< यहेज्केल 16 >

1 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला.
耶和华的话又临到我说:
2 मानवाच्या मुला, त्यांच्या किळस वाण्या कृत्याबद्दल यरूशलेमेस बजावून सांग.
“人子啊,你要使耶路撒冷知道她那些可憎的事,
3 असे जाहीर कर परमेश्वर देव यरूशलेमेला असे म्हणतो, तुझी सुरुवात आणि जन्म सुध्दा कनान देशात झाला आहे, तुझा बाप आमोरी आणि आई हित्ती होती.
说主耶和华对耶路撒冷如此说:你根本,你出世,是在迦南地;你父亲是亚摩利人,你母亲是赫人。
4 तू जन्मला त्या दिवशी तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने स्वच्छ केले नाही, किंवा मिठ लावून चोपडले नाही, किंवा बाळंत्याने गुंडळले नाही, तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझा तिव्र तिटकारा येऊन तुला उघड्यावर फेकून दिले.
论到你出世的景况,在你初生的日子没有为你断脐带,也没有用水洗你,使你洁净,丝毫没有撒盐在你身上,也没有用布裹你。
5 कुणाच्या डोळ्यात तुझ्याबद्दल करुणा दिसली नाही, ज्या दिवशी तुझा जन्म झाला, तुला मोकळ्या जागेत फेकून दिले.
谁的眼也不可怜你,为你做一件这样的事怜恤你;但你初生的日子扔在田野,是因你被厌恶。
6 पण मी तुझ्या जवळून जातांना तुला रक्तबंबाळ पाहिले; आणि मी तुझ्या ओघळणाऱ्या रक्ताला जीवन बोललो.
“我从你旁边经过,见你滚在血中,就对你说:你虽在血中,仍可存活;你虽在血中,仍可存活。
7 मी तुला भूमीतील रोपासारखे पेरले. तू बहुगुणीत झालीस. आणि मोठी झालीस, व तू आभुषणांचा दागीना झालीस, तुला उर फुटले आणि केस दाट झाले, तू बिनवस्त्र होती.
我使你生长好像田间所长的,你就渐渐长大,以致极其俊美,两乳成形,头发长成,你却仍然赤身露体。
8 मी पुन्हा तुझ्या जवळून गेलो, तेव्हा वेळ तुझ्या प्रेमाच्या विकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पांघरुन घालून तुझी नग्नता झाकली. मग मी शपथ वाहून तुझ्याशी करार केला. परमेश्वर देव म्हणतो, या कराराने तू माझी झाली आहेस.
“我从你旁边经过,看见你的时候正动爱情,便用衣襟搭在你身上,遮盖你的赤体;又向你起誓,与你结盟,你就归于我。这是主耶和华说的。
9 मी पाण्याने तुला धुतले, आणि तेलाने तुला मळले.
那时我用水洗你,洗净你身上的血,又用油抹你。
10 १० तुला नक्षीकाम केलेले कापड घातले, तुझ्या पायात कातड्याचे जोडे घातले, तुझ्या डोक्याला चांगले रेशमाचे मुलायम कापड घातले.
我也使你身穿绣花衣服,脚穿海狗皮鞋,并用细麻布给你束腰,用丝绸为衣披在你身上,
11 ११ त्यानंतर मी तुला दागिन्यांनी सजवले, तुझ्या हातात कडे घातले आणि गळ्यात साखळी घातली.
又用妆饰打扮你,将镯子戴在你手上,将金链戴在你项上。
12 १२ मी तुला नथ घातली आणि कानात बाळी घातली व सुंदर मुकुट तुझ्या डोक्यात घातला.
我也将环子戴在你鼻子上,将耳环戴在你耳朵上,将华冠戴在你头上。
13 १३ तुला सोन्यारुप्याने सजवीले, तुला रेशमाच्या कापडाचा व नक्षीकाम केलेला पेहराव घातला, तुला जेवणास मधपोळी तेलासह असत. तू अति सुंदर होतीस कारण तुला दिलेल्या तेजाने तू अप्रतीम होतीस असे परमेश्वर देव म्हणतो.
