< यहेज्केल 41 >

1 नंतर त्या मनुष्याने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले आणि खांब मापले तो त्याची रुंदी एका बाजूला सहा हात व दुसऱ्या बाजूला सहा हात होती.
Et introduxit me in templum, et mensus est frontes: sex cubitos latitudinis hinc, et sex cubitos latitudinis inde, latitudinem tabernaculi.
2 दाराची रुंदी दहा हात होती; त्याची भिंत एका बाजूला पाच हात व दुसरी पाच हात होती; मग मनुष्याने पवित्रस्थानाचे मोजमाप मोजले त्याची लांबी चाळीस हात व रुंदी वीस हात मापली.
Et latitudo portæ decem cubitorum erat: et latera portæ, quinque cubitis hinc, et quinque cubitis inde: et mensus est longitudinem ejus quadraginta cubitorum, et latitudinem viginti cubitorum.
3 मग तो मनुष्य परम पवित्रस्थानात गेला आणि त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व प्रत्येक बाजूच्या भिंतीची रुंदी सात हात भरली.
Et introgressus intrinsecus, mensus est in fronte portæ duos cubitos: et portam, sex cubitorum: et latitudinem portæ septem cubitorum.
4 मग त्याने खोलीची लांबी मोजली ती वीस हात होती. आणि त्याची रुंदी वीस हात मंदिरासमोर होती. मग तो मला म्हणाला, “हे परम पवित्रस्थान आहे.”
Et mensus est longitudinem ejus viginti cubitorum, et latitudinem ejus viginti cubitorum, ante faciem templi. Et dixit ad me: Hoc est Sanctum sanctorum.
5 मग मनुष्याने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती सहा हात जाड होती. मंदिराच्या सभोवती प्रत्येक बाजूला खोल्या होत्या त्या प्रत्येकाची रुंदी चार हात होती.
Et mensus est parietem domus sex cubitorum: et latitudinem lateris quatuor cubitorum undique per circuitum domus.
6 तेथे बाजूस असलेल्या खोल्या एकीवर एक अशा तीन मजली असून त्या रांगेने तीस होत्या. मंदिराच्या भोवताली असलेल्या खोल्यांसाठी जी भिंत होती तिला त्या लागलेल्या होत्या तरी त्या मंदिराच्या भिंतीला जोडलेल्या नव्हत्या.
Latera autem, latus ad latus, bis triginta tria: et erant eminentia, quæ ingrederentur per parietem domus, in lateribus per circuitum, ut continerent, et non attingerent parietem templi.
7 आणि बाजूच्या खोल्या इमारतीच्या सभोवार वरवर गेल्या तसतशा रुंद होत गेल्या आणि सभोवतालचा भाग वरवर गेला तसतसा तो रुंद होत गेला; म्हणून या इमारतीची रुंदी वरच्या बाजूस अधिक होती, अशी ती रुंदी खालच्यापेक्षा मधल्या मजल्यात व तेथल्यापेक्षा वरच्या मजल्यात वाढत गेली.
Et platea erat in rotundum, ascendens sursum per cochleam, et in cœnaculum templi deferebat per gyrum: idcirco latius erat templum in superioribus: et sic de inferioribus ascendebatur ad superiora in medium.
8 मग मी मंदिराला उंच पाया होता असे पाहिले; बाजूच्या खोल्यांचे पाये सहा हातांची एक मोठी काठी असे भरले.
Et vidi in domo altitudinem per circuitum, fundata latera ad mensuram calami sex cubitorum spatio:
9 बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंतीची जाडी पाच हात होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्यास लागून एक जागा खुली राहिली होती.
et latitudinem per parietem lateris forinsecus quinque cubitorum: et erat interior domus in lateribus domus.
10 १० या खुल्या जागेच्या दुसऱ्या बाजूला याजकासाठी बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या. ही जागा मंदिरासभोवती सर्व बाजूंनी वीस हात अंतर होती.
Et inter gazophylacia latitudinem viginti cubitorum in circuitu domus undique,
11 ११ बाजूच्या खोल्यांची दारे खुल्या जागेकडे होती. एक दरवाजा उत्तरेकडे आणि दुसरा दक्षिणेकडे होता. या खुल्या जागेची रुंदी चोहोकडून पांच हात होती.
et ostium lateris ad orationem: ostium unum ad viam aquilonis, et ostium unum ad viam australem: et latitudinem loci ad orationem, quinque cubitorum in circuitu.
12 १२ मंदिराच्या पश्चिमेस सोडलेल्या जागेतील जी इमारत होती तिची रुंदी सत्तर हात होती. तिची भिंत चोहोकडून पांच हात जाड आणि लांबी नव्वद हात लांब होती.
Et ædificium, quod erat separatum, versumque ad viam respicientem ad mare, latitudinis septuaginta cubitorum: paries autem ædificii, quinque cubitorum latitudinis per circuitum: et longitudo ejus nonaginta cubitorum.
