< यहेज्केल 27 >

1 परमेश्वराचे वचन पुन्हा मजकडे आले आणि म्हणाले,
ויהי דבר יהוה אלי לאמר
2 आता तू, मानवाच्या मुला, सोरेविषयी विलाप कर.
ואתה בן אדם שא על צר קינה
3 आणि “सोरेला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू समुद्राच्या प्रवेशाद्वाराजवळ वसली आहेस, जी तू पुष्कळ द्वीपांतील व्यापारी लोकांसाठी आहेस. सोरे! तू म्हणाली, मी सुंदरतेत परिपूर्ण आहे.
ואמרת לצור הישבתי (הישבת) על מבואת ים רכלת העמים אל איים רבים כה אמר אדני יהוה צור את אמרת אני כלילת יפי
4 तुझ्या सीमा समुद्राच्या हृदयात आहेत; बांधणाऱ्यांनी तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे.
בלב ימים גבוליך בניך כללו יפיך
5 त्यांनी तुझ्या सर्व फळ्या सनीरच्या सरूंनी केल्या आहेत. तुला डोलकाठी करायला त्यांनी लबानोनातून गंधसरु घेतले आहे.
ברושים משניר בנו לך את כל לחתים ארז מלבנון לקחו לעשות תרן עליך
6 त्यांनी तुझी वल्ही बाशानामधील अल्लोनाच्या झाडाची केली. त्यांनी तुझ्या बैठकीच्या फळ्या कित्तीम बेटातल्या बाक्स लाकडाच्या केल्या असून ती हस्तिदंताने जडलेल्या होत्या.
אלונים מבשן עשו משוטיך קרשך עשו שן בת אשרים מאיי כתים
7 तुझे शीड, ते तुला निशाण व्हावे म्हणून मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार बारीक सुताचे होते. ते पडद्याचे कापड एलीशा बेटाहून आणलेले निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे तुझे छत होते.
שש ברקמה ממצרים היה מפרשך להיות לך לנס תכלת וארגמן מאיי אלישה היה מכסך
8 जे कोणी सीदोन व अर्वद येथे राहत होते ते तुझ्या नावा वल्हवीत असत. हे सोरे, तुझ्यात सुज्ञ होते. ते तुझे नावाडी होते
ישבי צידון וארוד היו שטים לך חכמיך צור היו בך המה חבליך
9 तुझ्यामध्ये गबालाची वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजाची फुटतूट दुरुस्त करत असत. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या व्यापाराच्या व्यवहारासाठी तुझ्याकडे येत असत.
זקני גבל וחכמיה היו בך מחזיקי בדקך כל אניות הים ומלחיהם היו בך לערב מערבך
10 १० पारसी, लूदी व पूटी तुझ्या सैन्यात तुझे लढणारे माणसे होती. ते आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्यामध्ये टांगीत; ते तुझे वैभव दाखवत.
פרס ולוד ופוט היו בחילך אנשי מלחמתך מגן וכובע תלו בך המה נתנו הדרך
11 ११ अर्वदची माणसे व हेलेखचे सैनिक सभोवार तुझ्या तटावर असत आणि गम्मादाचे लोक तुझ्या बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर चोहोकडे टांगून ठेवीत असत. त्यांनी तुझी सुंदरता पूर्णत्वाला आणली.
בני ארוד וחילך על חומותיך סביב וגמדים במגדלותיך היו שלטיהם תלו על חומותיך סביב--המה כללו יפיך
12 १२ तार्शीश तुझा ग्राहक होता कारण प्रत्येक प्रकारचा मालमत्तेचा साठा तुझ्याकडे होता. ते तुझ्या मालाच्या बदल्यात रुपे, लोखंड, कथील व शिसे आणून विकायचा माल घेत असत.
