< यहेज्केल 30 >
1 १ परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
Neno la Yahwe likanijia, kusema,
2 २ “मानवाच्या मुला, भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे!
“Mwanadamu, toa unabii na sema, 'Bwana Yahwe asema hivi: Maombolezo. “Ole unakuja siku hiyo.”
3 ३ तो दिवस नजीक आहे. परमेश्वराचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांसाठी न्यायाची वेळ असेल.
siku ikaribu. Siku ikaribu kwa ajili ya Yahwe. Itakuwa siku ya mawingu, mda wa hukumu kwa ajili ya mataifa.
4 ४ मग मिसराविरूद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिसरात पडतील तेव्हा कूशात वेदना होतील, ते तिची संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाये नष्ट होतील.
Kisha upanga utakuja dhidi ya Misri, na huko kutakuwa na maumivu makali katika Kushi wakati wauaji wa watu watakapoanguka katika Misri-wakati watakapochukua utajiri, na wakati misingi yake itakapoharibiwa.
5 ५ कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील.
Kushi, Putu, na Ludi, na wageni wote, pamoja na watu wa nyumba ya agano-wote wataanguka chini kwa upanga.
6 ६ परमेश्वर असे म्हणतो, मग जो कोणी एक मिसराला मदत करील तो पडेल आणि तिच्या सामर्थ्याचा गर्व खाली उतरेल. मिग्दोलापासून सवेनेपर्यंतचे त्याचे सैनिक तलवारीने पडतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Yahwe asema hivi: Basi wale wanaoisaidia Misri wataanguka, na kiburi cha uweza wake kitashuka chini. Kutoka Migdoli hata Sewene maaskari wao wataanguka kwa upanga-hivi ndivyo Bwana Yahwe asemavyo.
7 ७ ते जे देश ओसाड झाले आहेत त्यांच्यामध्ये ते घृणास्पद होतील आणि त्यांची नगरे नाश झालेल्या नगरात असतील.
Wataogofya kati ya nchi zilizotupwa, na miji yao itakuwa miongoni mwa miji yote iliharibika.
8 ८ जेव्हा मी मिसरामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
Kisha watajua kwamba mimi ni Yahwe, nitakapouweka moto katika Misri, na wakati wasaidizi wake wote watakapoharibiwa.
9 ९ त्या दिवशी, सुरक्षित कूशी लोकांस दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील; आणि त्या दिवशी तेथे मिसरांच्यामध्ये न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील. कारण पाहा! ती येत आहे!
Katika siku hiyo wajumbe watatoka mbele yangu katika meli ili kuitia hofu Kushi iliyo salama, na kutakuwa na maumivu makali miongoni mwao katika siku ya kuangamizwa Misri. Kwa kuwa tazama! inakuja.
10 १० प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी मिसराचा समुदाय बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाताने नाहीसा करीन.
Bwana Yahwe asema hivi: Nitaufanya mwisho wa watu wa Misri kwa mkono wa Nebukadreza, mfalme wa Babeli.
11 ११ तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील.
Yeye na jeshi lake pamoja naye, hofu ya mataifa, italetwa kuiharibu nchi; watafuta panga zao juu ya Misri na kuijaza nchi pamoja na watu waliokufa.
12 १२ मी नद्यांना कोरडी भूमी करीन आणि मी देश दुष्ट मनुष्यांच्या हाती विकत देईन. मी, परमेश्वर, सांगतो की परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन. मी, परमेश्वर, असे सांगत आहे.
Nitaifanya mito kuwa nchi kavu, na nitaiuza nchi kwenye mkono wa watu waovu. Nitaifanya nchi na viijazavyo ukiwa kwa mkono wa wageni-mimi, Yahwe, nimesema.
13 १३ प्रभू परमेश्वर असे म्हणतोः मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडीमोलाच्या मूर्त्त्यां नाहीशा करीन. ह्यापुढे मिसर देशामध्ये कोणीही अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन.
Bwana Yahwe asema hivi: Nitaziharibu sanamu, na nitaleta mwisho wa sanamu za ubatili za Nofu. Hakutakuwa na mkuu katika Misri, na nitaweka hofu katika nchi ya Misri.
14 १४ मी पथ्रोसला ओसाड करीन. व सोअनास आग लावीन. मी नो याला न्यायदंड करीन.
Kisha nitaifanya Pathrosi ukiwa na kuweka moto katika Soani, nitatekeleza matendo ya hukumu katika No.
