाचे तेज आले. त्याचा शब्द पुष्कळ जलांच्या ध्वनीप्रमाणे होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.
और क्या देखता हूँ कि इस्राईल के ख़ुदा का जलाल पूरब की तरफ़ से आया, और उसकी आवाज़ सैलाब के शोर के जैसी थी, और ज़मीन उसके जलाल से मुनव्वर हो गई।
3 आणि जेव्हा तो नगराचा नाश करायला आला होता तेव्हा जो दृष्टांत मी पाहिला होता त्याच्यासारखे ते दृष्टांत होते, खबार नदीतीरी पाहिलेल्या दृष्टांतासारखाच हा दृष्टांत होता आणि तेव्हा मी उपडा पडलो.
और यह उस ख़्वाब की नुमाइश के मुताबिक़ था जो मैंने देखा था, हाँ, उस ख़्वाब के मुताबिक़ जो मैंने उस वक़्त देखा था जब मैं शहर को बर्बाद करने आया था, और यह रोयतें उस ख़्वाब की तरह थीं जो मैंने नहर — ए — किबार के किनारे पर देखा था; तब मैं मुँह के बल गिरा।
4 जे दार पूर्वेकडे उघडे होते त्यातून परमेश्वराचे तेज मंदिरात आले.
और ख़ुदावन्द का जलाल उस फाटक की राह से, जिसका रुख़ पूरब की तरफ़ है हैकल में दाख़िल हुआ।
5 मग आत्म्याने मला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. पाहा! परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले.
और रूह ने मुझे उठा कर अन्दरूनी सहन में पहुँचा दिया, और क्या देखता हूँ कि हैकल ख़ुदावन्द के जलाल से मा'मूर है।
6 मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले आणि तो मनुष्य माझ्या शेजारीच उभा होता.
और मैंने किसी की आवाज़ सुनी, जो हैकल में से मेरे साथ बातें करता था, और एक शख़्स मेरे पास खड़ा था।
7 तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही माझ्या सिंहासनाची व पादसनाची जागा आहे, येथे मी इस्राएलाच्या लोकांमध्ये सर्वकाळ राहीन. इस्राएल घराणे व त्याचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उंचस्थानात माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत.
और उसने मुझे फ़रमाया, कि 'ऐ आदमज़ाद, यह मेरी तख़्तगाह और मेरे पाँव की कुर्सी है जहाँ मैं बनी — इस्राईल के बीच हमेशा तक रहूँगा और बनी इस्राईल और उनके बादशाह फिर कभी मेरे पाक नाम को अपनी बदकारी और अपने बादशाहों की लाशों से उनके मरने पर नापाक न करेंगे।
8 त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्याशेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभाशेजारी उभारीले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती. अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या नावास बट्टा लाविला आहे. म्हणून मी आपल्या रागाने त्यांना नष्ट केले आहे.
क्यूँकि वह अपने आस्ताने मेरे आस्तानों के पास, और अपनी चौखटें मेरी चौखटों के पास लगाते थे, और मेरे और उनके बीच सिर्फ़ एक दीवार थी; उन्होंने अपने उन घिनौने कामों से जो उन्होंने किए मेरे पाक नाम को नापाक किया, इसलिए मैंने अपने क़हर में उनको हलाक किया।
9 आता त्यांनी आपला व्यभिचार आणि व राजांची प्रेते माझ्यापासून दूर करावी. म्हणजे मी सर्वकाळ त्यांच्यात राहीन.
अगरचे अब वह अपनी बदकारी और अपने बादशाहों की लाशें मुझ से दूर कर दें, तो मैं हमेशा तक उनके बीच रहूँगा।
10 १० मानवाच्या मुला, तू इस्राएलाच्या घराण्याला हे घर दाखीव, अशासाठी की, त्यांनी आपल्या अन्यायामुळे लज्जित व्हावे; त्यांनी त्यांच्या वर्णनाविषयी विचार करावा.