这样,你就有金银的妆饰,穿的是细麻衣和丝绸,并绣花衣;吃的是细面、蜂蜜,并油。你也极其美貌,发达到王后的尊荣。
14 १४ तुझ्या देखणे पणाची चर्चा सर्व राष्ट्रात पसरली, ती तुला परिपूर्ण मोहून टाकणारी आहे, जी मी तुला दिली असे परमेश्वर देव म्हणतो.
你美貌的名声传在列邦中,你十分美貌,是因我加在你身上的威荣。这是主耶和华说的。
15 १५ पण तू आपल्या देखणेपणावर विसंबून राहीली आणि वेश्या कर्म केले, ये जा करणाऱ्यांशी तू वेश्या कर्म केले, त्यांनी तुझे सोंदर्य लुटले.
“只是你仗着自己的美貌,又因你的名声就行邪淫。你纵情淫乱,使过路的任意而行。
16 १६ मग तू आपले विविध रंगी कपड्यांनी उच्च स्थाने सजवली, कधी झाली नाही व कधी केली जाणार नाही असे वेश्या कर्म तू केलेस.
你用衣服为自己在高处结彩,在其上行邪淫。这样的事将来必没有,也必不再行了。
17 १७ मी दिलेल्या शोभेच्या सोन्याचांदीच्या दागीन्यांची तू पुरुष प्रतिमा बनवीली आणि त्यांच्या बरोबर तू वेश्या कर्म केले.
你又将我所给你那华美的金银、宝器为自己制造人像,与他行邪淫;
18 १८ तू त्यांना नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली त्यांनी तू सुगंधी तेलाचा धुप चढवला.
又用你的绣花衣服给他披上,并将我的膏油和香料摆在他跟前;
19 १९ भाकर, पिठ, तेल, मध मी तुला दिले व तुला खाऊ घातले ते तुझ्यापुढे सुवासीक अर्पण असे होते. असे घडले प्रभू परमेश्वर देव जाहीर पणे सांगतो.
又将我赐给你的食物,就是我赐给你吃的细面、油,和蜂蜜,都摆在他跟前为馨香的供物。这是主耶和华说的。
20 २० मग तुझ्या पुत्र कन्यांना जे माझ्यापासून जन्मले त्यांना तू खाऊन टाकण्यासाठी अर्पण केले आणि वेश्याकर्म केलेस.
并且你将给我所生的儿女焚献给他。
21 २१ तू मूर्तीच्यापुढे माझ्या लेकरांना अग्नीने जाळून खाक केले व त्यांचे अग्नीअर्पण केले.
你行淫乱岂是小事,竟将我的儿女杀了,使他们经火归与他吗?
22 २२ तुझे सर्व किळसवाणे व वेश्याकर्म तू कुमारी असतांना नग्न होऊन रक्तात लोळत होती याचे स्मरण तुला झाले नाही.
你行这一切可憎和淫乱的事,并未追念你幼年赤身露体滚在血中的日子。”
23 २३ तुला हाय हाय असो! असे परमेश्वर देव जाहीर करतो, या सर्व दुष्टपणात आणखी भर,
“你行这一切恶事之后(主耶和华说:你有祸了!有祸了!)
24 २४ तू आपल्यासाठी संस्कार गृह बांधले, व सार्वजनिक असे पवित्र ठिकाण उभे केले
又为自己建造圆顶花楼,在各街上做了高台。
25 २५ तू पवित्र ठिकाण आपल्यासाठी प्रत्येक रस्त्यावर उभे केले आणि तुझे सौंदर्य जाहीर केले, तू आपले पाय पसरुन आपल्या मना प्रमाणे वेश्या कर्म केले.
你在一切市口上建造高台,使你的美貌变为可憎的,又与一切过路的多行淫乱。
26 २६ तू मिसर देशाच्या लोकांशी, शेजाऱ्यांशी जे वासनाधुंद त्यांच्या सोबत वेश्या कर्म केले त्याचा मला राग येतोय.
你也和你邻邦放纵情欲的埃及人行淫,加增你的淫乱,惹我发怒。
27 २७ बघ मी माझा हात तुझ्यावर उचलीन व तुझी उपासमार करीन तुझ्या शत्रुंचा हात तुझ्यावर पडेल व पलिष्ट्यांच्या कन्या तुझ्या वासनाधुंदपणाची तुझी लाज काढतील.
