< यहेज्केल 21 >

1 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
וַיְהִ֥י דְבַר־יְהוָ֖ה אֵלַ֥י לֵאמֹֽר׃
2 मानवाच्या मुला आपले तोंड यरूशलेमेकडे कर आणि पवित्र ठिकाणा विषयी इस्राएलाच्या भूमी विरुध्द भविष्यवाणी कर.
בֶּן־אָדָ֗ם שִׂ֤ים פָּנֶ֙יךָ֙ אֶל־יְר֣וּשָׁלַ֔͏ִם וְהַטֵּ֖ף אֶל־מִקְדָּשִׁ֑ים וְהִנָּבֵ֖א אֶל־אַדְמַ֥ת יִשְׂרָאֵֽל׃
3 इस्राएलाच्या भूमिला सांग, परमेश्वर देव म्हणतो; पाहा! मी तुझ्या विरुध्द आहे, मी शेथापासून आपली तलवार म्यानातून उपसून घेऊन तुझ्यापासून धर्मिकाला आणि दुर्जनाला वेगळे करीन.
וְאָמַרְתָּ֞ לְאַדְמַ֣ת יִשְׂרָאֵ֗ל כֹּ֚ה אָמַ֣ר יְהוָ֔ה הִנְנִ֣י אֵלַ֔יִךְ וְהֹוצֵאתִ֥י חַרְבִּ֖י מִתַּעְרָ֑הּ וְהִכְרַתִּ֥י מִמֵּ֖ךְ צַדִּ֥יק וְרָשָֽׁע׃
4 माझ्या क्रमाने नीतिमान आणि दुर्जन तुझ्यापासून वेगळे करेन, माझी तलवार म्यानातून निघून शेथापासून सर्व जीवा विरूद्ध उत्तर दक्षिण भागात बाहेर पडेल
יַ֛עַן אֲשֶׁר־הִכְרַ֥תִּי מִמֵּ֖ךְ צַדִּ֣יק וְרָשָׁ֑ע לָ֠כֵן תֵּצֵ֨א חַרְבִּ֧י מִתַּעְרָ֛הּ אֶל־כָּל־בָּשָׂ֖ר מִנֶּ֥גֶב צָפֹֽון׃
5 मग सर्व जीवांना कळेल मी परमेश्वर देव आहे. मी शेथा जवळ तलवार ठेवली आहे. ती परत म्यानात जाणार नाही.
וְיָֽדְעוּ֙ כָּל־בָּשָׂ֔ר כִּ֚י אֲנִ֣י יְהוָ֔ה הֹוצֵ֥אתִי חַרְבִּ֖י מִתַּעְרָ֑הּ לֹ֥א תָשׁ֖וּב עֹֽוד׃ ס
6 आणि तू, मानवाच्या मुला, कंबर मोडल्याप्रमाणे उसासा टाक, त्यांच्या नजरे देखत कष्टाने कण्हत राहा.
וְאַתָּ֥ה בֶן־אָדָ֖ם הֵֽאָנַ֑ח בְּשִׁבְרֹ֤ון מָתְנַ֙יִם֙ וּבִמְרִיר֔וּת תֵּֽאָנַ֖ח לְעֵינֵיהֶֽם׃
7 मग ते तुला विचारतील काय झाले? तू का विव्हळतोस? मग तू त्यांना सांग कारण अशी बातमी येत आहे, प्रत्येक हृदय क्षीण होईल, प्रत्येक हात अडखळेल आणि प्रत्येक गुडघा पाणी पाणी होईल, पाहा! असे घडून येत आहे आणि ते तसेच होईल “असे परमेश्वर देव जाहीर करीत आहे.”
