< यहेज्केल 32 >

1 मग बाबेलातील बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
וַֽיְהִי֙ בִּשְׁתֵּ֣י עֶשְׂרֵ֣ה שָׁנָ֔ה בִּשְׁנֵי־עָשָׂ֥ר חֹ֖דֶשׁ בְּאֶחָ֣ד לַחֹ֑דֶשׁ הָיָ֥ה דְבַר־יְהוָ֖ה אֵלַ֥י לֵאמֹֽר׃
2 मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारोविषयी मोठ्याने विलाप कर. त्यास म्हण, राष्ट्रांमध्ये मी तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू समुद्रातील मगर असा आहेस. तू पाणी घुसळून काढतोस, तू आपल्या पायाने पाणी ढवळून काढतो आणि त्यांचे पाणी गढूळ करतोस.
בֶּן־אָדָ֗ם שָׂ֤א קִינָה֙ עַל־פַּרְעֹ֣ה מֶֽלֶךְ־מִצְרַ֔יִם וְאָמַרְתָּ֣ אֵלָ֔יו כְּפִ֥יר גּוֹיִ֖ם נִדְמֵ֑יתָ וְאַתָּה֙ כַּתַּנִּ֣ים בַּיַּמִּ֔ים וַתָּ֣גַח בְּנַהֲרוֹתֶ֗יךָ וַתִּדְלַח־מַ֙יִם֙ בְּרַגְלֶ֔יךָ וַתִּרְפֹּ֖ס נַהֲרוֹתָֽם׃
3 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी पुष्कळ लोकांच्या समुदायाकडून आपले जाळे तुझ्यावर पसरीन आणि ते तुला माझ्या जाळीने वर ओढून काढतील.
כֹּ֤ה אָמַר֙ אֲדֹנָ֣י יְהוִ֔ה וּפָרַשְׂתִּ֤י עָלֶ֙יךָ֙ אֶת־רִשְׁתִּ֔י בִּקְהַ֖ל עַמִּ֣ים רַבִּ֑ים וְהֶעֱל֖וּךָ בְּחֶרְמִֽי׃
4 मी तुला जमिनीवर सोडून देईन. मी तुला शेतांत फेकून देईन आणि आकाशातील सर्व पक्षी येऊन तुझ्यावर बसतील असे करीन. मी तुझ्याकडून पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्याची भूक तृप्त करीन.
וּנְטַשְׁתִּ֣יךָ בָאָ֔רֶץ עַל־פְּנֵ֥י הַשָּׂדֶ֖ה אֲטִילֶ֑ךָ וְהִשְׁכַּנְתִּ֤י עָלֶ֙יךָ֙ כָּל־ע֣וֹף הַשָּׁמַ֔יִם וְהִשְׂבַּעְתִּ֥י מִמְּךָ֖ חַיַּ֥ת כָּל־הָאָֽרֶץ׃
5 कारण मी तुझे मांस पर्वतावर ठेवीन, आणि किड्यांनी भरलेली तुमची प्रेते दऱ्यांत भरीन.
וְנָתַתִּ֥י אֶת־בְּשָׂרְךָ֖ עַל־הֶֽהָרִ֑ים וּמִלֵּאתִ֥י הַגֵּאָי֖וֹת רָמוּתֶֽךָ׃
6 मग मी तुझे रक्त पर्वतावर ओतीन, तुझ्या रक्ताने प्रवाह भरून वाहतील.
וְהִשְׁקֵיתִ֨י אֶ֧רֶץ צָפָתְךָ֛ מִדָּמְךָ֖ אֶל־הֶֽהָרִ֑ים וַאֲפִקִ֖ים יִמָּלְא֥וּן מִמֶּֽךָּ׃
7 मग जेव्हा मी तुझा दिवा विझवून टाकीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातले तारे अंधारमय करीन. मी सूर्याला ढगाने झाकीन आणि चंद्र प्रकाशणार नाही.
