< निर्गम 39 >

1 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली.
A od porfire i skerleta i crvca naèiniše haljine za službu, da se služi u svetinji; i naèiniše svete haljine Aronu, kao što bješe zapovjedio Gospod Mojsiju.
2 त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.
Naèiniše opleæak od zlata, i od porfire i od skerleta i od crvca i od tankoga platna uzvedenoga.
3 त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतामध्ये व कातलेल्या तलम सणाच्या कापडामध्ये भरली.
Istegliše listove od zlata, i isjekoše žice, te izvezoše porfiru i skerlet i crvac i tanko platno vrlo vješto.
4 त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या.
Poramenice mu naèiniše da se sastavljaju, da se sastavlja na dva kraja svoja.
5 एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
I pojas na opleæku izlažaše od njega i bješe iste naprave, od zlata i od porfire i od skerleta i od crvca i od tankoga platna uzvedenoga, kao što bješe zapovjedio Gospod Mojsiju.
6 मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवली.
I ukovaše dva kamena oniha u zlato, i izrezaše na njima imena sinova Izrailjevih, kao što se režu peèati.
7 इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
I udariše ih na poramenice od opleæka, da budu kameni za spomen sinovima Izrailjevijem, kao što bješe zapovjedio Gospod Mojsiju.
8 त्यांने कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट बनवून घेलता.
I naèiniše naprsnik vrlo vješte naprave kao što je naprava u opleæka, od zlata i od porfire i od skerleta i od crvca i od tankoga platna uzvedenoga;
9 तो ऊरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला; तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता.
Èetvorouglast i dvostruk naèiniše naprsnik, u dužinu s pedi i u širinu s pedi, dvostruk.
10 १० त्यामध्ये रत्नांच्या चार रांगा बसविल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
I udariše po njemu èetiri reda kamenja; u prvom redu: sardonih, topaz i smaragad;
11 ११ दुसऱ्या रांगेत पाचू इंद्रनीलमणी व हिरा;
A u drugom redu: karbunkul, safir i dijamanat;
12 १२ तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
A u treæem redu: ligur, ahat i ametist;
13 १३ आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली.
A u èetvrtom redu: hrisolit, onih i jaspid, sve optoèeno zlatom u svojim redovima.
14 १४ इस्राएलाच्या पुत्रांसाठी एक याप्रमाणे ती बारा रत्ने ऊरपटावर होती. त्यांच्या बारा वंशांच्या संख्येइतकी बारा नावे होती. एकेका रत्नावर एकेका मुलाचे नाव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.
Tijeh kamena s imenima sinova Izrailjevijeh bješe dvanaest prema njihovijem imenima, rezani kao peèati, za dvanaest plemena, svako po svom imenu.
15 १५ दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या त्यांनी ऊरपटावर लावल्या.
I naèiniše na naprsnik lance jednake, pletene, od èistoga zlata.
16 १६ सोन्याची दोन जाळीदार कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या.
I naèiniše dvije kopèe zlatne i dvije grivne zlatne, i metnuše te dvije grivne na dva kraja naprsniku,
17 १७ ऊरपटाच्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या.
I provukoše dva zlatna lanca kroz dvije grivne na krajevima naprsniku,
18 १८ पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या.
A druga dva kraja od dva lanca zapeše za dvije kopèe, i pritvrdiše ih za poramenice na opleæku sprijed.
19 १९ सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या.
I naèiniše još dvije zlatne grivne, i metnuše ih na dva kraja naprsniku na strani prema opleæku iznutra.
20 २० सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या.
I naèiniše još dvije grivne zlatne, koje metnuše na dvije poramenice na opleæku ozdo naprijed gdje se sastavlja, više pojasa na opleæku.
21 २१ त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो ऊरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
Tako privezaše naprsnik kroz grivne na njemu i grivne na opleæku vrvcom od porfire, da stoji svrh pojasa od opleæka i da se ne razdvaja naprsnik od opleæka, kao što bješe zapovjedio Gospod Mojsiju.
22 २२ नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला.
I naèiniše plašt pod opleæak, tkan, sav od porfire.
23 २३ त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला.
I prorez na plaštu u srijedi kao prorez na oklopu, i oko proreza oplatu da se ne razdre.
24 २४ मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळिंबे काढली.
