< यहेज्केल 33 >

1 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
וַיְהִ֥י דְבַר־יְהוָ֖ה אֵלַ֥י לֵאמֹֽר׃
2 “मानवाच्या मुला, तुझ्या लोकांशी बोल त्यांना सांग की, जेव्हा मी कोणत्याही देशाविरूद्ध तलवार आणीन, तेव्हा त्या देशाचे लोक आपल्यातील एका मनुष्यास घेतात आणि त्यास आपल्यासाठी पहारेकरी करतात.
בֶּן־אָדָ֗ם דַּבֵּ֤ר אֶל־בְּנֵֽי־עַמְּךָ֙ וְאָמַרְתָּ֣ אֲלֵיהֶ֔ם אֶ֕רֶץ כִּֽי־אָבִ֥יא עָלֶ֖יהָ חָ֑רֶב וְלָקְח֨וּ עַם־הָאָ֜רֶץ אִ֤ישׁ אֶחָד֙ מִקְצֵיהֶ֔ם וְנָתְנ֥וּ אֹתֹ֛ו לָהֶ֖ם לְצֹפֶֽה׃
3 तो देशावर तलवार येत आहे असे पाहून आणि तो त्याचे शिंग फुंकून लोकांस सावध करतो.
וְרָאָ֥ה אֶת־הַחֶ֖רֶב בָּאָ֣ה עַל־הָאָ֑רֶץ וְתָקַ֥ע בַּשֹּׁופָ֖ר וְהִזְהִ֥יר אֶת־הָעָֽם׃
4 जर लोकांनी शिंगाचा आवाज ऐकला पण त्याकडे लक्ष दिले नाही, आणि जर त्यांच्यावर तलवार आली व त्यांना मारले, तर प्रत्येकाचे रक्त त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर राहिल.
וְשָׁמַ֨ע הַשֹּׁמֵ֜עַ אֶת־קֹ֤ול הַשֹּׁופָר֙ וְלֹ֣א נִזְהָ֔ר וַתָּ֥בֹוא חֶ֖רֶב וַתִּקָּחֵ֑הוּ דָּמֹ֥ו בְרֹאשֹׁ֖ו יִֽהְיֶֽה׃
5 जर कोणी एखाद्याने शिंगाचा आवाज ऐकला आणि लक्ष दिले नाही, त्याचे रक्त त्यावर राहिल. पण जर त्याने लक्ष दिले, तो आपला स्वतःचा जीव वाचवील.
אֵת֩ קֹ֨ול הַשֹּׁופָ֤ר שָׁמַע֙ וְלֹ֣א נִזְהָ֔ר דָּמֹ֖ו בֹּ֣ו יִֽהְיֶ֑ה וְה֥וּא נִזְהָ֖ר נַפְשֹׁ֥ו מִלֵּֽט׃
6 पण, कदाचित्, जर जसे पहारेकरी तलवार येत आहे असे पाहील, पण जर त्याने शिंग फुंकले नाही, त्याचा परीणाम लोकांस सावध केले नाही, आणि जर तलवार आली आणि कोणाचा जीव घेतला, तर तो त्याच्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी पहारेकऱ्याकडून मागून घेईन.
וְ֠הַצֹּפֶה כִּֽי־יִרְאֶ֨ה אֶת־הַחֶ֜רֶב בָּאָ֗ה וְלֹֽא־תָקַ֤ע בַּשֹּׁופָר֙ וְהָעָ֣ם לֹֽא־נִזְהָ֔ר וַתָּבֹ֣וא חֶ֔רֶב וַתִּקַּ֥ח מֵהֶ֖ם נָ֑פֶשׁ ה֚וּא בַּעֲוֹנֹ֣ו נִלְקָ֔ח וְדָמֹ֖ו מִיַּֽד־הַצֹּפֶ֥ה אֶדְרֹֽשׁ׃ ס
7 आता, मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी पहारेकरी केले आहे. तू माझ्या मुखातून वचन ऐकून आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर.