因此我伸手攻击你,减少你应用的粮食,又将你交给恨你的非利士众女,使她们任意待你。她们见你的淫行,为你羞耻。
28 २८ तू अश्शूरांशी वेश्या काम केले कारण त्यांने तू समाधानी झाली नाहीस. तू समाधान होईपर्यंत वेश्या काम करीत होतीस.
你因贪色无厌,又与亚述人行淫,与他们行淫之后,仍不满意,
29 २९ तू व्यापाऱ्यांच्या म्हणजे खास्द्यांच्या देशात बरेच वेश्या काम केले किंबहूना यानेही तुझे समाधान झाले नाही.
并且多行淫乱,直到那贸易之地,就是迦勒底,你仍不满意。
30 ३० तुझे हृदय इतके कमजोर का? “असे परमेश्वर प्रभू देव जाहीरपणे सांगतो” तू स्वतःच्या मना प्रमाणे निर्लज्ज स्त्री सारखे सर्व काही केले.
“主耶和华说:你行这一切事,都是不知羞耻妓女所行的,可见你的心是何等懦弱!
31 ३१ रस्त्यावर, प्रत्येक नाक्यावर तू संस्कार गृह बांधले व सार्वजनिक ठिकाणी पवित्र ठिकाण उभे केलेस, तू वेश्याकमाई घेतली नाही व वेश्येचा रिवाज मोडला.
因你在一切市口上建造圆顶花楼,在各街上做了高台,你却藐视赏赐,不像妓女。
32 ३२ तू जारीण आपल्या पतीच्या ऐवजी परक्या पुरुषाशी जारकर्म केले.
哎!你这行淫的妻啊,宁肯接外人,不接丈夫。
33 ३३ लोक प्रत्येक वेश्येला धन देतात, पण तू आपल्या जारकर्म्यांना उलट पक्षी मोबदला देतेस, तुझ्याशी वेश्या कर्म करावे म्हणून सर्व बाजूने तू त्यांना लाच देतेस.
凡妓女是得人赠送,你反倒赠送你所爱的人,贿赂他们从四围来与你行淫。
34 ३४ म्हणून तुझ्यात व इतर स्त्रियात फरक आहे, कुणी तुझ्या बरोबर झोपण्यास तयार होत नाही जोपर्यंत तू त्यास मोबदला देत नाही, तो तुला काही धन देत नाही.
你行淫与别的妇女相反,因为不是人从你行淫;你既赠送人,人并不赠送你;所以你与别的妇女相反。”
35 ३५ परमेश्वर देवाचा शब्द तू हे जारीण ऐक.
“你这妓女啊,要听耶和华的话。
36 ३६ असे परमेश्वर देव म्हणतो, कारण तू आपल्या वासनेची ओतणी करुण निर्लज्जता तुझ्या वेश्याकर्माने जारकर्म्यावर व मूर्तीपुढे उघडी केली, आणि तू आपल्या लेकरांचे रक्त मूर्तीला वाहीले;
主耶和华如此说:因你的污秽倾泄了,你与你所爱的行淫露出下体,又因你拜一切可憎的偶像,流儿女的血献给他,
37 ३७ यास्तव पहा! तुझे चाहाते व द्वेष्टे सर्वांना जमा करून तुझी लाज परराष्ट्री पुढे उघडी करेल व ते तुझी नग्नता सर्व बाजूने बघतील.
我就要将你一切相欢相爱的和你一切所恨的都聚集来,从四围攻击你;又将你的下体露出,使他们看尽了。
38 ३८ तुझ्या जारकर्माचे व तू सांडलेल्या रक्ता बद्दल शासन मी तुला करीन व माझ्या रागाने व त्वेषाने तुझे रक्त सांडेल.
我也要审判你,好像官长审判淫妇和流人血的妇女一样。我因忿怒忌恨,使流血的罪归到你身上。
39 ३९ तुला मी त्यांच्या हाती सोपवेन व ते तुझे सर्व घरे पाडून टाकतील तुझे वस्त्र, दागिने हुसकावून तुला उघडी नागडी करतील.
我又要将你交在他们手中;他们必拆毁你的圆顶花楼,毁坏你的高台,剥去你的衣服,夺取你的华美宝器,留下你赤身露体。
40 ४० मग ते तुझ्या विरुध्द लोक जमा करून तुला धोंडमार करतील व तलवारीने तुझे तुकडे करतील.