וְהָיָה֙ כִּֽי־יֹאמְר֣וּ אֵלֶ֔יךָ עַל־מָ֖ה אַתָּ֣ה נֶאֱנָ֑ח וְאָמַרְתָּ֡ אֶל־שְׁמוּעָ֣ה כִֽי־בָאָ֡ה וְנָמֵ֣ס כָּל־לֵב֩ וְרָפ֨וּ כָל־יָדַ֜יִם וְכִהֲתָ֣ה כָל־ר֗וּחַ וְכָל־בִּרְכַּ֙יִם֙ תֵּלַ֣כְנָה מַּ֔יִם הִנֵּ֤ה בָאָה֙ וְנִֽהְיָ֔תָה נְאֻ֖ם אֲדֹנָ֥י יְהוִֽה׃ פ
8 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
וַיְהִ֥י דְבַר־יְהוָ֖ה אֵלַ֥י לֵאמֹֽר׃
9 मानवाच्या मुला, भाकीत कर आणि म्हण असे परमेश्वर देव सांगत आहे, तलवारीला धार लावा आणि त्यास चकाकीत करा.
בֶּן־אָדָ֕ם הִנָּבֵא֙ וְאָ֣מַרְתָּ֔ כֹּ֖ה אָמַ֣ר אֲדֹנָ֑י אֱמֹ֕ר חֶ֥רֶב חֶ֛רֶב הוּחַ֖דָּה וְגַם־מְרוּטָֽה׃
10 १० मारुन टाकण्यासाठी हत्याराला धारधार करा; तिला चकाकीत करा; आमच्या पुत्राच्या राजदंडाचा आम्ही उत्सव करु? जी तलवार येईल ती सर्व दंडाला कमी लेखते.
לְמַ֨עַן טְבֹ֤חַ טֶ֙בַח֙ הוּחַ֔דָּה לְמַעַן־הֱיֵה־לָ֥הּ בָּ֖רָק מֹרָ֑טָּה אֹ֣ו נָשִׂ֔ישׂ שֵׁ֥בֶט בְּנִ֖י מֹאֶ֥סֶת כָּל־עֵֽץ׃
11 ११ मग तलवारीला चकाकीत होण्यासाठी सोपवून दिली, आणि मग आपल्या हातांनी जप्ती केली. तलवारीला धार लावली आणि चकाकीत केली ठार मारणाऱ्या पुरुषाच्या हाती दिली.
וַיִּתֵּ֥ן אֹתָ֛הּ לְמָרְטָ֖ה לִתְפֹּ֣שׂ בַּכָּ֑ף הִֽיא־הוּחַ֤דָּה חֶ֙רֶב֙ וְהִ֣יא מֹרָ֔טָּה לָתֵ֥ת אֹותָ֖הּ בְּיַד־הֹורֵֽג׃
12 १२ मानवाच्या मुला, मदतीसाठी हाक मार आक्रोश कर कारण ती तलवार माझ्या लोकांवर आली आहे, ती इस्राएलाच्या वडीलांवर आली आहे ज्याकडे तलवार भिरकावली, ते माझे लोक आहे त्यामुळे अतितीव्र दुःखाने आपली छातीपीट कर.
זְעַ֤ק וְהֵילֵל֙ בֶּן־אָדָ֔ם כִּי־הִיא֙ הָיתָ֣ה בְעַמִּ֔י הִ֖יא בְּכָל־נְשִׂיאֵ֣י יִשְׂרָאֵ֑ל מְגוּרֵ֤י אֶל־חֶ֙רֶב֙ הָי֣וּ אֶת־עַמִּ֔י לָכֵ֖ן סְפֹ֥ק אֶל־יָרֵֽךְ׃
13 १३ तेथे खटला भरला पण ज्याकडे राजदंड आहे त्याने शेवट केला नाही? हे परमेश्वर देव सांगत आहे.
כִּ֣י בֹ֔חַן וּמָ֕ה אִם־גַּם־שֵׁ֥בֶט מֹאֶ֖סֶת לֹ֣א יִֽהְיֶ֑ה נְאֻ֖ם אֲדֹנָ֥י יְהוִֽה׃ פ
14 १४ आता तू मानवाच्या मुला, भाकीत कर आणि आपल्या दोन्ही हातांनी टाळी दे यास्तव तलवार तिसऱ्यांदा चालून येईन. ती तलवार अनेकांना ठार मारण्यास, सगळीकडे भेदून पार करण्यासाठी आहे.
