< यहेज्केल 43 >
1 १ नंतर त्या मनुष्याने जे दार पूर्वेकडे उघडते त्याकडे मला नेले.
彼われを携へて門にいたる其門は東に向ふ
2 २ तेव्हा पाहा! पूर्वेकडून इस्राएलाच्या देवाचे तेज आले. त्याचा शब्द पुष्कळ जलांच्या ध्वनीप्रमाणे होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.
時にイスラエルの神の榮光東よりきたりしがその聲大水の音のごとくにして地その榮光に照さる
3 ३ आणि जेव्हा तो नगराचा नाश करायला आला होता तेव्हा जो दृष्टांत मी पाहिला होता त्याच्यासारखे ते दृष्टांत होते, खबार नदीतीरी पाहिलेल्या दृष्टांतासारखाच हा दृष्टांत होता आणि तेव्हा मी उपडा पडलो.
其狀を見るに我がこの邑を滅しに來りし時に見たるところの狀の如くに見ゆ又ケバル河の邊にて我が見しところの形のごとき形の者あり我すなはち俯伏す
4 ४ जे दार पूर्वेकडे उघडे होते त्यातून परमेश्वराचे तेज मंदिरात आले.
ヱホバの榮光東向の門よりきたりて室に入る
5 ५ मग आत्म्याने मला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. पाहा! परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले.
靈われを引あげて内庭にたづさへいるにヱホバの榮光室に充をる
6 ६ मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले आणि तो मनुष्य माझ्या शेजारीच उभा होता.
我聽に室より我に語ふ者あり又人ありてわが傍に立つ
7 ७ तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही माझ्या सिंहासनाची व पादसनाची जागा आहे, येथे मी इस्राएलाच्या लोकांमध्ये सर्वकाळ राहीन. इस्राएल घराणे व त्याचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उंचस्थानात माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत.
彼われに言たまひけるは人の子よ吾位のある所我脚の跖のふむ所此にて我長久にイスラエルの子孫の中に居んイスラエルの家とその王等再びその姦淫とその王等の屍骸およびその崇邱をもてわが聖き名を汚すことなかるべし
8 ८ त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्याशेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभाशेजारी उभारीले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती. अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या नावास बट्टा लाविला आहे. म्हणून मी आपल्या रागाने त्यांना नष्ट केले आहे.
彼らその閾をわが閾の側に設け其門柱をわが門柱の傍に設けたれば我と其等との間には只壁一重ありしのみ而して彼ら憎むべき事等をおこなひて吾が聖名を汚したるが故に我怒りてかれらを滅したり
9 ९ आता त्यांनी आपला व्यभिचार आणि व राजांची प्रेते माझ्यापासून दूर करावी. म्हणजे मी सर्वकाळ त्यांच्यात राहीन.
彼ら今はその姦淫とその王等の屍骸をわが前より除き去ん我また彼らの中に長久に居べし
10 १० मानवाच्या मुला, तू इस्राएलाच्या घराण्याला हे घर दाखीव, अशासाठी की, त्यांनी आपल्या अन्यायामुळे लज्जित व्हावे; त्यांनी त्यांच्या वर्णनाविषयी विचार करावा.
人の子よ汝この室をイスラエルの家に示せ彼らその惡を愧ぢまたこの式樣を量らん
11 ११ कारण जे त्यांनी केले आहे त्या सर्वामुळे जर ते लज्जित होतील तर त्यांना घराचे रूप, त्याची रचना, व त्याची बाहेर निघण्याची ठिकाणे, व त्याचे प्रवेश, त्याचे सर्व आकार व त्याचे सर्व नियम व त्याचे सर्व प्रकार व त्याचे सर्व विधी दाखीव आणि हे त्याच्यासमक्ष लिही. अशासाठी की, त्यांनी त्याचा सर्व आकार व त्याचे सर्व नियम पाळावे व ते आचरावे.
彼らその爲たる諸の事を愧なば彼らに此室の製法とその式樣その出口入口その一切の製法その一切の則その一切の製法その一切の法をしらしめよ是をかれらの目の前に書て彼らにその諸の製法とその一切の則を守りてこれを爲しむべし
12 १२ हा मंदिरासाठीचा नियम आहे, पर्वतमाथ्यावरची सर्व जागा अति पवित्र आहे. पाहा, हा मंदिराचा नियम आहे.
室の法は是なり山の頂の上なるその地は四方みな最聖し是室の法なり
13 १३ हातांनी वेदीची मापे ही आहेत. तिचा तळभाग एक हात व रुंदी एक हात होईल. आणि तिची कड तिच्याकाठापाशी सभोवती एक वीत होईल आणि हा वेदीचा पाया होय.
