1१तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर.
This chapter is missing in the source text.
2२ती चौरस असून एक हात लांब व एक हात रुंद असावी, आणि ती दोन हात उंच असावी; तिची शिंगे एकाच अखंड लाकडाची करावी.
3३वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
4४त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकीच्या विरूद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल.
5५हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत.
6६वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.
7७अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा;
8८पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळीत जावा.
9९तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये.
10१०अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे. ही वेदी परमेश्वराकरता परमपवित्र आहे.
12१२“तू इस्राएल लोकांची शिरगणती करशील तेव्हा गणनेवेळी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येक इस्राएलाने स्वत: च्या जिवाबद्दल परमेश्वरास खंड द्यावा;
13१३जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे.
14१४वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याची गणना होईल त्यातील प्रत्येकाने त्याने परमेश्वराकरता हे समर्पण करावे.
15१५तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत मनुष्याने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये;
16१६इस्राएल लोकांकडून प्रायश्चित्ताचा पैसा घ्यावा आणि त्याचा दर्शनमंडपामधील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्चित्त दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.”
18१८“पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हातपाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे.
19१९या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हातपाय धुवावेत;
20२०दर्शनमंडपामध्ये व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील.
21२१अहरोन व त्याचे वंशज ह्याच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.”
23२३“तू उत्तम प्रकारचे मसाले घे; म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, पाचशे शेकेल सुगंधी बच,
24२४आणि पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतूनाचे तेल घे,
25२५व त्याचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर;