< यहेज्केल 18 >
1 १ पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
Ilizwi leNkosi lafika kimi futhi lisithi:
2 २ “वडीलांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,” याचा अर्थ काय आहे? इस्राएलाच्या भूमीत तू ज्या म्हणी वापरतो आणि म्हणतो.
Litshoni, ukuthi lisebenzise lesisaga ngelizwe lakoIsrayeli, lisithi: Oyise badlile izithelo zevini ezimunyu, lamazinyo abantwana asetshelela?
3 ३ मी शपथ घेतो, “हे परमेश्वर देव जाहीर करतोय” निश्चितच इस्राएलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उरणार नाही.
Kuphila kwami, itsho iNkosi uJehova, isibili kakusayikuba kini ukusebenzisa lesisaga koIsrayeli.
4 ४ पाहा! सर्व जीव आत्मे माझे आहेत, जे पित्यापासून जीवधारी झालेत, म्हणून तेच पुत्राचे जीवन आहे, ते माझे आहे जो पुरुष पाप करेल तो मरेल.
Khangela, yonke imiphefumulo ngeyami; njengomphefumulo kayise, unjalo lomphefumulo wendodana, kungokwami. Umphefumulo owonayo, wona uzakufa.
5 ५ जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा व नीतिने वागणारा आहे.
Kodwa uba umuntu elungile, enze ukwahlulela lokulunga,
6 ६ जर त्यास पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि त्याने आपले डोळे वर इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाही, जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला भ्रष्ट केले नाही किंवा रुतुमती काळात स्त्रीकडे गेला नाही.
engadleli phezu kwezintaba, engaphakamiseli amehlo akhe ezithombeni zendlu yakoIsrayeli, engangcolisi umfazi kamakhelwane wakhe, engasondeli kowesifazana osemfuleni,
7 ७ जर त्याने कुणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदाराकडून शपथ वाहून घेतली जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही, पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्न लोकांना कपडे घातली.
engacindezeli muntu, ebuyisela kowebolekayo isibambiso sakhe, engaphangi impango, enika olambileyo isinkwa sakhe, esembesa oze ngesembatho,
8 ८ त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवी पेक्षा जास्त नफा घेतला नाही जर त्याने न्यायत्व केले व लोकांमध्ये विश्वासूपण निर्माण केला.
enganiki ngenzuzo, engathathi okwengezelelweyo, ebuyisa isandla sakhe esiphambekweni, esenza isahlulelo esiqinisileyo phakathi komuntu lomuntu,
9 ९ जर तो माझ्या दर्ज्याने चालेल आणि माझे फर्मान विश्वासूपणे वागण्यात पाळेल तो मनुष्य नितीमान ठरेल; तो जगेल, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
ehamba ngezimiso zami, egcina izahlulelo zami, ukwenza iqiniso; yena uqondile, uzaphila isibili, itsho iNkosi uJehova.
10 १० पण त्याला जर रक्तपात रागीट मुलगा असला व ही सर्व कामे त्याने केली,
Uba ezala indodana engumphangi, umchithi wegazi, lowenza okufanana lokunye kwalezizinto,
11 ११ त्याच्या वडिलाने यातील काही एक केले नाही पण त्याच्या मुलाने पवित्र पर्वतावर खाद्य पदार्थ नेऊन खाल्ले आणि आपल्या शेजाऱ्याच्या मुलीला भ्रष्ट केले.
longenzi zonke lezozinto, kodwa ngitsho edlela phezu kwezintaba, engcolisa umfazi womakhelwane wakhe,
12 १२ त्याने गरजू व गरीबांवर दडपशाही केली जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले परत केले नाही, जर त्याने आपली नजर मूर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले.
ecindezela umyanga loswelayo, ephanga impango, engabuyiselanga isibambiso, ephakamisele amehlo akhe ezithombeni, enze okunengekayo,
13 १३ जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही त्याने किळस वाणे हे सर्व काम केले तो खात्रीने मरेल त्याच्या रक्ताचा झडा त्याच्याच माथी येईल.
enika ngenzuzo, athathe ngokwengezelelweyo, uzaphila yini? Kayikuphila; wenze zonke lezizinengiso; uzakufa lokufa, amacala akhe egazi azakuba phezu kwakhe.
14 १४ पण पाहा! त्यास पुत्र झाला व त्याने आपल्या वडिलाने केलेले पातक पाहिले आणि स्वत: देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही,
Khangela-ke, uzala indodana ebona zonke izono zikayise azenzileyo, ibona, ingenzi njengalezizinto,
15 १५ जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्ले नाही व आपले डोळे इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाहीत आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट केले नाही.
ingadleli phezu kwezintaba, ingaphakamiseli amehlo ayo ezithombeni zendlu yakoIsrayeli, ingangcolisi umfazi womakhelwane wayo,
16 १६ जर त्याने कुणावरही दड्पशाही केली नाही, जप्ती, तारण म्हणून काही ठेवून घेतले किंवा चोरलेल्या वस्तू ठेवून घेतल्या नाहीत, पण त्याऐवजी त्याने भुकेलेल्या व्यक्तीस अन्न दिले आणि नग्न व्यक्तीस वस्त्र दिले.
ingacindezeli muntu, ingagodli isibambiso, ingaphangi impango, isipha olambileyo isinkwa sayo, yembese oze ngesembatho,
17 १७ गरीबांना नाडण्यास त्याने जर आपला हात आखुड केला आणि त्याने व्याज घेतले नाही व अन्यायाने नफा घेतला नाही, त्याने माझे फर्मान मान्य केले आणि माझ्या दर्जानुसार चालला, तर तो आपल्या वडिलाच्या पातकासाठी मरणार नाही. तो निश्चित जगेल.
isuse isandla sayo kongumyanga, ingemukeli inzuzo lokwengezelelweyo, isenza izahlulelo zami, ihambe ngezimiso zami, yona kayiyikufela isiphambeko sikayise, izaphila isibili.