תרשיש סחרתך מרב כל הון בכסף ברזל בדיל ועופרת נתנו עזבוניך
13 १३ यावान, तुबाल आणि मेशेख तुझ्याबरोबर मनुष्य जीव व पितळेच्या वस्तू ही देऊन तुझ्याशी व्यापार करीत असत. ते तुझा व्यापारी माल हाताळत होते.
יון תבל ומשך המה רכליך בנפש אדם וכלי נחשת נתנו מערבך
14 १४ तोगार्माचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे देऊन तुझ्याशी व्यापार करीत.
מבית תוגרמה סוסים ופרשים ופרדים נתנו עזבוניך
15 १५ ददानी माणसे पुष्कळ किनारपट्टीवर तुझे व्यापारी होते. व्यापारी माल तुझ्या हातात होता. ते तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड भेट म्हणून परत पाठवत होते.
בני דדן רכליך איים רבים סחרת ידך קרנות שן והובנים (והבנים) השיבו אשכרך
16 १६ तुझ्या पुष्कळ उत्पन्नात अराम तुझा व्यापारी होता. ते तुझ्याबद्दल पाचू, जांभळ्या रंगाचे कापड, सुती तलम कापड, पोवळे आणि माणके तुला पुरवत होते.
ארם סחרתך מרב מעשיך בנפך ארגמן ורקמה ובוץ וראמת וכדכד נתנו בעזבוניך
17 १७ यहूदा व इस्राएल देश ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या मालाबद्दल मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल आणि ऊद पुरवत होते.
יהודה וארץ ישראל המה רכליך בחטי מנית ופנג ודבש ושמן וצרי נתנו מערבך
18 १८ तुझ्या सर्व प्रचंड संपत्तीचा, तुझ्या सर्व मालाचा हेल्बोनाचा द्राक्षरस व पांढरी लोकर यांनी दिमिष्की तुझा व्यापारी होता.
דמשק סחרתך ברב מעשיך מרב כל הון ביין חלבון וצמר צחר
19 १९ दान व यावान उसालपासून तुझ्या मालाबद्दल घडीव लोखंड, दालचिनी, ऊसाचा पुरवठा करीत असत. हा तुझ्यासाठी व्यापार झाला.
ודן ויון מאוזל בעזבוניך נתנו ברזל עשות קדה וקנה במערבך היה
20 २० ददान तुझ्या खोगीराच्या आच्छादनासाठी उत्तम कपड्याचा व्यापारी होता.
דדן רכלתך בבגדי חפש לרכבה
21 २१ अरबस्तान व केदारचे सर्व प्रमुख तुझ्याबरोबर व्यापारी होते. ते तुला कोकरे, एडके आणि बोकड यांचा पुरवठा करीत होते.
ערב וכל נשיאי קדר המה סחרי ידך בכרים ואילם ועתודים בם סחריך
22 २२ शबा व रामा यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. ते तुझ्या मालाबद्दल सर्व प्रकारचे उत्तम मसाले आणि सर्व प्रकारचे मोल्यवान रत्ने व सोने देऊन तुझ्याशी व्यापार करीत होते.
רכלי שבא ורעמה המה רכליך בראש כל בשם ובכל אבן יקרה וזהב נתנו עזבוניך
23 २३ हारान, कन्ने व एदेन, शबा, अश्शूर व किल्मद यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते.
חרן וכנה ועדן רכלי שבא אשור כלמד רכלתך
24 २४ ते तुझा माल घेऊन उंची वस्त्रे, जांभळे व वेलबुट्टीचे झगे व उंची वस्त्रांच्या पेट्या व वळलेल्या टिकाऊ दोऱ्या वगैरे व्यापाऱ्याच्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत होते.
המה רכליך במכללים בגלומי תכלת ורקמה ובגנזי ברמים בחבלים חבשים וארזים במרכלתך
25 २५ तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल वाहतुक करणारे तुझे काफले असे होते. म्हणून तू समुद्राच्या हृदयामध्ये मालवाहू जहाजाप्रमाणे खच्चून भरलेली आहेस.
