< निर्गम 33 >
1 १ मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.
Og Herren talte til Moses: Dra nu bort herfra, både du og det folk som du har ført op fra Egyptens land, til det land jeg tilsvor Abraham, Isak og Jakob, da jeg sa: Din ætt vil jeg gi det;
2 २ तुमच्यापुढे चालण्यासाठी मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांस तेथून घालवून देईन.
og jeg vil sende en engel foran dig og drive ut kana'anittene, amorittene og hetittene og ferisittene og hevittene og jebusittene.
3 ३ दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशात तू जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हास नष्ट करीन.”
Dra op til et land som flyter med melk og honning; jeg vil ikke selv dra op med dig, fordi du er et hårdnakket folk; jeg vilde ellers komme til å ødelegge dig på veien.
4 ४ ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु: खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;
Da folket hørte denne hårde tale, sørget de, og ingen tok sine smykker på sig.
5 ५ कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हास भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.”
For Herren sa til Moses: Si til Israels barn: I er et hårdnakket folk; drog jeg endog bare et øieblikk op med dig, så måtte jeg ødelegge dig; men legg nu dine smykker av dig, så jeg kan vite hvad jeg skal gjøre med dig.
6 ६ म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागदागिन्यांवाचून राहिले.
Da tok Israels barn sine smykker av og bar dem ikke mere, efterat de hadde draget fra fjellet Horeb.
7 ७ मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शनमंडप असे नाव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई.
Men Moses tok et telt og slo det op utenfor leiren et godt stykke fra; han kalte det sammenkomstens telt, og enhver som søkte Herren, gikk ut til sammenkomstens telt utenfor leiren.
8 ८ ज्या वेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्या वेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्यास निरखून बघत.
Og hver gang Moses gikk ut til teltet, reiste hele folket sig, og de stod hver i døren til sitt telt og så efter Moses, til han var kommet inn i teltet.
9 ९ जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
Og når Moses var kommet inn i teltet, da senket skystøtten sig og stod i døren til teltet, og han talte med Moses.
10 १० जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
Og alt folket så skystøtten stå i døren til teltet, og alt folket reiste sig og bøide sig hver i døren til sitt telt.
11 ११ मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
Og Herren talte til Moses åsyn til åsyn, likesom en mann taler med sin næste. Så vendte han tilbake til leiren, men hans tjener Josva, Nuns sønn, en ung mann, vek ikke fra teltet.
12 १२ मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.
Og Moses sa til Herren: Se, du sier til mig: Før dette folk op! Men du har ikke latt mig vite hvem du vil sende med mig, enda du selv har sagt: Jeg kjenner dig ved navn, og du har funnet nåde for mine øine.
13 १३ आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.”
Dersom jeg nu har funnet nåde for dine øine, så la mig se din vei, så jeg kan kjenne dig og finne nåde for dine øine, og kom i hu at dette folk er ditt folk!
14 १४ परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.”
Da sa han: Mitt åsyn skal gå med, og jeg vil føre dig til hvile.
15 १५ मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस.
Men han sa til ham: Dersom ditt åsyn ikke går med, da la oss ikke dra op herfra!
16 १६ तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?”
Hvorav kan jeg da vite at jeg har funnet nåde for dine øine, jeg og ditt folk, medmindre du går med oss, så jeg og ditt folk blir æret fremfor alle folkeslag på jorden?
17 १७ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”
Da sa Herren til Moses: Også det du nu ber om, vil jeg gjøre; for du har funnet nåde for mine øine, og jeg kjenner dig ved navn.
18 १८ नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
Men han sa: La mig da få se din herlighet!
19 १९ मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन.
Og han sa: Jeg vil la all min godhet gå forbi ditt åsyn, og jeg vil rope ut Herrens navn for ditt åsyn; for jeg vil være nådig mot den som jeg er nådig imot, og miskunne mig over den som jeg miskunner mig over.
20 २० परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.”
Og han sa: Du kan ikke se mitt åsyn; for intet menneske kan se mig og leve.
21 २१ परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.
Derefter sa Herren: Se, her tett ved mig er et sted; still dig der på berget,
22 २२ माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन;
og når min herlighet går forbi, da vil jeg la dig stå i fjellkløften, og jeg vil dekke med min hånd over dig til jeg er gått forbi;
23 २३ नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.”
så vil jeg ta min hånd bort; da kan du se mig bakfra, men mitt åsyn kan ingen se.