< निर्गम 34 >
1 १ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या दोन पाट्यांप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार कर म्हणजे फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्याच्यावर लिहीन.
१फिर यहोवा ने मूसा से कहा, “पहली तख्तियों के समान पत्थर की दो और तख्तियाँ गढ़ ले; तब जो वचन उन पहली तख्तियों पर लिखे थे, जिन्हें तूने तोड़ डाला, वे ही वचन मैं उन तख्तियों पर भी लिखूँगा।
2 २ पहाटेस तयार हो व सीनाय पर्वतावर चढून ये आणि तेथे पर्वताच्या शिखरावर माझ्यासमोर हजर राहा.
२और सवेरे तैयार रहना, और भोर को सीनै पर्वत पर चढ़कर उसकी चोटी पर मेरे सामने खड़ा होना।
3 ३ तुझ्याबरोबर कोणी चढून वर येऊ नये पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी मनुष्य दिसू नये; तसेच शेरडेमेंढरे कळप व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या पायथ्याशी चरू देऊ नकोस.”
३तेरे संग कोई न चढ़ पाए, वरन् पर्वत भर पर कोई मनुष्य कहीं दिखाई न दे; और न भेड़-बकरी और गाय-बैल भी पर्वत के आगे चरने पाएँ।”
4 ४ तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार केल्या; सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सीनाय पर्वतावर चढून गेला;
४तब मूसा ने पहली तख्तियों के समान दो और तख्तियाँ गढ़ीं; और भोर को सवेरे उठकर अपने हाथ में पत्थर की वे दोनों तख्तियाँ लेकर यहोवा की आज्ञा के अनुसार पर्वत पर चढ़ गया।
5 ५ तेव्हा मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला; आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली.
५तब यहोवा ने बादल में उतरकर उसके संग वहाँ खड़ा होकर यहोवा नाम का प्रचार किया।
6 ६ परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,
६और यहोवा उसके सामने होकर यह प्रचार करता हुआ चला, “यहोवा, यहोवा, परमेश्वर दयालु और अनुग्रहकारी, कोप करने में धीरजवन्त, और अति करुणामय और सत्य,
7 ७ हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”
७हजारों पीढ़ियों तक निरन्तर करुणा करनेवाला, अधर्म और अपराध और पाप को क्षमा करनेवाला है, परन्तु दोषी को वह किसी प्रकार निर्दोष न ठहराएगा, वह पितरों के अधर्म का दण्ड उनके बेटों वरन् पोतों और परपोतों को भी देनेवाला है।”
8 ८ मग मोशेने ताबडतोब भूमीपर्यंत वाकून परमेश्वरास नमन केले.
८तब मूसा ने फुर्ती कर पृथ्वी की ओर झुककर दण्डवत् किया।
9 ९ मग तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी कृपादृष्टी जर माझ्यावर झाली असेल तर तू आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत हे मला माहीत आहे; तरी आमचा अन्याय व पाप यांची तू आम्हांला क्षमा कर आणि आपले वतन म्हणून आमचा स्वीकार कर.”
९और उसने कहा, “हे प्रभु, यदि तेरे अनुग्रह की दृष्टि मुझ पर हो तो प्रभु, हम लोगों के बीच में होकर चले, ये लोग हठीले तो हैं, तो भी हमारे अधर्म और पाप को क्षमा कर, और हमें अपना निज भाग मानकर ग्रहण कर।”
10 १० मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
१०उसने कहा, “सुन, मैं एक वाचा बाँधता हूँ। तेरे सब लोगों के सामने मैं ऐसे आश्चर्यकर्म करूँगा जैसा पृथ्वी पर और सब जातियों में कभी नहीं हुए; और वे सारे लोग जिनके बीच तू रहता है यहोवा के कार्य को देखेंगे; क्योंकि जो मैं तुम लोगों से करने पर हूँ वह भययोग्य काम है।
11 ११ मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी या लोकांस तुझ्यासमोरुन घालवून देतो.
