< यहेज्केल 27 >
1 १ परमेश्वराचे वचन पुन्हा मजकडे आले आणि म्हणाले,
E veio a mim a palavra do Senhor, dizendo:
2 २ आता तू, मानवाच्या मुला, सोरेविषयी विलाप कर.
Tu pois, ó filho do homem, levanta uma lamentação sobre Tiro.
3 ३ आणि “सोरेला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू समुद्राच्या प्रवेशाद्वाराजवळ वसली आहेस, जी तू पुष्कळ द्वीपांतील व्यापारी लोकांसाठी आहेस. सोरे! तू म्हणाली, मी सुंदरतेत परिपूर्ण आहे.
E dize a Tiro, que habita nas estradas do mar, e negocia com os povos em muitas ilhas: Assim diz o Senhor Jehovah: Ó Tiro, tu dizes: Eu sou perfeita em formosura.
4 ४ तुझ्या सीमा समुद्राच्या हृदयात आहेत; बांधणाऱ्यांनी तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे.
No coração dos mares estão os teus termos; os que te edificaram aperfeiçoaram a tua formosura.
5 ५ त्यांनी तुझ्या सर्व फळ्या सनीरच्या सरूंनी केल्या आहेत. तुला डोलकाठी करायला त्यांनी लबानोनातून गंधसरु घेतले आहे.
Fabricaram todos os teus convezes de faias de Senir; trouxeram cedros do líbano para te fazerem mastros.
6 ६ त्यांनी तुझी वल्ही बाशानामधील अल्लोनाच्या झाडाची केली. त्यांनी तुझ्या बैठकीच्या फळ्या कित्तीम बेटातल्या बाक्स लाकडाच्या केल्या असून ती हस्तिदंताने जडलेल्या होत्या.
Fizeram os teus remos de carvalhos de Basan: a companhia dos assyrios fez os teus bancos de marfim das ilhas dos chitteos.
7 ७ तुझे शीड, ते तुला निशाण व्हावे म्हणून मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार बारीक सुताचे होते. ते पडद्याचे कापड एलीशा बेटाहून आणलेले निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे तुझे छत होते.
Linho fino bordado do Egito era a tua cortina, para te servir de vela; azul e púrpura das ilhas de Elisa era a tua cobertura.
8 ८ जे कोणी सीदोन व अर्वद येथे राहत होते ते तुझ्या नावा वल्हवीत असत. हे सोरे, तुझ्यात सुज्ञ होते. ते तुझे नावाडी होते
Os moradores de Sidon e de Arvad foram os teus remeiros; os teus sábios, ó Tiro, que se achavam em ti, esses foram os teus pilotos.
9 ९ तुझ्यामध्ये गबालाची वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजाची फुटतूट दुरुस्त करत असत. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या व्यापाराच्या व्यवहारासाठी तुझ्याकडे येत असत.
Os anciãos de Gebal e seus sábios foram em ti os que concertavam as tuas fendas: todos os navios do mar e os marinheiros se acharam em ti, para negociar os teus negócios.
10 १० पारसी, लूदी व पूटी तुझ्या सैन्यात तुझे लढणारे माणसे होती. ते आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्यामध्ये टांगीत; ते तुझे वैभव दाखवत.
Os persas, e os Lídios, e os puteos eram no teu exército os teus soldados: escudos e capacetes penduraram em ti: eles te deram o teu renome.
11 ११ अर्वदची माणसे व हेलेखचे सैनिक सभोवार तुझ्या तटावर असत आणि गम्मादाचे लोक तुझ्या बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर चोहोकडे टांगून ठेवीत असत. त्यांनी तुझी सुंदरता पूर्णत्वाला आणली.
Os filhos de Arvad e o teu exército estavam sobre os teus muros em redor, e os gamaditas sobre as tuas torres: penduravam os seus escudos nos teus muros em redor; eles aperfeiçoavam a tua formosura.
12 १२ तार्शीश तुझा ग्राहक होता कारण प्रत्येक प्रकारचा मालमत्तेचा साठा तुझ्याकडे होता. ते तुझ्या मालाच्या बदल्यात रुपे, लोखंड, कथील व शिसे आणून विकायचा माल घेत असत.
Tarsis era a que negociava contigo, por causa da abundância de toda a casta de fazenda: com prata, ferro, estanho, e chumbo negociavam em tuas feiras.
