< निर्गम 8 >
1 १ मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर असे म्हणतो की, ‘माझ्या लोकांस माझी उपासना करण्याकरता जाऊ दे.
Sa’an nan Ubangiji ya ce wa Musa, “Ka je wurin Fir’auna, ka ce masa, ‘Ga abin da Ubangiji yana cewa, ka bar mutanena su tafi domin su yi mini sujada.
2 २ जर तू त्यांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझा सारा देश बेडकांनी पीडीन.
In ka ƙi barinsu, zan hore ka da annoban kwaɗi a dukan ƙasarka.
3 ३ नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत, अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील.
Nilu zai cika da kwaɗi. Za su haura zuwa cikin fadanka da kan gadonka, cikin gidajen bayinka da kan mutanenka, cikin kwanonin toye-toyenka da na cin abincinka.
4 ४ तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर बेडूक चढतील.”
Kwaɗin nan za su yi ta tsalle a kanka, da kan mutanenka, da kuma kan dukan bayinka.’”
5 ५ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्या जलावर लांब कर म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.”
Sai Ubangiji ya ce wa Musa, “Ka ce wa Haruna, ‘Ka miƙa hannunka da sandanka bisa koguna da rafuffuka da kuma kududdufai, ka sa kwaɗi su fito su mamaye ƙasar Masar.’”
6 ६ मग अहरोनाने आपला हात मिसराच्या जलाशयावर लांब केला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.
Sai Haruna ya miƙa hannunsa bisa ruwan Masar, kwaɗi kuwa suka fito, suka mamaye ƙasar Masar.
7 ७ तेव्हा जादूगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले.
Amma bokaye ma suka yi abubuwan nan ta wurin sihirinsu; suka sa kwaɗi suka fito suka mamaye ƙasar Masar.
8 ८ मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरास विनंती करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांस जाऊ देईन.”
Fir’auna ya kira Musa da Haruna ya ce, “Yi addu’a ga Ubangiji yă ɗauke kwaɗi daga gare ni da mutanena, zan kuwa bar mutanenku su tafi su yi hadaya ga Ubangiji.”
9 ९ मोशे फारोला म्हणाला, “मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी कोणत्या वेळी प्रार्थना करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.”
Musa ya ce wa Fir’auna, “Na ba ka dama ka ba da lokacin da zan yi addu’a dominka da kuma bayinka da mutanenka, gidajenku kuwa za su rabu da kwaɗi, amma ban da waɗanda suke cikin Nilu.”
10 १० फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशा प्रकारे तुम्हास समजेल की आमच्या परमेश्वरासारखा कोणीच देव नाही.
Fir’auna ya ce, “Gobe.” Musa ya amsa, “Za a yi kamar yadda ka faɗa, domin ka sani babu wani kamar Ubangiji, Allahnmu.
11 ११ बेडूक तुम्हापासून, तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक यांच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”
Kwaɗin za su bar ka da gidajenka, bayinka da mutanenka; za su kasance a Nilu ne kaɗai.”
12 १२ मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वरास प्रार्थना केली.
Bayan Musa da Haruna sun bar Fir’auna, Sai Musa ya yi kuka ga Ubangiji saboda kwaɗin da ya kawo a bisa Fir’auna.
13 १३ मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मरून गेले.
Sai Ubangiji ya yi abin da Musa ya nema. Kwaɗin suka mutu a gidaje, da filaye, da kuma gonaki.
14 १४ लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला.
Aka jibga su tsibi-tsibi, ƙasar ta yi ɗoyi saboda su.
15 १५ बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
Amma da Fir’auna ya ga an sami sauƙi, sai ya taurare, ya ƙi yă saurari Musa da Haruna kamar dai yadda Ubangiji ya riga ya faɗa.
16 १६ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”
Sa’an nan Ubangiji ya ce wa Musa, “Ka ce wa Haruna, ‘Miƙa hannunka ka bugi ƙurar ƙasa,’ dukan ƙurar ƙasar Masar kuwa za tă zama ƙwari masu cizo.”
17 १७ त्याने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगळ्या मिसर देशात धुळीच्या उवाच उवा बनल्या; त्या पशूंवर व मनुष्यांवर चढल्या.
Suka yi haka, da Haruna ya miƙa hannunsa da sandan, ya bugi ƙurar ƙasa, sai ƙwari masu cizo suka fito a kan mutane da dabbobi. Dukan ƙurar, ko’ina a ƙasar Masar ta zama cinnaku.
18 १८ जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना धुळीतून उवा बनविता आल्या नाहीत; पशू व मनुष्य उवांनी भरून गेले.
Sa’ad da bokayen Fir’auna suka yi ƙoƙari yin sihiri iri na rufe ido domin su fito da kwari, sai suka kāsa. Ƙwari masu cizo kuwa suka rufe mutane da dabbobi.