וְכִסֵּיתִ֤י בְכַבּֽוֹתְךָ֙ שָׁמַ֔יִם וְהִקְדַּרְתִּ֖י אֶת־כֹּֽכְבֵיהֶ֑ם שֶׁ֚מֶשׁ בֶּעָנָ֣ן אֲכַסֶּ֔נּוּ וְיָרֵ֖חַ לֹא־יָאִ֥יר אוֹרֽוֹ׃
8 मी आकाशातील चमकणारा सर्व प्रकाश तुझ्यावर अंधार करीन आणि तुझ्या देशाला अंधारात ठेवीन. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
כָּל־מְא֤וֹרֵי אוֹר֙ בַּשָּׁמַ֔יִם אַקְדִּירֵ֖ם עָלֶ֑יךָ וְנָתַ֤תִּי חֹ֙שֶׁךְ֙ עַֽל־אַרְצְךָ֔ נְאֻ֖ם אֲדֹנָ֥י יְהוִֽה׃
9 जेव्हा मी तुझा नाश करून तुला राष्ट्रांमध्ये, जे देश तुझ्या ओळखीचे नाहीत त्यामध्ये आणीन तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय घाबरून सोडील.
וְהִ֨כְעַסְתִּ֔י לֵ֖ב עַמִּ֣ים רַבִּ֑ים בַּהֲבִיאִ֤י שִׁבְרְךָ֙ בַּגּוֹיִ֔ם עַל־אֲרָצ֖וֹת אֲשֶׁ֥ר לֹֽא־יְדַעְתָּֽם׃
10 १० मी खूप लोकांस तुझ्याविषयी विस्मित करीन. जेव्हा मी आपली तलवार त्यांच्यापुढे परजीन, तेव्हा त्यांचे राजे दहशतीने थरथरतील. तुझ्या पतनाच्या दिवशी प्रत्येक मनुष्यास आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.
וַהֲשִׁמּוֹתִ֨י עָלֶ֜יךָ עַמִּ֣ים רַבִּ֗ים וּמַלְכֵיהֶם֙ יִשְׂעֲר֤וּ עָלֶ֙יךָ֙ שַׂ֔עַר בְּעוֹפְפִ֥י חַרְבִּ֖י עַל־פְּנֵיהֶ֑ם וְחָרְד֤וּ לִרְגָעִים֙ אִ֣ישׁ לְנַפְשׁ֔וֹ בְּי֖וֹם מַפַּלְתֶּֽךָ׃ ס
11 ११ कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, बाबेलाच्या राजाची तलवार तुमच्याविरुध्द येईल.
כִּ֛י כֹּ֥ה אָמַ֖ר אֲדֹנָ֣י יְהוִ֑ה חֶ֥רֶב מֶֽלֶךְ־בָּבֶ֖ל תְּבוֹאֶֽךָ׃
12 १२ योद्ध्याच्या तलवारीने तुझे सेवक पडतील असे मी करीन, प्रत्येक योद्धा राष्ट्राचा दहशत आहे! हे योद्धे मिसराचा गौरव उद्धस्त करतील आणि तिच्यातला सर्व समुदाय नष्ट करतील.
בְּחַרְב֤וֹת גִּבּוֹרִים֙ אַפִּ֣יל הֲמוֹנֶ֔ךָ עָרִיצֵ֥י גוֹיִ֖ם כֻּלָּ֑ם וְשָֽׁדְדוּ֙ אֶת־גְּא֣וֹן מִצְרַ֔יִם וְנִשְׁמַ֖ד כָּל־הֲמוֹנָֽהּ׃
13 १३ कारण मी महाजलांजवळील त्यांच्या सर्व गुरांढोरांचा नाश करीन; मग मनुष्याचा पाय पुन्हा ती गढूळ करणार नाही. तसेच गुरांच्या खुरही ते गढूळ करणार नाही.