18 १८ त्याच्या वडिलाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पाहा! तो आपल्या अधर्मामुळे मरेल.
Uyise, ngoba ecindezele ngocindezelo, waphanga impango kumfowabo, wenza okungalunganga phakathi kwabantu bakibo, khangela-ke, uzafela ebubini bakhe.
19 १९ पण तू म्हणतोस “वडिलाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये?” कारण मुलगा आपला न्याय भरुन पावला व नीतिने वागला आणि त्याने माझे सर्व नियम पाळले; त्याने त्याची कृती केली, तो निश्चित जगेल.
Kanti lithi: Kungani indodana ingathwali isiphambeko sikayise? Nxa indodana yenzile isahlulelo lokulunga, igcinile zonke izimiso zami, yazenza, izaphila isibili.
20 २० जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा वडिलाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल.
Umphefumulo owonayo, wona uzakufa. Indodana kayiyikuthwala isiphambeko sikayise, loyise kayikuthwala isiphambeko sendodana. Ukulunga kolungileyo kuzakuba phezu kwakhe, lenkohlakalo yokhohlakeleyo izakuba phezu kwakhe.
21 २१ पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.
Kodwa uba omubi ephenduka ezonweni zakhe zonke azenzileyo, agcine zonke izimiso zami, enze isahlulelo lokulunga, uzaphila isibili, kayikufa.
22 २२ सर्व अपराध जे त्याने केले त्याचे स्मरण पुन्हा केले जाणार नाही, तो आपल्या नीतीच्या सरावाने जगेल.
Iziphambeko zakhe zonke azenzileyo kaziyikukhunjulelwa kuye; ekulungeni kwakhe akwenzileyo, uzaphila.
23 २३ “मी दुष्टतेच्या मृत्यूवर मोठा हर्ष केला आहे” हे परमेश्वर देव जाहीर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?
Ngiyathokoza lokuthokoza ngokufa kokhohlakeleyo yini? itsho iNkosi uJehova; kakusikuthi aphenduke ezindleleni zakhe, aphile yini?
24 २४ जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्तेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद, दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही. जेव्हा त्याने देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.
Kodwa nxa olungileyo ephenduka ekulungeni kwakhe, esenza isiphambeko, enze njengokwezinengiso zonke azenzayo omubi, uzaphila yini? Ukulunga kwakhe konke akwenzileyo kakuyikukhunjulwa; esiphambekweni sakhe aphambeke ngaso, lesonweni sakhe asonileyo, uzafela kikho.
25 २५ पण तू म्हणतोस, “प्रभूचे मार्ग योग्य नाहीत,” इस्राएलाच्या घराण्या ऐक! काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का?
Kanti lithi: Indlela yeNkosi kayilingani. Zwanini-ke, lina ndlu kaIsrayeli; indlela yami kayilingani yini? Kayisizo yini izindlela zenu ezingalinganiyo?
26 २६ जर नीतिमान आपल्या नीतिमत्तेपासून आपला मार्ग फिरवेल आणि दुष्कर्म करेल आणि मरेल याचे कारण तोच ठरेल, आणि त्याने केलेल्या दुष्कर्मात मरेल.
Lapho olungileyo ephenduka ekulungeni kwakhe, enze iziphambeko, afele kuzo, eziphambekweni azenzileyo uzakufa.
27 २७ पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने व नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.
Futhi nxa omubi ephenduka ebubini bakhe abenzileyo, enze isahlulelo lokulunga, yena uzagcina umphefumulo wakhe uphila.
28 २८ कारण त्याने पाहिले व केलेल्या दुष्कर्मापासून तो वळाला, तो जगेल तो मरणार नाही.
Ngoba ebona, ephenduka kuzo zonke iziphambeko zakhe azenzileyo, uzaphila isibili, kayikufa.
29 २९ पण इस्राएलाचे घराणे म्हणते, “प्रभूचा मार्ग अयोग्य आहे आणि तुझे स्वत: चे मार्ग कसे अयोग्य नाही?”
Kanti indlu kaIsrayeli ithi: Indlela yeNkosi kayilingani. Wena ndlu kaIsrayeli, indlela zami kazilingani yini? Kayisizo yini indlela zenu ezingalinganiyo?
30 ३० तथापि “इस्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेन.” हे परमेश्वर देव जाहीर करतो, पश्चाताप कर व आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.
Ngakho ngizalahlulela, lina ndlu kaIsrayeli, ngulowo lalowo njengokwendlela zakhe, itsho iNkosi uJehova. Phendukani, libuye lisuke eziphambekweni zenu zonke; ukuze ububi bungabi yisikhubekiso kini.
31 ३१ तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर, तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?
Lahlani lisuse kini zonke iziphambeko zenu eliphambeke ngazo, lizenzele inhliziyo entsha lomoya omutsha; ngoba lizafelani, lina ndlu kaIsrayeli?
32 ३२ कारण “मी मरणाऱ्यांसाठी मला हर्ष होत नाही” हे परमेश्वर देव जाहीर करतो. “मग पश्चाताप कर आणि जीवित राहा.”
Ngoba kangithokozi ngokufa kofayo, itsho iNkosi uJehova; ngakho phendukani liphile.