וְאַתָּ֣ה בֶן־אָדָ֔ם צֹפֶ֥ה נְתַתִּ֖יךָ לְבֵ֣ית יִשְׂרָאֵ֑ל וְשָׁמַעְתָּ֤ מִפִּי֙ דָּבָ֔ר וְהִזְהַרְתָּ֥ אֹתָ֖ם מִמֶּֽנִּי׃
8 जर मी दुष्टाला म्हणतो, अरे दुष्टा तू खचित मरशील, पण जर तू दुष्टाला त्याच्या मार्गापासून फिरवण्यासाठी तू त्यास बजावून सांगण्यासाठी त्याच्याशी बोलणार नाही तर तो दुष्ट आपल्या पापत मरेल, पण त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेन.
בְּאָמְרִ֣י לָרָשָׁ֗ע רָשָׁע֙ מֹ֣ות תָּמ֔וּת וְלֹ֣א דִבַּ֔רְתָּ לְהַזְהִ֥יר רָשָׁ֖ע מִדַּרְכֹּ֑ו ה֤וּא רָשָׁע֙ בַּעֲוֹנֹ֣ו יָמ֔וּת וְדָמֹ֖ו מִיָּדְךָ֥ אֲבַקֵּֽשׁ׃
9 पण तू त्या पाप्यास सावध करून कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो मनुष्य त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील.
וְ֠אַתָּה כִּֽי־הִזְהַ֨רְתָּ רָשָׁ֤ע מִדַּרְכֹּו֙ לָשׁ֣וּב מִמֶּ֔נָּה וְלֹא־שָׁ֖ב מִדַּרְכֹּ֑ו ה֚וּא בַּעֲוֹנֹ֣ו יָמ֔וּת וְאַתָּ֖ה נַפְשְׁךָ֥ הִצַּֽלְתָּ׃ ס
10 १० म्हणून हे मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला सांग, तुम्ही म्हणता, की, आमचे अपराध व आमची पापे यांचा बोजा आम्हावर आहे व त्यामुळे त्यामध्ये आम्ही कुजत आहोत. आम्ही कसे जगावे?
וְאַתָּ֣ה בֶן־אָדָ֗ם אֱמֹר֙ אֶל־בֵּ֣ית יִשְׂרָאֵ֔ל כֵּ֤ן אֲמַרְתֶּם֙ לֵאמֹ֔ר כִּֽי־פְשָׁעֵ֥ינוּ וְחַטֹּאתֵ֖ינוּ עָלֵ֑ינוּ וּבָ֛ם אֲנַ֥חְנוּ נְמַקִּ֖ים וְאֵ֥יךְ נִֽחְיֶֽה׃
11 ११ त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे, मला ‘दुष्टांच्या मरणाने आनंद होत नाही, कारण जर दुष्टाने आपल्या मार्गापासून पश्चाताप केला, तर मग तो जिवंत राहील! पश्चाताप करा! तुमच्या दुष्ट मार्गापासून पश्चाताप करा! कारण इस्राएल घराण्यांनो, तुम्ही का मरावे?’
אֱמֹ֨ר אֲלֵיהֶ֜ם חַי־אָ֣נִי ׀ נְאֻ֣ם ׀ אֲדֹנָ֣י יְהוִ֗ה אִם־אֶחְפֹּץ֙ בְּמֹ֣ות הָרָשָׁ֔ע כִּ֣י אִם־בְּשׁ֥וּב רָשָׁ֛ע מִדַּרְכֹּ֖ו וְחָיָ֑ה שׁ֣וּבוּ שׁ֜וּבוּ מִדַּרְכֵיכֶ֧ם הָרָעִ֛ים וְלָ֥מָּה תָמ֖וּתוּ בֵּ֥ית יִשְׂרָאֵֽל׃ פ
12 १२ आणि मानवाच्या मुला, तू तुझ्या लोकांस सांग, धार्मिक पाप करील तर त्याची धार्मिकता त्यास वाचविणार नाही. आणि दुष्टाने आपल्या पापाचा पश्चाताप केला तर दुष्टतेमुळे त्याचा नाश होणार नाही. कारण धार्मिक पाप करू लागला तर तो आपल्या धार्मिकतेमुळे वाचू शकणार नाही.