אניות תרשיש שרותיך מערבך ותמלאי ותכבדי מאד בלב ימים
26 २६ तुझ्या वल्हेकऱ्यांनी तुला अफाट समुद्रात नेले. पूर्वेच्या वाऱ्याने तुला भर समुद्रात मोडून टाकले.
במים רבים הבאוך השטים אתך רוח הקדים שברך בלב ימים
27 २७ तुझी संपत्ती, तुझ्या व्यापारी वस्तू व विकत घेतलेल्या वस्तू; तुझे नाविक, खलाशी आणि जहाज बांधणारे; तुझ्या व्यापाराची देवघेव करणारे व तुझ्यामध्ये असलेली सर्व लढाऊ माणसे व तुझ्यामध्ये असलेला सर्व समुदाय तुझ्या नाशाच्या दिवशी भर समुद्रात पडतील.
הונך ועזבוניך מערבך מלחיך וחבליך מחזיקי בדקך וערבי מערבך וכל אנשי מלחמתך אשר בך ובכל קהלך אשר בתוכך יפלו בלב ימים ביום מפלתך
28 २८ तुझ्या खलाशांच्या आरोळीच्या आवाजाने समुद्राकडील नगरे भीतीने थरथर कापतील.
לקול זעקת חבליך ירעשו מגרשות
29 २९ जे कोणी वल्ही हाताळणारे ते सर्व खलाशी व समुद्रावरील प्रत्येक नावाडी आपल्या जहाजावरून उतरून खाली भूमीवर येतील.
וירדו מאניותיהם כל תפשי משוט--מלחים כל חבלי הים אל הארץ יעמדו
30 ३० ते तुला त्यांचा आवाज ऐकवतील आणि अतीखेदाने ओरडतील; ते आपल्या डोक्यांत धूळ घालतील. राखेत लोळतील.
והשמיעו עליך בקולם ויזעקו מרה ויעלו עפר על ראשיהם באפר יתפלשו
31 ३१ ते तुझ्यासाठी डोक्याचे केस कापतील. गोणपाट नेसतील. मनात अति खिन्न होऊन तुजसाठी मोठ्याने विलाप करतील.
והקריחו אליך קרחה וחגרו שקים ובכו אליך במר נפש מספד מר
32 ३२ ते तुझ्यासाठी आक्रोशाने विलाप करून म्हणतील, सोरेसारखी जी समुद्रामध्ये निशब्द झाली आहे, तिच्यासारखी कोणती तरी नगरी आहे काय?
ונשאו אליך בניהם קינה וקוננו עליך מי כצור כדמה בתוך הים
33 ३३ तुझ्या व्यापारांच्या वस्तू समुद्रातून जात असत तेव्हा तू पुष्कळांना तृप्त करीत असत; तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि आपल्या विकण्याचे पदार्थ फार असल्यामुळे तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.
בצאת עזבוניך מימים השבעת עמים רבים ברב הוניך ומערביך העשרת מלכי ארץ
34 ३४ पण जेव्हा तू खोल पाण्याने समुद्राकडून मोडून गेलीस तेव्हा तुझ्या विकण्याचा माल व तुझ्यामधील सर्व समुदायही बुडाले.
עת נשברת מימים במעמקי מים מערבך וכל קהלך בתוכך נפלו
35 ३५ समुद्रकाठी राहणाऱ्यांना तू घाबरून सोडले आणि त्यांच्या राजांचा दहशतीने थरकाप उडाला आहे. त्यांचे चेहरे कंप पावत आहेत.
כל ישבי האיים שממו עליך ומלכיהם שערו שער רעמו פנים
36 ३६ लोकांतले व्यापारी तुझा तिरस्कार करतात; तू दहशत अशी झाली आहेस आणि तू पुन्हा कधीच असणार नाहीस.”
סחרים בעמים שרקו עליך בלהות היית ואינך עד עולם

< यहेज्केल 27 >