< यहेज्केल 21 >
1 १ मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
फिर ख़ुदा वन्द का कलाम मुझ पर नाज़िल हुआ:
2 २ मानवाच्या मुला आपले तोंड यरूशलेमेकडे कर आणि पवित्र ठिकाणा विषयी इस्राएलाच्या भूमी विरुध्द भविष्यवाणी कर.
कि ऐ आदमज़ाद, येरूशलेम का रुख़ कर और पाक मकानों से मुख़ातिब होकर मुल्क — ए — इस्राईल के ख़िलाफ़ नबुव्वत कर
3 ३ इस्राएलाच्या भूमिला सांग, परमेश्वर देव म्हणतो; पाहा! मी तुझ्या विरुध्द आहे, मी शेथापासून आपली तलवार म्यानातून उपसून घेऊन तुझ्यापासून धर्मिकाला आणि दुर्जनाला वेगळे करीन.
और उस से कह, ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है: कि देख मैं तेरा मुख़ालिफ़ हूँ और अपनी तलवार मियान से निकाल लूँगा, और तेरे सादिक़ों और तेरे शरीरों को तेरे बीच से काट डालूँगा।
4 ४ माझ्या क्रमाने नीतिमान आणि दुर्जन तुझ्यापासून वेगळे करेन, माझी तलवार म्यानातून निघून शेथापासून सर्व जीवा विरूद्ध उत्तर दक्षिण भागात बाहेर पडेल
इसलिए चूँकि मैं तेरे बीच से सादिक़ों और शरीरों को काट डालूँगा, इसलिए मेरी तलवार अपने मियान से निकल कर दक्खिन से उत्तर तक तमाम बशर पर चलेगी।
5 ५ मग सर्व जीवांना कळेल मी परमेश्वर देव आहे. मी शेथा जवळ तलवार ठेवली आहे. ती परत म्यानात जाणार नाही.
और सब जानेंगे कि मैं ख़ुदावन्द ने अपनी तलवार मियान से खींची है वह फिर उसमें न जायेगी।
6 ६ आणि तू, मानवाच्या मुला, कंबर मोडल्याप्रमाणे उसासा टाक, त्यांच्या नजरे देखत कष्टाने कण्हत राहा.
इसलिए ऐ आदमज़ाद कमर की शिगास्तगी से आँहें मार और तल्ख़ कामी से उनकी आँखों के सामने ठण्डी साँस भर।
7 ७ मग ते तुला विचारतील काय झाले? तू का विव्हळतोस? मग तू त्यांना सांग कारण अशी बातमी येत आहे, प्रत्येक हृदय क्षीण होईल, प्रत्येक हात अडखळेल आणि प्रत्येक गुडघा पाणी पाणी होईल, पाहा! असे घडून येत आहे आणि ते तसेच होईल “असे परमेश्वर देव जाहीर करीत आहे.”
और जब वह पू छें कि तू क्यूँ हाए हाए करता है तो यूँ जवाब देना कि उसकी आमद की अफ़वाह की वजह से और हर एक दिल पिघल जायेगा और सब हाथ ढीले हो जायेंगे और हर एक जी डूब जाएगा और सब घुटने पानी की तरह कमज़ोर हो जायेंगे ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है उसकी आमद है यह वजूद में आएगा।
8 ८ मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
फिर ख़ुदावन्द का कलाम मुझपर नाज़िल हुआ।
9 ९ मानवाच्या मुला, भाकीत कर आणि म्हण असे परमेश्वर देव सांगत आहे, तलवारीला धार लावा आणि त्यास चकाकीत करा.
ऐ आदमज़ाद, नबुव्वत कर और कह ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है कि तू कह तलवार बल्कि तेज़ और सैकल की हुई तलवार है।
10 १० मारुन टाकण्यासाठी हत्याराला धारधार करा; तिला चकाकीत करा; आमच्या पुत्राच्या राजदंडाचा आम्ही उत्सव करु? जी तलवार येईल ती सर्व दंडाला कमी लेखते.
वह तेज़ की गई है ताकि उससे बड़ी खूंरेज़ी की जाये वह सैकल की गई है ताकि चमके फिर क्या हम ख़ुश हो सकते हैं मेरे बेटे का 'असा हर लकड़ी को बेकार जानता है।
11 ११ मग तलवारीला चकाकीत होण्यासाठी सोपवून दिली, आणि मग आपल्या हातांनी जप्ती केली. तलवारीला धार लावली आणि चकाकीत केली ठार मारणाऱ्या पुरुषाच्या हाती दिली.
और उसने उसे सैकल करने को दिया है ताकि हाथ में ली जाये वह तेज़ और सैकल की गई ताकि क़त्ल करने वाले के हाथ में दी जाए।
12 १२ मानवाच्या मुला, मदतीसाठी हाक मार आक्रोश कर कारण ती तलवार माझ्या लोकांवर आली आहे, ती इस्राएलाच्या वडीलांवर आली आहे ज्याकडे तलवार भिरकावली, ते माझे लोक आहे त्यामुळे अतितीव्र दुःखाने आपली छातीपीट कर.
