< यहेज्केल 38 >

1 परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
ヱホバの言我にのぞみて言ふ
2 “मानवाच्या मुला, मागोग देशातील, गोग, जो रोश, मेशेख व तुबाल यांचा अधिपती याजकडे तोंड कर. आणि त्याच्याविरुध्द भविष्य सांग.
人の子よロシ、メセクおよびトバルの君たるマゴグの地の王ゴグに汝の面をむけ之にむかひて預言し
3 म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘अरे गोगा, मेशेख व तुबाल यांच्या अधिपती, पाहा! मी तुझ्याविरूद्ध आहे.
言べし主ヱホバかく言たまふロシ、メセク、トバルの君ゴグよ視よ我なんぢを罰せん
4 म्हणून मी तुला पाठमोरा करीन आणि तुझ्या जाभाडात आकडा घालीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व घोडेस्वार यास बाहेर काढीन; ते सर्वजण पूर्ण चिलखत घालून, मोठ्या व लहान ढाली धारण केलेला, त्यासर्वांनी तलवारी धरलेला असा मोठा समुदाय मी पाठवीन.
我汝をひきもどし汝の腮に鉤をほどこして汝および汝の諸の軍勢と馬とその騎者を曳いだすべし是みな其服粧に美を極め大楯小楯をもち凡て劍を執る者にして大軍なり
5 पारस, कूश व पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरस्राणे धारण करून त्यांच्याबरोबर आहेत.
ペルシヤ、エテオピアおよびフテこれとともにあり皆楯と盔をもつ
6 त्याचप्रमाणे गोमर आणि त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेचा देश तोगार्माचे घराणे व त्याचा सेनासमूह, तसेच अनेक लोक तुजसह बाहेर काढीन.
ゴメルとその諸の軍隊北の極のトガルマの族とその諸の軍隊など衆多の民汝とともにあり
7 “सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वत: आणि तुम्हास येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. आणि तू त्यांचा सेनापती हो.
汝準備をなせ汝と汝にあつまれるところの軍隊みな備をせよ而して汝かれらの保護となれ
8 पुष्कळ दिवसानंतर तुम्हास बोलविण्यात येईल. जो देश तलवारीपासून घेतलेला आहे व पुष्कळ राष्ट्रांतील लोकांपासून मिळवलेला आहे, त्यामध्ये इस्राएलाचे पर्वत सर्वदा ओसाड होत असत त्यावर तू शेवटल्या वर्षामध्ये येशील; तथापि तो देश लोकांतून काढून घेतलेला आहे आणि ते सर्व निर्भय राहतील
衆多の日の後なんぢ罰せられん末の年に汝かの劍をのがれてかへり衆多の民の中より集りきたれる者の地にいたり久しく荒ゐたるイスラエルの山々にいたらん是は國々より導きいだされて皆安然に住ふなり
9 म्हणून तू चढून येशील, तू वादळासारखा येशील. देशाला झाकणाऱ्या ढगासारखा तू होशील, तू आणि तुझ्याबरोबरचे सैन्य व तुजसह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही त्यासारखे व्हाल.”
汝その諸の軍隊および衆多の民をひきゐて上り暴風のごとく至り雲のごとく地を覆はん
10 १० प्रभू परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात असे होईल की, तुझ्या मनात योजना येतील, तू वाईट युक्तिचा नवीन मार्ग आखशील.
主ヱホバかくいひたまふ其日に汝の心に思想おこり惡き謀計をくはだてて
11 ११ मग तू म्हणशील, मी उघड्या देशापर्यंत जाईन; ज्या देशांच्या नगराला तटबंदी नाही त्यांच्यावर मी हल्ला करीन. ते लोक सुरक्षित शांतीने राहतात, ते सर्वजण जेथे कोठे राहतात तेथे भिंती, अडसर, वेशी नाहीत त्यावर मी चालून जाईन.
言ん我平原の邑々にのぼり穩にして安然に住る者等にいたらん是みな石垣なくして居り關も門もあらざる者なりと
12 १२ अशासाठी की, तू लूट करावी व शिकार धरावी, आणि जी उजाड स्थाने वसली आहेत त्यावर, व जे लोक राष्ट्रांमधून एकवटलेले आहेत, ज्यांनी गुरे व धन ही प्राप्त करून घेतली आहेत, जे पृथ्वीच्या मध्यभागी वसतात त्यांच्यावरही तू आपला हात चालवावा.