'ऐ आदमज़ाद, तू बनी — इस्राईल को यह घर दिखा, ताकि वह अपनी बदकिरदारी से शर्मिन्दा हो जाएँ और इस नमूने को नापें।
11 ११ कारण जे त्यांनी केले आहे त्या सर्वामुळे जर ते लज्जित होतील तर त्यांना घराचे रूप, त्याची रचना, व त्याची बाहेर निघण्याची ठिकाणे, व त्याचे प्रवेश, त्याचे सर्व आकार व त्याचे सर्व नियम व त्याचे सर्व प्रकार व त्याचे सर्व विधी दाखीव आणि हे त्याच्यासमक्ष लिही. अशासाठी की, त्यांनी त्याचा सर्व आकार व त्याचे सर्व नियम पाळावे व ते आचरावे.
और अगर वह अपने सब कामों से शर्मिंदा हों, तो उस घर का नक़्शा और उसकी तरतीब और उसके मख़ारिज और मदख़ल और उसकी तमाम शक्ल और उसके कुल हुक्मों और उसकी पूरी वज़ह और तमाम क़वानीन उनको दिखा, और उनकी आँखों के सामने उसको लिख, ताकि वह उसका कुल नक़्शा और उसके तमाम हुक्मों को मानकर उन पर 'अमल करें।
12 १२ हा मंदिरासाठीचा नियम आहे, पर्वतमाथ्यावरची सर्व जागा अति पवित्र आहे. पाहा, हा मंदिराचा नियम आहे.
इस घर का क़ानून यह है कि इसकी तमाम सरहदें पहाड़ की चोटी पर और इसके चारों तरफ़ बहुत पाक होंगी; देख, यही इस घर का क़ानून है।
13 १३ हातांनी वेदीची मापे ही आहेत. तिचा तळभाग एक हात व रुंदी एक हात होईल. आणि तिची कड तिच्याकाठापाशी सभोवती एक वीत होईल आणि हा वेदीचा पाया होय.
'और हाथ के नाप से मज़बह के यह नाप हैं, और इस हाथ की लम्बाई एक हाथ चार उँगल है। पाया एक हाथ का होगा, और चौड़ाई एक हाथ और उसके चारो तरफ़ बालिश्त भर चौड़ा हाशिया, और मज़बह का पाया यही है।
14 १४ तिच्या तळभागापासून खालच्या बैठकीपर्यंत उंची दोन हात व रुंदी एक हात होती. वेदी लहान बैठकीपासून मोठ्या बैठकीपर्यंत चार हात व दोन हात रुंद होती.
और ज़मीन पर के इस पाये से लेकर नीचे की कुर्सी तक दो हाथ, और उसकी चौड़ाई एक हाथ और छोटी कुर्सी से बड़ी कुर्सी तक चार हाथ और चौड़ाई एक हाथ।
15 १५ वेदीच्या वरच्या भागाची उंची चार हात होती. वेदीच्या अग्नीकुंडाला लागून वर गेलेली चार शिंगे होती.
और ऊपर का मज़बह चार हाथ का होगा, और मज़बह के ऊपर चार सींग होंगे।
16 १६ वेदीवरील अग्नीकुंडाची लांबी बारा हात व रुंदी बारा हात अशी चौरस होती.
और मज़बह बारह हाथ लम्बा होगा और बारह हाथ चौड़ा मुरब्बा।
17 १७ तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद होती. त्याची कड दीड हात रुंद होती. तिच्यासभोवती कड अर्धा हात रुंद होता. तिचा तळभाग सभोवार एक हात उंच होता. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.”
और कुर्सी चौदह हाथ लम्बी और चौदह हाथ चौड़ी मुरब्बा' और चारों तरफ़ उसका किनारा आधा हाथ, उसका पाया चारो तरफ़ एक हाथ और उसका ज़ीना पूरब रू होगा।
18 १८ पुढे तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, प्रभू परमेश्वर म्हणतो, या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ते ती तयार करतील त्या दिवशी तिचे नियम हेच आहेत.