וְהַֽאֲבַדְתִּי֙ אֶת־כָּל־ בְּהֶמְתָּ֔הּ מֵעַ֖ל מַ֣יִם רַבִּ֑ים וְלֹ֨א תִדְלָחֵ֤ם רֶֽגֶל־אָדָם֙ ע֔וֹד וּפַרְס֥וֹת בְּהֵמָ֖ה לֹ֥א תִדְלָחֵֽם׃
14 १४ मग मी त्यांचे पाणी शांत करीन आणि त्यांच्या नद्या तेलाप्रमाणे वाहतील असे करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
אָ֚ז אַשְׁקִ֣יעַ מֵֽימֵיהֶ֔ם וְנַהֲרוֹתָ֖ם כַּשֶּׁ֣מֶן אוֹלִ֑יךְ נְאֻ֖ם אֲדֹנָ֥י יְהוִֽה׃
15 १५ जेव्हा मी मिसरची भूमी ओसाड करीन. म्हणजे तिच्यात जे भरले होते ते नाहीसे होऊन ती भूमी उजाड होईल, जेव्हा मी तिच्यातल्या सर्व राहणाऱ्यांस मारीन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
בְּתִתִּי֩ אֶת־אֶ֨רֶץ מִצְרַ֜יִם שְׁמָמָ֣ה וּנְשַׁמָּ֗ה אֶ֚רֶץ מִמְּלֹאָ֔הּ בְּהַכּוֹתִ֖י אֶת־כָּל־י֣וֹשְׁבֵי בָ֑הּ וְיָדְע֖וּ כִּֽי־אֲנִ֥י יְהוָֽה׃
16 १६ तेथे विलाप होईल. कारण तिच्यावर राष्ट्रांच्या कन्या विलाप करतील. ते मिसरासाठी विलाप करतील. ते तिच्या सर्व सेवकांसाठी विलाप करतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
קִינָ֥ה הִיא֙ וְק֣וֹנְנ֔וּהָ בְּנ֥וֹת הַגּוֹיִ֖ם תְּקוֹנֵ֣נָּה אוֹתָ֑הּ עַל־מִצְרַ֤יִם וְעַל־כָּל־הֲמוֹנָהּ֙ תְּקוֹנֵ֣נָּה אוֹתָ֔הּ נְאֻ֖ם אֲדֹנָ֥י יְהוִֽה׃ פ
17 १७ मग बाराव्या वर्षांच्या, महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
וַֽיְהִי֙ בִּשְׁתֵּ֣י עֶשְׂרֵ֣ה שָׁנָ֔ה בַּחֲמִשָּׁ֥ה עָשָׂ֖ר לַחֹ֑דֶשׁ הָיָ֥ה דְבַר־יְהוָ֖ה אֵלַ֥י לֵאמֹֽר׃
18 १८ मानवाच्या मुला, मिसरातल्या लोकसमूहासाठी खेद कर आणि त्यांना, मिसर कन्येस आणि ऐश्वर्यशाली राष्ट्रांच्या कन्येस गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर अधोलोकी लोटून दे.
בֶּן־אָדָ֕ם נְהֵ֛ה עַל־הֲמ֥וֹן מִצְרַ֖יִם וְהוֹרִדֵ֑הוּ א֠וֹתָהּ וּבְנ֨וֹת גּוֹיִ֧ם אַדִּרִ֛ם אֶל־אֶ֥רֶץ תַּחְתִּיּ֖וֹת אֶת־י֥וֹרְדֵי בֽוֹר׃
19 १९ त्यांना विचार, तू खरोखर कोणापेक्षाही अधिक सुंदर आहेस? खाली जा आणि बेसुंत्याबरोबर जाऊन पड.
מִמִּ֖י נָעָ֑מְתָּ רְדָ֥ה וְהָשְׁכְּבָ֖ה אֶת־עֲרֵלִֽים׃
20 २० जे कोणी तलवारीने वधले त्यामध्ये जाऊन ते पडतील! मिसर तलवारीला सोपून दिला आहे; व तिच्या सर्व समूहास ओढून न्या.
בְּת֥וֹךְ חַלְלֵי־חֶ֖רֶב יִפֹּ֑לוּ חֶ֣רֶב נִתָּ֔נָה מָשְׁכ֥וּ אוֹתָ֖הּ וְכָל־הֲמוֹנֶֽיהָ׃
21 २१ योद्ध्यातले जे बलवान ते त्याच्याशी व त्यास सहाय्य करणाऱ्याशी अधोलोकातून बोलतील; ते खाली उतरले आहेत. हे बेसुंती तलवारीने वधले ते तेथे पडले आहेत. (Sheol h7585)
יְדַבְּרוּ־ל֞וֹ אֵלֵ֧י גִבּוֹרִ֛ים מִתּ֥וֹךְ שְׁא֖וֹל אֶת־עֹֽזְרָ֑יו יָֽרְד֛וּ שָׁכְב֥וּ הָעֲרֵלִ֖ים חַלְלֵי־חָֽרֶב׃ (Sheol h7585)
22 २२ अश्शूर तिच्या समुदायाबरोबर तेथे आहे. तिच्या कबरा तिच्यासभोवती आहेत; ते सर्व त्यांच्या तलवारीने वधलेले आहेत.