וְאַתָּ֣ה בֶן־אָדָ֗ם אֱמֹ֤ר אֶל־בְּנֵֽי־עַמְּךָ֙ צִדְקַ֣ת הַצַּדִּ֗יק לֹ֤א תַצִּילֶ֙נּוּ֙ בְּיֹ֣ום פִּשְׁעֹ֔ו וְרִשְׁעַ֤ת הָֽרָשָׁע֙ לֹֽא־יִכָּ֣שֶׁל בָּ֔הּ בְּיֹ֖ום שׁוּבֹ֣ו מֵֽרִשְׁעֹ֑ו וְצַדִּ֗יק לֹ֥א יוּכַ֛ל לִֽחְיֹ֥ות בָּ֖הּ בְּיֹ֥ום חֲטֹאתֹֽו׃
13 १३ जर मी धार्मिकाला म्हणालो, तो खचित जिवंत राहिल! आणि जर तो आपल्या धार्मिकतेवर भाव ठेवून अन्याय करील, तर त्याची सर्व धार्मिकतेची कृत्ये मी आठवणार नाही. त्याने केलेल्या दुष्कृत्यांमुळे तो मरेल.
בְּאָמְרִ֤י לַצַּדִּיק֙ חָיֹ֣ה יִֽחְיֶ֔ה וְהֽוּא־בָטַ֥ח עַל־צִדְקָתֹ֖ו וְעָ֣שָׂה עָ֑וֶל כָּל־צִדְקָתֹו (צִדְקֹתָיו֙) לֹ֣א תִזָּכַ֔רְנָה וּבְעַוְלֹ֥ו אֲשֶׁר־עָשָׂ֖ה בֹּ֥ו יָמֽוּת׃
14 १४ आणि जर मी दुष्टाला म्हणालो तू खचित मरशील! पण जर त्याने त्याच्या पापापासून पश्चाताप केला आणि जे काही योग्य व न्याय्य आहे ते केले,
וּבְאָמְרִ֥י לָֽרָשָׁ֖ע מֹ֣ות תָּמ֑וּת וְשָׁב֙ מֵֽחַטָּאתֹ֔ו וְעָשָׂ֥ה מִשְׁפָּ֖ט וּצְדָקָֽה׃
15 १५ जर दुष्ट गहाण परत देईल, व जे चोरून घेतलेले ते परत भरून देईल, जर तो अन्याय न करता जीवनाच्या नियमांमध्ये वागेल तर तो वाचेलच, तो मरणार नाही.
חֲבֹ֨ל יָשִׁ֤יב רָשָׁע֙ גְּזֵלָ֣ה יְשַׁלֵּ֔ם בְּחֻקֹּ֤ות הַֽחַיִּים֙ הָלַ֔ךְ לְבִלְתִּ֖י עֲשֹׂ֣ות עָ֑וֶל חָיֹ֥ו יִֽחְיֶ֖ה לֹ֥א יָמֽוּת׃
16 १६ त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. जे योग्य व न्यायाने ते त्याने केले आहे, तो खचित जगेल.
כָּל־חַטָּאתֹו (חַטֹּאתָיו֙) אֲשֶׁ֣ר חָטָ֔א לֹ֥א תִזָּכַ֖רְנָה לֹ֑ו מִשְׁפָּ֧ט וּצְדָקָ֛ה עָשָׂ֖ה חָיֹ֥ו יִֽחְיֶֽה׃
17 १७ पण तुझे लोक म्हणतात, प्रभूचे मार्ग योग्य नाहीत, परंतु तुझे मार्ग योग्य नाहीत!
