< निर्गम 39 >
1 १ परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली.
Men af det gula silket, skarlakanet och rosenrödt, gjorde de Aaron ämbetskläder, till att tjena i helgedomenom; såsom Herren hade budit Mose.
2 २ त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.
Och han gjorde lifkjortelen af guld, gult silke, skarlakan, rosenrödt, och tvinnadt hvitt silke;
3 ३ त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतामध्ये व कातलेल्या तलम सणाच्या कापडामध्ये भरली.
Och utslog guldet, och skar det i trådar, så att man kunde konsteliga virka det in med det gula silket, skarlakan, rosenrödt, och hvita silket;
4 ४ त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या.
Och gjorde så, att man sammanfogade honom på båda axlar, och band honom tillhopa på båda sidor.
5 ५ एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
Och bältet var af samma konst och verk, af guld, gult silke, skarlakan, rosenrödt, och tvinnadt hvitt silke; såsom Herren hade budit Mose.
6 ६ मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवली.
Och de tillredde två onichinerstenar, omfattade i guld; utgrafna af stensnidare med Israels barnas namn;
7 ७ इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
Och fäste dem på axlarna af lifkjortelen, att de skulle vara åminnelsestenar till Israels barn; såsom Herren Mose budit hade.
8 ८ त्यांने कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट बनवून घेलता.
Och de gjorde skölden efter den konst och verk, som lifkjortelen var, af guld, gult silke, skarlakan, rosenrödt, och tvinnadt hvitt silke;
9 ९ तो ऊरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला; तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता.
Så att han var fyrakant och tvefald, en hand lång och bred;
10 १० त्यामध्ये रत्नांच्या चार रांगा बसविल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
Och fyllde honom med fyra radar stenar. Den första raden var en sarder, topaz och smaragd;
11 ११ दुसऱ्या रांगेत पाचू इंद्रनीलमणी व हिरा;
Den andra, en rubin, saphir och diamant;
12 १२ तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
Den tredje, en lyncurer, achat och amethist;
13 १३ आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली.
Den fjerde, en turkos, onicher och jaspis; omfattade i guld i alla radarna.
14 १४ इस्राएलाच्या पुत्रांसाठी एक याप्रमाणे ती बारा रत्ने ऊरपटावर होती. त्यांच्या बारा वंशांच्या संख्येइतकी बारा नावे होती. एकेका रत्नावर एकेका मुलाचे नाव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.
Och stenarna stodo grafne af stensnidarena, efter de tolf Israels barnas namn; hvardera af sitt namn, efter de tolf slägten.
15 १५ दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या त्यांनी ऊरपटावर लावल्या.
Och de gjorde till skölden kedjor uppåt af klart guld;
16 १६ सोन्याची दोन जाळीदार कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या.
Och tu gyldene spänner, och två gyldene ringar; och fäste de två ringar vid tu hörnen af skölden.
17 १७ ऊरपटाच्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या.
Och de två gyldene kedjorna satte de uti de två ringar på hörnen af skölden.
18 १८ पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या.
Men de två ändar af de gyldene kedjor läto de komma intill de tu spännen; och hakade dem intill hörnen af lifkjortelen tvärtemot hvartannat;
19 १९ सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या.
Och gjorde två andra gyldene ringar, och knäppte dem vid de andra tu hörnen af skölden nedantill, så att han låg hardt inpå lifkjortelen;
20 २० सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या.
Och gjorde två andra gyldene ringar; dem gjorde de på tu hörnen nedantill på lifkjortelen, tvärtemot hvarannan, der lifkjortelen nedantill sammangår.
21 २१ त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो ऊरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
Och vardt skölden med sina ringar knäppt intill lifkjortelens ringar med ett gult snöre, så att det låg hardt intill lifkjortelen, och icke for löst ifrå lifkjortelen; såsom Herren hade budit Mose.
22 २२ नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला.
Och han gjorde silkeskjortelen under lifkjortelen, den all virkad var med gult silke;
23 २३ त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला.
