< यहेज्केल 32 >
1 १ मग बाबेलातील बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
十二年十二月初一日,耶和華的話臨到我說:
2 २ मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारोविषयी मोठ्याने विलाप कर. त्यास म्हण, राष्ट्रांमध्ये मी तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू समुद्रातील मगर असा आहेस. तू पाणी घुसळून काढतोस, तू आपल्या पायाने पाणी ढवळून काढतो आणि त्यांचे पाणी गढूळ करतोस.
「人子啊,你要為埃及王法老作哀歌,說: 從前你在列國中,如同少壯獅子; 現在你卻像海中的大魚。 你衝出江河, 用爪攪動諸水, 使江河渾濁。
3 ३ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी पुष्कळ लोकांच्या समुदायाकडून आपले जाळे तुझ्यावर पसरीन आणि ते तुला माझ्या जाळीने वर ओढून काढतील.
主耶和華如此說: 我必用多國的人民, 將我的網撒在你身上, 把你拉上來。
4 ४ मी तुला जमिनीवर सोडून देईन. मी तुला शेतांत फेकून देईन आणि आकाशातील सर्व पक्षी येऊन तुझ्यावर बसतील असे करीन. मी तुझ्याकडून पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्याची भूक तृप्त करीन.
我必將你丟在地上, 拋在田野, 使空中的飛鳥都落在你身上, 使遍地的野獸吃你得飽。
5 ५ कारण मी तुझे मांस पर्वतावर ठेवीन, आणि किड्यांनी भरलेली तुमची प्रेते दऱ्यांत भरीन.
我必將你的肉丟在山間, 用你高大的屍首填滿山谷。
6 ६ मग मी तुझे रक्त पर्वतावर ओतीन, तुझ्या रक्ताने प्रवाह भरून वाहतील.
我又必用你的血澆灌你所游泳之地, 漫過山頂; 河道都必充滿。
7 ७ मग जेव्हा मी तुझा दिवा विझवून टाकीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातले तारे अंधारमय करीन. मी सूर्याला ढगाने झाकीन आणि चंद्र प्रकाशणार नाही.
我將你撲滅的時候, 要把天遮蔽, 使眾星昏暗, 以密雲遮掩太陽, 月亮也不放光。
8 ८ मी आकाशातील चमकणारा सर्व प्रकाश तुझ्यावर अंधार करीन आणि तुझ्या देशाला अंधारात ठेवीन. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
我必使天上的亮光都在你以上變為昏暗, 使你的地上黑暗。 這是主耶和華說的。
9 ९ जेव्हा मी तुझा नाश करून तुला राष्ट्रांमध्ये, जे देश तुझ्या ओळखीचे नाहीत त्यामध्ये आणीन तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय घाबरून सोडील.
「我使你敗亡的風聲傳到你所不認識的各國。那時,我必使多民的心因你愁煩。
10 १० मी खूप लोकांस तुझ्याविषयी विस्मित करीन. जेव्हा मी आपली तलवार त्यांच्यापुढे परजीन, तेव्हा त्यांचे राजे दहशतीने थरथरतील. तुझ्या पतनाच्या दिवशी प्रत्येक मनुष्यास आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.
我在許多國民和君王面前向你掄我的刀,國民就必因你驚奇,君王也必因你極其恐慌。在你仆倒的日子,他們各人為自己的性命時刻戰兢。」
11 ११ कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, बाबेलाच्या राजाची तलवार तुमच्याविरुध्द येईल.
主耶和華如此說:「巴比倫王的刀必臨到你。
12 १२ योद्ध्याच्या तलवारीने तुझे सेवक पडतील असे मी करीन, प्रत्येक योद्धा राष्ट्राचा दहशत आहे! हे योद्धे मिसराचा गौरव उद्धस्त करतील आणि तिच्यातला सर्व समुदाय नष्ट करतील.
