< यहेज्केल 22 >
1 १ मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे येऊन म्हणाला,
Und des HERRN Wort geschah zu mir und sprach:
2 २ मग हे मानवाच्या मुला, तू न्याय करशील का? शहराच्या रक्ताचा न्याय तू करतो काय? त्याच्या सर्व घृणास्पद कामाची माहिती तुला आहे.
Du Menschenkind, willst du nicht strafen die mörderische Stadt und ihr anzeigen alle ihre Greuel?
3 ३ मग तू म्हणावे परमेश्वर देव असे म्हणत आहे, असे दिवस येत आहेत की, या शहराच्या मध्य भागात रक्तपात करण्यात आला आहे. शहराने स्वतःला मूर्तीने अपवित्र केले आहे.
Sprich: So spricht der HERR HERR: O Stadt, die du der Deinen Blut vergeußest, auf daß deine Zeit komme, und die du Götzen bei dir machst, damit du dich verunreinigest!
4 ४ तू सांडलेल्या रक्त्तासाठी तू दोषी आहेस आणि तू अपवित्र मूर्ती तयार केल्या आहेस, तू आपला काळ जवळ आणला आहेस. यास्तव मी तुझी खरड पट्टी राष्ट्रात काढेल व भूमीवर तुझा उपहास प्रत्येक डोळ्या समोर करेन.
Du verschuldest dich an dem Blut, das Du vergeußest, und verunreinigest dich an den Götzen, die du machst; damit bringest du deine Tage herzu und machst, daß deine Jahre kommen müssen. Darum will ich dich zum Spott unter den Heiden und zum Hohn in allen Ländern machen.
5 ५ जे जवळ आहे व दूर आहे त्या दोघांचाही उपहास केला जाईल. तू शहराला अपवित्र केले आहेस, पूर्णपणे गोंधळलेले असे तुला नावलौकीक प्राप्त झाले आहे.
Beide, in der Nähe und in der Ferne, sollen sie dein spotten, daß du ein schändlich Gerücht haben und großen Jammer leiden müssest.
6 ६ पहा, इस्राएलाच्या शास्त्यानो तुमच्या स्वबळाने रक्तपात केला आहे.
Siehe die Fürsten in Israel! Ein jeglicher ist mächtig bei dir, Blut zu vergießen.
7 ७ त्यांनी आपल्या आईबापांचा अनादर केला आहे. व त्यांनी तुमच्यामध्ये विदेशांच्या कारवाया केल्या आहे. तुमच्यातील विधवा आणि अनाथांना त्यांनी तुमच्या वाईट वागणुक दिली आहे.
Vater und Mutter verachten sie; den Fremdlingen tun sie Gewalt und Unrecht; die Witwen und Waisen schinden sie.
8 ८ तू माझ्या पवित्र वस्तुंना तुच्छ लेखल्या आहेस व माझ्या शब्बाथाचा अनादर केला आहे.
Du verachtest meine Heiligtümer und entheiligest meine Sabbate.
9 ९ बदनामी कारक पुरुषांनी क्रमाने येऊन रक्त ओतले व उंच स्थानी जाऊन भोजन केले, व त्यांनी माझ्या पुढे दुष्टपणा केला आहे.
Verräter sind in dir, auf daß sie Blut vergießen. Sie essen auf den Bergen und handeln mutwilliglich in dir;
10 १० तुझ्याकडे तुझ्या बापाची नग्नता उघड झाली आहे त्यांनी ऋतूमती अशुद्धतेत स्त्रिला भ्रष्ट केले आहे.
sie blößen die Scham der Väter und nötigen die Weiber in ihrer Krankheit
11 ११ ज्या पुरुषांनी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी घृणास्पद वर्तन केले आहे. ज्या पुरुषाने आपल्या सुनेला लज्जास्पद अशुद्ध केले; असा पुरुष ज्याने आपल्या वडिलाच्या मुलीला बहिणीला भ्रष्ट केले ते सर्व कृत्ये तुझ्यामध्ये झालेले आहे.
