< निर्गम 36 >

1 “परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्रस्थानाचे सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुध्दी व समज घातली आहे ते बसालेल व अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यानी हे बांधकाम करावे.”
Beseleel, therefore, and Ooliab, and every wise man, to whom the Lord gave wisdom and understanding, to know how to work artificially, made the things that are necessary for the uses of the sanctuary, and which the Lord commanded.
2 नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुध्दी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती, त्यांना मोशेने बोलावले.
And when Moses had called them, and every skillful man, to whom the Lord had given wisdom, and such as of their own accord had offered themselves to the making of the work,
3 आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जी एकंदर अर्पणे आणली होती ती त्यांनी मोशेच्या पुढून घेतली. लोकांनी रोज सकाळी आपली स्वखुशीची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेवला.
He delivered all the offerings of the children of Israel unto them. And while they were earnest about the work, the people daily in the morning offered their vows.
4 शेवटी मग सर्व बुध्दिमान पुरुष पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले.
Whereupon the workmen being constrained to come,
5 आणि ते मोशेला म्हणाले लोकांनी परमेश्वरासाठी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हांला या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!
Said to Moses: The people offereth more than is necessary.
6 तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम दिला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये,” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणण्यास बंदी घालण्यात आली.
Moses therefore commanded proclamation to be made by the crier’s voice: Let neither man nor woman offer any more for the work of the sanctuary. And so they ceased from offering gifts,
7 त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती.
Because the things that were offered did suffice, and were too much.
8 मग त्या कसबी कारागिरांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनविला. त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी कुशल कारागिराकडून करुब काढले.
And all the men that were wise of heart, to accomplish the work of the tabernacle, made ten curtains of twisted fine linen, and violet, and purple, and scarlet twice dyed, with varied work, and the art of embroidering:
9 प्रत्येक पडद्याचे मोजमाप अठ्ठावीस हात लांब व रुंदी चार हात असे सारखेच होते.
The length of one curtain was twenty-eight cubits, and the breadth four: all the curtains were of the same size.
10 १० त्यांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे पाच पडदे जोडून दुसरा भाग असे केले.
And he joined five curtains, one to another, and the other five he coupled one to another.
11 ११ नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली.
He made also loops of violet in the edge of the curtain on both sides, and in the edge of the other curtain in like manner,
12 १२ त्यांनी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती.
That the loops might meet on against another, and might be joined each with the other.
13 १३ नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याचे पन्नास गोल आकडे बनविले; त्या आकड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वांचा मिळून अखंड पवित्र निवासमंडप तयार झाला.
Whereupon also he cast fifty rings of gold, that might catch the loops of the curtains, and they might be made one tabernacle.
14 १४ नंतर पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला.
He made also eleven curtains of goats’ hair, to cover the roof of the tabernacle:
15 १५ या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे ते तीस हात लांब व चार हात रुंद होते.
One curtain was thirty cubits long and four cubits broad: all the curtains were of one measure.
16 १६ त्या कारागिरांनी त्यांपैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला.
Five of which he joined apart, and the other six apart.
17 १७ नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली.
And he made fifty loops in the edge of one curtain, and fifty in the edge of another curtain, that they might be joined one to another.
18 १८ हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आकडे केले.
And fifty buckles of brass wherewith the roof might be knit together, that of all the curtains there might be made one covering.
19 १९ मग त्यांनी पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
He made also a cover for the tabernacle of rams’ skins dyed red: and another cover over that of violet skins.
20 २० पवित्र निवासमंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फळ्या तयार केल्या.
He made also the boards of the tabernacle of setim wood standing.
21 २१ प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद होती.
The length of one board was ten cubits: and the breadth was one cubit and a half.
22 २२ त्यांनी प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला दोन कुसे केली. त्यांनी निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या.
There were two mortises throughout every board, that one might be joined to the other. And in this manner he made for all the boards of the tabernacle.
23 २३ निवासमंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यांपैकी दक्षिण बाजूस लावण्यासाठी वीस फळ्या केल्या;
Of which twenty were at the south side southward,
24 २४ त्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या, एका फळीच्या खाली कुसासाठी दोन दोन उथळ्या त्यांनी केल्या.
With forty sockets of silver, two sockets were put under one board on the two sides of the corners, where the mortises of the sides end in the corners.
25 २५ त्याचप्रमाणे निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळ्या केल्या.
At that side also of the tabernacle, that looketh toward the north, he made twenty boards.
26 २६ त्यांनी त्याच्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या म्हणजे एकेका फळीच्या खाली दोन दोन उथळ्या.
With forty sockets of silver, two sockets for every board.
27 २७ निवासमंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फळ्या केल्या,
But against the west, to wit, at that side of the tabernacle, which looketh to the sea, he made six boards,
28 २८ आणि मागच्या बाजूस निवासमंडपाच्या कोपऱ्यासाठी दोन फळ्या त्यांनी केल्या.
And two others at each corner of the tabernacle behind:
29 २९ या फळ्या खालपासून दोन दोन असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जोडल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यांसाठी त्यांनी अशाच फळ्या केल्या.
Which were also joined from beneath unto the top, and went together into one joint. Thus he did on both sides at the corners:
30 ३० या प्रकारे आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या झाल्या. अर्थात एकेका फळीखाली दोन दोन उथळ्या होत्या.
So there were in all eight boards and they had sixteen sockets of silver, to wit, two sockets under every board.
31 ३१ त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले. निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,
He made also bars of setim wood, five to hold together the boards of one side of the tabernacle,
32 ३२ दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच;
And five others to join together the boards of the other side: and besides these, five other bars at the west side of the tabernacle towards the sea.
33 ३३ आणि त्यांनी फळ्याच्या मध्यभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचेल असा केला.
He made also another bar, that might come by the midst of the boards from corner to corner.
34 ३४ त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढवल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवल्या आणि अडसरही सोन्याने मढवले.
And the board works themselves he overlaid with gold, casting for them sockets of silver. And their rings he made of gold, through which the bars might be drawn: and he covered the bars themselves with plates of gold.
35 ३५ मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करुब काढले,
He made also a veil of violet, and purple, scarlet, and fine twisted linen, varied and distinguished with embroidery:
36 ३६ आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढवले; त्याच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्याच्यासाठी चांदीच्या चार उथळ्या ओतल्या.
And four pillars of setim wood, which with their heads be overlaid with gold, casting for them sockets of silver.
37 ३७ मग त्यांनी निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनवला.
He made also a hanging in the entry of the tabernacle of violet, purple, scarlet, and fine twisted linen, with the work of an embroiderer.
38 ३८ व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनवल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच उथळ्या बनवल्या.
And five pillars with their heads, which he covered with gold, and their sockets he cast of brass.

< निर्गम 36 >