我必藉勇士的刀使你的眾民仆倒;這勇士都是列國中強暴的。 他們必使埃及的驕傲歸於無有; 埃及的眾民必被滅絕。
13 १३ कारण मी महाजलांजवळील त्यांच्या सर्व गुरांढोरांचा नाश करीन; मग मनुष्याचा पाय पुन्हा ती गढूळ करणार नाही. तसेच गुरांच्या खुरही ते गढूळ करणार नाही.
我必從埃及多水旁除滅所有的走獸; 人腳獸蹄必不再攪渾這水。
14 १४ मग मी त्यांचे पाणी शांत करीन आणि त्यांच्या नद्या तेलाप्रमाणे वाहतील असे करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
那時,我必使埃及河澄清, 江河像油緩流。 這是主耶和華說的。
15 १५ जेव्हा मी मिसरची भूमी ओसाड करीन. म्हणजे तिच्यात जे भरले होते ते नाहीसे होऊन ती भूमी उजाड होईल, जेव्हा मी तिच्यातल्या सर्व राहणाऱ्यांस मारीन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
我使埃及地變為荒廢淒涼; 這地缺少從前所充滿的, 又擊殺其中一切的居民。 那時,他們就知道我是耶和華。
16 १६ तेथे विलाप होईल. कारण तिच्यावर राष्ट्रांच्या कन्या विलाप करतील. ते मिसरासाठी विलाप करतील. ते तिच्या सर्व सेवकांसाठी विलाप करतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
「人必用這哀歌去哀哭,列國的女子為埃及和她的群眾也必以此悲哀。這是主耶和華說的。」
17 १७ मग बाराव्या वर्षांच्या, महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
十二年十二月十五日,耶和華的話臨到我說:
18 १८ मानवाच्या मुला, मिसरातल्या लोकसमूहासाठी खेद कर आणि त्यांना, मिसर कन्येस आणि ऐश्वर्यशाली राष्ट्रांच्या कन्येस गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर अधोलोकी लोटून दे.
「人子啊,你要為埃及群眾哀號,又要將埃及和有名之國的女子,並下坑的人,一同扔到陰府去。
19 १९ त्यांना विचार, तू खरोखर कोणापेक्षाही अधिक सुंदर आहेस? खाली जा आणि बेसुंत्याबरोबर जाऊन पड.
你埃及的美麗勝過誰呢? 你下去與未受割禮的人一同躺臥吧!
20 २० जे कोणी तलवारीने वधले त्यामध्ये जाऊन ते पडतील! मिसर तलवारीला सोपून दिला आहे; व तिच्या सर्व समूहास ओढून न्या.
他們必在被殺的人中仆到。她被交給刀劍,要把她和她的群眾拉去。
21 २१ योद्ध्यातले जे बलवान ते त्याच्याशी व त्यास सहाय्य करणाऱ्याशी अधोलोकातून बोलतील; ते खाली उतरले आहेत. हे बेसुंती तलवारीने वधले ते तेथे पडले आहेत. (Sheol )
強盛的勇士要在陰間對埃及王和幫助他的說話;他們是未受割禮被殺的人,已經下去,躺臥不動。 (Sheol )
22 २२ अश्शूर तिच्या समुदायाबरोबर तेथे आहे. तिच्या कबरा तिच्यासभोवती आहेत; ते सर्व त्यांच्या तलवारीने वधलेले आहेत.
「亞述和她的眾民都在那裏,她民的墳墓在她四圍;他們都是被殺倒在刀下的。
23 २३ ज्या कोणाच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत, तिचा समुदाय तिच्या कबरेभोवती तेथे आहे. जे जिवंताच्या भूमीत ज्यांनी दहशत घातली ते सर्व वधलेले, तलवारीने पडले आहेत.
他們的墳墓在坑中極深之處。她的眾民在她墳墓的四圍,都是被殺倒在刀下的;他們曾在活人之地使人驚恐。
24 २४ तेथे एलाम आहे व तिच्या सर्व समुदाया बरोबर तिच्या कबरेभोवती आहे. ते सर्व वधलेले, तलवारीने पडलेले आहेत. ते बेसुंती असताना पृथ्वीच्या खालच्या स्थानात गेले आहेत. ते जिवंताच्या भूमीत दहशत घालीत ते सर्व वध पावले आहेत.
