< यहेज्केल 30 >

1 परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
여호와의 말씀이 또 내게 임하여 가라사대
2 “मानवाच्या मुला, भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे!
인자야 너는 예언하여 이르라 주 여호와의 말씀에 너희는 통곡하며 이르기를 슬프다 이 날이여 하라
3 तो दिवस नजीक आहे. परमेश्वराचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांसाठी न्यायाची वेळ असेल.
그 날이 가까웠도다 여호와의 날이 가까웠도다 구름의 날일 것이요 열국의 때이리로다
4 मग मिसराविरूद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिसरात पडतील तेव्हा कूशात वेदना होतील, ते तिची संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाये नष्ट होतील.
애굽에 칼이 임할 것이라 애굽에서 살륙 당한 자들이 엎드러질 때에 구스에 심한 근심이 있을 것이며 애굽의 무리가 옮기우며 그 기지가 헐릴 것이요
5 कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील.
구스와 붓과 룻과 모든 섞인 백성과 굽과 및 동맹한 땅의 백성들이 그들과 함께 칼에 엎드러지리라
6 परमेश्वर असे म्हणतो, मग जो कोणी एक मिसराला मदत करील तो पडेल आणि तिच्या सामर्थ्याचा गर्व खाली उतरेल. मिग्दोलापासून सवेनेपर्यंतचे त्याचे सैनिक तलवारीने पडतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
나 여호와가 말하노라 애굽을 붙들어 주는 자도 엎드러질 것이요 애굽의 교만한 권세도 낮아질 것이라 믹돌에서부터 수에네까지 무리가 그 가운데서 칼에 엎드러지리라 나 주 여호와의 말이니라
7 ते जे देश ओसाड झाले आहेत त्यांच्यामध्ये ते घृणास्पद होतील आणि त्यांची नगरे नाश झालेल्या नगरात असतील.
황무한 열방 같이 그들도 황무할 것이며 사막이 된 성읍들 같이 그 성읍들도 사막이 될 것이라
8 जेव्हा मी मिसरामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
내가 애굽에 불을 일으키며 그 모든 돕는 자를 멸할 때에 그들이 나를 여호와인 줄 알리라
9 त्या दिवशी, सुरक्षित कूशी लोकांस दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील; आणि त्या दिवशी तेथे मिसरांच्यामध्ये न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील. कारण पाहा! ती येत आहे!
그 날에 사자들이 내 앞에서 배로 나아가서 염려 없는 구스 사람을 두렵게 하리니 애굽의 재앙의 날과 같이 그들에게도 심한 근심이 있으리라 이것이 오리로다
10 १० प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी मिसराचा समुदाय बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाताने नाहीसा करीन.
나 주 여호와가 말하노라 내가 또 바벨론 왕 느부갓네살의 손으로 애굽 무리들을 끊으리니
11 ११ तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील.
그가 열국 중에 강포한 자기 군대를 거느리고 와서 그 땅을 멸할 때에 칼을 빼어 애굽을 쳐서 살륙 당한 자로 땅에 가득하게 하리라
12 १२ मी नद्यांना कोरडी भूमी करीन आणि मी देश दुष्ट मनुष्यांच्या हाती विकत देईन. मी, परमेश्वर, सांगतो की परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन. मी, परमेश्वर, असे सांगत आहे.
내가 그 모든 강을 말리우고 그 땅을 악인의 손에 팔겠으며 타국 사람의 손으로 그 땅과 그 가운데 있는 모든 것을 황무케 하리라 나 여호와의 말이니라
13 १३ प्रभू परमेश्वर असे म्हणतोः मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडीमोलाच्या मूर्त्त्यां नाहीशा करीन. ह्यापुढे मिसर देशामध्ये कोणीही अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन.
나 주 여호와가 말하노라 내가 그 우상들을 멸하며 신상들을 놉 가운데서 끊으며 애굽 땅에서 왕이 다시 나지 못하게 하고 그 땅에 두려움이 있게 하리라
14 १४ मी पथ्रोसला ओसाड करीन. व सोअनास आग लावीन. मी नो याला न्यायदंड करीन.