ऐ आदमज़ाद, तू रो और नाला कर क्यूँकि वह मेरे लोगों पर चलेगी वह इस्राईल के सब हाकिमों पर होगी वह मेरे लोगों के सात तलवार के हवाले किए गए हैं इसलिए तू अपनी रान पर हाथ मार।
13 १३ तेथे खटला भरला पण ज्याकडे राजदंड आहे त्याने शेवट केला नाही? हे परमेश्वर देव सांगत आहे.
यक़ीनन वह आज़माई गई और अगर लाठी उसे बेकार जाने तो क्या वह हलाक होगा ख़ुदावन्द फ़रमाता है।
14 १४ आता तू मानवाच्या मुला, भाकीत कर आणि आपल्या दोन्ही हातांनी टाळी दे यास्तव तलवार तिसऱ्यांदा चालून येईन. ती तलवार अनेकांना ठार मारण्यास, सगळीकडे भेदून पार करण्यासाठी आहे.
और 'ऐ आदमज़ाद, तू नबुव्वत कर और ताली बजा और तलवार दो गुना बल्कि तीन गुना हो जाए वह तलवार जो मक़तूलों पर कारगर हुई बड़ी खूँरेज़ी की तलवार है जो उनको घेरती है।
15 १५ त्याच्या हृदयाचे पाणी पाणी होण्यास आणि अनेकांना अडखळण होण्यासाठी त्यांच्या वेशीवर ठार मारण्यासाठी तलवारी सिध्द केल्या आहे. आहाहा! तिला विजेसारखी चमकवली आहे, ती कसाई सारखी उपसली आहे.
मैंने यह तलवार उनके सब फाटकों के ख़िलाफ़ क़ायम की है ताकि उनके दिल पिघल जायें और उनके गिरने के सामान ज़्यादा हों हाए बर्क़ तेग यह क़त्ल करने को खींची गई।
16 १६ हे तलवारी, जशी तू आपले मुख फिरवशील तशी उजवीकडे डावीकडे तुझ्या मर्जी प्रमाणे वळवली जा.
तैयार हो; दाहनी तरफ़ जा, आमादा हो, बाईं तरफ़ जा, जिधर तेरा रुख़,
17 १७ मी सुध्दा टाळी वाजवून आपल्या त्वेषाला शांत करेन, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
और मैं भी ताली बजाऊँगा और अपने क़हर को ठण्डा करूँगा मैं ख़ुदावन्द ने यह फ़रमाया है।
18 १८ परमेश्वर देवाचा शब्द पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला.
और ख़ुदावन्द का कलाम मुझपर नाज़िल हुआ।
19 १९ आता तू मानवाच्या मुला बाबेलाच्या राजाची तलवार येण्यासाठी दोन मार्ग सिध्द कर, दोन्ही मार्गाची सुरुवात एकाच ठिकाणी होईल, दिशादर्शक दगड शहराकडे निर्देश करेल.
कि 'ऐ आदमज़ाद, तू दो रास्ते खींच जिनसे शाह — ए — बाबुल की तलवार आये एक ही मुल्क से वह दोनों रास्ते निकाल और एक हाथ निशान के लिए शहर की रास्ते के सिरे पर लगा।
20 २० एका मार्गाला बाबेलाच्या सेन्यासाठी खुण करून ठेवा अम्मोनीच्या मुलाकडे राब्बा जवळ येण्यासाठी मार्ग सिध्द करा, दुसरी खुण यरूशलेमेच्या शहरा जवळ यहूदाच्या सेन्याकडे तट बंदीकडे निर्देश करा.
एक रास्ता निकाल जिससे तलवार बनी'अम्मून की रब्बा पर और फिर एक और जिससे यहूदाह के मासूर शहर येरूशलेम पर आये।
21 २१ वाडीत बाबेलचा राजा रस्ता ओलांडण्यासाठी थांबेल, भविष्यकथन मिळवून घेण्यासाठी तो काही बाण हलवून मूर्ती पासून मार्गदर्शन मागेल, काळजावरुन तो तपासणी करेल.
क्यूँकि शाह — ए — बाबुल दोनों रास्तों के नुक़्त — ए — इतसाल पर फ़ालगीरी के लिए खड़ा हुआ और तीरों को हिला कर बुत से सवाल करेगा और जिगर पर नज़र करेगा।
22 २२ यरूशलेमेबद्दल पुढे घडून येणारी गोष्ट त्याच्या उजव्या हातात असेल, किल्ल्याचे दरवाजे फोडण्याचे हत्यार त्याविरूद्ध असेल, त्यांच्या तोंडातून मारण्याचा, युध्दाची ओरड! त्यासाठी हत्यार वेशीसाठी तयार केले, त्यासाठी मातीचे टेकाड बुरुज बांधावे.