「以攔也在那裏,她的群眾在她墳墓的四圍,都是被殺倒在刀下、未受割禮而下陰府的;他們曾在活人之地使人驚恐,並且與下坑的人一同擔當羞辱。
25 २५ त्यांनी एलाम व त्याच्या सर्व समुदायासाठी वधलेल्यामध्ये शय्या तयार केली. त्याच्याभोवती त्यांच्या कबरा आहेत. ते सर्व बेसुंती तलवारीने मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताची भूमी दहशतीने भरली आहे. म्हणून गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर ते लज्जित झाले आहेत. वधलेल्यामध्ये त्यांना ठेवले आहे.
人給她和她的群眾在被殺的人中設立床榻。她民的墳墓在她四圍,他們都是未受割禮被刀殺的;他們曾在活人之地使人驚恐,並且與下坑的人一同擔當羞辱。以攔已經放在被殺的人中。
26 २६ तेथे मेशेख, तुबाल आणि त्यांचा सर्व समूह आहे. त्यांच्या कबरा त्यांच्या सभोवती आहेत. ते सर्व बेसुंती तलवारी मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताच्या भूमीत आपली दहशत आणली.
「米設、土巴,和她們的群眾都在那裏。她民的墳墓在她四圍,他們都是未受割禮被刀殺的;他們曾在活人之地使人驚恐。
27 २७ बेसुंती लोकांपैकी जे योद्धे पडून आपल्या सर्व लढाईच्या शस्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहीले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते योद्ध्यास दहशत घालत म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांवर आहे. (Sheol )
他們不得與那未受割禮仆倒的勇士一同躺臥;這些勇士帶着兵器下陰間,頭枕刀劍,骨頭上有本身的罪孽;他們曾在活人之地使勇士驚恐。 (Sheol )
28 २८ म्हणून हे मिसरा, बेसुंतीमध्ये तुझा नाश होईल. आणि तलवारीने वधलेल्यांबरोबर पडून राहशील.
「法老啊,你必在未受割禮的人中敗壞,與那些被殺的人一同躺臥。
29 २९ तेथे अदोम तिचा राजा आणि तिच्या सर्व अधिपतीबरोबर आहे. ते सर्व शक्तीशाली होते, पण आता ते तलवारीने वधलेल्याबरोबर पडले आहे, बेसुंतीबरोबर, जे कोणी खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ठेवले आहेत.
「以東也在那裏。她君王和一切首領雖然仗着勢力,還是放在被殺的人中;他們必與未受割禮的和下坑的人一同躺臥。
30 ३० उतरेकडचे सर्वच्या सर्व अधिकारी व वधलेल्याबरोबर खाली गेलेले सर्व सीदोनी हे तेथे आहेत. ते शक्तीशाली होते आणि ते दुसऱ्यांना घाबरून सोडत, पण आता ते लज्जेने, जे तलवारीने वधले गेले त्या बेसुंतीबरोबर पडून राहिले आहेत.
「在那裏有北方的眾王子和一切西頓人,都與被殺的人下去。他們雖然仗着勢力使人驚恐,還是蒙羞。他們未受割禮,和被刀殺的一同躺臥,與下坑的人一同擔當羞辱。
31 ३१ फारो त्यांना पाहील तेव्हा तो आपल्या सर्व समूहाविषयी समाधान पावेल. फारो व त्याचे सर्व सैन्य यांस तलवारीने वधले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
「法老看見他們,便為他被殺的軍隊受安慰。這是主耶和華說的。
32 ३२ मी फारोला जिवंताच्या भूमीवर दहशत घातली तरी तो व त्याचा समुदाय हे तलवारीने वधलेल्याबरोबर बेसुंतीमध्ये पडून राहतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
我任憑法老在活人之地使人驚恐,法老和他的群眾必放在未受割禮和被殺的人中。這是主耶和華說的。」