19 १९ तेव्हा जादूगारांनी फारोला सांगितले की, “यामध्ये देवाचा हात आहे.” परंतु फारोने मन कठीण केले व त्यांने त्यांचे ऐकायचे नाकारले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच तसे झाले.
Sai bokaye suka ce wa Fir’auna, “Wannan fa da hannun Allah a ciki.” Amma zuciyar Fir’auna ta taurare, bai kuwa saurara ba, kamar dai yadda Ubangiji ya riga ya faɗa.
20 २० मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्यापुढे उभा राहा. त्यास असे सांग की परमेश्वर म्हणतो, माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांस जाऊ दे.
Sai Ubangiji ya ce wa Musa, “Ka tashi da sassafe ka sadu da Fir’auna a lokacin da za shi kogi, ka ce masa, ‘Ga abin da Ubangiji yana cewa, bari mutanena su tafi, don su yi mini sujada.
21 २१ जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील.
In ba ka bar mutanena suka tafi ba, zan turo da tarin ƙuda a kanka da bayinka, a kan mutanenka da cikin gidajenka. Gidajen Masarawa za su cika da ƙudaje, har ma da ƙasa inda za su taka.
22 २२ तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात, तो मी त्या दिवशी वेगळा करीन, तेथे गोमाश्यांचे थवे जाणार नाहीत. यावरुन पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे हे तुला समजेल.
“‘Amma zan keɓe yankin Goshen, inda mutanena suke don kada ƙudaje su taɓa wurin, domin ka sani cewa Ni, Ubangiji, ina cikin wannan ƙasa.
23 २३ तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन. उद्या हा चमत्कार होईल.”
Zan sa iyaka tsakanin jama’ata da jama’arka. Gobe ne wannan mu’ujiza za tă auku.’”
24 २४ अशा रीतीने परमेश्वराने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या घरात व त्याच्या सेवकांच्या घरात व सगळ्या मिसर देशात गोमाशाचे थवेच्या थवे आले. गोमाश्यांच्या या थव्यांनी मिसर देशाची नासाडी केली.
Ubangiji kuwa ya yi haka. Tarin ƙuda suka zubo a fadar Fir’auna da cikin gidajen bayinsa, da ko’ina a Masar, ƙasar kuwa ta lalace saboda ƙudaje.
25 २५ म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”
Sai Fir’auna ya kira Musa da Haruna ya ce, “Ku tafi, ku miƙa hadaya ga Allahnku, a nan a cikin ƙasar.”
26 २६ परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही, कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसरी लोकांच्या दृष्टीने किळसवाणा असेल, त्यामुळे आम्ही तो मिसरी लोकांसमोर केला तर ते आम्हांवर दगडफेक करायचे नाहीत काय?
Amma Musa ya ce, “Wannan ba zai yiwu ba. Hadayun da mukan miƙa wa Ubangiji, Allahnmu haram ne ga Masarawa. In kuwa muka miƙa hadayun da suke haram a idanunsu, ba za su jajjefe mu ba?
27 २७ तर आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला सांगेल त्याप्रमाणे त्यास यज्ञ करू.”
Dole mu yi tafiya kwana uku cikin hamada domin miƙa hadayu ga Ubangiji Allahnmu, yadda ya umarce mu.”
28 २८ तेव्हा फारो म्हणाला, “मी तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरिता रानात जाऊ देण्याची परवानगी देतो. पण तुम्ही फार दूर जाऊ नका. माझ्यासाठी प्रार्थना करा.”
Fir’auna ya ce, “Zan bar ku ku tafi, don ku miƙa hadayu ga Ubangiji Allahnku, a cikin hamada, amma ba za ku tafi da nisa ba. Yanzu ku yi mini addu’a.”
29 २९ मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वांपासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वरास विनंती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांस तुम्ही पुन्हा फसवू नये.”
Musa ya amsa, “Da zarar na bar ka, zan yi addu’a ga Ubangiji, gobe kuwa ƙudaje za su bar Fir’auna da fadawansa da kuma mutanensa. Sai dai a tabbata Fir’auna bai sāke yin ruɗi ta wurin ƙin barin mutane su tafi su miƙa hadayu ga Ubangiji ba.”
30 ३० तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
Sa’an nan Musa ya rabu da Fir’auna, ya kuma yi addu’a ga Ubangiji,
31 ३१ या प्रकारे परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो, त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशाचे थवे दूर केले. तेथे एकही गोमाशी राहिली नाही.
Ubangiji kuwa ya yi abin da Musa ya roƙa. Ƙudaje suka rabu da Fir’auna da fadawansa da kuma mutanensa; ba ƙudan da ya rage.
32 ३२ परंतु फारोने पुन्हा आपले मन कठोर केले आणि त्याने इस्राएली लोकांस जाऊ दिले नाही.
Amma a wannan lokaci ma, Fir’auna ya taurare zuciyarsa, bai kuma bar mutanen suka tafi ba.