११जो आज्ञा मैं आज तुम्हें देता हूँ उसे तुम लोग मानना। देखो, मैं तुम्हारे आगे से एमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिब्बी, और यबूसी लोगों को निकालता हूँ।
12 १२ सावध राहा, नाही तर तू ज्या देशात जात आहेस त्यामध्ये राहणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही प्रकारे करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.
१२इसलिए सावधान रहना कि जिस देश में तू जानेवाला है उसके निवासियों से वाचा न बाँधना; कहीं ऐसा न हो कि वह तेरे लिये फंदा ठहरे।
13 १३ परंतु त्यांच्या वेद्या पाडून टाक; त्यांचे स्तंभ तोडून टाक; त्यांच्या अशेरा मूर्ती फोडून टाक.
१३वरन् उनकी वेदियों को गिरा देना, उनकी लाठों को तोड़ डालना, और उनकी अशेरा नामक मूर्तियों को काट डालना;
14 १४ तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नये; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान असे आहे; तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.
१४क्योंकि तुम्हें किसी दूसरे को परमेश्वर करके दण्डवत् करने की आज्ञा नहीं, क्योंकि यहोवा जिसका नाम जलनशील है, वह जल उठनेवाला परमेश्वर है,
15 १५ तू सावध राहा. या देशातील रहिवाशाबरोबर कोणत्याही प्रकारचे करारमदार करू नको; ते व्यभिचारी मतीने आपल्या देवामागे लागून त्यांना बलिदान करतील. त्यातल्या कोणी तुला बोलावले असता तुम्ही त्यांच्या बलिदानातले काही खाल.
१५ऐसा न हो कि तू उस देश के निवासियों से वाचा बाँधे, और वे अपने देवताओं के पीछे होने का व्यभिचार करें, और उनके लिये बलिदान भी करें, और कोई तुझे नेवता दे और तू भी उसके बलिपशु का प्रसाद खाए,
16 १६ त्यांच्या कन्यांची तुम्ही आपल्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवड कराल; त्यांच्या कन्या व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्यामागे जातील आणि त्या तुमच्या पुत्रांना व्यभिचारी बुध्दीने त्यांच्या नादी लावतील.
१६और तू उनकी बेटियों को अपने बेटों के लिये लाए, और उनकी बेटियाँ जो आप अपने देवताओं के पीछे होने का व्यभिचार करती हैं तेरे बेटों से भी अपने देवताओं के पीछे होने को व्यभिचार करवाएँ।
17 १७ तू आपल्यासाठी ओतीव देव करू नको.
१७“तुम देवताओं की मूर्तियाँ ढालकर न बना लेना।
18 १८ बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात मिसर देशातून तू बाहेर निघालास.
१८“अख़मीरी रोटी का पर्व मानना। उसमें मेरी आज्ञा के अनुसार अबीब महीने के नियत समय पर सात दिन तक अख़मीरी रोटी खाया करना; क्योंकि तू मिस्र से अबीब महीने में निकल आया।
19 १९ प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नरवत्स माझे आहेत.
१९हर एक पहलौठा मेरा है; और क्या बछड़ा, क्या मेम्ना, तेरे पशुओं में से जो नर पहलौठे हों वे सब मेरे ही हैं।
20 २० गाढवीचे पहिले शिंगरु खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे, पण त्यास तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावा. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
२०और गदही के पहलौठे के बदले मेम्ना देकर उसको छुड़ाना, यदि तू उसे छुड़ाना न चाहे तो उसकी गर्दन तोड़ देना। परन्तु अपने सब पहलौठे बेटों को बदला देकर छुड़ाना। मुझे कोई खाली हाथ अपना मुँह न दिखाए।
21 २१ सहा दिवस तू आपले कामकाज कर, परंतु सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू विसावा घे.
२१“छः दिन तो परिश्रम करना, परन्तु सातवें दिन विश्राम करना; वरन् हल जोतने और लवने के समय में भी विश्राम करना।
22 २२ तू सप्ताहाचा, म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा.
२२और तू सप्ताहों का पर्व मानना जो पहले लवे हुए गेहूँ का पर्व कहलाता है, और वर्ष के अन्त में बटोरन का भी पर्व मानना।
23 २३ तुमच्या सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर रहावे.