וְאָמְרוּ֙ בְּנֵ֣י עַמְּךָ֔ לֹ֥א יִתָּכֵ֖ן דֶּ֣רֶךְ אֲדֹנָ֑י וְהֵ֖מָּה דַּרְכָּ֥ם לֹֽא־יִתָּכֵֽן׃
18 १८ जेव्हा धार्मिक आपल्या धार्मिकतेपासून फिरून व पाप करू लागला, तर तो त्यामध्ये मरेल.
בְּשׁוּב־צַדִּ֥יק מִצִּדְקָתֹ֖ו וְעָ֣שָׂה עָ֑וֶל וּמֵ֖ת בָּהֶֽם׃
19 १९ आणि जेव्हा दुष्ट आपल्या दुष्टतेपासून फिरून जे योग्य व न्याय्य आहे ते करतो तर तो त्या गोष्टीमुळे जगेल.
וּבְשׁ֤וּב רָשָׁע֙ מֵֽרִשְׁעָתֹ֔ו וְעָשָׂ֥ה מִשְׁפָּ֖ט וּצְדָקָ֑ה עֲלֵיהֶ֖ם ה֥וּא יִֽחְיֶֽה׃
20 २० पण तुम्ही लोक म्हणता, प्रभूचा मार्ग बरोबर नाही! इस्राएलाच्या घराण्यांनो मी तुमच्या प्रत्येकाचा न्याय त्याच्या मार्गाप्रमाणे करीन.”
וַאֲמַרְתֶּ֕ם לֹ֥א יִתָּכֵ֖ן דֶּ֣רֶךְ אֲדֹנָ֑י אִ֧ישׁ כִּדְרָכָ֛יו אֶשְׁפֹּ֥וט אֶתְכֶ֖ם בֵּ֥ית יִשְׂרָאֵֽל׃ פ
21 २१ आमच्या बंदिवासाच्या बाराव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी असे झाले की, यरूशलेमेमधून एक फरारी माझ्याकडे आला व म्हणाला, “नगर काबीज झाले आहे.”
וַיְהִ֞י בִּשְׁתֵּ֧י עֶשְׂרֵ֣ה שָׁנָ֗ה בָּעֲשִׂרִ֛י בַּחֲמִשָּׁ֥ה לַחֹ֖דֶשׁ לְגָלוּתֵ֑נוּ בָּא־אֵלַ֨י הַפָּלִ֧יט מִירוּשָׁלַ֛͏ִם לֵאמֹ֖ר הֻכְּתָ֥ה הָעִֽיר׃
22 २२ तो फरारी संध्याकाळी येण्यापूर्वी परमेश्वराचा हात माझ्यावर होता, आणि तो सकाळी माझ्याकडे येण्याच्या वेळी परमेश्वराने त्याने माझे मुख उघडले होते. म्हणून माझे मुख उघडे होते; मी मुका राहिलो नाही.
וְיַד־יְהוָה֩ הָיְתָ֨ה אֵלַ֜י בָּעֶ֗רֶב לִפְנֵי֙ בֹּ֣וא הַפָּלִ֔יט וַיִּפְתַּ֣ח אֶת־פִּ֔י עַד־בֹּ֥וא אֵלַ֖י בַּבֹּ֑קֶר וַיִּפָּ֣תַח פִּ֔י וְלֹ֥א נֶאֱלַ֖מְתִּי עֹֽוד׃ פ
23 २३ मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
וַיְהִ֥י דְבַר־יְהוָ֖ה אֵלַ֥י לֵאמֹֽר׃
24 २४ “मानवाच्या मुला, जे इस्राएल देशाच्या विध्वंस झालेल्या नगरातून राहत आहेत ते बोलतात व म्हणतात, अब्राहाम फक्त एकच पुरुष होता आणि त्यास या देशाचे वतन मिळाले परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत! देश आम्हास वतनासाठी दिला आहे.