שָׁ֤ם אַשּׁוּר֙ וְכָל־קְהָלָ֔הּ סְבִֽיבוֹתָ֖יו קִבְרֹתָ֑יו כֻּלָּ֣ם חֲלָלִ֔ים הַנֹּפְלִ֖ים בֶּחָֽרֶב׃
23 २३ ज्या कोणाच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत, तिचा समुदाय तिच्या कबरेभोवती तेथे आहे. जे जिवंताच्या भूमीत ज्यांनी दहशत घातली ते सर्व वधलेले, तलवारीने पडले आहेत.
אֲשֶׁ֨ר נִתְּנ֤וּ קִבְרֹתֶ֙יהָ֙ בְּיַרְכְּתֵי־ב֔וֹר וַיְהִ֣י קְהָלָ֔הּ סְבִיב֖וֹת קְבֻרָתָ֑הּ כֻּלָּ֤ם חֲלָלִים֙ נֹפְלִ֣ים בַּחֶ֔רֶב אֲשֶׁר־נָתְנ֥וּ חִתִּ֖ית בְּאֶ֥רֶץ חַיִּֽים׃
24 २४ तेथे एलाम आहे व तिच्या सर्व समुदाया बरोबर तिच्या कबरेभोवती आहे. ते सर्व वधलेले, तलवारीने पडलेले आहेत. ते बेसुंती असताना पृथ्वीच्या खालच्या स्थानात गेले आहेत. ते जिवंताच्या भूमीत दहशत घालीत ते सर्व वध पावले आहेत.
שָׁ֤ם עֵילָם֙ וְכָל־הֲמוֹנָ֔הּ סְבִיב֖וֹת קְבֻרָתָ֑הּ כֻּלָּ֣ם חֲלָלִים֩ הַנֹּפְלִ֨ים בַּחֶ֜רֶב אֲֽשֶׁר־יָרְד֥וּ עֲרֵלִ֣ים ׀ אֶל־אֶ֣רֶץ תַּחְתִּיּ֗וֹת אֲשֶׁ֨ר נָתְנ֤וּ חִתִּיתָם֙ בְּאֶ֣רֶץ חַיִּ֔ים וַיִּשְׂא֥וּ כְלִמָּתָ֖ם אֶת־י֥וֹרְדֵי בֽוֹר׃
25 २५ त्यांनी एलाम व त्याच्या सर्व समुदायासाठी वधलेल्यामध्ये शय्या तयार केली. त्याच्याभोवती त्यांच्या कबरा आहेत. ते सर्व बेसुंती तलवारीने मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताची भूमी दहशतीने भरली आहे. म्हणून गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर ते लज्जित झाले आहेत. वधलेल्यामध्ये त्यांना ठेवले आहे.
בְּת֣וֹךְ חֲ֠לָלִים נָתְנ֨וּ מִשְׁכָּ֥ב לָהּ֙ בְּכָל־הֲמוֹנָ֔הּ סְבִֽיבוֹתָ֖יו קִבְרֹתֶ֑הָ כֻּלָּ֣ם עֲרֵלִ֣ים חַלְלֵי־חֶ֡רֶב כִּֽי־נִתַּ֨ן חִתִּיתָ֜ם בְּאֶ֣רֶץ חַיִּ֗ים וַיִּשְׂא֤וּ כְלִמָּתָם֙ אֶת־י֣וֹרְדֵי ב֔וֹר בְּת֥וֹךְ חֲלָלִ֖ים נִתָּֽן׃
26 २६ तेथे मेशेख, तुबाल आणि त्यांचा सर्व समूह आहे. त्यांच्या कबरा त्यांच्या सभोवती आहेत. ते सर्व बेसुंती तलवारी मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताच्या भूमीत आपली दहशत आणली.
