< यहेज्केल 36 >
1 १ आता मानवाच्या मुला, तू इस्राएलाच्या पर्वताला भविष्य सांग आणि म्हण, इस्राएलामधील पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
Wena-ke ndodana yomuntu, profetha kuzo izintaba zakoIsrayeli, uthi: Lina zintaba zakoIsrayeli, zwanini ilizwi leNkosi.
2 २ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण शत्रू तुमच्याविषयी म्हणतात की, अहा! आणि प्राचीन उंच ठिकाणे आमची मालमत्ता झाली आहे.
Itsho njalo iNkosi uJehova: Ngoba isitha sitshilo simelene lani: Aha, ngitsho izindawo zasendulo eziphakemeyo ziyilifa lethu;
3 ३ “म्हणून तू भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, ‘कारण त्यांनी तुमचा नाश केला आणि तुम्ही उरलेल्या राष्ट्रांना वतन व्हावे म्हणून त्यांनी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही लोकांच्या तोंडी व जिभेने व गोष्टीचा निंदेचा विषय असे झाले आहात.”
ngakho profetha uthi: Itsho njalo iNkosi uJehova: Ngoba, yebo, ngoba bakwenze incithakalo, baliginya inhlangothi zonke, ukuze libe yilifa kuyo insali yabezizwe, liphakanyiswa endebeni zolimi, laba lunyeyo lwabantu;
4 ४ म्हणून, इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर पर्वत, व उंच टेकड्या, झरे, व दऱ्या उजाड आणि सोडून दिलेली नगरे यांना असे सांगतो की,
ngakho, lina zintaba zakoIsrayeli, zwanini ilizwi leNkosi uJehova: Itsho njalo iNkosi uJehova ezintabeni, lemaqaqeni, emifuleni, lezihotsheni, lemanxiweni achithekileyo, lemizini etshiyiweyo, esibe yimpango lenhlekisa kunsali yezizwe ezizingelezeleyo.
5 ५ “यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो की, खचित मी आपल्या आवेशाच्या अग्नीने पेटून उरलेल्या राष्ट्रांविषयी व अदोमाविषयी बोललो आहे. त्यांनी माझ्या देशाला लुटून रिकामे करावे म्हणून त्यांनी उल्लासीत हृदयाने, त्यांच्या मनातील तिरस्काराने, त्यांच्या कुरणासाठी घेतली.”
Ngakho itsho njalo iNkosi uJehova: Isibili ngomlilo wobukhwele bami sengikhulume ngimelene lensali yabezizwe, ngimelene leEdoma yonke, abazinikele ilizwe lami ukuthi libe yilifa ngentokozo yenhliziyo yonke, ngengqondo yokudelela, ngenxa yokuliphosa libe yimpango.
6 ६ “म्हणून, इस्राएल देशाला भविष्य सांग, आणि पर्वत, व टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी आपल्या आवेशाने आणि रागाने बोललो आहे. कारण, तुम्हास राष्ट्रांकडून अपमान सहन करावा लागला.”
Ngakho profetha ngelizwe lakoIsrayeli, uthi ezintabeni, lemaqaqeni, emifuleni, lezihotsheni: Itsho njalo iNkosi uJehova: Khangela, ngikhulumile ebukhweleni bami lelakeni lwami, ngoba lithwele ihlazo lezizwe.
7 ७ म्हणून, प्रभू परमेश्वर, म्हणतो, “मी आपला हात उंचावून वचन देतो की, तुमच्या भोवतालची राष्ट्रे खचित अप्रतिष्ठा पावतील.”
Ngakho itsho njalo iNkosi uJehova: Mina ngiphakamisile isandla sami. Isibili izizwe ezilihanqileyo, yizo ezizathwala ihlazo lazo.
8 ८ “पण इस्राएलाच्या पर्वतांनो, तुम्हावरील झाडास फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांसाठी फळे द्याल असे लवकरच घडून येईल.