내가 바드로스를 황무케 하며 소안에 불을 일으키며 노를 국문하며
15 १५ कारण मी मिसराचा बालेकिल्ला जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन. व नोच्या समुदायाला कापून काढीन.
내 분노를 애굽의 견고한 성 신에 쏟고 또 노의 무리를 끊을 것이라
16 १६ मी मिसराला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील व नो मोडून पडेल. प्रत्येक दिवशी नोफावर शत्रू येतील.
내가 애굽에 불을 일으키리니 신이 심히 근심할 것이며 노는 찢어 나뉠 것이며 놉은 날로 대적이 있을 것이며
17 १७ आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील.
아웬과 비베셋의 소년들은 칼에 엎드러질 것이며 그 성읍 거민들은 포로될 것이라
18 १८ जेव्हा मी तहपन्हेस येथे मिसराची जोखडे तोडीन तेव्हा त्यादिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा होईल. तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल.
내가 애굽 멍에를 꺾으며 그 교만한 권세를 그 가운데서 그치게 할 때에 드합느헤스에서는 날이 어둡겠고 그 성읍에는 구름이 덮일 것이며 그 딸들은 포로 될 것이라
19 १९ अशा रीतीने, मी मिसरावर न्यायादंड आणीन, मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
이와 같이 내가 애굽을 국문하리니 그들이 나를 여호와인 줄 알리라 하셨다 하라
20 २० मग अकराव्या वर्षात, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
제십일년 정월 칠일에 여호와의 말씀이 네게 임하여 가라사대
21 २१ “मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो याचा भुज मी मोडला आहे. पाहा! त्याच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्यास बरे करण्यासाठी औषधोपचार करून पट्टी लावून त्यास कोणीही बांधले नाही.
인자야 내가 애굽 왕 바로의 팔을 꺾었더니 칼을 잡을 힘이 있도록 그것을 그저 싸매지도 못하였고 약을 붙여 싸매지도 못하였느니라
22 २२ यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मिसराचा राजा फारो! याच्याविरूद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला आहे तोही मोडीन. आणि त्याच्या हातातून तलवार गळून पडेल असे मी करीन.
그러므로 나 주 여호와가 말하노라 내가 애굽 왕 바로를 대적하여 그 두 팔 곧 성한 팔과 이미 꺾인 팔을 꺾어서 칼이 그 손에서 떨어지게 하고
23 २३ मग मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन आणि त्यांना देशामध्ये उधळून लावीन.
애굽 사람을 열국 가운데로 흩으며 열방 가운데로 헤칠지라
24 २४ मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन. आणि आपली तलवार त्यांच्या हाती देईन. यासाठी की, मी फारोचे बाहू तोडीन. मग तो बाबेल राजासमोर मरणाऱ्या मनुष्याप्रमाणे कण्हण्यांनी कण्हून ओरडेल.
내가 바벨론 왕의 팔을 견고하게 하고 내 칼을 그 손에 붙이려니와 내가 바로의 팔을 꺾으리니 그가 바벨론 왕의 앞에서 고통하기를 죽게 상한 자의 고통하듯 하리라
25 २५ कारण मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन, पण फारोचे बाहू गळून पडतील. जेव्हा मी मिसर देशावर उगारण्यासाठी आपली तलवार बाबेल राजाच्या हातात ठेवीन. मग तो तीने त्यांच्या देशावर हल्ला करील. तेव्हा ते जाणतील की परमेश्वर आहे.
내가 바벨론 왕의 팔은 들어주고 바로의 팔은 떨어뜨릴 것이라 내가 내 칼을 바벨론 왕의 손에 붙이고 그로 들어 애굽 땅을 치게 하리니 그들이 나를 여호와인 줄 알겠고
26 २६ म्हणून मी मिसऱ्यांना राष्ट्रांत विखरुन टाकीन आणि त्यांना देशातून पांगविन. मग ते जाणतील की मीच परमेश्वर आहे.”
내가 애굽 사람을 열국 가운데로 흩으며 열방 가운데로 헤치리니 그들이 나를 여호와인 줄 알리라

< यहेज्केल 30 >