< निर्गम 38 >

1 बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब व पाच हात रुंद व तीन हात उंच अशी केली.
Suka gina bagaden ƙona hadaya da itacen ƙirya, tsawonsa kamu biyar, fāɗinsa kamu biyar, murabba’i ke nan, tsayinsa kuwa kamu uku.
2 त्याने तिच्या चाऱ्ही कोपऱ्यास चार शिंगे बनवली, ती अंगचीच होती, त्याने ती पितळेने मढविली.
Suka yi ƙahoni a kusurwansa huɗu, ƙahonin da bagade a haɗe suke, suka kuma dalaye bagaden da tagulla.
3 त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली.
Da tagulla kuma ya yi duk kayayyakin bagaden, da kwanoni, da babban cokali, da daruna, da cokula masu yatsotsi, da farantan wuta.
4 त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली, ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली.
Suka yi wa bagaden raga, tagulla kuma don yă sa shi a tsakiya.
5 त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या;
Suka yi zubin zoban tagulla don riƙe sanduna a kusurwoyi huɗu na ragar tagullar.
6 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढवले.
Suka yi sanduna da itacen ƙirya, suka kuma dalaye su da tagulla.
7 वेदी उचलून नेण्याकरता तिच्या बाजूच्या कड्यांत त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूंना फळ्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली.
Suka sa sandunan a cikin zoban saboda su kasance a gefen bagade don ɗaukarsa, suka yi rami cikinsa.
8 दर्शनमंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.
Suka yi daro da gammonsa da tagulla daga madubai na mata masu yin aiki a ƙofar Tentin Sujada.
9 त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची लांबी शंभर हात होती.
Suka kuma yi filin Tentin Sujada. Suka yi labulanta na gefen kudu da lallausan lilin, tsawonsu kamu ɗari,
10 १० तिला वीस खांब असून त्या खांबासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
da sanduna ashirin da rammukan sandunan tagulla ashirin, da kuma ƙugiyoyin azurfa da maɗauri a kan sandunan.
11 ११ अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती व तिच्यासाठीही वीस पितळी उथळ्या असलेल्या वीस खांबावर ती आधारलेली होती; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
Tsawon labule na wajen gefen arewa kamu ɗari ne, yana kuma da sanduna guda ashirin da rammuka ashirin na tagulla, da ƙugiyoyin azurfa da maɗaurai a kan sandunan.
12 १२ अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याही होत्या; या खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;
Labule na gefen yamma kamu hamsin, da sanduna guda goma, da rammuka guda goma, da ƙugiyoyin azurfa da maɗaurai a kan sandunan.
13 १३ पूर्वेकडील बाजू पन्नास हात लांब होती;
A ƙarshen gefen gabas, wajen fitowar rana, shi ma fāɗinsa kamu hamsin ne.
14 १४ अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात होती; तिच्यासाठी तीन खांब व तीन उथळ्या होत्या;
Labule na gefe ɗaya na ƙofar, kamu goma sha biyar ne, da sanduna guda uku da rammukansu,
15 १५ आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या या बाजूला व त्या बाजूला पंधरा पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांना तीन तीन खांब व त्यांच्या उथळ्याही तीन तीन होत्या.
akwai labule mai kamu goma sha biyar a ɗayan gefen ƙofar shiga zuwa filin Tentin Sujada, da sanduna uku da rammuka uku.
16 १६ अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते.
An yi dukan labulan da suke kewaye da filin Tentin Sujada da lallausan zaren lilin.
17 १७ खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.
An yi rammukan sandunan da tagulla. An dalaye ƙugiyoyi da maɗauran da suke kan sandunan da azurfa; saboda haka dukan sandunan filin Tentin Sujada suna da maɗaurai na azurfa.
18 १८ अंगणाच्या फाटकाचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर वेलबुट्टीदार विणकाम केलेले होते; तो वीस हात लांब व पाच हात उंच होता; ही उंची अंगणाच्या पडद्या इतकी पाच हात असावी.
