< निर्गम 7 >
1 १ परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी तुला फारोच्या नजरेत देवासमान महान करतो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;
耶和华对摩西说:“我使你在法老面前代替 神,你的哥哥亚伦是替你说话的。
2 २ ज्या आज्ञा मी तुला करीन त्या सर्व तू अहरोनाला सांग; मग तू इस्राएल लोकांस हा देश सोडून जाऊ दे, असे तू फारोला सांग.
凡我所吩咐你的,你都要说。你的哥哥亚伦要对法老说,容以色列人出他的地。
3 ३ परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसर देशामध्ये आपल्या सामर्थ्याची अनेक चिन्हे व अनेक आश्चर्ये दाखवीन.
我要使法老的心刚硬,也要在埃及地多行神迹奇事。
4 ४ तरीही फारो तुमचे काही ऐकणार नाही. तेव्हा मग मी आपला हात मिसरावर चालवीन आणि त्यास जबर शिक्षा करून मी आपली सेना, माझे लोक, इस्राएल वंशज यांना मिसर देशातून काढून आणीन.
但法老必不听你们;我要伸手重重地刑罚埃及,将我的军队以色列民从埃及地领出来。
5 ५ आणि मिसरावर मी हात उगारून त्यांच्यातून इस्राएली लोकांस काढून आणीन, तेव्हा मिसऱ्यांना कळेल की मी परमेश्वर आहे.”
我伸手攻击埃及,将以色列人从他们中间领出来的时候,埃及人就要知道我是耶和华。”
6 ६ मग मोशे व अहरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले.
摩西、亚伦这样行;耶和华怎样吩咐他们,他们就照样行了。
7 ७ ते फारोबरोबर बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता.
摩西、亚伦与法老说话的时候,摩西八十岁,亚伦八十三岁。
8 ८ नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
耶和华晓谕摩西、亚伦说:
9 ९ “फारो तुम्हास एखादा चमत्कार दाखविण्याविषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी फारोच्या देखत जमिनीवर टाकावयास सांग म्हणजे तिचा साप होईल.”
“法老若对你们说:‘你们行件奇事吧!’你就吩咐亚伦说:‘把杖丢在法老面前,使杖变作蛇。’”
10 १० तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला.
摩西、亚伦进去见法老,就照耶和华所吩咐的行。亚伦把杖丢在法老和臣仆面前,杖就变作蛇。
11 ११ तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसाच प्रकार केला.
于是法老召了博士和术士来;他们是埃及行法术的,也用邪术照样而行。
12 १२ त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले, परंतु अहरोनाच्या काठीने त्यांचे साप गिळून टाकले.
他们各人丢下自己的杖,杖就变作蛇;但亚伦的杖吞了他们的杖。
13 १३ तरी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
法老心里刚硬,不肯听从摩西、亚伦,正如耶和华所说的。
14 १४ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांस जाऊ देत नाही.
耶和华对摩西说:“法老心里固执,不肯容百姓去。
15 १५ उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नदीच्या काठी त्यास भेटण्यास उभा राहा.
明日早晨,他出来往水边去,你要往河边迎接他,手里要拿着那变过蛇的杖,
16 १६ त्यास असे सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांस त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, पण आतापर्यंत तू ऐकले नाहीस.
对他说:‘耶和华—希伯来人的 神打发我来见你,说:容我的百姓去,好在旷野事奉我。到如今你还是不听。
17 १७ परमेश्वर म्हणतो, की मी परमेश्वर आहे हे त्यास यावरुन कळेल: मी नदीच्या पाण्यावर माझ्या हातातील काठीने मारीन तेव्हा त्याचे रक्त होईल.
耶和华这样说:我要用我手里的杖击打河中的水,水就变作血;因此,你必知道我是耶和华。
18 १८ मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.
河里的鱼必死,河也要腥臭,埃及人就要厌恶吃这河里的水。’”
19 १९ परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनाला सांग की, आपली काठी घेऊन मिसर देशामधील नद्यांवर, नाल्यावर, त्यांच्या तलावावर व त्यांच्या सर्व पाण्याच्या तळ्यावर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात रक्तच रक्त होईल.”
耶和华晓谕摩西说:“你对亚伦说:‘把你的杖伸在埃及所有的水以上,就是在他们的江、河、池、塘以上,叫水都变作血。在埃及遍地,无论在木器中,石器中,都必有血。’”
20 २० तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उचलून फारोच्या व त्याच्या अधिकाऱ्यासमोर पाण्यावर मारली. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले.
摩西、亚伦就照耶和华所吩咐的行。亚伦在法老和臣仆眼前举杖击打河里的水,河里的水都变作血了。
21 २१ नदीतले मासे मरण पावले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसरी लोकांस नदीतील पाणी पिववेना. अवघ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले.
河里的鱼死了,河也腥臭了,埃及人就不能吃这河里的水;埃及遍地都有了血。
22 २२ तेव्हा मिसराच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले.
埃及行法术的,也用邪术照样而行。法老心里刚硬,不肯听摩西、亚伦,正如耶和华所说的。
23 २३ नंतर फारो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला. त्याने याकडे लक्ष देखील दिले नाही.
法老转身进宫,也不把这事放在心上。
24 २४ मिसराच्या लोकांस नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.
埃及人都在河的两边挖地,要得水喝,因为他们不能喝这河里的水。
25 २५ परमेश्वराने नदीला दिलेल्या तडाख्याला सात दिवस होऊन गेले.
耶和华击打河以后满了七天。