壇の寸尺はキユビトをもて言ば左のごとしそのキユビトは一キユビトと手寛あり壇の底は一キユビト寛一キユビトその周圍の邊は半キユビト是壇の臺なり
14 १४ तिच्या तळभागापासून खालच्या बैठकीपर्यंत उंची दोन हात व रुंदी एक हात होती. वेदी लहान बैठकीपासून मोठ्या बैठकीपर्यंत चार हात व दोन हात रुंद होती.
土に坐れる底座より下の層まで二キユビト寛一キユビト又小き層より大なる層まで四キユビト寛一キユビトなり
15 १५ वेदीच्या वरच्या भागाची उंची चार हात होती. वेदीच्या अग्नीकुंडाला लागून वर गेलेली चार शिंगे होती.
正壇は四キユビト壇の上の面に四の角あり
16 १६ वेदीवरील अग्नीकुंडाची लांबी बारा हात व रुंदी बारा हात अशी चौरस होती.
壇の上の面は長十二キユビト寛十二キユビトにしてその四面角なり
17 १७ तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद होती. त्याची कड दीड हात रुंद होती. तिच्यासभोवती कड अर्धा हात रुंद होता. तिचा तळभाग सभोवार एक हात उंच होता. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.”
その層は四方とも長十四キユビト寛十四キユビトその四周の縁は半キユビトその底は四方一キユビトその階は東に向ふ
18 १८ पुढे तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, प्रभू परमेश्वर म्हणतो, या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ते ती तयार करतील त्या दिवशी तिचे नियम हेच आहेत.
彼われに言けるは人の子よ主ヱホバかく言たまふ壇を建て其上に燔祭を献げ血を灑ぐ日には是をその則とすべし
19 १९ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझी सेवा करावयला माझ्याजवळ येणाऱ्या लेवी वंशातला सादोक कुळातील याजक यास पापार्पणासाठी एक गोऱ्हा दे.
主ヱホバかく言ふ汝レビの支派ザドクの裔にして我にちかづき事ふるところの祭司等に犢なる牡牛を罪祭として與ふべし
20 २० तू त्याच्या रक्तातले थोडेसे घेऊन वेदीच्या चारी शिंगावर, बैठकीच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपड. अशा रीतीने तू प्रायश्चित करून शुद्ध कर.
又その血を取てこれをその四の角と層の四隅と四周の邊に抹り斯して之を淸め潔ようすべし
21 २१ मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याने पवित्रस्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमलेल्या जागी होम करावे.
汝罪祭の牛を取てこれを聖所の外にて殿の中の定まれる處に焚べし
22 २२ नंतर दुसऱ्या दिवशी तू पापार्पणासाठी निर्दोष बोकड घे. जसे त्यांनी बैलाच्या होमाने वेदी शुद्ध केली तसे याजकांनी ती शुद्ध करावी.
第二日に汝全き牡山羊を罪祭に献ぐべし即ちかれら牡牛をもて淸めしごとく之をもて壇を淸むべし
23 २३ जेव्हा तू तिचे शुद्धीकरण समाप्त करशील तेव्हा कळपातून एक निर्दोष गोऱ्हा व निर्दोष मेंढा अर्पण करशील.
汝潔禮を終たる時は犢なる牡牛の全き者および群の全き牡羊を献ぐべし
24 २४ तू हे परमेश्वरापुढे अर्पण कर. याजक त्यावर मीठ टाकील आणि ते होमार्पण करून परमेश्वरास अर्पण करतील.
汝これをヱホバの前に持きたるべし祭司等これに鹽を撒かけ燔祭としてヱホバに献ぐべし
25 २५ तू सात दिवस, रोज एकएका निर्दोष बकऱ्याचे पापार्पण कर; एक गोऱ्हा व कळपातील एक निर्दोष मेंढा हेही अर्पण करावे.
七日の間汝日々に牡山羊を罪祭に供ふべしまた彼ら犢なる牡牛と群の牡羊との全き者を供ふべし
26 २६ सात दिवस ते वेदीचे प्रायश्चित करतील व तिला शुद्ध करतील. अशा रीतीने त्यांनी ते पवित्रीकरण विधी करावे.
七日の間かれら壇を潔ようしこれを淸めその手を滿すべし
27 २७ आणि त्यांनी ते दिवस समाप्त केल्यावर असे होईल की, आठव्या दिवशी व त्यापुढे याजक तुमची शांत्यर्पणे वेदीवर अर्पितील आणि मी तुमचा स्विकार करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
是等の日滿て八日にいたりて後は祭司等汝らの燔祭と酬恩祭をその壇の上に奉へん我悦びて汝らを受納べし主ヱホバこれを言たまふ