בֶּן־אָדָ֗ם יֹ֠שְׁבֵי הֶחֳרָבֹ֨ות הָאֵ֜לֶּה עַל־אַדְמַ֤ת יִשְׂרָאֵל֙ אֹמְרִ֣ים לֵאמֹ֔ר אֶחָד֙ הָיָ֣ה אַבְרָהָ֔ם וַיִּירַ֖שׁ אֶת־הָאָ֑רֶץ וַאֲנַ֣חְנוּ רַבִּ֔ים לָ֛נוּ נִתְּנָ֥ה הָאָ֖רֶץ לְמֹורָשָֽׁה׃ ס
25 २५ म्हणून तू त्यांना सांग की प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तुम्ही रक्तासकट मांस खाता. तुम्ही आपल्या मूर्तीकडे डोळे लावता, तुम्ही लोकांचे रक्त पाडता. तर मग तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का?
לָכֵן֩ אֱמֹ֨ר אֲלֵיהֶ֜ם כֹּֽה־אָמַ֣ר ׀ אֲדֹנָ֣י יְהֹוִ֗ה עַל־הַדָּ֧ם ׀ תֹּאכֵ֛לוּ וְעֵינֵכֶ֛ם תִּשְׂא֥וּ אֶל־גִּלּוּלֵיכֶ֖ם וְדָ֣ם תִּשְׁפֹּ֑כוּ וְהָאָ֖רֶץ תִּירָֽשׁוּ׃
26 २६ तुम्ही तुमच्या स्वत: च्या तलवारीवर अवलंबून राहता आणि तुम्ही अमंगळ गोष्टी करता. प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला अशुद्ध करतो, तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का?
עֲמַדְתֶּ֤ם עַֽל־חַרְבְּכֶם֙ עֲשִׂיתֶ֣ן תֹּועֵבָ֔ה וְאִ֛ישׁ אֶת־אֵ֥שֶׁת רֵעֵ֖הוּ טִמֵּאתֶ֑ם וְהָאָ֖רֶץ תִּירָֽשׁוּ׃ ס
27 २७ तू त्यांना हे सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी जिवंत आहे; त्या नाश झालेल्या नगरात राहणारे लोक तलवारीने खचित मारले जातील. जर एखादा शेतांत असेल, तर त्यास मी पशूचे भक्ष्य म्हणून देईन आणि जे कोणी किल्ल्यात व गुहेत आहेत ते मरीने मरतील.
כֹּֽה־תֹאמַ֨ר אֲלֵהֶ֜ם כֹּה־אָמַ֨ר אֲדֹנָ֣י יְהוִה֮ חַי־אָנִי֒ אִם־לֹ֞א אֲשֶׁ֤ר בֶּֽחֳרָבֹות֙ בַּחֶ֣רֶב יִפֹּ֔לוּ וַֽאֲשֶׁר֙ עַל־פְּנֵ֣י הַשָּׂדֶ֔ה לַחַיָּ֥ה נְתַתִּ֖יו לְאָכְלֹ֑ו וַאֲשֶׁ֛ר בַּמְּצָדֹ֥ות וּבַמְּעָרֹ֖ות בַּדֶּ֥בֶר יָמֽוּתוּ׃
28 २८ मग मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन आणि त्याच्या सामर्थ्याचा गर्वाचा अंत होईल. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही.
וְנָתַתִּ֤י אֶת־הָאָ֙רֶץ֙ שְׁמָמָ֣ה וּמְשַׁמָּ֔ה וְנִשְׁבַּ֖ת גְּאֹ֣ון עֻזָּ֑הּ וְשָֽׁמְמ֛וּ הָרֵ֥י יִשְׂרָאֵ֖ל מֵאֵ֥ין עֹובֵֽר׃
29 २९ म्हणून त्यांनी ज्या अमंगळ गोष्टी केल्या त्यामुळे जेव्हा मी तो देश ओसाड आणि दहशत असा करीन. तेव्हा त्यांना समजेल की, मीच परमेश्वर आहे.