13 १३ यावान, तुबाल आणि मेशेख तुझ्याबरोबर मनुष्य जीव व पितळेच्या वस्तू ही देऊन तुझ्याशी व्यापार करीत असत. ते तुझा व्यापारी माल हाताळत होते.
Javan, Tubal e Mesech eram teus mercadores: com almas de homens e vasos de bronze fizeram negócios contigo.
14 १४ तोगार्माचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे देऊन तुझ्याशी व्यापार करीत.
Da casa de Togarma traziam às tuas feiras cavalos, e cavaleiros e mulos.
15 १५ ददानी माणसे पुष्कळ किनारपट्टीवर तुझे व्यापारी होते. व्यापारी माल तुझ्या हातात होता. ते तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड भेट म्हणून परत पाठवत होते.
Os filhos de Dedan eram os teus mercadores; muitas ilhas eram o comércio da tua mão: dentes de marfim e pau preto tornavam a dar-te em presente.
16 १६ तुझ्या पुष्कळ उत्पन्नात अराम तुझा व्यापारी होता. ते तुझ्याबद्दल पाचू, जांभळ्या रंगाचे कापड, सुती तलम कापड, पोवळे आणि माणके तुला पुरवत होते.
A Síria negociava contigo por causa da multidão das tuas boas obras: esmeralda, púrpura, e obra bordada, e seda, e corais e cristal traziam às tuas feiras.
17 १७ यहूदा व इस्राएल देश ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या मालाबद्दल मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल आणि ऊद पुरवत होते.
Judá e a terra de Israel, eles eram os teus mercadores: com trigo de Minith, e pannagh, e mel, e azeite e bálsamo fizeram negócios contigo.
18 १८ तुझ्या सर्व प्रचंड संपत्तीचा, तुझ्या सर्व मालाचा हेल्बोनाचा द्राक्षरस व पांढरी लोकर यांनी दिमिष्की तुझा व्यापारी होता.
Damasco negociava contigo, por causa da multidão das tuas obras, por causa da multidão de toda a sorte de fazenda, com vinho de Chelbon e lã branca.
19 १९ दान व यावान उसालपासून तुझ्या मालाबद्दल घडीव लोखंड, दालचिनी, ऊसाचा पुरवठा करीत असत. हा तुझ्यासाठी व्यापार झाला.
Também Dan, e Javan, o caminhante, traficavam nas tuas feiras: ferro polido, casca, e cana aromática entravam no teu negócio.
20 २० ददान तुझ्या खोगीराच्या आच्छादनासाठी उत्तम कपड्याचा व्यापारी होता.
Dedan negociava contigo com panos preciosos para carros.
21 २१ अरबस्तान व केदारचे सर्व प्रमुख तुझ्याबरोबर व्यापारी होते. ते तुला कोकरे, एडके आणि बोकड यांचा पुरवठा करीत होते.
Arábia, e todos os príncipes de Kedar, eram eles os mercadores de tua mão, com cordeiros, e carneiros e bodes; nestas coisas negociavam contigo.
22 २२ शबा व रामा यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. ते तुझ्या मालाबद्दल सर्व प्रकारचे उत्तम मसाले आणि सर्व प्रकारचे मोल्यवान रत्ने व सोने देऊन तुझ्याशी व्यापार करीत होते.
Os mercadores de Sheba e Raama eram eles os teus mercadores em todos os mais subidos aromas, e em toda a pedra preciosa e ouro contratavam nas tuas feiras.
23 २३ हारान, कन्ने व एदेन, शबा, अश्शूर व किल्मद यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते.
Haran, e Canne e Éden, os mercadores de Sheba, Assur e Kilmad negociavam contigo.
24 २४ ते तुझा माल घेऊन उंची वस्त्रे, जांभळे व वेलबुट्टीचे झगे व उंची वस्त्रांच्या पेट्या व वळलेल्या टिकाऊ दोऱ्या वगैरे व्यापाऱ्याच्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत होते.
Estes eram teus mercadores em toda a sorte de mercadorias, em fardos de cardeo, e bordado, e em cofres de roupas preciosas, amarrados com cordas e metidos em cofres de cedro, na tua mercadoria.
25 २५ तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल वाहतुक करणारे तुझे काफले असे होते. म्हणून तू समुद्राच्या हृदयामध्ये मालवाहू जहाजाप्रमाणे खच्चून भरलेली आहेस.