und treiben untereinander, Freund mit Freundes Weibe, Greuel; sie schänden ihre eigene Schnur mit allem Mutwillen; sie notzüchtigen ihre eigenen Schwestern, ihres Vaters Töchter;
12 १२ असा पुरुष रक्तपात करण्यासाठी लाच घेतो, तू अति प्रमाणात व्याज घेतो, तू तुझ्या कामाने शेजाऱ्याचे नुकसान केले आहेस, आणि तू मला विसरला आहेस. असे परमेश्वर देव जाहीर करतो.
sie nehmen Geschenke, auf daß sie Blut vergießen; sie wuchern und übersetzen einander und treiben ihren Geiz wider ihren Nächsten und tun einander Gewalt und vergessen mein also, spricht der HERR HERR.
13 १३ यास्तव तू केलेल्या अनादराच्या कामावर मी आपला हात उगारीन आणि तुझ्यामध्ये जो रक्तपात झाला आहे.
Siehe, ich schlage meine Hände zusammen über den Geiz, den du treibest, und über das Blut, so in dir vergossen ist.
14 १४ जेव्हा मी तुझ्याशी करार केला आहे तेव्हा तुझे मन आणि तुझा हात बळकट कर असे परमेश्वर देव जाहीर करतो व ते मी करेनच.
Meinest du aber, dein Herz möge es erleiden oder deine Hände ertragen zu der Zeit, wenn ich's mit dir machen werde? Ich, der HERR, hab es geredet und will's auch tun
15 १५ मी तुमची देशातून दाणादाण करेल व भूमीतून नाहीसे करेन, मी तुम्हास तुमच्या अशुद्धतेतून शुध्द करेन.
und will dich zerstreuen unter die Heiden und dich verstoßen in die Länder und will deines Unflats ein Ende machen,
16 १६ मग तुम्ही राष्ट्राच्या देखत अशुद्ध व्हाल. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
daß du bei den Heiden mußt verflucht geachtet werden und erfahren, daß ich der HERR sei.
17 १७ पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला.
Und des HERRN Wort geschah zu mir und sprach:
18 १८ मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे मला धातुच्या गाळाप्रमाणे झाले आहे. त्यामध्ये उरलेले पितळ, कथील, आणि लोखंड, शिसे आहे, ते भट्टीतल्या चांदीचा गाळ आहे.
Du Menschenkind, das Haus Israel ist mir zu Schaum worden; all ihr Erz, Zinn, Eisen und Blei ist im Ofen zu Silberschaum worden.
19 १९ यास्तव परमेश्वर देव हे म्हणतो, कारण तुम्ही उरलेला गाळ झाला आहात. यास्तव पाहा! मी तुम्हास यरूशलेमेत एकत्र करीन.
Darum spricht der HERR HERR also: Weil ihr denn alle Schaum worden seid, siehe, so will ich euch alle gen Jerusalem zusammentun.
20 २० चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिसे गोळा करून जसे तुम्हा मध्ये त्यांच्यात भट्टीत टाकले जाते तसे मी तुम्हास वितळवीन. यासाठी मी तुला माझ्या क्रोधाच्या अग्नीने एकत्र करीन, मी त्यांना भट्टीत वितळून टाकीन, तुम्हास त्यामध्ये ओतणी करेन.
Wie man Silber, Erz, Eisen, Blei und Zinn zusammentut im Ofen, daß man ein Feuer darunter aufblase und zerschmelze es, also will ich euch auch in meinem Zorn und Grimm zusammentun, einlegen und schmelzen.
21 २१ म्हणजे मी तुमच्यात माझ्या क्रोधाच्या अग्नीने त्यांच्यावर ओतणी करेन.
Ja, ich will euch sammeln und das Feuer meines Zorns unter euch aufblasen, daß ihr drinnen zerschmelzen müsset.
22 २२ जसे चांदीला भट्टीत अग्नीने वितळवले जाते, तसा तू त्यांच्यात वितळविला जाशील मग तुला कळेल मी परमेश्वर देवाने तुझ्या विरुध्द त्वेषाची ओतणी केली आहे.
