< निर्गम 5 >

1 या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”
After these things Moses and Aaron went in, and said to Pharao: Thus saith the Lord God of Israel: Let my people go that they may sacrifice to me in the desert.
2 फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही. म्हणून इस्राएलाला मी जाऊ देणार नाही.”
But he answered: Who is the Lord, that I should hear his voice, and let Israel go? I know not the Lord, neither will I let Israel go.
3 मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हांशी बोलला आहे. म्हणून आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर याल यज्ञार्पण करू द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.”
And they said: The God of the Hebrews hath called us, to go three days’ journey into the wilderness and to sacrifice to the Lord our God: lest a pestilence or the sword fall upon us.
4 परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा.
The king of Egypt said to them: Why do you Moses and Aaron draw off the people from their works? Get you gone to your burdens.
5 फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.”
And Pharao said: The people of the land is numerous: you see that the multitude is increased: how much more if you give them rest from their works?
6 त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
Therefore he commanded the same day the overseers of the works, and the taskmasters of the people, saying:
7 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा.
You shall give straw no more to the people to make brick, as before: but let them go and gather straw.
8 तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.
And you shall lay upon them the task of bricks, which they did before, neither shall you diminish any thing thereof: for they are idle, and therefore they cry, saying: Let us go and sacrifice to our God.
9 तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
Let them be oppressed, with works, and let them fulfill them: that they may not regard lying words.
10 १० म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हास विटा बनवण्यासाठी लागणारे गवत देणार नाही.
And the overseers of the works and the taskmasters went out and said to the people: Thus saith Pharao, I allow you no straw:
11 ११ तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत: च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.”
Go, and gather it where you can find it: neither shall any thing of your work be diminished.
12 १२ म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले.
And the people was scattered through all the land of Egypt to gather straw.
13 १३ त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावत.
And the overseers of the works pressed them, saying: Fulfill your work every day as before you were wont to do when straw was given you.
14 १४ मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही?”
And they that were over the works of the children of Israel were scourged by Pharao’s taskmasters, saying: Why have you not made up the task of bricks both yesterday and today as before?
15 १५ मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशा प्रकारे का वागत आहा?
And the officers of the children of Israel came, and cried out to Pharao, saying: Why dealest thou so with thy servants?
16 १६ तुम्ही आम्हांला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता, आणि आता आपल्या दासांना मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.”
Straw is not given us, and bricks are required of us as before: behold we thy servants are beaten with whips, and thy people is unjustly dealt withal.
17 १७ फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला परमेश्वरास यज्ञ करायला जाऊ देण्याची परवानगी दे.
And he said: You are idle, and therefore you say: Let us go and sacrifice to the Lord.
18 १८ आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हास गवत काही मिळायचे नाही, परंतु पूर्वीप्रमानेच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.
Go therefore, and work: straw shall not be given you, and you shall deliver the accustomed number of bricks.
19 १९ आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.”
And the officers of the children of Israel saw that they were in evil case, because it was said to them: There shall not a whit be diminished of the bricks for every day.
20 २० फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले;
And they met Moses and Aaron, who stood over against them as they came out from Pharao:
21 २१ तेव्हा ते मोशे व अहरोन ह्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो. कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हांला अपमानकारक केले आहे. आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे.”
And they said to them: The Lord see and judge, because you have made our savour to stink before Pharao and his servants, and you have given him a sword to kill us.
22 २२ मग मोशेने परमेश्वराकडे परत जाऊन प्रार्थना करून म्हटले, “प्रभू, तू या लोकांस का त्रास देत आहेस? पहिली गोष्ट म्हणजे तू मला का पाठवलेस?
And Moses returned to the Lord, and said: Lord, why hast thou afflicted this people? wherefore hast thou sent me?
23 २३ मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाहीस.”
For since the time that I went in to Pharao to speak in thy name, he hath afflicted thy people: and thou hast not delivered them.

< निर्गम 5 >