他们也必带多人来攻击你,用石头打死你,用刀剑刺透你,
41 ४१ ते तुझ्या घराला जाळून टाकतील अनेक स्त्रियांच्या डोळ्यादेखत तुझ्यावर शासन केले जाईल, मी तुझे वेश्या कर्म बंद करेन, आणि आता तू कुणालाही मोबदला देणार नाहीस.
用火焚烧你的房屋,在许多妇人眼前向你施行审判。我必使你不再行淫,也不再赠送与人。
42 ४२ मग माझा राग तुझ्या वरचा थंड होईल; मग माझा राग निघून जाईल, मी शांत होईन व पुन्हा कोपणार नाही.
这样,我就止息向你发的忿怒,我的忌恨也要离开你,我要安静不再恼怒。
43 ४३ कारण तू आपल्या तरुणपणात माझी आठवण केली नाहीस आणि मला क्रोधावीष्ट केलेस. बघ तुझ्या वाईट कृत्याचे परीणाम मी तुझ्या शिरी घेऊन येईन; असे परमेश्वर देव जाहीर करतो, म्हणून आता यापुढे तू वाईट वेश्या काम करणार नाहीस.
因你不追念你幼年的日子,在这一切的事上向我发烈怒,所以我必照你所行的报应在你头上,你就不再贪淫,行那一切可憎的事。这是主耶和华说的。”
44 ४४ बघ! तुला अनुसरुन जे कोणी म्हणी वापरतील, जशी आई आपल्या मुलीसाठी आहे
“凡说俗语的必用俗语攻击你,说:‘母亲怎样,女儿也怎样。’
45 ४५ तू आपल्या आईची मुलगी आहेस, जिने आपल्या पतीचा व लेकराचा तिरस्कार केला व तुझ्या आपल्या बहीणीने बहीणीच्या पतीच्या व तिच्या लेकरांचा तिरस्कार केला, तुझी आई हित्ती आणि तुझा बाप आमोरी आहे.
你正是你母亲的女儿,厌弃丈夫和儿女;你正是你姊妹的姊妹,厌弃丈夫和儿女。你母亲是赫人,你父亲是亚摩利人。
46 ४६ तुझी मोठी बहीण शोमरोनी आणि तिची कन्या पूर्वेकडे वस्तीला आहे त्यापैकी एक सदोम आहे.
你的姊姊是撒马利亚,她和她的众女住在你左边;你的妹妹是所多玛,她和她的众女住在你右边。
47 ४७ आता तिच्या पावलावर पाऊल टाकून तिरस्कार करु नको; जरी या थोडक्या बाबी आहेत तरी देखील तू होती त्याहून तुझे मार्ग वाईट आहेत.
你没有效法她们的行为,也没有照她们可憎的事去做,你以那为小事,你一切所行的倒比她们更坏。
48 ४८ परमेश्वर देव जाहीर करतो की सदोम तुझी बहीण आणि तुझी मुलगी, तू आपल्या बहिणीप्रमाणे वाईट कृत्ये केली नाहीस.
主耶和华说:我指着我的永生起誓,你妹妹所多玛与她的众女尚未行你和你众女所行的事。
49 ४९ पाहा! सदोम या तुझ्या बहिणीचे हे पातक आहे. ती आपल्या फुरसतीत सर्व बाबतीत उध्दट, निष्काळजी, करुणाहीन, होती. तिने व तिच्या मुलीने गरजू व गरीबांना मदतीचा हात पुढे केला नाही.
看哪,你妹妹所多玛的罪孽是这样:她和她的众女都心骄气傲,粮食饱足,大享安逸,并没有扶助困苦和穷乏人的手。
50 ५० ती उध्दट आणि किळसवाणी कार्य तिने माझ्या पुढे केले आहे, तुझ्या देखत मी तुला हुसकावून दिले आहे.
她们狂傲,在我面前行可憎的事,我看见便将她们除掉。
51 ५१ शोमरोनाने तुझ्या सारखे निम्मे पाप केले नाही, त्यांनी केलेल्या पापापेक्षा तू अनेक किळस वाणे पापे केलीस, तू दाखवलेस की तुझी बहीण तुझ्याहून सरळ आहे कारण सर्व ओंगाळ कर्म तू केलेले आहेस.