Os navios de Tarsis cantavam de ti por causa de teu negócio; e te encheste, e te glorificaste muito no meio dos mares.
26 २६ तुझ्या वल्हेकऱ्यांनी तुला अफाट समुद्रात नेले. पूर्वेच्या वाऱ्याने तुला भर समुद्रात मोडून टाकले.
Os teus remeiros te conduziram sobre grandes águas: o vento oriental te quebrantou no meio dos mares.
27 २७ तुझी संपत्ती, तुझ्या व्यापारी वस्तू व विकत घेतलेल्या वस्तू; तुझे नाविक, खलाशी आणि जहाज बांधणारे; तुझ्या व्यापाराची देवघेव करणारे व तुझ्यामध्ये असलेली सर्व लढाऊ माणसे व तुझ्यामध्ये असलेला सर्व समुदाय तुझ्या नाशाच्या दिवशी भर समुद्रात पडतील.
As tuas fazendas e as tuas feiras, o teu negócio, os teus marinheiros, e os teus pilotos, os que concertavam as tuas fendas, e os que faziam os teus negócios, e todos os teus soldados, que estão em ti, juntamente com toda a tua congregação, que está no meio de ti, cairão no meio dos mares no dia da tua queda.
28 २८ तुझ्या खलाशांच्या आरोळीच्या आवाजाने समुद्राकडील नगरे भीतीने थरथर कापतील.
Ao estrondo da gritaria dos teus pilotos tremerão os arrabaldes.
29 २९ जे कोणी वल्ही हाताळणारे ते सर्व खलाशी व समुद्रावरील प्रत्येक नावाडी आपल्या जहाजावरून उतरून खाली भूमीवर येतील.
E todos os que pegam no remo, os marinheiros, e todos os pilotos do mar descerão de seus navios, e na terra pararão.
30 ३० ते तुला त्यांचा आवाज ऐकवतील आणि अतीखेदाने ओरडतील; ते आपल्या डोक्यांत धूळ घालतील. राखेत लोळतील.
E farão ouvir a sua voz sobre ti, e gritarão amargamente; e lançarão pó sobre as cabeças, e na cinza se revolverão.
31 ३१ ते तुझ्यासाठी डोक्याचे केस कापतील. गोणपाट नेसतील. मनात अति खिन्न होऊन तुजसाठी मोठ्याने विलाप करतील.
E se farão inteiramente calvos por tua causa, e se cingirão de sacos, e chorarão sobre ti com amargura da alma, e amarga lamentação.
32 ३२ ते तुझ्यासाठी आक्रोशाने विलाप करून म्हणतील, सोरेसारखी जी समुद्रामध्ये निशब्द झाली आहे, तिच्यासारखी कोणती तरी नगरी आहे काय?
E levantarão uma lamentação sobre ti no seu pranto, e lamentarão sobre ti, dizendo: Quem foi como Tiro? como a destruída no meio do mar
33 ३३ तुझ्या व्यापारांच्या वस्तू समुद्रातून जात असत तेव्हा तू पुष्कळांना तृप्त करीत असत; तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि आपल्या विकण्याचे पदार्थ फार असल्यामुळे तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.
Quando as tuas mercadorias procediam dos mares, fartaste a muitos povos; com a multidão da tua fazenda e do teu negócio, enriqueceste os reis da terra.
34 ३४ पण जेव्हा तू खोल पाण्याने समुद्राकडून मोडून गेलीस तेव्हा तुझ्या विकण्याचा माल व तुझ्यामधील सर्व समुदायही बुडाले.
No tempo em que foste quebrantada dos mares, nas profundezas das águas, cairam os teus negócios e toda a tua congregação no meio de ti.
35 ३५ समुद्रकाठी राहणाऱ्यांना तू घाबरून सोडले आणि त्यांच्या राजांचा दहशतीने थरकाप उडाला आहे. त्यांचे चेहरे कंप पावत आहेत.
Todos os moradores das ilhas foram a teu respeito cheios de espanto; e os seus reis tremeram em grande maneira, e foram perturbados nos seus rostos.
36 ३६ लोकांतले व्यापारी तुझा तिरस्कार करतात; तू दहशत अशी झाली आहेस आणि तू पुन्हा कधीच असणार नाहीस.”
Os mercadores dentre os povos assobiaram sobre ti: tu te tornaste em grande espanto, e nunca jamais serás para sempre.