< यहेज्केल 4 >
1 १ परंतू मानवाच्या मुला, तू एक वीट घे आणि तुझ्या पुढे ठेव. व यरूशलेम शहराचे चित्र रेखाट.
Und du, Menschenkind, nimm einen Ziegel; den lege vor dich und entwirf darauf die Stadt Jerusalem
2 २ तिला वेढा पडला आहे आणि तिच्या समोर बुरुज रचून मोरचे बांधले आहेत, तिच्या पुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहे, असे चित्र काढ.
und mache eine Belagerung darum und baue ein Bollwerk darum und schütte einen Wall darum und mache ein Heerlager darum und stelle Sturmböcke rings um sie her.
3 ३ तू आपल्याकरता लोखंडाची कढई घेऊन ती लोखंडी भिंत असी तुझ्यामध्ये आणि नगराच्यामध्ये ठेव आणि तू आपले मुख तिच्याकडे कर, म्हणजे तिला घेरा पडेल आणि तू तिला वेढा घालशील. इस्राएलाच्या घराण्याला चिन्ह होईल.
Vor dich aber nimm eine eiserne Pfanne; die laß eine eiserne Mauer sein zwischen dir und der Stadt, und richte dein Angesicht gegen sie und belagere sie. Das sei ein Zeichen dem Hause Israel.
4 ४ मग आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्राएलाच्या घराण्याचे पाप स्वतःवर घे; इस्राएलाचे पाप जितके दिवस तू झोपून राहाशील, तितके दिवसाच्या गणतीप्रमाणे तू त्याचा अन्याय वाहाशील.
Du sollst dich auch auf deine linke Seite legen und die Missetat des Hauses Israel auf dieselbe legen; soviel Tage du darauf liegst, so lange sollst du auch ihre Missetat tragen.
5 ५ मी तुझ्यावर त्यांच्या शिक्षेची जबाबदारी प्रत्येक वर्षाची तीनशे नव्वद दिवस सोपवून दिली आहे, तू इस्राएलाच्या घराण्याचे अपराध वाहून नेशील.
Ich will dir aber die Jahre ihrer Missetat zur Anzahl der Tage machen, nämlich dreihundertundneunzig Tage; so lange sollst du die Missetat des Hauses Israel tragen.
6 ६ जेव्हा तू हे दिवस पूर्ण करशील, तेव्हा दुसऱ्यांदा उजव्या कुशीवर नीज, चाळीस दिवस यहूदाच्या घराण्याचे पाप तू वाहशील, मी तुला प्रत्येक वर्षाला एक दिवस सोपवून दिला आहे.
Und wenn du solches ausgerichtet hast, sollst du darnach dich auf deine rechte Seite legen und sollst tragen die Missetat des Hauses Juda vierzig Tage lang; denn ich gebe dir hier auch je einen Tag für ein Jahr.
7 ७ आपले तोंड यरूशलेमेच्या विरुध्द दिशेला कर जे चित्र रेखाटले आहेस, ज्याला वेढा पडलेला आहे, आपल्या बाहुंनी झाकु नको; आणि त्यांच्या विरुध्द भाकीत कर.
Und richte dein Angesicht und deinen bloßen Arm wider das belagerte Jerusalem und weissage wider dasselbe.
8 ८ पहा, तुला दोरीने करकचून बांधतील, तू एका बाजूहून दुसरीकडे वळू शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस.
Und sieh, ich will dir Stricke anlegen, daß du dich nicht wenden könnest von einer Seite zur andern, bis du die Tage deiner Belagerung vollendet hast.
9 ९ स्वतःसाठी तू गहू, जव, सोयाबीन, कडधान्य, बाजरी, ज्वारी, आणि काठ्या गहू घेऊन जितके दिवस तू एका बाजूस रहाशील तेवढ्या दिवसासाठी एका भांड्यात ते घे आणि आपल्यासाठी भाकर तयार कर, जे तू तीनशे नव्वद दिवस खाशील.
So nimm nun zu dir Weizen, Gerste, Bohnen, Linsen, Hirse und Spelt und tue alles in ein Faß und mache dir Brot daraus, soviel Tage du auf deiner Seite liegst, daß du dreihundertundneunzig Tage daran zu essen hast,
10 १० हे तुझ्या खाण्यासाठी वीस शेकेल वजनाचे असेल जी वेळोवेळी तुझी उपजीवीका असेल.
also daß deine Speise, die du täglich essen sollst, sei zwanzig Lot nach dem Gewicht. Solches sollst du von einer Zeit zur andern essen.
11 ११ पाणी साठ हिन मोजून वेळो वेळी तुझ्या पीण्यासाठी असेल.
Das Wasser sollst du auch nach dem Maß trinken, nämlich das sechste Teil vom Hin, und sollst solches auch von einer Zeit zur andern trinken.
12 १२ जवाची भाकर तू भाजून खा पण सर्वांदेखत मनुष्याच्या विष्टेवर भाजून खा!
Gerstenkuchen sollst du essen, die du vor ihren Augen auf Menschenmist backen sollst.
13 १३ यासाठी परमेश्वर देव “सांगतो, ती भाकर म्हणजे, इस्राएलाचे घराणे जे अपवित्र आहेत, ज्या देशातून मी त्यांना हद्दपार करेन.”
Und der HERR sprach: Also müssen die Kinder Israel ihr unreines Brot essen unter den Heiden, dahin ich sie verstoßen werde.
14 १४ परंतू मी म्हणालो “अहा, हे परमेश्वर! माझे मन कधी अपवित्र झाले नाही! जे मरण पावलेले व मारुन टाकलेले मी कधी खाल्ले नाही, विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही.”
Ich aber sprach: Ach Herr HERR! siehe, meine Seele ist noch nie unrein geworden; denn ich habe von meiner Jugend auf bis auf diese Zeit kein Aas oder Zerrissenes gegessen, und ist nie unreines Fleisch in meinen Mund gekommen.
15 १५ म्हणून तो मला म्हणाला, “पहा! मी तुला मानवाच्या विष्टे ऐवजी गाईच्या विष्टेवर स्वतःसाठी भाकर भाज.”
Er aber sprach zu mir: Siehe, ich will dir Kuhmist für Menschenmist zulassen, darauf du dein Brot machen sollst.
16 १६ तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला पहा! मी यरूशलेमेच्या भाकरीचा पुरवठा काढून टाकेन, आणि अस्वस्थतेत शिधा वाटप ते करतील आणि ते पाणी पितील जोपर्यंत शिधा कपात केली जाईल.
Und sprach zu mir: Du Menschenkind, siehe, ich will den Vorrat des Brots zu Jerusalem wegnehmen, daß sie das Brot essen müssen nach dem Gewicht und mit Kummer, und das Wasser nach dem Maß mit Kummer trinken,
17 १७ कारण त्यांना अन्नपाण्याचा तुटवडा पडून त्यांची त्रेधा उडेल व ऐकमेकात त्यांच्या अपराधामुळे ते भयभीत होतील.”
darum daß es an Brot und Wasser mangeln und einer mit dem andern trauern wird und sie in ihrer Missetat verschmachten sollen.