Kodwa lina, zintaba zakoIsrayeli, lizaveza ingatsha zenu, lithele isithelo senu kubantu bami uIsrayeli, ngoba basondela ukubuya.
9 ९ कारण पाहा, मी तुम्हास अनुकूल आहे, आणि मी तुम्हाकडे वळेल, मग तुम्ही मशागत केलेले, व बी पेरलेले व्हाल.
Ngoba, khangelani, ngilani, ngiphendukele ngakini, njalo lizalinywa lihlanyelwe.
10 १० म्हणून मी तुम्हावर मनुष्याची, इस्राएलाचे सर्व घराणे, ते सर्वच बहुतपट करीन, आणि नगरे वसतील आणि ओसाड झालेली ठिकाणे पुन्हा उभारली जातील.
Njalo ngizakwandisa abantu phezu kwenu, yonke indlu kaIsrayeli, yona yonke; lemizi izahlalwa, lamanxiwa azakwakhiwa.
11 ११ मनुष्य व पशू यांना बहुतपट करीन आणि ते वाढतील व फळ देणारे होतील; पूर्वीच्याप्रमाणे लोक राहू लागतील. आणि तुमच्या पूर्वदिवसात केले त्यापेक्षा तुमचे मी अधिक कल्याण करीन मग तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे.
Njalo ngizakwandisa phezu kwenu umuntu lenyamazana, njalo kuzakwanda kuthele izithelo; ngilenze lihlale njengasezindaweni zenu zendulo, ngikwenze kube kuhle kulezikhathi zenu zokuqala. Khona lizakwazi ukuthi ngiyiNkosi.
12 १२ मी मनुष्ये, म्हणजे माझे इस्राएल लोक आणीन, ते तुमच्यावर चालतील असे मी करीन. ते तुझा ताबा घेतील आणि तू त्यांचे वतन होशील, आणि तू त्यांच्या मुलांच्या मरणाचे कारण होणार नाहीस.”
Yebo ngizakwenza abantu bahambe phezu kwenu, abantu bami uIsrayeli; badle ilifa lakho, wena ube yilifa labo, kawusayikubenza bafelwe ngabantwana futhi.
13 १३ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण लोक तुम्हास म्हणतात, “तू लोकांस खाणारा देश आहेस, आणि तुझ्या देशाची मुले मरत आहेत.
Itsho njalo iNkosi uJehova: Ngoba bathi kini: Wena ungumudli wabantu, wenze izizwe zakho zifelwe ngabantwana.
14 १४ यास्तव यापुढे तू लोकांस खाणार नाहीस, आणि पुन्हा तू आपल्या राष्ट्राला त्यांच्या मृत्यूचा शोक करण्यास लावणार नाहीस.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Ngakho kawusayikudla abantu, kawusayikukhubekisa izizwe zakho, itsho iNkosi uJehova.
15 १५ “किंवा यापुढे मी तुला पुन्हा राष्ट्रांचा अपमान ऐकू देणार नाही. तुला लोकांची निंदा पुन्हा सहन करावी लागणार नाही किंवा तुझ्या राष्ट्रास पडू देणार नाहीस.” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
Njalo kangisayikuzwakalisa kuwe ihlazo lezizwe, kawusayikuthwala inhloni zabantu, kawusayikukhubekisa izizwe, itsho iNkosi uJehova.
16 १६ मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
Ilizwi leNkosi lafika kimi futhi lisithi:
17 १७ “मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे त्यांच्या देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मार्गाने व कृत्यांनी तो देश भ्रष्ट केला. त्यांचे मार्ग माझ्यापुढे रजस्रावी स्त्रीच्या विटाळाप्रमाणे आहेत.
Ndodana yomuntu, abendlu kaIsrayeli besahlala elizweni lakibo, balingcolisa ngendlela yabo langezenzo zabo; indlela yabo phambi kwami yayifanana lokungcola kowesifazana osemfuleni.
18 १८ म्हणून त्यांनी जे रक्त भूमीवर पाडले होते त्यामुळे, आणि त्यांनी आपल्या मूर्तींनी तिला अशुद्ध केले होते त्यामुळे मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतला.