וְאַתָּ֣ה בֶן־אָדָ֔ם הִנָּבֵ֕א וְהַ֖ךְ כַּ֣ף אֶל־כָּ֑ף וְתִכָּפֵ֞ל חֶ֤רֶב שְׁלִישִׁ֙תָה֙ חֶ֣רֶב חֲלָלִ֔ים הִ֗יא חֶ֚רֶב חָלָ֣ל הַגָּדֹ֔ול הַחֹדֶ֖רֶת לָהֶֽם׃
15 १५ त्याच्या हृदयाचे पाणी पाणी होण्यास आणि अनेकांना अडखळण होण्यासाठी त्यांच्या वेशीवर ठार मारण्यासाठी तलवारी सिध्द केल्या आहे. आहाहा! तिला विजेसारखी चमकवली आहे, ती कसाई सारखी उपसली आहे.
לְמַ֣עַן ׀ לָמ֣וּג לֵ֗ב וְהַרְבֵּה֙ הַמִּכְשֹׁלִ֔ים עַ֚ל כָּל־שַׁ֣עֲרֵיהֶ֔ם נָתַ֖תִּי אִבְחַת־חָ֑רֶב אָ֛ח עֲשׂוּיָ֥ה לְבָרָ֖ק מְעֻטָּ֥ה לְטָֽבַח׃
16 १६ हे तलवारी, जशी तू आपले मुख फिरवशील तशी उजवीकडे डावीकडे तुझ्या मर्जी प्रमाणे वळवली जा.
הִתְאַחֲדִ֥י הֵימִ֖נִי הָשִׂ֣ימִי הַשְׂמִ֑ילִי אָ֖נָה פָּנַ֥יִךְ מֻעָדֹֽות׃
17 १७ मी सुध्दा टाळी वाजवून आपल्या त्वेषाला शांत करेन, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
וְגַם־אֲנִ֗י אַכֶּ֤ה כַפִּי֙ אֶל־כַּפִּ֔י וַהֲנִחֹתִ֖י חֲמָתִ֑י אֲנִ֥י יְהוָ֖ה דִּבַּֽרְתִּי׃ פ
18 १८ परमेश्वर देवाचा शब्द पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला.
וַיְהִ֥י דְבַר־יְהוָ֖ה אֵלַ֥י לֵאמֹֽר׃
19 १९ आता तू मानवाच्या मुला बाबेलाच्या राजाची तलवार येण्यासाठी दोन मार्ग सिध्द कर, दोन्ही मार्गाची सुरुवात एकाच ठिकाणी होईल, दिशादर्शक दगड शहराकडे निर्देश करेल.
וְאַתָּ֨ה בֶן־אָדָ֜ם שִׂים־לְךָ֣ ׀ שְׁנַ֣יִם דְּרָכִ֗ים לָבֹוא֙ חֶ֣רֶב מֶֽלֶךְ־בָּבֶ֔ל מֵאֶ֥רֶץ אֶחָ֖ד יֵצְא֣וּ שְׁנֵיהֶ֑ם וְיָ֣ד בָּרֵ֔א בְּרֹ֥אשׁ דֶּֽרֶךְ־עִ֖יר בָּרֵֽא׃
20 २० एका मार्गाला बाबेलाच्या सेन्यासाठी खुण करून ठेवा अम्मोनीच्या मुलाकडे राब्बा जवळ येण्यासाठी मार्ग सिध्द करा, दुसरी खुण यरूशलेमेच्या शहरा जवळ यहूदाच्या सेन्याकडे तट बंदीकडे निर्देश करा.
דֶּ֣רֶךְ תָּשִׂ֔ים לָבֹ֣וא חֶ֔רֶב אֵ֖ת רַבַּ֣ת בְּנֵֽי־עַמֹּ֑ון וְאֶת־יְהוּדָ֥ה בִירוּשָׁלַ֖͏ִם בְּצוּרָֽה׃
21 २१ वाडीत बाबेलचा राजा रस्ता ओलांडण्यासाठी थांबेल, भविष्यकथन मिळवून घेण्यासाठी तो काही बाण हलवून मूर्ती पासून मार्गदर्शन मागेल, काळजावरुन तो तपासणी करेल.
