< यहेज्केल 35 >

1 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
上主的話傳給我說:「
2 “मानवाच्या मुला, सेईर पर्वताकडे आपले तोंड कर आणि त्याच्याविरुध्द भविष्य सांग.
人子,你要面向色依爾山,講預言攻斥它,
3 त्यास सांग, ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, सेईर पर्वता, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि मी आपल्या हाताने तुला तडाखा देईन आणि तुला उजाड व दहशत करीन.
對它說:吾主上主這樣說:色依爾山啊! 看,我要攻擊你,伸手打擊你,使你變成沙漠和荒野。
4 मी तुझी नगरे उजाड करीन आणि तू स्वतः ओसाड होशील. मग तुला समजेल की मी परमेश्वर आहे.
我要使你的城市變成廢墟,你將成為沙漠:如此,你便承認我是上主。
5 कारण तू इस्राएल लोकांशी नेहमीच शत्रुत्व केले आणि त्यांच्या संकटकाळी, त्यांच्या अन्यायाच्या शिक्षेच्या वेळी तू त्यांच्यावर तलवार चालविलीस.”
因為在以色列子民遭難時,在他們罪惡滿盈時,你懷著永不忘的仇恨將他們交於刀劍:
6 म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, “मी तुला तुझे रक्त पाडण्यासाठी तयार करीन आणि रक्तपात तुझ्या पाठीस लागेल; तू रक्तपाताचा द्वेष केला नाही म्हणून खचित रक्तपात तुझ्या पाठीस लागेल.
為此,我指著我的生命起誓──吾主上主的斷語──你既仇恨了血,血也必迫害你。
7 मी सेईर पर्वताला ओसाड, उजाड करीन. जेव्हा त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या कोणालाही कापून काढीन.
我必使色依爾山成為沙漠和荒野,由其中滅絕來往經過的人。
8 आणि त्याचे डोंगर मी मृत शरींरांनी भरीन. तुझ्या उंच टेकड्या व दऱ्या आणि तुझे सर्व प्रवाह जे तलवारीने मारले ते त्यामध्ये पडतील.
我要使你的群山、丘陵、山谷和溪澗,堆滿傷亡的人,使刀劍傷亡的人橫臥其中。
9 मी तुला कायमचा ओसाड असे करीन. तुझ्या नगरांतून कोणीही राहाणार नाहीत मग तुला समजेल की, मी परमेश्वर आहे.”
我要使你永久變為荒蕪,你的城邑再沒有人居住:如此,你們便承認我是上主。
10 १० तू म्हणालास, ती दोन राष्ट्रे आणि ही दोन देश माझे होतील आणि आम्ही त्यांचा ताबा घेऊ. तेव्हा तेथे परमेश्वर त्यांच्याबरोबर उपस्थित होता.
因為你說過:這兩個民族,這兩個地域應屬於我,雖然雅威住在那裏,我還要去佔領;
11 ११ म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे, “तुझ्या क्रोधाप्रमाणे आणि जो तुझा हेवा तू आपल्या द्वेषाने इस्राएलाविरूद्ध प्रगट केला त्याप्रमाणे मी आपले कार्य करीन. आणि मी तुझा न्याय केला म्हणजे मी त्यांना प्रगट होईन.
為此,我指著我的生命起誓,──吾主上主的斷語──就如你怎樣懷著仇恨對待他們,同樣我也必以怒火和妒恨來對待你;當我懲罰你時,我叫你知道我在他們中,
12 १२ तू इस्राएलाच्या पर्वताविरूद्ध म्हणालास की ते उध्वस्त झाले आहेत ते आम्हास खायला दिले आहेत हे सर्व तुझे दुर्भाषण मी परमेश्वराने ऐकले आहे हे तुला कळेल.
並要你知道,我上主聽見了你向以色列的群山所講的一切詛咒的話,說:它們已荒蕪了,已交給我們享用。
13 १३ तुम्ही आपल्या तोंडाने मजविरूद्ध जेव्हा फुशारकी मारली; तुम्ही माझ्याविरूद्ध पुष्कळ गोष्टी बोललात. मी ते ऐकले आहे.”
當你們開口說大話攻斥我,說出許多凌辱我的話時,我都聽見了。
14 १४ प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, “सर्व पृथ्वी हर्ष करीत असताना मी तुझा नाश करीन.
吾主上主這樣說:當全地歡躍時,我要使你荒蕪,
15 १५ इस्राएल लोकांचे वतन ओसाड झाले म्हणीन जसा तुला आनंद झाला होता तसेच मी तुलाही करीन. हे सेईर पर्वता तू ओसाड होशील व संपूर्ण अदोम तो सारा नाश होईल. मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
就如在以色列家的產業荒蕪時,你曾喜樂;同樣,我也要這樣對待你;色依爾山必變成荒野,全厄東必被消滅:如此,人必承認我是上主。」

< यहेज्केल 35 >