וְיָדְע֖וּ כִּֽי־אֲנִ֣י יְהוָ֑ה בְּתִתִּ֤י אֶת־הָאָ֙רֶץ֙ שְׁמָמָ֣ה וּמְשַׁמָּ֔ה עַ֥ל כָּל־תֹּועֲבֹתָ֖ם אֲשֶׁ֥ר עָשֽׂוּ׃ ס
30 ३० आणि, मानवाच्या मुला, आता तुझ्याबद्दल तुझे लोक भिंतीला टेकून, त्यांच्या घराच्या दारांत उभे राहून, व एक दुसऱ्याशी व प्रत्येक आपल्या भावाशी बोलतो, ते म्हणतात चला, व परमेश्वराकडून संदेष्ट्याकडे आलेले वचन जाऊन ऐकू या.
וְאַתָּ֣ה בֶן־אָדָ֔ם בְּנֵ֣י עַמְּךָ֗ הַנִּדְבָּרִ֤ים בְּךָ֙ אֵ֣צֶל הַקִּירֹ֔ות וּבְפִתְחֵ֖י הַבָּתִּ֑ים וְדִבֶּר־חַ֣ד אֶת־אַחַ֗ד אִ֤ישׁ אֶת־אָחִיו֙ לֵאמֹ֔ר בֹּֽאוּ־נָ֣א וְשִׁמְע֔וּ מָ֣ה הַדָּבָ֔ר הַיֹּוצֵ֖א מֵאֵ֥ת יְהוָֽה׃
31 ३१ म्हणून ते लोक येत असतात तसे ते तुझ्याकडे येतात. आणि ते माझ्या लोकांप्रमाणे तुझ्यापुढे बसतात तुझी वचने ऐकतात, परंतु ते ती आचरीत नाहीत. जरी ते आपल्या मुखाने फार प्रीती दाखवतात तरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे चालत जाते.
וְיָבֹ֣ואוּ אֵ֠לֶיךָ כִּמְבֹוא־עָ֞ם וְיֵשְׁב֤וּ לְפָנֶ֙יךָ֙ עַמִּ֔י וְשָֽׁמְעוּ֙ אֶת־דְּבָרֶ֔יךָ וְאֹותָ֖ם לֹ֣א יַֽעֲשׂ֑וּ כִּֽי־עֲגָבִ֤ים בְּפִיהֶם֙ הֵ֣מָּה עֹשִׂ֔ים אַחֲרֵ֥י בִצְעָ֖ם לִבָּ֥ם הֹלֵֽךְ׃
32 ३२ कारण पाहा, ज्याचा स्वर गोड व तू त्यांना मनोहर गीतासारखा, तंतुवाद्यांवर मधुर आवाजात वाजवणारा, असा तू त्यांना आहे. म्हणून ते तुझे वचने ऐकतात, पण त्याप्रमाणे ते चालत नाहीत.
וְהִנְּךָ֤ לָהֶם֙ כְּשִׁ֣יר עֲגָבִ֔ים יְפֵ֥ה קֹ֖ול וּמֵטִ֣ב נַגֵּ֑ן וְשָֽׁמְעוּ֙ אֶת־דְּבָרֶ֔יךָ וְעֹשִׂ֥ים אֵינָ֖ם אֹותָֽם׃
33 ३३ म्हणून जेव्हा हे सर्व होईल, पाहा! हे होईल! मग त्यांना समजेल की आपल्यामध्ये एक संदेष्टा होता.”
וּבְבֹאָ֑הּ הִנֵּ֣ה בָאָ֔ה וְיָ֣דְע֔וּ כִּ֥י נָבִ֖יא הָיָ֥ה בְתֹוכָֽם׃ ס

< यहेज्केल 33 >