< यहेज्केल 17 >
1 १ परमेश्वराचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
I doszło do mnie słowo PANA mówiące:
2 २ मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला कोडे सांग आणि दाखला सांग.
Synu człowieczy, zadaj zagadkę i opowiedz domowi Izraela przypowieść;
3 ३ सांग की परमेश्वर देव तुम्हास सांगत आहे, एक मोठा गरुड मोठ्या पंखासह आणि लांब दातेरी चाकासह व पिसाऱ्याने परिपूर्ण आणि ते बहुरंगी आहेत ते लबानोन पर्वतावर गेला व त्यांने गंधसरुची फांदी मोडून टाकली.
I powiedz: Tak mówi Pan BÓG: Wielki orzeł o wielkich i długich skrzydłach, pełen pstrego pierza, przyleciał nad Liban i wziął wierzchołek cedru.
4 ४ त्यांच्या फांदीचा शेंडा मोडून टाकला आणि त्यास कनानात घेऊन गेला, त्यास व्यापाऱ्यांच्या शहरात लावले.
Ułamał koniec jego pędów, zaniósł go do ziemi kupieckiej i złożył go w mieście kupieckim.
5 ५ त्याने त्यातले काही बीज घेतले आणि पेरणी करण्यासाठी तयार भूमीत जेथे विपुल पाणी होते तेथे वाळुंजासारखे लावले.
Wziął też nasienie tej ziemi i zasadził na urodzajnym polu; umieścił je nad wielkimi wodami jak wierzbę.
6 ६ मग त्याची वाढ होऊन द्राक्षाच्या झाडाच्या फांद्या पसरल्या व गरुडाकडे झुकल्या आणि त्याचे मुळ त्याकडे वाढ झालेले होते.
I urosło, i stało się bujną winoroślą, [choć] niskiego wzrostu; jej latorośle zwracały się ku niemu, a korzenie były mu poddane. I stało się winoroślą, która wydała latorośle i wypuściła pędy.
7 ७ पण तेथे अजून एक मोठा गरुड असून मोठे पंख आणि पिसारा असलेला होता आणि पाहा! या द्राक्षलता गरुडाकडे झुकलेली असून व त्यांच्या फांद्याही गरुडाकडे पसरलेल्या होत्या, त्यास रोपन केल्या पासून त्यास विपुल पाणी घातले होते.
Ale był inny wielki orzeł o wielkich skrzydłach i gęstym pierzu, a oto ta winorośl zwróciła swoje korzenie ku niemu i rozciągnęła swe latorośle do niego, aby on ją nawadniał z bruzd swego sadu.
8 ८ त्यास सुपीक जमीनीत विपुल पाण्याजवळ रोपण केलेले होते त्यामुळे त्यांच्या फांद्या बहरल्या आणि ते फलदायी झाले, त्यातून उत्तम दर्जाची द्राक्ष आली.
A [była] przecież zasadzona na dobrym polu, nad wielkimi wodami, aby wypuściła latorośle, wydała owoc i stała się wspaniałą winoroślą.
9 ९ हे घडेल का? लोकांस असे सांगा परमेश्वर देव हे म्हणतो; त्याचे मुळ उपटून टाकू नका; आणि त्याची फळे तोडू नका, त्यांची वाढ सुकून जाईल; कोणतेही बाहूबल कोणताही जनसमुदाय त्यास उपटून टाकणार नाही.
Wtedy powiedz: Tak mówi Pan BÓG: Czy się jej poszczęści? Czy [orzeł] nie wyrwie jej korzeni i nie oberwie jej owocu [tak], by uschła? Uschną wszystkie listki, które wypuści, i nie będzie trzeba wielkiej mocy ani licznego ludu, aby ją wyrwać z korzeniami.
10 १० मग पाहा! त्यास रोपन केल्यावर त्याची वाढ होईल, ते सुकून जाणार नाही? जेव्हा पूर्वेकडील वारा त्यास स्पर्श करेल? ते आपल्या जागेत पूर्ण वाळून जाईल.
Oto jakkolwiek będzie zasadzona, czy się [jej] poszczęści? Czy doszczętnie nie uschnie, gdy dotknie ją wiatr wschodni? Uschnie w bruzdach, w których wyrosła.
11 ११ मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला
Potem doszło do mnie słowo PANA:
12 १२ बंडखोर घराण्याशी बोल या गोष्टी काय आहे ते तुला माहित नाही का? पाहा! बाबेलचा राजा यरूशलेमकडे येईल त्यांचा राजा आणि राज पुत्राला घेऊन, बाबेलात जाईल.
Mów teraz do domu buntowniczego: Czyż nie wiecie, co znaczą te [rzeczy]? Powiedz: Oto król Babilonu przybył do Jerozolimy, zabrał jej króla i książąt i uprowadził ich ze sobą do Babilonu.
13 १३ मग राजवंशाला घेऊन जाईल, त्याच्याशी करार करेल आणि त्यांना शपथेखाली घेऊन येईल. आणि भूमीतील बलवानांना सोबत घेऊन जाईल.
Wziął też jednego z potomków króla, zawarł z nim przymierze i związał go przysięgą. Zabrał też możnych tej ziemi;
14 १४ मग राज्य रसातळाला जाईल मग उच्च पातळी गाठणार नाही, त्याचा करार मान्य करुनच भूमीवर वावरता येईल.
