< यहेज्केल 26 >
1 १ आणि असे झाले की, बाबेलातील बंदिवासाच्या अकराव्या वर्षी, महिन्याच्या पहिल्याच दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
El año undécimo, el primero del mes, recibí esta palabra de Yahvé:
2 २ “मानवाच्या मुला, कारण सोर यरूशलेमेविरूद्ध म्हणत आहे, अहा! लोकांचे प्रवेशद्वार तुटले आहेत! ती माझ्याकडे वळली आहे; जशी ती उजाड झाली तशी मी ओतप्रोत भरेल.”
“Hijo de hombre, por cuanto dice Tiro contra Jerusalén: «¡Ha! destruida está la puerta de los pueblos, la cual (ahora) se ha abierto para mí. Yo me haré rica y ella está asolada».
3 ३ म्हणून, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा सोर, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि जसा समुद्र आपल्या लाटा उंचावतो तसे मी तुजविरूद्ध पुष्कळ राष्ट्रांना उठविन.”
Por eso, así dice Yahvé, el Señor: Heme aquí contra ti, oh Tiro; haré subir contra ti muchas naciones, a la manera que el mar levanta sus olas.
4 ४ ते सोरेच्या तटाचा नाश करतील आणि तिचे बुरुज पाडून टाकतील. मी तिची धूळ झाडून दूर करीन आणि तिला उघडा खडक करीन.
Destruirán los muros de Tiro y derribarán sus torres; y barreré de ella hasta su polvo para dejarla como una roca desnuda.
5 ५ ती समुद्रामध्ये जाळीसाठी वाळवण्याची जागा होईल. असे प्रभू परमेश्वर म्हणतो, आणि ती राष्ट्रासाठी लूट अशी होईल.
Vendrá a ser un lugar en medio del mar donde se tienden las redes, pues Yo he hablado, dice Yahvé, el Señor; y será ella presa de las naciones.
6 ६ तिच्या कन्या ज्या कोणी शेतात आहेत त्या तलवारीने वधल्या जातील आणि त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
Y sus hijas que están en el continente, perecerán al filo de la espada; y conocerán que Yo soy Yahvé.
7 ७ कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी उत्तरेकडून बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, राजांचा राजा याला मी घोडे व रथ, आणि घोडदळ! पुष्कळ लोकांची फौज घेऊन सोराविरूद्ध आणत आहे.
Porque así dice Yahvé, el Señor: He aquí que conduciré desde el norte, contra Tiro, a Nabucodonosor, rey de Babilonia, rey de reyes, con caballos y carros y caballería y gran multitud de tropas.
8 ८ तो तुझ्या कन्यांना शेतात तलवारीने मारील आणि तुझ्याविरूद्ध उतरती वेढ्याची भिंत बांधील आणि तुझ्याविरूद्ध ढाल उभारील.
A tus hijas que están en el continente, las pasará a cuchillo, te circunvalará con torres de asedio, levantará contra ti terraplenes y alzará contra ti escudos.
9 ९ तो तुझ्या तटाला पाडण्यासाठी आपला मोठा ओंडका ठेवील आणि आपल्या हत्यारांनी तुझे बुरुज पाडून टाकील.
Dirigirá el ataque de sus arietes contra tus muros y con sus instrumentos de hierro demolerá tus torres.
10 १० घोड्यांच्या जमावांच्या धुळीने तो तुला झाकून टाकील. जेव्हा तो हल्ला करून तटबंदीची नगरे पाडून जसे आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत प्रवेश करेल, तेव्हा घोड्यांच्या आवाजाने आणि रथांच्या चाकांच्या खडखडाटाने तुझे तट थरथर कापतील.
La muchedumbre de sus caballos te cubrirá con su polvo y tus muros temblarán al estrépito de los jinetes, ruedas y carros, cuando él entrare por tus puertas, como quien entra en una ciudad tomada.
11 ११ तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवितील. तो तुझ्या लोकांची तलवारीने कत्तल करील आणि तुझे भक्कम स्तंभ जमीनीवर पडतील.
Con los cascos de sus caballos hollará todas tus calles; pasará a cuchillo a tu pueblo, y serán derribadas al suelo tus más poderosas columnas.
12 १२ याप्रकारे ते तुझी शक्ती आणि व्यापारी माल लुटतील! ते तुझे तट आणि तुझी श्रीमंत घरे पाडून टाकतील तुझे दगड व लाकूड आणि तुझी माती ते पाण्यामध्ये घालतील.