כִּֽי־עָמַ֨ד מֶלֶךְ־בָּבֶ֜ל אֶל־אֵ֣ם הַדֶּ֗רֶךְ בְּרֹ֛אשׁ שְׁנֵ֥י הַדְּרָכִ֖ים לִקְסָם־קָ֑סֶם קִלְקַ֤ל בַּֽחִצִּים֙ שָׁאַ֣ל בַּתְּרָפִ֔ים רָאָ֖ה בַּכָּבֵֽד׃
22 २२ यरूशलेमेबद्दल पुढे घडून येणारी गोष्ट त्याच्या उजव्या हातात असेल, किल्ल्याचे दरवाजे फोडण्याचे हत्यार त्याविरूद्ध असेल, त्यांच्या तोंडातून मारण्याचा, युध्दाची ओरड! त्यासाठी हत्यार वेशीसाठी तयार केले, त्यासाठी मातीचे टेकाड बुरुज बांधावे.
בִּֽימִינֹ֞ו הָיָ֣ה ׀ הַקֶּ֣סֶם יְרוּשָׁלַ֗͏ִם לָשׂ֤וּם כָּרִים֙ לִפְתֹּ֤חַ פֶּה֙ בְּרֶ֔צַח לְהָרִ֥ים קֹ֖ול בִּתְרוּעָ֑ה לָשׂ֤וּם כָּרִים֙ עַל־שְׁעָרִ֔ים לִשְׁפֹּ֥ךְ סֹלְלָ֖ה לִבְנֹ֥ות דָּיֵֽק׃
23 २३ पुढे घडून येणारी ती उपयोग हीन बाब दिसून येईल, यरूशलेमपैकी एक, ज्याच्याकडे तलवार व तोंडात बाबेलांची शपथ आहे. पण त्याच्या वेढ्याच्या पुढे राजा उल्लंघन करणारा तहाचा आरोप केला जाईल.
וְהָיָ֨ה לָהֶ֤ם כִּקְסֹום־ (כִּקְסָם)־שָׁוְא֙ בְּעֵ֣ינֵיהֶ֔ם שְׁבֻעֵ֥י שְׁבֻעֹ֖ות לָהֶ֑ם וְהֽוּא־מַזְכִּ֥יר עָוֹ֖ן לְהִתָּפֵֽשׂ׃ פ
24 २४ यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे, कारण तुझे अपराध माझ्यापुढे स्मरण केले जाईल, तुझे अपराध प्रकट केले जातील; तुझी पापे तुझ्या सर्व कृतीतून दर्शीवीली जातील, यास्तव तू सर्वांच्या स्मरणात राहून आपल्या शत्रुच्या तावडीत सापडशील.
לָכֵ֗ן כֹּֽה־אָמַר֮ אֲדֹנָ֣י יְהוִה֒ יַ֗עַן הַזְכַּרְכֶם֙ עֲוֹ֣נְכֶ֔ם בְּהִגָּלֹ֣ות פִּשְׁעֵיכֶ֗ם לְהֵֽרָאֹות֙ חַטֹּ֣אותֵיכֶ֔ם בְּכֹ֖ל עֲלִילֹֽותֵיכֶ֑ם יַ֚עַן הִזָּ֣כֶרְכֶ֔ם בַּכַּ֖ף תִּתָּפֵֽשׂוּ׃ פ
25 २५ तू पवित्रते बद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्राएलचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे.
וְאַתָּה֙ חָלָ֣ל רָשָׁ֔ע נְשִׂ֖יא יִשְׂרָאֵ֑ל אֲשֶׁר־בָּ֣א יֹומֹ֔ו בְּעֵ֖ת עֲוֹ֥ן קֵֽץ׃ ס
26 २६ प्रभू परमेश्वर देव हे सांगत आहे. आपल्या डोक्यावरील पगडी मुकुट बाजुला सारा, सर्व काही एक समान राहाणार नाही, जे उंचावलेले नमवले जातील आणि नम्र उंच केले जातील.