Aby królestwo było poniżone, tak by się nie podnosiło, [ale] by tak trwało, zachowując jego przymierze.
15 १५ पण मिसऱ्यांनी त्यास घोडे व बहुत लोक द्यावेत म्हणून तो आपला राजदुत पाठवून त्याजविरूद्ध बंड करेल तो यशस्वी होईल का? या गोष्टी करणाऱ्याची सुटका होईल का? जर तो कराराचे उल्लंघन करेल, त्याची सुटका होईल का?
Lecz on zbuntował się przeciwko niemu, wysyłając swych posłów do Egiptu, aby dano mu koni i liczny lud. Czy mu się poszczęści? Czy ujdzie zemsty ten, który tak czynił? Czy ocali się ten, który złamał przymierze?
16 १६ माझ्या जीवताची शपथ असे परमेश्वर देव जाहीर करतो तो निश्चित राज्याच्या भूमीत मरेल ज्याने त्यास राजा केले, ज्या राजाने करार केला ज्याने त्यास तुच्छ लेखून करार मोडला. तो बाबेलाच्या मध्यवर्ती ठिकाणी मरेल.
Jak żyję, mówi Pan BÓG, w miejscu tego króla, który go uczynił królem, a którego przysięgą wzgardził i którego przymierze złamał, u niego w Babilonie umrze.
17 १७ फारो आपल्या पराक्रमी बाहूबलाने अनेक लोकांस जमवेल युध्दाने त्याचा बचाव होणार नाही, जेव्हा बाबेलाच्या पर्वतावर वेढा बुरुज बांधतील आणि अनेकांचा धुव्वा उडवण्यासाठी ते बुरुज पाडून टाकतील.
I ani faraon z wielkim wojskiem i z licznym zastępem nie pomoże mu na wojnie, gdy usypie wały i pobuduje wieże, aby zniszczyć mnóstwo ludzi;
18 १८ करार मोडून राजाने शपथेला तुच्छ लेखले, पाहा! तो आपल्या हाताने वचनप्राप्ती करेल, पण त्याने जे केले त्यासाठी तो निभावणार नाही.
Ponieważ wzgardził przysięgą, łamiąc przymierze. Oto bowiem dał na to swą rękę, a to wszystko uczynił. Nie ujdzie zemsty.
19 १९ यास्तव परमेश्वर देव असे सांगतो जसे मी शपथेने म्हणतो, त्याने करार मोडला आणि तुच्छ लेखले? म्हणून मी त्याच्या माथी शासन आणिन;
Dlatego tak mówi Pan BÓG: Jak żyję, moją przysięgę, którą wzgardził, i moje przymierze, które złamał, złożę mu na głowę.
20 २० मी आपले पाश त्याच्यावर टाकीन, त्यास पारध म्हणून पकडेन, मग त्यास बाबेलात नेईन आणि शासन अमलात आणिन जेव्हा त्यांनी देशद्रोह केला व माझ्याशी विश्वासघात केला.
Rozciągnę na nim swoją sieć i zostanie schwytany w moje sidła, i zaprowadzę go do Babilonu, a tam się z nim rozprawię za jego występek, którym zgrzeszył przeciwko mnie.
21 २१ आणि त्याच्या बाहूबलाचे सर्व शरणस्थान तलवारीने मोडले गेले, आणि जे उरलेले सर्व दिशेने विखुरले गेले आहे, मग तुला कळेल मी परमेश्वर देव आहे, मी जे बोलले ते घडेल.
A wszyscy, którzy uciekli od niego wraz ze wszystkimi jego hufcami, od miecza polegną, a pozostali zostaną rozproszeni na wszystkie wiatry. I poznacie, że ja, PAN, [to] powiedziałem.
22 २२ परमेश्वर देव हे म्हणतो, मग मी स्वतःला देवदार झाडाच्या उच्च ठिकाणी घेऊन जाईल आणि मी त्यांचे रोपन करेल व त्यांच्या फांद्या तोडल्या जातील व मी स्वतःला उच्चस्थानी स्थापील.
Tak mówi Pan BÓG: Wezmę wierzchołek tego wysokiego cedru i zasadzę; z najwyższych jego gałązek odłamię młodą gałązkę i zasadzę [ją] na wysokiej i wyniosłej górze;
23 २३ मी त्यांना इस्राएलाच्या पर्वतावर रोपन करेल व त्यांना फांद्या, फळे येतील आणि ते देवदार झाडाचे उदात्त होतील म्हणून पंखाचे पक्षी त्याखाली राहतील, ते त्यांच्या फांद्यांमध्ये घरटे करतील.
Na wysokiej górze Izraela ją zasadzę. Wypuści gałązki, wyda owoc i stanie się cedrem wspaniałym. I będzie mieszkać pod nim wszelkie ptactwo skrzydlate; pod cieniem jego gałęzi będą mieszkać.
24 २४ मग सर्व झाडाच्या पक्षांना कळेल की मी परमेश्वर देव आहे, मी उच्च झाड खाली आणेन; मी लहान झाडाला उच्च करीन, मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन; कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे. मी परमेश्वर देव आहे, मी जे जाहीर केले आहे ते घडेल.
A tak wszystkie drzewa polne poznają, że ja, PAN, poniżyłem drzewo wysokie, a wywyższyłem drzewo niskie, ususzyłem drzewo zielone, a sprawiłem, że zakwitło drzewo suche. Ja, PAN, to powiedziałem i uczynię.