13 १३ मग त्या मनुष्याने मंदिराचे मोजमापे केले. ती सोडलेली जागा व भिंतीसह इमारत ही शंभर हात लांब होती.
Et mensus est domus longitudinem, centum cubitorum: et quod separatum erat ædificium, et parietes ejus, longitudinis centum cubitorum.
14 १४ मंदिराची समोरची बाजू आणि पूर्वेकडील सोडलेली जागा यांची रुंदी शंभर हात होती.
Latitudo autem ante faciem domus, et ejus quod erat separatum contra orientem, centum cubitorum.
15 १५ नंतर त्या मनुष्याने मंदिराच्यामागे असलेल्या, त्या सोडलेल्या जागेपुढच्या इमारतीची लांबी व दोन्ही बाजूस असलेले सज्जे, पवित्र स्थान व अंगणातील द्वारमंडप ही सर्व शंभर हात मोजली.
Et mensus est longitudinem ædificii contra faciem ejus, quod erat separatum ad dorsum: ethecas ex utraque parte centum cubitorum: et templum interius, et vestibula atrii.
16 १६ तीनही मजल्यासभोवतालची सज्जे, आतील भिंती आणि खिडक्या, अरुंद खिडक्या आणि यांस लाकडी तावदाने होती.
Limina, et fenestras obliquas, et ethecas in circuitu per tres partes, contra uniuscujusque limen, stratumque ligno per gyrum in circuitu: terra autem usque ad fenestras, et fenestræ clausæ super ostia.
17 १७ मंदिरातल्या व बाहेरच्या बाजूची द्वाराजवळची जागा, सभोवतालच्या सर्व भिंतीचे आतील व बाहेरील माप हे योग्य होते.
Et usque ad domum interiorem, et forinsecus per omnem parietem in circuitu, intrinsecus et forinsecus, ad mensuram.
18 १८ आणि ते करुब आणि खजुरीच्या झाडांनी सजवलेले होते. प्रत्येक दोन करुबामध्ये एक खजूराचे झाड होते. आणि प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती.
Et fabrefacta cherubim et palmæ: et palma inter cherub et cherub, duasque facies habebat cherub.
19 १९ करुबाला एका खजुरीच्या झाडाकडे मनुष्याचे मुख व दुसऱ्या खजुरीच्या झाडाकडे तरुण सिंहाचे मुख होते. मंदिरावर चोहोंकडे अशाप्रकारचे काम होते.
Faciem hominis juxta palmam ex hac parte, et faciem leonis juxta palmam ex alia parte: expressam per omnem domum in circuitu.
20 २० जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत मंदिराच्या भिंतीवर करुब व खजुरीची झाडे केलेली होती.
De terra usque ad superiora portæ, cherubim et palmæ cælatæ erant in pariete templi.
21 २१ मंदिराच्या द्वारांचे खांब चौरस होते. परमपवित्रस्थानाच्या पुढच्या बाजूचे स्वरूप मंदिराच्या सारखेच होते.
Limen quadrangulum, et facies sanctuarii, aspectus contra aspectum.
22 २२ पवित्र स्थानासमोर वेदी लाकडाची असून तीन हात उंच व दोन हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या. मग त्या मनुष्याने मला म्हटले, “परमेश्वराच्या पुढे असणारे हे मेज आहे.”
Altaris lignei trium cubitorum altitudo, et longitudo ejus duorum cubitorum: et anguli ejus, et longitudo ejus, et parietes ejus lignei. Et locutus est ad me: Hæc est mensa coram Domino.
23 २३ पवित्र स्थानाला आणि परमपवित्रस्थानाला दोन दोन दारे होती.
Et duo ostia erant in templo et in sanctuario.
24 २४ प्रत्येक दरवाजाला दोन व दुसऱ्यास दोन अशा प्रत्येक तावदानाला दोन दोन बिजागऱ्या होत्या.
Et in duobus ostiis ex utraque parte bina erant ostiola quæ in se invicem plicabantur: bina enim ostia erant ex utraque parte ostiorum.
25 २५ जसे भिंतीवर केलेले होते तसे त्यावर, मंदिराच्या दारांवर करुब व खजुरीची झाडे कोरली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूस लाकडाचे छत होते.
Et cælata erant in ipsis ostiis templi cherubim, et sculpturæ palmarum, sicut in parietibus quoque expressæ erant: quam ob rem et grossiora erant ligna in vestibuli fronte forinsecus.
26 २६ द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या अरुंद खिडक्या असून त्यावर खजुरीची झाडेही कोरली होती. मंदिराच्या या बाजूच्या खोल्या आणि त्यास पुढे आलेले छतही होते.
Super quæ fenestræ obliquæ, et similitudo palmarum hinc atque inde in humerulis vestibuli, secundum latera domus, latitudinemque parietum.

< यहेज्केल 41 >