撒马利亚没有犯你一半的罪,你行可憎的事比她更多,使你的姊妹因你所行一切可憎的事,倒显为义。
52 ५२ विशेषत; तू आपली स्वतःची लाज दाखवलीस; या मार्गाने तू आपल्या बहीणीपेक्षा उत्तम आहेस हे दर्शविले, तू केलेल्या पापाने सर्व किळसवाणे कार्य तू केलेले आहेस, तुझी बहीण तुझ्याहून उत्तम आहे, विशेषत; तू आपली लाज उघडी केली, या मानाने तुझी बहीण तुझ्या मानाने उत्तम आहे.
你既断定你姊妹为义,就要担当自己的羞辱;因你所犯的罪比她们更为可憎,她们就比你更显为义;你既使你的姊妹显为义,你就要抱愧担当自己的羞辱。”
53 ५३ यास्तव मी तुझे भविष्य सामान्य स्थितीत आणेन, सदोमाचे भविष्य आणि तुझ्या बहिणीचे आणि शोमरोनाचे व तिच्या बहीणीचे भविष्यपण त्यांच्यापैकी असेल.
“我必叫她们被掳的归回,就是叫所多玛和她的众女,撒马利亚和她的众女,并你们中间被掳的,都要归回,
54 ५४ या सर्वांचा लेखा जोखा तुला आपली लज्जा उघडी केली जाईल; आणि या मार्गाने तुझे सांत्वन केले जाईल.
好使你担当自己的羞辱,并因你一切所行的使她们得安慰,你就抱愧。
55 ५५ म्हणून सदोम व तुझ्या बहिणीची पूर्वीच्या स्थितीहून सामान्य स्थिती आणेन. मग शोमरोन व तिच्या मुलीची स्थिती मी सामान्य करेन.
你的妹妹所多玛和她的众女必归回原位;撒马利亚和她的众女,你和你的众女,也必归回原位。
56 ५६ जेव्हा तू घमंडी होतीस सदोम तुझ्या बहीणीचे नाव मुखातून उच्चारण केले नव्हते.
在你骄傲的日子,你的恶行没有显露以先,你的口就不提你的妹妹所多玛。那受了凌辱的亚兰众女和亚兰四围非利士的众女都恨恶你,藐视你。
57 ५७ तुझा दुष्टपणा जेव्हा प्रकट झाला. पण तू आता अदोमाचे कन्ये तिरस्कारणीय बाब आहेस आणि सभोवतालच्या पलिष्टीच्या कन्येसाठी असलेले सर्व लोक तिरस्कार करतील.
58 ५८ तू तुझी लज्जा दाखवली आणि तुझे तिरस्करणीय कृती केली असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
耶和华说:你贪淫和可憎的事,你已经担当了。”
59 ५९ प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी इतरांशी जसा वागलो तसा मी तुझ्याशी वागेन ज्यांनी शपथेचा तिरस्कार केला व करार मोडला.
“主耶和华如此说:你这轻看誓言、背弃盟约的,我必照你所行的待你。
60 ६० तुझ्या तरुणपणात केलेल्या माझ्या कराराचे मी सर्वदा स्मरण करीन आणि मी सर्व काही कराराच्या द्वारे स्थापीत करेन.
然而我要追念在你幼年时与你所立的约,也要与你立定永约。
61 ६१ मग तुला तुझ्या मार्गाची आठवण होईल आणि आपल्या थोरल्या बहिणीची व धाकट्या बहिणीबद्दल लज्जीत होशील, तू तुझी मुलगी त्यांना देईल पण तुझ्या करारामुळे नव्हे.
你接待你姊姊和你妹妹的时候,你要追念你所行的,自觉惭愧;并且我要将她们赐你为女儿,却不是按着前约。
62 ६२ तुझ्या सोबत करार स्थापीत करेल, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
我要坚定与你所立的约(你就知道我是耶和华),
63 ६३ या बाबीमुळे तुला सर्व काही स्मरण होईल आणि त्याची लाज वाटेल तू केलेल्या सर्व कर्माची मी तुला क्षमा केली, “असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.”
好使你在我赦免你一切所行的时候,心里追念,自觉抱愧,又因你的羞辱就不再开口。这是主耶和华说的。”

< यहेज्केल 16 >