Wie das Silber zerschmilzet im Ofen, so sollt ihr auch drinnen zerschmelzen und erfahren, daß ich, der HERR, meinen Grimm über euch ausgeschüttet habe.
23 २३ परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
Und des HERRN Wort geschah zu mir und sprach:
24 २४ ‘मानवाच्या मूला’ तिला सांग तू अशी भूमी आहेस जी अजून शुध्द झाली नाही, क्रोधाच्या दिवसात पाऊस पडणार नाही.
Du Menschenkind, sprich zu ihnen: Du bist ein Land, das nicht zu reinigen ist, wie eins, das nicht beregnet wird zur Zeit des Zorns.
25 २५ तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टयांच्या विरुध्द कारस्थान तुझ्यात आहे, जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्षाला फाडून टाकतो, ते जीवन संपवून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनवले.
Die Propheten, so drinnen sind, haben sich gerottet, die Seelen zu fressen, wie ein brüllender Löwe, wenn er raubet; sie reißen Gut und Geld zu sich und machen der Witwen viel drinnen.
26 २६ तिचे याजक माझ्या नियमांच्या विरुध्द दंगल माजवतात; ते माझ्या पवित्र वस्तुबद्दल अनादर दाखवतात, ते पवित्र वस्तू आणि अपवित्रतेची तुलना करीत नाही. त्यांनी आपले डोळे माझ्या शब्बाथावरुन बंद केले आहेत. यास्तव त्यांच्यात माझा अनादर झाला आहे.
Ihre Priester verkehren mein Gesetz freventlich und entheiligen mein Heiligtum; sie halten unter dem Heiligen und Unheiligen keinen Unterschied und lehren nicht, was rein oder unrein sei, und warten meiner Sabbate nicht; und ich werde unter ihnen entheiliget.
27 २७ त्यांच्या राज कुमारी या लांडग्या प्रमाणे बळी घेणारे व रक्तपात करणारे आहेत. आपल्या हिंसाचारासाठी ते जीवाचा घात करतात.
Ihre Fürsten sind drinnen wie die reißenden Wölfe, Blut zu vergießen und Seelen umzubringen, um ihres Geizes willen.
28 २८ आणि त्यांचे द्रष्टे चुना लावलेल्या भिंतीसारखे आहेत ते खोटा दृष्टांत बघतात आणि खोटा शकुन सांगतात व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर बोलला असे म्हणतात.
Und ihre Propheten tünchen sie mit losem Kalk, predigen lose Teidinge und weissagen ihnen Lügen und sagen: So spricht der HERR HERR! so es doch der HERR nicht geredet hat.
29 २९ भूमितील लोक पिळवणुकीने दबून गेले आहेत आणि डाका टाकून लुटून टाकतील व ते गरीब, गरजूंना वाईट वागणुक देतात तसेच विदेशांना अन्यायाने दाबून टाकतात.
Das Volk im Lande übet Gewalt und rauben getrost und schinden die Armen und Elenden und tun den Fremdlingen Gewalt und Unrecht.
30 ३० मग मी मानवाचा शोध घेतला जो बुरुज बांधून घेईल आणि जो माझ्या पुढे उभा राहील ती भूमिला भित असेल ज्याचा विध्वंस मी करणार नाही.
Ich suchte unter ihnen, ob jemand sich eine Mauer machte und wider den Riß stünde vor mir für das Land, daß ich's nicht verderbete; aber ich fand keinen.
31 ३१ मग मी माझ्या संतापाची ओतणी त्यांच्यावर करीन, मी माझ्या संतापाच्या अग्नीने त्यांना संपवून टाकीन आणि त्यांचा मार्ग त्यांच्या डोळ्यापुढे सिध्द करेन. असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
Darum schüttete ich meinen Zorn über sie und mit dem Feuer meines Grimms machte ich ihrer ein Ende und gab ihnen also ihren Verdienst auf ihren Kopf, spricht der HERR HERR.