כֹּ֤ה אָמַר֙ אֲדֹנָ֣י יְהוִ֔ה הָסִיר֙ הַמִּצְנֶ֔פֶת וְהָרִ֖ים הָֽעֲטָרָ֑ה זֹ֣את לֹא־זֹ֔את הַשָּׁפָ֣לָה הַגְבֵּ֔הַ וְהַגָּבֹ֖הַ הַשְׁפִּֽיל׃
27 २७ मी सगळ्यांची नासाडी, नासाडी, नासाडी करेन, जमाव उरणार नाही, ज्याला हक्क आहे त्यास तो मिळेल.
עַוָּ֥ה עַוָּ֖ה עַוָּ֣ה אֲשִׂימֶ֑נָּה גַּם־זֹאת֙ לֹ֣א הָיָ֔ה עַד־בֹּ֛א אֲשֶׁר־לֹ֥ו הַמִּשְׁפָּ֖ט וּנְתַתִּֽיו׃ פ
28 २८ तर मग तू मानवाच्या मुला भाकीत कर आणि बोल; परमेश्वर देव हे सांगत आहे, अम्मोनच्या मुलांविषयी जो कलंक आहे तो त्यावर येत आहे. तलवार उचलली आहे ती अधाशीपणे ठार मारण्यासाठी तेजधार केली आहे ती विजेप्रमाणे चकाकत आहे.
וְאַתָּ֣ה בֶן־אָדָ֗ם הִנָּבֵ֤א וְאָֽמַרְתָּ֙ כֹּ֤ה אָמַר֙ אֲדֹנָ֣י יְהֹוִ֔ה אֶל־בְּנֵ֥י עַמֹּ֖ון וְאֶל־חֶרְפָּתָ֑ם וְאָמַרְתָּ֗ חֶ֣רֶב חֶ֤רֶב פְּתוּחָה֙ לְטֶ֣בַח מְרוּטָ֔ה לְהָכִ֖יל לְמַ֥עַן בָּרָֽק׃
29 २९ ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.
בַּחֲזֹ֥ות לָךְ֙ שָׁ֔וְא בִּקְסָם־לָ֖ךְ כָּזָ֑ב לָתֵ֣ת אֹותָ֗ךְ אֶֽל־צַוְּארֵי֙ חַֽלְלֵ֣י רְשָׁעִ֔ים אֲשֶׁר־בָּ֣א יֹומָ֔ם בְּעֵ֖ת עֲוֹ֥ן קֵֽץ׃
30 ३० तलवार म्यानात जाईल, तू ज्या ठिकाणी जन्मला तुझी जेथे सुरुवात झाली त्या भूमिवर मी तुझा न्याय करेन.
הָשַׁ֖ב אֶל־תַּעְרָ֑הּ בִּמְקֹ֧ום אֲשֶׁר־נִבְרֵ֛את בְּאֶ֥רֶץ מְכֻרֹותַ֖יִךְ אֶשְׁפֹּ֥ט אֹתָֽךְ׃
31 ३१ मी तुझ्यावर माझा कोपाग्नीचा संताप ओतेन आणि तुला क्रुर कोशल्याने हानी करण्यास लोकांच्या ताब्यात देईन.
וְשָׁפַכְתִּ֤י עָלַ֙יִךְ֙ זַעְמִ֔י בְּאֵ֥שׁ עֶבְרָתִ֖י אָפִ֣יחַ עָלָ֑יִךְ וּנְתַתִּ֗יךְ בְּיַד֙ אֲנָשִׁ֣ים בֹּֽעֲרִ֔ים חָרָשֵׁ֖י מַשְׁחִֽית׃
32 ३२ तू अग्नीसाठी इंधन होशील; तुझे रक्त भूमिच्या मध्यभागी सांडले जाईल. तुझे स्मरण पुन्हा केले जाणार नाही. “मी परमेश्वर देव हे जाहीर करत आहे.”
לָאֵ֤שׁ תִּֽהְיֶה֙ לְאָכְלָ֔ה דָּמֵ֥ךְ יִהְיֶ֖ה בְּתֹ֣וךְ הָאָ֑רֶץ לֹ֣א תִזָּכֵ֔רִי כִּ֛י אֲנִ֥י יְהוָ֖ה דִּבַּֽרְתִּי׃ פ

< यहेज्केल 21 >