< यहेज्केल 37 >
1 १ परमेश्वराचा हात माझ्यावर आला, परमेश्वराच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले आणि खाली दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती हाडांनी भरलेली होती.
Ręka PANA była nade mną i on wyprowadził mnie w duchu PANA, i postawił mnie w środku doliny, która była pełna kości;
2 २ मग त्याने मला त्यामधून गोल व गोल चालवले. पाहा! दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होती. आणि पाहा! ती हाडे अगदी सुकलेली होती.
Przeprowadził mnie obok nich dokoła, a oto było ich bardzo dużo na obszarze tej doliny, a oto były bardzo wyschłe.
3 ३ तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे पुन्हा जिवंत होऊ शकतील का?” मग मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, फक्त तुलाच माहीत आहे.”
I powiedział do mnie: Synu człowieczy, czy te kości ożyją? Odpowiedziałem: Panie BOŻE, ty wiesz.
4 ४ मग तो मला म्हणाला, “त्या हाडांविषयी भविष्य सांग आणि त्यांना म्हण, सुकलेल्या हाडांनो परमेश्वराचे वचन ऐका.
Wtedy powiedział do mnie: Prorokuj o tych kościach i mów do nich: Wyschłe kości, słuchajcie słowa PANA.
5 ५ प्रभू परमेश्वर या हाडांस असे म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालीन व तुम्ही जिवंत व्हाल.
Tak mówi Pan BÓG do tych kości: Oto sprawię, że wstąpi w was tchnienie i ożyjecie;
6 ६ मी तुमच्यावर स्नायू लावीन आणि मांस चढवीन आणि मी तुम्हास त्वचेने आवरण घालीन आणि तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही जिवंत व्हाल. मग तुम्हास समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.”
Nałożę na was ścięgna i sprawię, że obrośniecie ciałem, oblekę was w skórę, i włożę w was tchnienie, i ożyjecie. I poznacie, że ja jestem PANEM.
7 ७ म्हणून मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी भविष्य सांगितले; जसे मी भविष्य सांगत असता, आवाज आला. पाहा भूकंप होऊन हाडांना हाड लागून एकमेकांशी जवळ येऊन जोडली गेली.
Prorokowałem więc, jak mi rozkazano. A gdy prorokowałem, powstał szum, a oto poruszenie; i kości zbliżyły się [do siebie], kość do swojej kości.
8 ८ मी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले व त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता.
I spojrzałem, a oto pojawiły się na nich ścięgna, obrosły ciałem i skóra je powlekła z wierzchu, ale nie było w nich tchnienia.
9 ९ मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला वाऱ्याला भविष्य सांग, भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशेने ये व वधलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते पुन्हा जिवंत होतील.”
I powiedział do mnie: Prorokuj do wiatru, prorokuj, synu człowieczy, i powiedz do wiatru: Tak mówi Pan BÓG: Przyjdź od czterech wiatrów, tchnienie, i powiej na tych zabitych, i niech ożyją.
10 १० मग मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्य सांगितले, तेव्हा त्यामध्ये श्वास येऊन ते जिवंत झाले व ते अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले.
Prorokowałem więc, jak mi rozkazał, i wstąpiło w nie tchnienie, a ożyły i stanęły na nogach, bardzo, bardzo liczne wojsko.
11 ११ आणि देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे म्हणजे सर्व इस्राएल घराणेच आहे. पाहा ते म्हणतात, आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हास आशा राहिलेली नाही. आम्हास नाशासाठी कापून टाकले आहे.
I powiedział do mnie: Synu człowieczy, te kości to cały dom Izraela. Oto mówią: Nasze kości wyschły, nasza nadzieja przepadła, jesteśmy zgubieni.
12 १२ म्हणून भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरी उघडून तुम्हास कबरीतून बाहेर काढीन. आणि मी तुम्हास इस्राएलाच्या भूमीत परत आणीन.
Dlatego prorokuj i mów do nich: Tak mówi Pan BÓG: Oto otworzę wasze groby i wyprowadzę was z waszych grobów, ludu mój, i przyprowadzę was do ziemi Izraela.
13 १३ माझ्या लोकांनो, जेव्हा मी तुमच्या कबरी उघडीन व त्यातून तुम्हास बाहेर काढीन तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे.
I poznacie, że ja jestem PANEM, gdy otworzę wasze groby i wyprowadzę was z waszych grobów, ludu mój.
14 १४ मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन म्हणजे मग तुम्ही जिवंत व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या स्वतःच्या देशात विसावा देईन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”
Włożę w was mojego ducha i ożyjecie, i osadzę was w waszej ziemi. I poznacie, że ja, PAN, to powiedziałem i uczyniłem, mówi PAN.
15 १५ मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
I doszło do mnie słowo PANA mówiące:
16 १६ तर “मानवाच्या मुला, आता तू आपल्यासाठी एक काठी घे आणि तिच्यावर लिही, यहूदा आणि त्याचे सहकारी इस्राएलाचे लोक यांच्यासाठी. आणि दुसरी काठी घे व तिच्यावर लिही, योसेफासाठी म्हणजे एफ्राईमाची शाखा व त्यांचे सहकारी सर्व इस्राएलाचे लोक यासाठी आहे.
