< यहेज्केल 31 >

1 बाबेलातील बंदिवासाच्या अकराव्या वर्षी, तिसऱ्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले,
फिर ग्यारहवें बरस के तीसरे महीने की पहली तारीख़ को, ख़ुदावन्द का कलाम मुझ पर नाज़िल हुआ:
2 “मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो आणि त्याच्यासभोवती असलेले त्याचे सेवक, यांना सांग, तू आपल्या मोठेपणात कोणासारखा आहेस?
कि 'ऐ आदमज़ाद शाह — ए — मिस्र फ़िर'औन और उसके लोगों से कह, तुम अपनी बुजु़र्गी में किसकी तरह हो?
3 पाहा! अश्शूर लबानोनात सुंदर फांद्याचा, व दाट छायेचा व उंच उंचीचा गंधसरू असा होता. आणि त्याचा शेंडा फांद्यावर होता.
देख असूर लुबनान का बुलन्द देवदार था, जिसकी डालियाँ ख़ूबसूरत थीं, और पत्तियों की कसरत से वह ख़ूब सायादार था और उसका क़द बुलन्द था, और उसकी चोटी घनी शाख़ों के बीच थी।
4 पुष्कळ जलांनी त्यास उंच वाढवले. खोल जलांनी त्यास खूप मोठे केले. त्याच्या प्रदेशाभोवती सर्व नद्या वाहत होत्या त्यांचे पाट शेतातील सर्व झाडास जाऊन पसरत होते.
पानी ने उसकी परवरिश की, गहराव ने उसे बढ़ाया, उसकी नहरें चारों तरफ़ जारी थीं, और उसने अपनी नालियों को मैदान के सब दरख़्तों तक पहुँचाया।
5 म्हणून ते झाड शेतातील इतर कोणत्याही झाडांपेक्षा उंचीने मोठे होते आणि त्याच्या फांद्या बहुत झाल्या. त्यास भरपूर पाणी मिळाल्याने फार फांद्या फुटल्या, त्याच्या फांद्या लांब वाढल्या.
इसलिए पानी की कसरत से उसका क़द मैदान के सब दरख़्तों से बुलन्द हुआ, और जब वह लहलहाने लगा, तो उसकी शाख़ें फ़िरावान और उसकी डालियाँ दराज़ हुई।
6 आकाशातील प्रत्येक पक्षी त्याच्या फांद्यांमध्ये आपली घरटी करीत. त्याच्या खांद्याच्या खाली सर्व वनपशू पिल्लांना जन्म देत. त्याच्या सावली खाली सर्व मोठी राष्ट्रे राहत.
हवा के सब परिन्दे उसकी शाख़ों पर अपने घोंसले बनाते थे, और उसकी डालियों के नीचे सब दश्ती हैवान बच्चे देते थे, और सब बड़ी बड़ी क़ौमें उसके साये में बसती थीं।
7 वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला, त्याच्या फांद्या लांब झाल्या.
यूँ वह अपनी बुजु़र्गी में अपनी डलियों की दराज़ी की वजह से ख़ुशनुमा था, क्यूँकि उसकी जड़ों के पास पानी की कसरत थी।
8 देवाच्या बागेतील, देवदारूने त्यास झाकून टाकिता येईना! सुरूच्या झाडामधील फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या व अर्मोन झाडे त्याच्या मुख्य फांद्याची बरोबरी करू न शकणाऱ्या होत्या. देवाच्या बागेतील कोणतेच झाड सुंदरतेत त्याच्यासारखे नव्हते.
ख़ुदा के बाग़ के देवदार उसे छिपा न सके, सरो उसकी शाख़ों और चिनार उसकी डालियों के बराबर न थे और ख़ुदा के बाग़ का कोई दरख़्त ख़ूबसूरती में उसकी तरह न था।
9 मी त्यास खूप फांद्या देऊन सुंदर बनविले. आणि देवाच्या एदेन बागेतील सर्व झाडे होती ती त्यांचा द्वेष करीत.
मैंने उसकी डालियों की फ़िरावानी से उसे हुस्न बख़्शा, यहाँ तक कि अदन के सब दरख़्तों को जो ख़ुदा के बाग़ में थे उस पर रश्क आता था।
10 १० यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतोः कारण त्याने आपणाला उंच केले आहे आणि तो वाढून आपल्या फांद्याच्या शेंड्याने ढगाला भिडला आहे व त्या उंचीने त्याचे हृदय उंचावले आहे.
इसलिए ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि चूँकि उसने आपको बुलन्द और अपनी चोटी को घनी शाख़ों के बीच ऊँचा किया, और उसके दिल में उसकी बूलन्दी पर गु़रूर समाया।
11 ११ म्हणून मी त्यास पकडून एका बलिष्ट राष्ट्राच्या राज्यकर्त्याच्या स्वाधीन करीन. हा राज्यकर्ता त्याच्याविरुध्द कृती करून आणि त्याच्या दुष्टतेमुळे त्यास दूर काढून टाकीन.