उसके दहने हाथ में येरूशलेम का पर्ची पड़ेगी कि मंजनीक़ लगाये और कुश्त — ओ — ख़ून के लिए मुँह खोले ललकार की आवाज़ बुलन्द करे और फाटकों पर मंजनीक़ लगाए और दमदमा बांधे और बुर्ज़ बनाए।
23 २३ पुढे घडून येणारी ती उपयोग हीन बाब दिसून येईल, यरूशलेमपैकी एक, ज्याच्याकडे तलवार व तोंडात बाबेलांची शपथ आहे. पण त्याच्या वेढ्याच्या पुढे राजा उल्लंघन करणारा तहाचा आरोप केला जाईल.
लेकिन उनकी नज़र में यह ऐसा होगा जैसा झूटा शगुन या'नी उनके लिए जिन्होंने क़सम खाई थी, पर वह बदकिरदारी को याद करेगा ताकि वह गिरफ़्तार हों।
24 २४ यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे, कारण तुझे अपराध माझ्यापुढे स्मरण केले जाईल, तुझे अपराध प्रकट केले जातील; तुझी पापे तुझ्या सर्व कृतीतून दर्शीवीली जातील, यास्तव तू सर्वांच्या स्मरणात राहून आपल्या शत्रुच्या तावडीत सापडशील.
इसलिए ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि चूँकि तुम ने अपनी बदकिरदारी याद दिलाई और तुम्हारी ख़ताकारी ज़ाहिर हुई यहाँ तक कि तुम्हारे सब कामों में तुम्हारे गुनाह अयाँ हैं; और चूँकि तुम ख़याल में आ गए इसलिए गिरफ़्तार हो जाओगे।
25 २५ तू पवित्रते बद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्राएलचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे.
और तू ऐ मजरूह शरीर शाह — ए — इस्राईल, जिसका ज़माना बदकिरदारी के अन्जाम को पहुँचने पर आया है।
26 २६ प्रभू परमेश्वर देव हे सांगत आहे. आपल्या डोक्यावरील पगडी मुकुट बाजुला सारा, सर्व काही एक समान राहाणार नाही, जे उंचावलेले नमवले जातील आणि नम्र उंच केले जातील.
ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि कुलाह दूर कर और ताज उतार, यह ऐसा न रहेगा, पस्त को बलन्द कर और उसे जो बुलन्द है पस्त कर।
27 २७ मी सगळ्यांची नासाडी, नासाडी, नासाडी करेन, जमाव उरणार नाही, ज्याला हक्क आहे त्यास तो मिळेल.
मैं ही उसे उलट उलट दूँगा, पर यूँ भी न रहेगा और वह आएगा जिसका हक़ है, और मैं उसे दूँगा।
28 २८ तर मग तू मानवाच्या मुला भाकीत कर आणि बोल; परमेश्वर देव हे सांगत आहे, अम्मोनच्या मुलांविषयी जो कलंक आहे तो त्यावर येत आहे. तलवार उचलली आहे ती अधाशीपणे ठार मारण्यासाठी तेजधार केली आहे ती विजेप्रमाणे चकाकत आहे.
“और तू ऐ आदमज़ाद नबुव्वत कर और कह ख़ुदावन्द ख़ुदा बनी अम्मून और उनकी ताना ज़नी के बारे में यूँ फ़रमाता है: कि तू कह तलवार बल्कि खींची हुई तलवार खूंरेजी के लिए सैकल की गई है, ताकि बिजली की तरह भसम करे।
29 २९ ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.
जबकि वह तेरे लिए धोका देखते हैं और झूटे फ़ाल निकालते हैं कि तुझ को उन शरीरों की गर्दनों पर डाल दें जो मारे गए, जिनका ज़माना उनकी बदकिरदारी के अंजाम को पहुँचने पर आया है।
30 ३० तलवार म्यानात जाईल, तू ज्या ठिकाणी जन्मला तुझी जेथे सुरुवात झाली त्या भूमिवर मी तुझा न्याय करेन.
उसको मियान में कर। मैं तेरी पैदाइश के मकान में और तेरी ज़ाद बूम में तेरी 'अदालत करूँगा।
31 ३१ मी तुझ्यावर माझा कोपाग्नीचा संताप ओतेन आणि तुला क्रुर कोशल्याने हानी करण्यास लोकांच्या ताब्यात देईन.
और मैं अपना क़हर तुझ पर नाज़िल करूँगा और अपने ग़ज़ब की आग तुझ पर भड़काऊँगा, और तुझ को हैवान ख़सलत आदमियों के हवाले करूँगा जो बर्बाद करने में माहिर हैं।
32 ३२ तू अग्नीसाठी इंधन होशील; तुझे रक्त भूमिच्या मध्यभागी सांडले जाईल. तुझे स्मरण पुन्हा केले जाणार नाही. “मी परमेश्वर देव हे जाहीर करत आहे.”
तू आग के लिए ईधन होगा और तेरा खू़न मुल्क में बहेगा, और फिर तेरा ज़िक्र भी न किया जाएगा, क्यूँकि मैं ख़ुदावन्द ने फ़रमाया है।”