< यहेज्केल 37 >

1 परमेश्वराचा हात माझ्यावर आला, परमेश्वराच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले आणि खाली दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती हाडांनी भरलेली होती.
Und es war auf mir Jehovahs Hand, und Er brachte mich heraus im Geist Jehovahs, und ließ mich nieder inmitten einer Talebene, und sie war voll von Gebeinen.
2 मग त्याने मला त्यामधून गोल व गोल चालवले. पाहा! दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होती. आणि पाहा! ती हाडे अगदी सुकलेली होती.
Und Er ließ mich darüber hinziehen ringsum und ringsum, und siehe, ihrer waren sehr viel auf der Fläche der Talebene; und siehe, sie waren gar sehr verdorrt.
3 तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे पुन्हा जिवंत होऊ शकतील का?” मग मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, फक्त तुलाच माहीत आहे.”
Und er sprach zu mir: Menschensohn, werden diese Gebeine leben? Und ich sprach: Herr Jehovah, Du weißt es.
4 मग तो मला म्हणाला, “त्या हाडांविषयी भविष्य सांग आणि त्यांना म्हण, सुकलेल्या हाडांनो परमेश्वराचे वचन ऐका.
Und Er sprach zu mir: Weissage über diese Gebeine und sprich zu ihnen: Ihr verdorrte Gebeine, hört das Wort Jehovahs.
5 प्रभू परमेश्वर या हाडांस असे म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालीन व तुम्ही जिवंत व्हाल.
So spricht der Herr Jehovah zu diesen Gebeinen: Siehe, Ich bringe Geist in euch, auf daß ihr lebet;
6 मी तुमच्यावर स्नायू लावीन आणि मांस चढवीन आणि मी तुम्हास त्वचेने आवरण घालीन आणि तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही जिवंत व्हाल. मग तुम्हास समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.”
Und Ich gebe Sehnen auf euch, und lasse Fleisch auf euch heraufkommen und überdecke euch mit Haut, und gebe Geist in euch, auf daß ihr lebet, und ihr sollt wissen, daß Ich Jehovah bin.
7 म्हणून मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी भविष्य सांगितले; जसे मी भविष्य सांगत असता, आवाज आला. पाहा भूकंप होऊन हाडांना हाड लागून एकमेकांशी जवळ येऊन जोडली गेली.
Und ich weissagte, wie mir geboten war, und es ward eine Stimme, als ich weissagte, und siehe, ein Beben und die Gebeine nahten sich, Gebein zu seinem Gebein.
8 मी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले व त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता.
Und ich sah und siehe, über sie kamen herauf Sehnen und Fleisch, und es überdeckte sie Haut von oben; und es war kein Geist in ihnen.
9 मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला वाऱ्याला भविष्य सांग, भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशेने ये व वधलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते पुन्हा जिवंत होतील.”
Und Er sprach zu mir: Weissage über den Geist! Weissage, Menschensohn, und sprich zum Geist: So spricht der Herr Jehovah: Von den vier Winden komme Geist, und hauche diese Erwürgten an, auf daß sie leben.
10 १० मग मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्य सांगितले, तेव्हा त्यामध्ये श्वास येऊन ते जिवंत झाले व ते अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले.
Und ich weissagte, wie Er mir gebot; und der Geist kam in sie, und sie lebten, und sie standen auf ihren Füßen, eine sehr, sehr große Streitmacht.
11 ११ आणि देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे म्हणजे सर्व इस्राएल घराणेच आहे. पाहा ते म्हणतात, आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हास आशा राहिलेली नाही. आम्हास नाशासाठी कापून टाकले आहे.
Und Er sprach zu mir: Menschensohn, diese Gebeine, sie sind das ganze Haus Israel. Siehe, sie sprechen: Verdorrt sind unsere Gebeine, und verloren unsere Hoffnung, wir sind abgeschnitten!
12 १२ म्हणून भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरी उघडून तुम्हास कबरीतून बाहेर काढीन. आणि मी तुम्हास इस्राएलाच्या भूमीत परत आणीन.
Darum weissage und sprich zu ihnen: Also spricht der Herr Jehovah: Siehe, Ich öffne eure Gräber und bringe euch herauf aus euren Gräbern, Mein Volk, und bringe euch hinein auf den Boden Israels.
13 १३ माझ्या लोकांनो, जेव्हा मी तुमच्या कबरी उघडीन व त्यातून तुम्हास बाहेर काढीन तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे.
Und ihr sollt wissen, daß Ich Jehovah bin, wenn eure Gräber Ich geöffnet und euch, Mein Volk, aus euren Gräbern habe lassen aufsteigen;
14 १४ मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन म्हणजे मग तुम्ही जिवंत व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या स्वतःच्या देशात विसावा देईन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”
Und gebe Meinen Geist in euch, auf daß ihr lebet, und lasse euch auf euren Boden nieder, auf daß ihr wisset, daß Ich, Jehovah, es habe geredet und getan, spricht Jehovah.
15 १५ मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
Und es geschah Jehovahs Wort an mich, sprechend:
16 १६ तर “मानवाच्या मुला, आता तू आपल्यासाठी एक काठी घे आणि तिच्यावर लिही, यहूदा आणि त्याचे सहकारी इस्राएलाचे लोक यांच्यासाठी. आणि दुसरी काठी घे व तिच्यावर लिही, योसेफासाठी म्हणजे एफ्राईमाची शाखा व त्यांचे सहकारी सर्व इस्राएलाचे लोक यासाठी आहे.
