< निर्गम 31 >

1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला
And Jehovah speaketh unto Moses, saying,
2 “पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे.
'See, I have called by name Bezaleel, son of Uri, son of Hur, of the tribe of Judah,
3 देवाच्या आत्म्याने त्यास परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्यास अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत.
and I fill him [with] the Spirit of God, in wisdom, and in understanding, and in knowledge, and in all work,
4 तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील.
to devise devices to work in gold, and in silver, and in brass,
5 तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील.
and in graving of stone for settings, and in graving of wood to work in all work.
6 त्याच्याबरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुध्दिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुध्दी ठेवली आहे. ती यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या.
'And I, lo, I have given with him Aholiab, son of Ahisamach, of the tribe of Dan, and in the heart of every wise-hearted one I have given wisdom, and they have made all that which I have commanded thee.
7 म्हणजे दर्शनमंडप, आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूच्या सर्व वस्तू;
'The tent of meeting, and the ark of testimony, and the mercy-seat which [is] on it, and all the vessels of the tent,
8 मेज व त्यावरील सर्व वस्तू, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची उपकरणे;
and the table and its vessels, and the pure candlestick and all its vessels, and the altar of the perfume,
9 होमवेदी व तिची उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक;
and the altar of the burnt-offering and all its vessels, and the laver and its base,
10 १० अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची, कुशलतेने विणलेली तलम व पवित्र वस्रे;
and the coloured garments, and the holy garments for Aaron the priest, and the garments of his sons, for acting as priests in;
11 ११ अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागीर तयार करतील.”
and the anointing oil, and the perfume of the spices for the sanctuary; according to all that I have commanded thee — they do.'
12 १२ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
And Jehovah speaketh unto Moses, saying,
13 १३ “इस्राएल लोकांस हे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण की पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की, तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.
'And thou, speak unto the sons of Israel, saying, Only, My sabbaths ye do keep, for it [is] a sign between Me and you, to your generations, to know that I, Jehovah, am sanctifying you;
14 १४ म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसास जर कोणी भ्रष्ट करील तर त्यास अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्यादिवशी काम करील, त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.
and ye have kept the sabbath, for it [is] holy to you, he who is polluting it is certainly put to death — for any who doeth work in it — that person hath even been cut off from the midst of his people.
15 १५ सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्यास अवश्य ठार मारावे.
'Six days is work done, and in the seventh day [is] a sabbath of holy rest to Jehovah; any who doeth work in the sabbath-day is certainly put to death,
16 १६ इस्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा.
and the sons of Israel have observed the sabbath; to keep the sabbath to their generations [is] a covenant age-during,
17 १७ शब्बाथ दिवस इस्राएल लोकांमध्ये व माझ्यामध्ये कायमची खूण आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी स्वस्थ राहून विसावा घेतला.”
between Me and the sons of Israel it [is] a sign — to the age; for six days Jehovah made the heavens and the earth, and in the seventh day He hath ceased, and is refreshed.'
18 १८ या प्रमाणे देवाने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन दगडी पाट्यांचे आज्ञापट त्यास दिले.
And He giveth unto Moses, when He finisheth speaking with him in mount Sinai, two tables of the testimony, tables of stone, written by the finger of God.

< निर्गम 31 >