斯して汝物を奪ひ物を掠め汝の手をかへして彼の人の住むにいたれる墟址を攻め又かの國々より集りきたりて地の墺區にすみて群と財寶をもつところの民をせめんとす
13 १३ “शबा आणि ददान आणि तार्शीशाचे व्यापारी, त्यांच्याबरोबरचे सर्व तरुण सिंह ते सर्व तुम्हास तुला म्हणतील, ‘तू लूट करायला आलास काय? सोने व चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता, चोरून लुटून नेण्यासाठी, मोठी लूट हस्तगत करण्यासाठी तू आपली सेना जमवली आहेस का?”
シバ、デダン、タルシシの商賈およびその諸の小獅子汝に言ん汝物を奪はんとて來れるや汝物を掠めんために軍隊をあつめしや金銀をもちさり群と財寶を取り多くの物を奪はんとするやと
14 १४ म्हणून हे मानवाच्या मुला, गोगाला भविष्य सांग, “प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ‘त्या दिवसात जेव्हा माझे इस्राएल लोक सुरक्षीत राहतील, तेव्हा तुला हे कळणार नाही का?
是故に人の子よ汝預言してゴグに言へ主ヱホバかくいひたまふ其日に汝わが民イスラエルの安然に住むを知ざらんや
15 १५ तू आपल्या स्थानातून अगदी उत्तरेकडच्या दूरच्या प्रदेशातून मोठ्या सैन्याने, त्यातील सर्व घोड्यांवर स्वार होऊन मोठा समुदाय व विशाल सैन्य असे येतील.
汝すなはち北の極なる汝の處より來らん衆多の民汝とともにあり皆馬に乗る其軍隊は大にしてその軍勢は夥多し
16 १६ “तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसात माझ्या देशाशी लढावयास मी तुला आणिन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे.”
而して汝わが民イスラエルに攻きたり雲のごとくに地を覆はんゴグよ末の日にこの事あらんすなはち我汝をわが地に攻きたらしめ汝をもて我の聖き事を國々の民の目のまへにあらはして彼らに我をしらしむべし
17 १७ परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्यावेळी, मी पूर्वी जे तुझ्याजवळ बोललो होतो, ते लोकांस आठवेल. मी माझ्या सेवकांचा, इस्राएलाच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला हेही त्यांना आठवेल ‘मी तुला त्यांच्याविरुद्ध लढावयास आणिन असे इस्राएलाच्या संदेष्ट्यांनी, माझ्यावतीने, पूर्वीच सांगितल्याचे त्यांना स्मरेल.”
主ヱホバかく言たまふ我の昔日わが僕なるイスラエルの預言者等をもて語りし者は汝ならずや即ち彼ら其頃年ひさしく預言して我汝を彼らに攻きたらしめんと言り
18 १८ म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करील त्या दिवसात असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील.
主ヱホバいひたまふ其日すなはちゴグがイスラエルの地に攻來らん日にわが怒面にあらはるべし
19 १९ कारण मी आपल्या रागाच्या भरात आवेशाने व आपल्या क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे. इस्राएल देशामध्ये त्या दिवशी खचित मोठा भूकंप होईल.
我嫉妬と燃たつ怒をもて言ふ其日には必ずイスラエルの地に大なる震動あらん
20 २० त्यावेळी सर्व सजीव भीतीने कापतील. समुद्रातील मासे, हवेत भराऱ्या मारणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे सर्व छोटे जीव आणि सर्व माणसे ह्यांच्या भीतीने थरकाप उडेल. पर्वत व कडे कोसळतील. प्रत्येक भिंत जमीनदोस्त होईल.”
海の魚空の鳥野の獣凡て地に匍ふところの昆蟲凡て地にある人わが前に震へん又山々崩れ嶄巌たふれ石垣みな地に仆れん
21 २१ कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपल्या सर्व पर्वतावर त्याच्याविरुध्द तलवार बोलावीन. प्रत्येक मनुष्याची तलवार आपल्या भावाविरूद्ध चालेल.
主ヱホバいひたまふ我劍をわが諸の山に召きたりて彼をせめしめん人々の劍その兄弟を撃べし
22 २२ आणि मरी व रक्ताने मी त्याजबरोबर वाद मांडीन. त्याजवर, त्यांच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर जे पुष्कळ प्रकारचे लोक असतील त्यांच्यावर पुराचा पाऊस व मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
我疫病と血をもて彼の罪をたださん我漲ぎる雨と雹と火と硫磺を彼とその軍勢および彼とともなる多の民の上に降すべし
23 २३ मग मी आपला महिमा व पवित्रता दाखवून देईन आणि माझी ओळख पुष्कळ राष्ट्रांना करून देईन; तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.
而して我わが大なることと聖きことを明かにし衆多の國民の目のまへに我を示さん彼らはすなはち我のヱホバなることをしるべし

< यहेज्केल 38 >