Aka yi wa labulen ƙofar filin Tentin Sujada ado na ɗinki da na shuɗi, da na shunayya, da na jan zare, da na lallausan lilin, aikin gwaninta. Tsawonsa kamu ashirin, kuma kamar yadda labulen filin Tentin Sujada suke, tsayinsa kamu biyar ne,
19 १९ तो पडदा पितळेच्या चार उथळ्या आणि चार खांबावर आधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनवलेल्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती.
da sanduna guda huɗu da rammuka guda huɗu na tagulla. Ƙugiyoyinsu da maɗauransu na azurfa ne, aka kuma dalaye bisansu da azurfa.
20 २० निवासमंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.
Aka yi dukan ƙarafan kafa tabanakul da kuma na kewayen filin Tentin Sujada da tagulla ne.
21 २१ निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाच्या ज्या वस्तू लेव्यांच्या सेवेकरीता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा पुत्र इथामार ह्याने केली ती ही;
Waɗannan su ne kayayyakin da aka yi amfani da su domin aikin tabanakul, da tabanakul na Shaida, waɗanda aka rubuta bisa ga umarnin Musa ta wurin Lawiyawa, a ƙarƙashin jagorancin Itamar ɗan Haruna, firist.
22 २२ ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहूदा वंशातील हुराचा नातू म्हणजे ऊरीचा पुत्र बसालेल याने बनवल्या;
(Bezalel ɗan Uri, ɗan Hur, na kabilar Yahuda, ya yi dukan abin da Ubangiji ya umarci Musa;
23 २३ तसेच त्यास मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढणारा होता.
tare da shi akwai Oholiyab ɗan Ahisamak, na kabilar Dan, shi gwani ne cikin aikin zāne-zāne, da ɗinki na shuɗi, da na shunayya, da na jan zare, da na lallausan lilin.)
24 २४ पवित्रस्थानाच्या सर्व कामाकरता अर्पण केलेले सोने सुमारे एकोणतीस किक्कार होते आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सातशे तीस शेकेल होते.
Jimillar zinariya daga hadaya ta kaɗawar da aka yi amfani da su domin aikin wuri mai tsarki ta kai talenti 29 da shekel 730, bisa ga ma’aunin shekel na tsattsarkan wuri.
25 २५ मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.
Azurfar da aka samu daga ƙidayar taron jama’a, talenti 100 ne, da shekel 1,775, bisa ga ma’aunin shekel na tsattsarkan wuri.
26 २६ वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येका मनुष्यामागे एक बेका चांदी म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.
Duk mutumin da ya shiga ƙirge daga mai shekaru ashirin zuwa gaba, ya ba da rabin shekel. Mazan da suka shiga ƙirge sun kai mutum 603,550.
27 २७ त्यांनी ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक उथळीसाठी प्रत्येकी एक किक्कार अशा शंभर किक्काराच्या शंभर उथळ्या बनविल्या.
An yi amfani da azurfa talenti 100 don yin rammuka na wuri mai tsarki, da kuma rammukan labule, rammuka 100 daga talenti 100, talenti ɗaya don rami ɗaya.
28 २८ बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी आकड्या, बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.
Suka yi amfani da shekel 1,775 don yin ƙugiyoyi saboda sanduna, suka dalaye bisan sandunan da maɗauransu.
29 २९ सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल अधिक पितळ अर्पण करण्यात आले होते.
Tagullar da aka bayar daga hadaya ta kaɗawa ya kai talenti 70 da shekel 2,400.
30 ३० त्या पितळेच्या दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील उथळ्या, वेदीची उपकरणे व तिची जाळी ह्यांकरता;
Suka yi amfani da shi don yin rammukan ƙofar Tentin Sujada, da bagaden tagulla tare da ragar tagulla da dukan kayayyakinsa,
31 ३१ त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या उथळ्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या उथळ्या, तसेच पवित्र निवासमंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.
da rammukan sanduna don kewaye filin, da waɗanda suke ƙofarsa, da dukan ƙarafan kafa tenti don tabanakul, da kuma don kewaye filin.

< निर्गम 38 >