שָׁ֣ם מֶ֤שֶׁךְ תֻּבַל֙ וְכָל־הֲמוֹנָ֔הּ סְבִֽיבוֹתָ֖יו קִבְרוֹתֶ֑יהָ כֻּלָּ֤ם עֲרֵלִים֙ מְחֻ֣לְלֵי חֶ֔רֶב כִּֽי־נָתְנ֥וּ חִתִּיתָ֖ם בְּאֶ֥רֶץ חַיִּֽים׃
27 २७ बेसुंती लोकांपैकी जे योद्धे पडून आपल्या सर्व लढाईच्या शस्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहीले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते योद्ध्यास दहशत घालत म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांवर आहे. (Sheol h7585)
וְלֹ֤א יִשְׁכְּבוּ֙ אֶת־גִּבּוֹרִ֔ים נֹפְלִ֖ים מֵעֲרֵלִ֑ים אֲשֶׁ֣ר יָרְדֽוּ־שְׁא֣וֹל בִּכְלֵֽי־מִלְחַמְתָּם֩ וַיִּתְּנ֨וּ אֶת־חַרְבוֹתָ֜ם תַּ֣חַת רָאשֵׁיהֶ֗ם וַתְּהִ֤י עֲוֺֽנֹתָם֙ עַל־עַצְמוֹתָ֔ם כִּֽי־חִתִּ֥ית גִּבּוֹרִ֖ים בְּאֶ֥רֶץ חַיִּֽים׃ (Sheol h7585)
28 २८ म्हणून हे मिसरा, बेसुंतीमध्ये तुझा नाश होईल. आणि तलवारीने वधलेल्यांबरोबर पडून राहशील.
וְאַתָּ֗ה בְּת֧וֹךְ עֲרֵלִ֛ים תִּשָּׁבַ֥ר וְתִשְׁכַּ֖ב אֶת־חַלְלֵי־חָֽרֶב׃
29 २९ तेथे अदोम तिचा राजा आणि तिच्या सर्व अधिपतीबरोबर आहे. ते सर्व शक्तीशाली होते, पण आता ते तलवारीने वधलेल्याबरोबर पडले आहे, बेसुंतीबरोबर, जे कोणी खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ठेवले आहेत.
שָׁ֣מָּה אֱד֗וֹם מְלָכֶ֙יהָ֙ וְכָל־נְשִׂיאֶ֔יהָ אֲשֶׁר־נִתְּנ֥וּ בִגְבוּרָתָ֖ם אֶת־חַלְלֵי־ חָ֑רֶב הֵ֛מָּה אֶת־עֲרֵלִ֥ים יִשְׁכָּ֖בוּ וְאֶת־יֹ֥רְדֵי בֽוֹר׃
30 ३० उतरेकडचे सर्वच्या सर्व अधिकारी व वधलेल्याबरोबर खाली गेलेले सर्व सीदोनी हे तेथे आहेत. ते शक्तीशाली होते आणि ते दुसऱ्यांना घाबरून सोडत, पण आता ते लज्जेने, जे तलवारीने वधले गेले त्या बेसुंतीबरोबर पडून राहिले आहेत.
שָׁ֣מָּה נְסִיכֵ֥י צָפ֛וֹן כֻּלָּ֖ם וְכָל־צִֽדֹנִ֑י אֲשֶׁר־יָרְד֣וּ אֶת־חֲלָלִ֗ים בְּחִתִּיתָ֤ם מִגְבֽוּרָתָם֙ בּוֹשִׁ֔ים וַיִּשְׁכְּב֤וּ עֲרֵלִים֙ אֶת־חַלְלֵי־חֶ֔רֶב וַיִּשְׂא֥וּ כְלִמָּתָ֖ם אֶת־י֥וֹרְדֵי בֽוֹר׃
31 ३१ फारो त्यांना पाहील तेव्हा तो आपल्या सर्व समूहाविषयी समाधान पावेल. फारो व त्याचे सर्व सैन्य यांस तलवारीने वधले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
אוֹתָם֙ יִרְאֶ֣ה פַרְעֹ֔ה וְנִחַ֖ם עַל־כָּל־המונה חַלְלֵי־חֶ֙רֶב֙ פַּרְעֹ֣ה וְכָל־חֵיל֔וֹ נְאֻ֖ם אֲדֹנָ֥י יְהוִֽה׃
32 ३२ मी फारोला जिवंताच्या भूमीवर दहशत घातली तरी तो व त्याचा समुदाय हे तलवारीने वधलेल्याबरोबर बेसुंतीमध्ये पडून राहतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
כִּֽי־נָתַ֥תִּי אֶת־חתיתו בְּאֶ֣רֶץ חַיִּ֑ים וְהֻשְׁכַּב֩ בְּת֨וֹךְ עֲרֵלִ֜ים אֶת־חַלְלֵי־חֶ֗רֶב פַּרְעֹה֙ וְכָל־הֲמוֹנֹ֔ה נְאֻ֖ם אֲדֹנָ֥י יְהוִֽה׃ פ

< यहेज्केल 32 >