Despojarán tus riquezas y saquearán tus mercancías; destruirán tus muros y derribarán tus bellísimas casas, y arrojarán al mar tus piedras y tus maderas y hasta tu polvo.
13 १३ कारण मी तुझ्या गीतांचा आवाज बंद पाडीन आणि तुझ्या तंतुवाद्यांचा आवाज पुन्हा कधीही ऐकू येणार नाही.
Haré cesar la voz de tus cantares y no se oirá más el son de tus cítaras.
14 १४ कारण मी तुला उघडा खडक करीन, तू जाळी कोरडी करण्यासाठीची जागा होशील, तुझी पुन्हा उभारणी होणार नाही. कारण मी, परमेश्वराने असे म्हटले आहे, प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
Te dejaré como una roca desnuda; vendrás a ser un lugar donde se tienden las redes; ni volverás a ser reedificada; pues Yo Yahvé he hablado, dice Yahvé, el Señor.
15 १५ प्रभू परमेश्वर सोरला म्हणतो, तुझ्या अधःपतनाच्या आवाजाने आणि जेव्हा तुझ्यामध्ये भयंकर कत्तल झाली त्यामध्ये जखमीच्या कण्हण्याने द्वीपांचा थरकाप होणार नाही का?
Así dice Yahvé, el Señor, a Tiro: ¿No se estremecerán acaso las islas al estruendo de tu caída, cuando giman los traspasados en la gran matanza que se hará en medio de ti?
16 १६ कारण समुद्रातले सर्व प्रमुख आपल्या सिंहासनावरून खाली उतरतील आणि आपले झगे बाजूला काढून ठेवतील आणि आपले रंगीबेरंगी वस्त्रे काढून टाकतील. ते स्वतःला भीतीच्या वस्त्राने आच्छादतील आणि भीतीने जमिनीवर बसतील व वारंवार कांपतील आणि तुझ्याविषयी भयचकीत होतील.
Entonces todos los príncipes del mar bajarán de sus tronos y se quitarán sus mantos, se despojarán de sus vestimentos bordados, y se vestirán de espanto. Sentados en tierra temblarán a cada momento, y quedarán consternados a causa de ti.
17 १७ ते तुझ्यासाठी ओरडून विलाप करून तुला म्हणतील, “अगे, जे कोणी खलाशी तुझ्यात वस्ती करून होते त्यांचा नाश झाला आहे. जी तू बलवान प्रसिद्ध नगरी होती. ती आता समुद्रात आहे. जी तू तेथे राहणाऱ्या प्रत्येकजणास दहशत घालीत होतीस ती तू कशी नष्ट झाली आहेस?
Y cantarán sobre ti una elegía diciéndote: «¡Cómo estás destruida tú que habitas entre las aguas, ciudad célebre, poderosa en el mar! Ella y sus moradores llenaban de espanto a todos los habitantes del (mar).
18 १८ आता, तुझ्या पडण्याच्या दिवशी, समुद्रकिनारीचा देशांचा भीतीने थरकाप उडेल. समुद्र किनाऱ्यावरील देश भयभीत झाले आहेत, कारण तू पाण्यात गेली आहेस.”
Ahora las islas temblarán en el día de tu caída, las islas que están en el mar quedarán atónitas al ver tu fin».
19 १९ कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जी नगरे वसली नाहीत त्यासारखे जेव्हा मी तुला ओसाड नगर करीन, जेव्हा मी तुझ्यावर खोल समुद्र आणीन आणि तेव्हा प्रचंड जले तुला झाकतील.
Porque así dice Yahvé, el Señor: Cuando Yo te haya convertido en ciudad desolada, como las ciudades que no se habitan, cuando Yo haga venir sobre ti el océano y te cubran las grandes aguas;
20 २० मग मी तुला ते जे कोणी दुसरे खाचेत खाली प्राचीन काळच्या लोकांकडे गेले आहेत त्यांच्यासारखे प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानात तुला पृथ्वीच्या अधोभागी तुला रहावयास लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस.
entonces te haré bajar con los que han bajado a la fosa, donde están los pueblos de tiempos remotos, y te colocaré en las profundidades de la tierra, entre las ruinas perpetuas, junto con los que bajaron a la fosa, para que no seas ya habitada; pues Yo doy la gloria a la tierra de los que viven.
21 २१ मी तुझ्यावर विपत्ती आणिन आणि तू अस्तित्वात असणार नाहीस. मग तुला शोधतील, पण तू त्यांना पुन्हा कधीही सापडणार नाहीस” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
Te reduciré a la nada y dejarás de existir; te buscarán, pero nunca jamás serás hallada”, dice Yahvé, el Señor.