२३वर्ष में तीन बार तेरे सब पुरुष इस्राएल के परमेश्वर प्रभु यहोवा को अपने मुँह दिखाएँ।
24 २४ मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन; मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन; आणि वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यामोर हजर राहायला जाशील त्या वेळी तुझ्या देशाचा कोणीही लोभ धरणार नाही.
२४मैं तो अन्यजातियों को तेरे आगे से निकालकर तेरी सीमाओं को बढ़ाऊँगा; और जब तू अपने परमेश्वर यहोवा को अपना मुँह दिखाने के लिये वर्ष में तीन बार आया करे, तब कोई तेरी भूमि का लालच न करेगा।
25 २५ माझ्या यज्ञबलीचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.
२५“मेरे बलिदान के लहू को ख़मीर सहित न चढ़ाना, और न फसह के पर्व के बलिदान में से कुछ सवेरे तक रहने देना।
26 २६ हंगामाच्या वेळी तुझ्या जमिनीच्या उत्पन्नातील प्रथम पिकाचा सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर, ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”
२६अपनी भूमि की पहली उपज का पहला भाग अपने परमेश्वर यहोवा के भवन में ले आना। बकरी के बच्चे को उसकी माँ के दूध में न पकाना।”
27 २७ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव, कारण याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.”
२७और यहोवा ने मूसा से कहा, “ये वचन लिख ले; क्योंकि इन्हीं वचनों के अनुसार मैं तेरे और इस्राएल के साथ वाचा बाँधता हूँ।”
28 २८ मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून ठेवल्या.
२८मूसा तो वहाँ यहोवा के संग चालीस दिन और रात रहा; और तब तक न तो उसने रोटी खाई और न पानी पिया। और उसने उन तख्तियों पर वाचा के वचन अर्थात् दस आज्ञाएँ लिख दीं।
29 २९ मग मोशे, साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्यास भान नव्हते.
२९जब मूसा साक्षी की दोनों तख्तियाँ हाथ में लिये हुए सीनै पर्वत से उतरा आता था तब यहोवा के साथ बातें करने के कारण उसके चेहरे से किरणें निकल रही थीं। परन्तु वह यह नहीं जानता था कि उसके चेहरे से किरणें निकल रही हैं।
30 ३० अहरोन व सर्व इस्राएल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्याजवळ जायला घाबरले;
३०जब हारून और सब इस्राएलियों ने मूसा को देखा कि उसके चेहरे से किरणें निकलती हैं, तब वे उसके पास जाने से डर गए।
31 ३१ परंतु मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्याना बोलावले, तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, तो त्यांच्याशी बोलू लागला.
३१तब मूसा ने उनको बुलाया; और हारून मण्डली के सारे प्रधानों समेत उसके पास आया, और मूसा उनसे बातें करने लगा।
32 ३२ त्यानंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही परमेश्वराने त्यास सीनाय पर्वतावर सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले.
३२इसके बाद सब इस्राएली पास आए, और जितनी आज्ञाएँ यहोवा ने सीनै पर्वत पर उसके साथ बात करने के समय दी थीं, वे सब उसने उन्हें बताईं।
33 ३३ लोकांशी आपले बोलणे संपविल्यावर मोशेने आपला चेहरा आच्छादनाने झाकला.
३३जब तक मूसा उनसे बात न कर चुका तब तक अपने मुँह पर ओढ़ना डाले रहा।
34 ३४ जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्यासमोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे; मग तो इस्राएल लोकांकडे बाहेर येऊन परमेश्वर जी काही आज्ञा देई ती तो त्यांना सांगत असे.
३४और जब जब मूसा भीतर यहोवा से बात करने को उसके सामने जाता तब-तब वह उस ओढ़नी को निकलते समय तक उतारे हुए रहता था; फिर बाहर आकर जो-जो आज्ञा उसे मिलती उन्हें इस्राएलियों से कह देता था।
35 ३५ मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे.
३५इस्राएली मूसा का चेहरा देखते थे कि उससे किरणें निकलती हैं; और जब तक वह यहोवा से बात करने को भीतर न जाता तब तक वह उस ओढ़नी को डाले रहता था।