15 १५ कारण मी मिसराचा बालेकिल्ला जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन. व नोच्या समुदायाला कापून काढीन.
Kwa kuwa nitamwaga ghadhabu yangu juu Sini, ngome ya Misri, na kuwakatilia mbali watu wa mataifa.
16 १६ मी मिसराला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील व नो मोडून पडेल. प्रत्येक दिवशी नोफावर शत्रू येतील.
Kisha nitaweka moto katika Misri; Sini itakuwa katika dhiki kuu, No itavunjika, na Nofu itakabiliana na maadui kila siku.
17 १७ आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील.
Vijana katika Oni na Pi-besethi wataanguka kwa upanga, na miji yao itaenda utumwani.
18 १८ जेव्हा मी तहपन्हेस येथे मिसराची जोखडे तोडीन तेव्हा त्यादिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा होईल. तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल.
Huko Tapanesi, siku itabadilika kuwa usiku nitakapo ivunja nira ya Misri huko, na kiburi cha uwezo wake kitaisha. Kutakuwa na wingu likimfunika, na binti zake wataenda utumwani.
19 १९ अशा रीतीने, मी मिसरावर न्यायादंड आणीन, मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
Nitatekeleza matendo ya hukumu katika Misri, hivyo watajua kwamba mimi ni Yahwe.”'
20 २० मग अकराव्या वर्षात, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
Kisha ikawa katika mwaka wa kumi na moja, katika mwezi wa kwanza, katika siku ya saba ya mwezi, lile neno la Yahwe likanijia, kusema,
21 २१ “मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो याचा भुज मी मोडला आहे. पाहा! त्याच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्यास बरे करण्यासाठी औषधोपचार करून पट्टी लावून त्यास कोणीही बांधले नाही.
“Mwanadamu, nimeuvunja mkono wa Farao, mfalme wa Misri. Tazama! Haukufungwa, au kufungwa kwa kitambaa cha bendeji ili upone, hivyo basi uweze kuwa imara kushika upanga.
22 २२ यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मिसराचा राजा फारो! याच्याविरूद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला आहे तोही मोडीन. आणि त्याच्या हातातून तलवार गळून पडेल असे मी करीन.
Kwa hiyo Bwana Yahwe asema hivi, 'Tazama, mimi niko juu ya Farao, mfalme wa Misri. Kwa kuwa nitauvunja mkono wake, wote yule aliye hodari na yule aliyevunjika, nitaufanya upanga wangu kuanguka kutoka kwenye mkono wake.
23 २३ मग मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन आणि त्यांना देशामध्ये उधळून लावीन.
Kisha nitaitawanya Misri miongoni mwa mataifa na kuwatawanya katika nchi mbali mbali.
24 २४ मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन. आणि आपली तलवार त्यांच्या हाती देईन. यासाठी की, मी फारोचे बाहू तोडीन. मग तो बाबेल राजासमोर मरणाऱ्या मनुष्याप्रमाणे कण्हण्यांनी कण्हून ओरडेल.
Nitaunyoosha mikono kwa mfalme wa Babeli na kuweka upanga wangu katika mkono wake ili kwamba niweze kuiharibu mikono ya Farao. Atagugumia mbele ya mfalme wa Babeli kwa mgumio wa mtu anayekufa.
25 २५ कारण मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन, पण फारोचे बाहू गळून पडतील. जेव्हा मी मिसर देशावर उगारण्यासाठी आपली तलवार बाबेल राजाच्या हातात ठेवीन. मग तो तीने त्यांच्या देशावर हल्ला करील. तेव्हा ते जाणतील की परमेश्वर आहे.
Kwa kuwa nitainyoosha mikono ya mfalme wa Babeli, wakati mkono wa Farao utakapoanguka. Kisha watajua yakwamba mimi ni Yahwe, nitakapoweka upanga wangu kwenye mkono wa mfalme wa Babeli; kwa kuwa ataishambulia nchi ya Misri kwa huo.
26 २६ म्हणून मी मिसऱ्यांना राष्ट्रांत विखरुन टाकीन आणि त्यांना देशातून पांगविन. मग ते जाणतील की मीच परमेश्वर आहे.”
Hivyo nitaitawanya miongoni mwa mataifa na kuyatawanya kwenye nchi tofauti tofauti. Kisha watajua yakwamba mimi ni Yahwe.”'