I naèiniše po skutu od plašta šipke od porfire i od skerleta i od crvca i od tankoga platna uzvedenoga.
25 २५ नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेराभोवती दोन दोन डाळिंबाच्यामध्ये लावली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरु मग डाळिंब, पुन्हा घुंगरू मग डाळिंब याप्रमाणे दोन डाळिंबामध्ये एक घुंगरु अशी ती झाली;
I naèiniše zvonca od èistoga zlata, i metnuše zvonca meðu šipke, po skutu od plašta unaokolo izmeðu šipaka.
26 २६ सेवा करते वेळी अंगी घालायच्या झगाच्या घेराच्या काठावर सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब व एक घुंगरू व एक डाळिंब असे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे तसेच त्यांनी हे केले.
Zvonce pa šipak, zvonce pa šipak po skutu od plašta unaokolo, za službu, kao što bješe zapovjedio Gospod Mojsiju.
27 २७ अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे केले.
I naèiniše košulje od tankoga platna izmetanoga Aronu i sinovima njegovijem;
28 २८ आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व कातलेल्या सणाचे चोळणे केले.
I kapu od tankoga platna, i kapice kiæene od tankoga platna, i gaæe platnene od tankoga platna uzvedenoga;
29 २९ मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
I pojas od tankoga platna uzvedenoga i od porfire i od skerleta i od crvca, vezen, kao što bješe zapovjedio Gospod Mojsiju.
30 ३० मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरली.
I naèiniše ploèicu za sveto oglavlje od èistoga zlata, i napisaše na njoj pismom kako se reže na peèatima: svetinja Gospodu.
31 ३१ ती मंदिलाभोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
I pritvrdiše za nju vrvcu od porfire da se veže za kapu ozgo, kao što bješe zapovjedio Gospod Mojsiju.
32 ३२ अशा प्रकारे पवित्र निवासमंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
I tako se svrši sav posao oko šatora i naslona od sastanka. I naèiniše sinovi Izrailjevi sve; kako bješe zapovjedio Gospod Mojsiju, tako naèiniše.
33 ३३ मग त्यांनी तो निवासमंडप मोशेकडे आणला. तंबू व तंबूच्या सर्व वस्तू म्हणजे आकड्या, फळ्या, अडसर, खांब, खांबाच्या उथळ्या;
I donesoše k Mojsiju šator, naslon i sve sprave njegove, kuke, daske, prijevornice, stupove i stopice,
34 ३४ आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी व अंतरपट;
I pokrivaè od koža ovnujskih crvenih obojenih i pokrivaè od koža jazavèijih, i zavjes,
35 ३५ साक्षपटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन
I kovèeg od svjedoèanstva i poluge za nj, i zaklopac,
36 ३६ मेज, त्यावरील सर्व वस्तू व पवित्र समक्षतेची भाकर;
Sto sa svijem spravama, i hljeb za postavljanje,
37 ३७ शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल;
Svijetnjak èisti, žiške njegove, žiške nareðane, i sve sprave njegove, i ulje za vidjelo.
38 ३८ सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा;
I oltar zlatni, i ulje pomazanja, i kad mirisni, i zavjes na vrata od šatora,
39 ३९ पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक:
Oltar mjedeni i rešetku mjedenu za nj, poluge njegove i sve sprave njegove, umivaonicu i podnožje njezino,
40 ४० अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या उथळ्या, अंगणाच्या प्रवेशदाराचा पडदा, तणावे, मेखा व पवित्र निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य;
Zavjese za trijem, stupove za njih i stopice njihove, i zavjes na vrata od trijema, uža njegova i kolje njegovo, i sve sprave za službu u šatoru, za šator od sastanka.
41 ४१ पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली;
Haljine za službu, da se služi u svetinji, haljine svete Aronu svešteniku i haljine sinovima njegovijem, da vrše službu sveštenièku.
42 ४२ परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.
Sve kako bješe zapovjedio Gospod Mojsiju, onako uradiše sinovi Izrailjevi sve ovo djelo.
43 ४३ लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
I pogleda Mojsije sve to djelo, i gle, naèiniše ga, kao što bješe zapovjedio Gospod, tako ga naèiniše; i blagoslovi ih Mojsije.

< निर्गम 39 >