और उसने मुझ से कहा, ऐ आदमज़ाद, ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि मज़बह के यह हुक्म उस दिन जारी होंगे जब वह उसे बनाएँगे, ताकि उस पर सोख़्तनी क़ुर्बानी पेश करें और उस पर ख़ून छिड़कें।
19 १९ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझी सेवा करावयला माझ्याजवळ येणाऱ्या लेवी वंशातला सादोक कुळातील याजक यास पापार्पणासाठी एक गोऱ्हा दे.
और तू लावी काहिनों को जो सदूक़ की नसल से हैं, जो मेरी ख़िदमत के लिए मेरे सामने आते हैं, ख़ता की क़ुर्बानी के लिए बछड़ा देना, ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है।
20 २० तू त्याच्या रक्तातले थोडेसे घेऊन वेदीच्या चारी शिंगावर, बैठकीच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपड. अशा रीतीने तू प्रायश्चित करून शुद्ध कर.
और तू उसके खू़न में से लेना और मज़बह के चारों सींगों पर, उसकी कुर्सी के चारों कोनों पर और उसके चारो तरफ़ के हाशिए पर लगाना; इसी तरह कफ़्फ़ारा देकर उसे पाक — ओ — साफ़ करना।
21 २१ मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याने पवित्रस्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमलेल्या जागी होम करावे.
और ख़ता की क़ुर्बानी के लिए बछड़ा लेना, और वह घर की मुक़र्रर जगह में हैकल के बाहर जलाया जाएगा।
22 २२ नंतर दुसऱ्या दिवशी तू पापार्पणासाठी निर्दोष बोकड घे. जसे त्यांनी बैलाच्या होमाने वेदी शुद्ध केली तसे याजकांनी ती शुद्ध करावी.
और तू दूसरे दिन एक बे'ऐब बकरा ख़ता की क़ुर्बानी के लिए पेश करना, और वह मज़बह को कफ़्फ़ारा देकर उसी तरह पाक करेंगे, जिस तरह बछड़े से पाक किया था।
23 २३ जेव्हा तू तिचे शुद्धीकरण समाप्त करशील तेव्हा कळपातून एक निर्दोष गोऱ्हा व निर्दोष मेंढा अर्पण करशील.
और जब तू उसे पाक कर चुके तो एक बे'ऐब बछड़ा और गल्ले का एक बे'ऐब मेंढा पेश करना।
24 २४ तू हे परमेश्वरापुढे अर्पण कर. याजक त्यावर मीठ टाकील आणि ते होमार्पण करून परमेश्वरास अर्पण करतील.
और तू उनको ख़ुदावन्द के सामने लाना और काहिन उनपर नमक छिड़कें और उनको सोख़्तनी क़ुर्बानी के लिए ख़ुदावन्द के सामने पेश करें।
25 २५ तू सात दिवस, रोज एकएका निर्दोष बकऱ्याचे पापार्पण कर; एक गोऱ्हा व कळपातील एक निर्दोष मेंढा हेही अर्पण करावे.
और तू सात दिन तक हर रोज़ एक बकरा ख़ता की क़ुर्बानी के लिए तैयार कर रखना, वह एक बछड़ा और गल्ले का एक मेंढा भी जो बे'ऐब हों तैयार कर रख्खें।
26 २६ सात दिवस ते वेदीचे प्रायश्चित करतील व तिला शुद्ध करतील. अशा रीतीने त्यांनी ते पवित्रीकरण विधी करावे.
सात दिन तक वह मज़बह को कफ़्फ़ारा देकर पाक — ओ — साफ़ करेंगे और उसको मख़्सूस करेंगे।
27 २७ आणि त्यांनी ते दिवस समाप्त केल्यावर असे होईल की, आठव्या दिवशी व त्यापुढे याजक तुमची शांत्यर्पणे वेदीवर अर्पितील आणि मी तुमचा स्विकार करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
और जब यह दिन पूरे होंगे, तो यूँ होगा कि आठवें दिन और आइन्दा काहिन तुम्हारी सोख़्तनी कुर्बानियों को और तुम्हारी सलामती की कु़र्बानियों को मज़बह पर पेश करूँगे, और मैं तुम को क़ुबूल करूँगा; ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है।

< यहेज्केल 43 >