Ngakho ngathululela ulaka lwami phezu kwabo ngenxa yegazi ababelichithe elizweni, langenxa yezithombe zabo ababelingcolise ngazo.
19 १९ मी त्यांना राष्ट्रांमध्ये पसरविले आणि सर्व देशात विखरुन टाकले. मी त्यांच्या मार्गाप्रमाणे व त्यांच्या कृत्याप्रमाणे न्याय केला.
Ngasengibahlakaza phakathi kwezizwe, basabalaliswa phakathi kwamazwe; ngabahlulela njengokwendlela yabo lanjengokwezenzo zabo.
20 २० मग ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले आणि ते जेथे कोठे गेले, तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले, तेव्हा लोक त्यांना म्हणाले, हे खरेच परमेश्वराचे लोक आहेत का? कारण त्यांना त्याच्या देशातून बाहेर फेकून दिले आहे.
Lapho befika kwabezizwe, lapho abaya khona, bangcolisa ibizo lami elingcwele, lapho kwathiwa ngabo: Laba ngabantu beNkosi, baphume elizweni layo.
21 २१ पण इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रात गेले त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले. तेव्हा मी आपल्या नावास जपलो.
Kodwa ngalihawukela ibizo lami elingcwele, indlu kaIsrayeli eyayilingcolise phakathi kwezizwe, lapho abaya khona.
22 २२ म्हणून इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल घराण्यांनो, मी हे तुमच्यासाठी करत नाही, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव भ्रष्ट केलेत त्याकरता मी हे करत आहे.
Ngakho tshono kuyo indlu kaIsrayeli: Itsho njalo iNkosi uJehova: Kangikwenzi ngenxa yenu, lina ndlu kaIsrayeli, kodwa ngenxa yebizo lami elingcwele, elilingcolisileyo phakathi kwezizwe, lapho elaya khona.
23 २३ कारण तुम्ही माझ्या महान नावास राष्ट्रांमध्ये भ्रष्ट केल्यामुळे त्या राष्ट्रांनी अपवित्र मानले, ती ते पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्राच्या देखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रास समजेल की, मी प्रभू परमेश्वर आहे.
Njalo ngizangcwelisa ibizo lami elikhulu, elingcoliswe phakathi kwezizwe, elilingcolisileyo phakathi kwazo; lezizwe zizakwazi ukuthi ngiyiNkosi, itsho iNkosi uJehova, lapho ngizangcweliswa kini emehlweni abo.
24 २४ मी तुम्हास त्या राष्ट्रांतून काढून घेईन आणि तुम्हास प्रत्येक देशातून गोळा करीन व तुम्हास तुमच्या देशात आणीन.
Ngoba ngizalithatha ezizweni, ngilibuthe emazweni wonke, ngililethe elizweni lenu.
25 २५ मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन.
Khona ngizafafaza amanzi ahlambulukileyo phezu kwenu, lihlambuluke; kukho konke ukungcola kwenu, lakuzo zonke izithombe zenu, ngizalihlambulula.
26 २६ मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठायी नवीन आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन.
Ngilinike inhliziyo entsha, ngifake umoya omutsha phakathi kwenu, ngisuse inhliziyo yelitshe enyameni yenu, ngilinike inhliziyo yenyama.
27 २७ मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन.
Ngifake uMoya wami phakathi kwenu, ngilenze ukuthi lihambe ngezimiso zami, ligcine izahlulelo zami lizenze.
28 २८ मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात रहाल. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन.
Lizahlala-ke elizweni engalinika oyihlo, libe ngabantu bami, lami ngibe nguNkulunkulu wenu.
29 २९ कारण मी तुम्हास तुमच्या सर्व अशुद्धेतेपासून वाचवीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. मी तुमच्यावर दुष्काळ पडू देणार नाही.
Njalo ngizalisindisa kukho konke ukungcola kwenu; ngibize amabele, ngiwandise, ngingabeki ndlala phezu kwenu.