इसलिए मैं उसको क़ौमों में से एक उहदे दार के हवाले कर दूँगा, यक़ीनन वह उसका फ़ैसला करेगा, मैंने उसे उसकी शरारत की वजह से निकाल दिया।
12 १२ सर्व राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्यास तोडून व नंतर त्यास सोडून दिले. त्याच्या फांद्या डोंगरावर व खोऱ्यात पडल्या आहेत आणि त्याच्या मुख्य फांद्या पृथ्वीवरील सर्व प्रवाहात मोडून पडल्या आहेत. मग पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत आणि त्यास सोडले आहे.
और अजनबी लोग जो क़ौमों में से हैबतनाक हैं, उसे काट डालेंगे और फेंक देंगे पहाड़ों और सब वादियों पर उसकी शाख़ें गिर पड़ेगी, और ज़मीन की सब नहरों के आस — पास उसकी डालियाँ तोड़ी जाएँगी, और इस ज़मीन के सब लोग उसके साये से निकल जाएँगे और उसे छोड़ देंगे।
13 १३ त्या पडलेल्या झाडावर आकाशातील सर्व पक्षी जमतात आणि शेतातील सर्व पशू त्याच्या फांद्यावरती बसतात.
हवा के सब परिन्दे उसके टूटे तने में बसेंगे, और तमाम दश्ती जानवर उसकी शाख़ों पर होंगे।
14 १४ आता, पाण्याजवळील कोणत्याही झाडाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये. आपल्या शेंड्याने ढगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नये. कारण सर्व पाणी पिणाऱ्यानी, आपल्या उंचीने उंचावू नये. कारण त्या सर्वास मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवजात जाते तिच्यात त्यासही जावयास लाविले आहे.
ताकि लब — ए — आब के सब बलूतों के दरख़्तों में से कोई अपनी बुलन्दी पर मग़रूर न हो, और अपनी चोटी घनी शाख़ों के बीच ऊँची न करे, और उनमें से बड़े बड़े और पानी जज़्ब करने वाले सीधे खड़े न हों, क्यूँकि वह सबके सब मौत के हवाले किए जाएँगे, या'नी ज़मीन के तह में बनी आदम के बीच जो पाताल में उतरते हैं।
15 १५ प्रभू परमेश्वर असे म्हणतोः ज्या दिवशी जेव्हा तो मृत्युलोकांत गेला, त्यादिवशी मी पृथ्वीवर शोक आणला. मी त्याच्याकरता जलाशय झाकला आणि समुद्राचे पाणी मागे धरून ठेवले. मी महाजले रोखली आणि त्याच्यासाठी लबानोनाला शोक करायला लावले. त्याच्यासाठी शेतातील सर्व झाडे म्लान झाली. (Sheol h7585)
ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि जिस रोज़ वह पाताल में उतरे मैं मातम कराऊँगा, मैं उसकी वजह से गहराव को छिपा दूँगा और उसकी नहरों को रोक दूँगा और बड़े सैलाब थम जाएँगे; हाँ, मैं लुबनान को उसके लिए सियाह पोश कराऊँगा, और उसके लिए मैदान के सब दरख़्त ग़शी में आएँगे। (Sheol h7585)
16 १६ गर्तेत जाणाऱ्याबरोबर मी त्यास अधोलोकी लोटून दिले तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रांस थरथर कांपविले; आणि मी तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व झाडे, पाण्याने पोसलेले निवडक व अति सुंदर असे लबानोनाचे झाडाचे समाधान झाले! म्हणून शेतातील सर्व झाडांनी त्याच्यासाठी शोक केला. (Sheol h7585)
जिस वक़्त मैं उसे उन सब के साथ जो गढ़े में गिरते हैं, पाताल में डालूँगा, तो उसके गिरने के शोर से तमाम क़ौम लरज़ाँ होंगी; और अदन के सब दरख़्त, लुबनान के चीदा और नफ़ीस, वह सब जो पानी जज़्ब करते हैं ज़मीन के तह में तसल्ली पाएँगे। (Sheol h7585)
17 १७ जी कोणी राष्ट्रे त्यांच्या छायेत राहत होती. ते त्याचे बलवान बाहू असे होते तेही त्यांच्याबरोबर तलवारीने वधले होते त्यांच्याकडे खाली अधोलोकात गेले. (Sheol h7585)
वह भी उसके साथ उन तक, जो तलवार से मारे गए, पाताल में उतर जाएँगे और वह भी जो उसके बाज़ू थे, और क़ौमों के बीच उसके साये में बसते थे वहीं होंगे। (Sheol h7585)
18 १८ तू वैभवाने व मोठेपणाने एदेनेमधल्या झाडांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनांतल्या झाडांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमुदाय यांची अशी गति होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
“तू शान — ओ — शौकत में अदन के दरख़्तों में से किसकी तरह है? लेकिन तू अदन के दरख़्तों के साथ ज़मीन के तह में डाला जाएगा, तू उनके साथ जो तलवार से क़त्ल हुए, नामख़्तूनों के बीच पड़ा रहेगा; यही फ़िर'औन और उसके सब लोग हैं, ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है।”

< यहेज्केल 31 >