A ty, synu człowieczy, weź sobie kawałek drewna i napisz na nim: Dla Judy i synów Izraela, jego towarzyszy. Weź też drugi [kawałek] drewna i napisz na nim: Dla Józefa, drewno Efraima i całego domu Izraela, jego towarzyszy.
17 १७ मग त्या दोन्ही एकत्र आणून त्यांची एक काठी कर म्हणजे त्या तुझ्या हातांत एक होतील.
I złóż je jedno z drugim w jeden kawałek, aby stanowiły jedno w twoim ręku.
18 १८ जेव्हा तुझे लोक तुझ्याशी बोलतील आणि म्हणतील, या तुझ्या गोष्टींचा अर्थ काय आहे हे आम्हास सांगणार नाहीस काय?
A gdy synowie twego ludu zapytają cię: Czy nie oznajmisz nam, co przez to rozumiesz?
19 १९ मग त्यांना सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, योसेफाची जी काठी एफ्राईमाच्या हाती आहे तिला आणि इस्राएलाचे जे वंश त्यांचे सहकारी आहेत त्यांना घेऊन मी यहूदाच्या काठीबरोबर जोडीन, यासाठी की त्यांना एक काठी करीन आणि ते माझ्या हातांत एक होतील.
Powiesz im: Tak mówi Pan BÓG: Oto wezmę drewno Józefa, które jest w ręku Efraima oraz pokolenia Izraela, jego towarzyszy, i przyłożę je do tamtego, do drewna Judy, i uczynię je jednym drewnem, i staną się jednym w moim ręku.
20 २० नंतर ज्या काठ्यांवर तू लिहिशील त्या त्यांच्या डोळ्यासमोर तुझ्या हातात धर.
A te drewna, na których napiszesz, będą w twoim ręku na ich oczach.
21 २१ मग त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी इस्राएल लोकांस ज्या राष्ट्रांत ते गेले आहेत, तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सभोवतालच्या देशातून गोळा करीन. कारण मी त्यांना त्यांच्या देशात आणीन.
Potem powiedz do nich: Tak mówi Pan BÓG: Oto wezmę synów Izraela spośród narodów, do których przybyli, zgromadzę ich zewsząd i przyprowadzę ich do ich ziemi.
22 २२ मी या देशात इस्राएलाच्या पर्वतावर त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील. यापुढे ती दोन राष्ट्रे राहणार नाहीत, त्यांचे यापुढे दोन राज्यात विभाजन होणार नाही.
I uczynię ich jednym narodem w ziemi, na górach Izraela, i jeden król będzie królem nad nimi wszystkimi. Nie będą już dwoma narodami i już nie podzielą się na dwa królestwa.
23 २३ मग ते यापुढे आपल्या स्वत: ला मूर्तीपुढे वा त्यांच्या तिरस्करणीय वस्तूंनी किंवा त्यांचे कोणतेही पापांनी आपणाला विटाळविणार नाहीत. त्यांनी ज्या आपल्या राहण्याच्या स्थानात पाप केले आहे त्या सर्वातून मी त्यांना तारीन व त्यांना शुद्ध करीन, यासाठी की, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.
Nie splugawią się już swymi bożkami i obrzydliwościami oraz wszelkimi występkami. Wybawię ich ze wszystkich ich miejsc zamieszkania, gdzie zgrzeszyli, i oczyszczę ich. I będą moim ludem, a ja będę ich Bogiem.
24 २४ दावीद माझा सेवक त्यांच्यावर राजा होईल. त्या सर्वांवर एकच मेंढपाळ असेल, आणि ते माझ्या निर्णयानुसार चालतील आणि माझे नियम राखून ठेवतील व त्याचे पालन करतील.
Mój sługa Dawid będzie królem nad nimi i wszyscy będą mieli jednego pasterza. Będą chodzić według moich sądów, [będą] przestrzegać moich ustaw i wykonywać je.
25 २५ जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला, जेथे तुमचे पूर्वज राहत होते. त्यामध्ये ते वस्ती करतील, तेथे ते व त्यांची मुले, व त्यांची नातवंडे सर्वकाळ तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा सर्वकाळचा अधिपती होईन.
I zamieszkają w tej ziemi, którą dałem mojemu słudze Jakubowi, w której mieszkali wasi ojcowie; będą w niej mieszkali, oni, ich synowie i synowie ich synów, aż na wieki, a mój sługa Dawid [będzie] ich księciem na wieki.
26 २६ मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन. तो त्यांच्याशी सर्वकाळचा करार होईल. मी त्यांना घेऊन बहुगुणीत करीन आणि मी आपले पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ स्थापीन.
Zawrę też z nimi przymierze pokoju, które będzie przymierzem wiecznym z nimi. Osadzę ich i rozmnożę, i umieszczę swoją świątynię pośród nich na wieki.
27 २७ माझे निवासस्थान त्यांच्यामध्ये राहील. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
Mój przybytek będzie wśród nich i będę ich Bogiem, a oni będą moim ludem.
28 २८ जेव्हा माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की, इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”
I poznają narody, że ja jestem PANEM, który uświęca Izraela, gdy moja świątynia będzie wśród nich na wieki.