30 ३० मी झाडाचे फळ आणि शेतांचे उत्पादन वाढवीन याकरिता की, राष्ट्रांमध्ये तुम्हास दुष्काळामुळे होणारी निंदा सहन करावी लागणार नाही.
Ngandise isithelo sesihlahla, lesivuno sensimu, ukuze lingaphindi lemukele ihlazo lendlala phakathi kwezizwe.
31 ३१ मग तुम्ही तुमच्या वाईट मार्गाचे आणि जी तुमची कृत्ये चांगली नव्हती त्यांचा विचार कराल, तेव्हा तुम्ही आपल्या पापाबद्दल आणि घृणीत कृत्यांबद्दल स्वत: चाच द्वेष कराल.
Khona lizakhumbula izindlela zenu ezimbi lezenzo zenu ezingalunganga; linengeke ngani ngokwenu ngobubi benu langenxa yezinengiso zenu.
32 ३२ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्याकरिता हे करत नाही, हे तुम्हास माहित असू द्या. म्हणून इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही आपल्या मार्गाविषयी लज्जित व फजीत व्हा.
Kangikwenzi ngenxa yenu, itsho iNkosi uJehova; kakwaziwe kini. Banini lenhloni libe lehlazo ngenxa yezindlela zenu, lina ndlu kaIsrayeli.
33 ३३ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुम्हास तुमच्या सर्व अन्यायापासून शुद्ध करीन त्या दिवशी मी नगरे वसवीन आणि उजाड स्थाने बांधण्यात येतील.
Itsho njalo iNkosi uJehova: Mhla ngilihlambulula kubo bonke ububi benu, ngizakwenza imizi ihlalwe, lamanxiwa akhiwe.
34 ३४ कारण जी भूमी, तिच्या जवळून जाणाऱ्या सर्वांना, ओसाड दिसत होती, ती ओसाड जमीन मशागत केल्याप्रमाणे दिसेल.
Lelizwe elichithekileyo lizalinywa, endaweni yokuthi beliyinkangala emehlweni abo bonke abadlulayo.
35 ३५ ते म्हणतील, ‘ही जी जमीन ओसाड होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. जी नगरे ओसाड व उजाड व दुर्गम झाली होती ती आता तटबंदीची होऊन वसली आहेत.
Njalo bazakuthi: Lelilizwe ebeselichithekile selinjengesivande seEdeni; lemizi eyinkangala lengamanxiwa lediliziweyo isibiyelwe yahlalwa.
36 ३६ मग तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांना समजेल की, मी परमेश्वर आहे आणि मीच नष्ट झालेली ठिकाणे बांधून काढोत व ओसाड जमिनीत मी लागवड केली. मी परमेश्वर आहे. मी हे बोललो व ते मी करीनच.
Khona izizwe ezisele zilizingelezele zizakwazi ukuthi mina iNkosi ngakha indawo ezidiliziweyo, ngihlanyele ezichithekileyo. Mina Nkosi ngikhulumile, ngizakwenza.
37 ३७ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी हे त्यांच्यासाठी करावे म्हणून इस्राएलाच्या घराण्याकडून पुन्हा मागणी होईल; कळपाप्रमाणे मी त्यामध्ये लोकांची वाढ करीन.
Itsho njalo iNkosi uJehova: Langalokhu ngizacelwa yindlu kaIsrayeli, ukuthi ngiyenzele khona; ngizabandisa ngabantu njengomhlambi.
38 ३८ पवित्र यज्ञपशूंचा कळप, यरूशलेमेतील सणाचा कळप असतात त्याप्रमाणे ओसाड नगरे लोकांच्या कळपांनी भरून जातील; मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”
Njengomhlambi ongcwele, njengomhlambi weJerusalema emikhosini yawo emisiweyo, ngokunjalo imizi echithekileyo izagcwala ngemihlambi yabantu. Khona bazakwazi ukuthi ngiyiNkosi.