Und du, Menschensohn, nimm ein Holz dir und schreibe darauf: Dem Jehudah und den Söhnen Israels, seinen Gefährten; und nimm ein Holz und schreibe darauf: Dem Joseph, das Holz Ephraims und des ganzen Hauses Israels, seiner Gefährten!
17 १७ मग त्या दोन्ही एकत्र आणून त्यांची एक काठी कर म्हणजे त्या तुझ्या हातांत एक होतील.
Und bringe sie für dich nahe, eins zum anderen, zu einem Holz, daß sie eins seien in deiner Hand.
18 १८ जेव्हा तुझे लोक तुझ्याशी बोलतील आणि म्हणतील, या तुझ्या गोष्टींचा अर्थ काय आहे हे आम्हास सांगणार नाहीस काय?
Und wie die Söhne deines Volkes zu dir sprechen und sagen: Willst du uns nicht ansagen, was dir das sein soll?
19 १९ मग त्यांना सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, योसेफाची जी काठी एफ्राईमाच्या हाती आहे तिला आणि इस्राएलाचे जे वंश त्यांचे सहकारी आहेत त्यांना घेऊन मी यहूदाच्या काठीबरोबर जोडीन, यासाठी की त्यांना एक काठी करीन आणि ते माझ्या हातांत एक होतील.
Rede du zu ihnen: So spricht der Herr Jehovah: Siehe, Ich nehme Josephs Holz, das in der Hand Ephraims und der Stämme Israels, seiner Gefährten, ist, und Ich gebe sie, die darauf sind, zum Holze Jehudahs und mache sie zu einem Holz, auf daß sie eins seien in Meiner Hand.
20 २० नंतर ज्या काठ्यांवर तू लिहिशील त्या त्यांच्या डोळ्यासमोर तुझ्या हातात धर.
Und sie sollen die Hölzer, auf die du geschrieben hast, in deiner Hand vor ihren Augen sein.
21 २१ मग त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी इस्राएल लोकांस ज्या राष्ट्रांत ते गेले आहेत, तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सभोवतालच्या देशातून गोळा करीन. कारण मी त्यांना त्यांच्या देशात आणीन.
Und rede du zu ihnen: Also spricht der Herr Jehovah: Siehe, Ich nehme die Völker Israels heraus von den Völkerschaften, dahin sie gegangen waren, und bringe sie zusammen von ringsumher und bringe sie herein auf ihren Boden;
22 २२ मी या देशात इस्राएलाच्या पर्वतावर त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील. यापुढे ती दोन राष्ट्रे राहणार नाहीत, त्यांचे यापुढे दोन राज्यात विभाजन होणार नाही.
Und Ich mache sie zu einer Völkerschaft im Lande auf Israels Bergen, und ein König soll für sie alle König sein, daß nicht mehr zwei Völkerschaften seien und sie nicht noch in zwei Reiche mehr sich teilen.
23 २३ मग ते यापुढे आपल्या स्वत: ला मूर्तीपुढे वा त्यांच्या तिरस्करणीय वस्तूंनी किंवा त्यांचे कोणतेही पापांनी आपणाला विटाळविणार नाहीत. त्यांनी ज्या आपल्या राहण्याच्या स्थानात पाप केले आहे त्या सर्वातून मी त्यांना तारीन व त्यांना शुद्ध करीन, यासाठी की, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.
Und nicht werden sie sich mehr mit ihren Götzen und ihren Scheusalen und auf all ihren Übertretungen verunreinigen. Und Ich rette sie aus allen ihren Wohnsitzen, worin sie sündigten, und reinige sie, daß sie Mein Volk werden, und Ich ihnen Gott sei.
24 २४ दावीद माझा सेवक त्यांच्यावर राजा होईल. त्या सर्वांवर एकच मेंढपाळ असेल, आणि ते माझ्या निर्णयानुसार चालतील आणि माझे नियम राखून ठेवतील व त्याचे पालन करतील.
Und Mein Knecht David wird König sein über sie und wird ein Hirte sein für sie alle, und in Meinen Rechten werden sie wandeln, und halten Meine Satzungen und sie tun.
25 २५ जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला, जेथे तुमचे पूर्वज राहत होते. त्यामध्ये ते वस्ती करतील, तेथे ते व त्यांची मुले, व त्यांची नातवंडे सर्वकाळ तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा सर्वकाळचा अधिपती होईन.
Und werden in dem Lande wohnen, das Ich Meinem Knechte, dem Jakob, gegeben habe, in dem wohnten eure Väter, und in ihm werden wohnen sie und ihre Söhne und ihrer Söhne Söhne in Ewigkeit, und Mein Knecht David soll ihr Fürst sein ewiglich.
26 २६ मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन. तो त्यांच्याशी सर्वकाळचा करार होईल. मी त्यांना घेऊन बहुगुणीत करीन आणि मी आपले पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ स्थापीन.
Und Ich will einen Bund des Friedens mit ihnen schließen, ein Bund der Ewigkeit soll es für sie sein. Und Ich gebe sie und mehre sie und gebe Mein Heiligtum in ihre Mitte ewiglich.
27 २७ माझे निवासस्थान त्यांच्यामध्ये राहील. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
Und Meine Wohnung soll sein bei ihnen, und Ich will ihr Gott sein und sie sollen Mein Volk sein.
28 २८ जेव्हा माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की, इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”
Und die Völkerschaften sollen wissen, daß Ich, Jehovah, Israel heilige, wenn Mein Heiligtum ewiglich in ihrer Mitte ist.

< यहेज्केल 37 >