Och hans hufvudsmog midt ofvanuppå, och en borda omkring hufvudsmoget fållad, att det icke skulle gå sönder.
24 २४ मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळिंबे काढली.
Och de gjorde på hans fåll granatäple af gult silke, skarlakan, rosenrödt, och tvinnadt hvitt silke:
25 २५ नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेराभोवती दोन दोन डाळिंबाच्यामध्ये लावली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरु मग डाळिंब, पुन्हा घुंगरू मग डाळिंब याप्रमाणे दोन डाळिंबामध्ये एक घुंगरु अशी ती झाली;
Och gjorde bjellror af klart guld; dem satte de emellan de granatäplen allt omkring på fållen af den silkeskjortelen;
26 २६ सेवा करते वेळी अंगी घालायच्या झगाच्या घेराच्या काठावर सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब व एक घुंगरू व एक डाळिंब असे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे तसेच त्यांनी हे केले.
Ju ett granatäple, och en bjellra allt omkring, till att tjena deruti; såsom Herren hade budit Mose;
27 २७ अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे केले.
Och gjorde desslikes den trånga kjortelen, virkad af hvitt silke, till Aaron och hans söner;
28 २८ आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व कातलेल्या सणाचे चोळणे केले.
Och hatten af hvitt silke, och sköna hufvor af hvitt silke, och nederklädet af tvinnadt hvitt linne;
29 २९ मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
Och det stickade bältet af tvinnadt hvitt silke, gult silke, skarlakan, rosenrödt; såsom Herren hade budit Mose.
30 ३० मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरली.
De gjorde ock ännespannet på den helga kronona af klart guld, och grofvo skrift deruppå: Herrans HELIGHET;
31 ३१ ती मंदिलाभोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
Och bundo ett gult snöre dervid, att det måtte knäppas ofvanpå hatten; såsom Herren hade budit Mose.
32 ३२ अशा प्रकारे पवित्र निवासमंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
Alltså vardt fullbordadt hela verket till vittnesbördsens tabernakels boning. Och Israels barn gjorde allt det Herren hade budit Mose;
33 ३३ मग त्यांनी तो निवासमंडप मोशेकडे आणला. तंबू व तंबूच्या सर्व वस्तू म्हणजे आकड्या, फळ्या, अडसर, खांब, खांबाच्या उथळ्या;
Och hade boningen till Mose, tabernaklet och all dess redskap, spänner, bräder, skottstänger, stolpar, fötter;
34 ३४ आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी व अंतरपट;
Täckelset af rödlett vädurskinn; täckelset af tackskinn, och förlåten;
35 ३५ साक्षपटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन
Vittnesbördsens ark med sina stänger; nådastolen;
36 ३६ मेज, त्यावरील सर्व वस्तू व पवित्र समक्षतेची भाकर;
Bordet med all dess redskap, och skådobröden;
37 ३७ शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल;
Den sköna ljusastakan, tillreddan med lamporna, och all sin redskap, och oljo till lysning;
38 ३८ सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा;
Gyldene altaret och smörjelsen, och godt rökverk; klädet i tabernaklets dörr;
39 ३९ पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक:
Kopparaltaret och dess koppargallrar, med sina stänger, och all sin redskap; tvättekaret med sin fot;
40 ४० अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या उथळ्या, अंगणाच्या प्रवेशदाराचा पडदा, तणावे, मेखा व पवित्र निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य;
Bonaden till gården med sina stolpar och fötter, klädet till ingången åt gårdenom med sin tåg och pålar, och all redskap som behöfdes till boningenes tjenst, vittnesbördsens tabernakels;
41 ४१ पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली;
Aarons Prestens ämbetskläder till att tjena i helgedomenom; och hans söners kläder, till att de skulle göra Prestaämbetet.
42 ४२ परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.
All ting, såsom Herren hade budit Mose, gjorde Israels barn till alla denna tjenstena.
43 ४३ लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
Och Mose såg på allt detta verket, att de gjorde såsom Herren budit hade, och välsignade dem.