< निर्गम 30 >
1 १ तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर.
“Napravi i žrtvenik za paljenje tamjana; napravi ga od bagremova drva.
2 २ ती चौरस असून एक हात लांब व एक हात रुंद असावी, आणि ती दोन हात उंच असावी; तिची शिंगे एकाच अखंड लाकडाची करावी.
Neka bude lakat dug, lakat širok, u pravokut, i dva lakta visok. Neka mu roščići budu od jednoga komada s njim.
3 ३ वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
Obloži mu u čisto zlato: njegovu gornju plohu, njegove strane naokolo i njegove roščiće. Načini mu zlatan završni pojas naokolo.
4 ४ त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकीच्या विरूद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल.
Načini mu dva zlatna koluta. Pričvrsti mu ih s dviju suprotnih strana ispod završnog pojasa. Kroz njih će se provlačiti motke za nošenje.
5 ५ हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत.
Motke načini od bagremova drva i zlatom ih obloži.
6 ६ वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.
Postavi žrtvenik pred zavjesu što zastire Kovčeg Svjedočanstva - nasuprot Pomirilištu nad Svjedočanstvom - gdje ću se ja s tobom sastajati.
7 ७ अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा;
Neka na njemu Aron pali miomirisni tamjan svako jutro kad priprema svjetla;
8 ८ पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळीत जावा.
neka ga Aron opet pali u suton kad svjetla zapaljuje, da to bude svagdašnje kadiono prinošenje pred Jahvom u sve vaše naraštaje.
9 ९ तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये.
Ne prinosi na njemu ni neposvećenoga tamjana, ni paljenice, ni prinosnice, ni ljevanice!
10 १० अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे. ही वेदी परमेश्वराकरता परमपवित्र आहे.
Jednom u godini neka Aron obavi obred pomirenja na njegovim roščićima. Krvlju žrtve koja se prinosi za grijeh, jednom na godinu, neka obavi obred pomirenja za žrtvenik. Tako činite u sve naraštaje. Jer oltar je presveta svetinja Jahvina.”
11 ११ मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
Nadalje Jahve reče Mojsiju:
12 १२ “तू इस्राएल लोकांची शिरगणती करशील तेव्हा गणनेवेळी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येक इस्राएलाने स्वत: च्या जिवाबद्दल परमेश्वरास खंड द्यावा;
“Kad budeš pravio popis Izraelaca prilikom novačenja, neka svatko da Jahvi otkupninu za se kad se upiše, da ih kakvo zlo ne snađe zbog novačenja.
13 १३ जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे.
Tko god potpada pod novačenje, ovoliko neka dadne: pola šekela - prema hramskom šekelu, gdje je dvadeset gera u šekelu. To pola šekela neka bude kao prinos Jahvi.
14 १४ वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याची गणना होईल त्यातील प्रत्येकाने त्याने परमेश्वराकरता हे समर्पण करावे.
Tko god potpada pod novačenje, od dvadeset godina starosti pa naviše, neka dadne prinos Jahvi.
15 १५ तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत मनुष्याने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये;
Bogataš neka ne plaća više niti siromah manje od pola šekela kad daju prinos Jahvi kao otkup za se.
16 १६ इस्राएल लोकांकडून प्रायश्चित्ताचा पैसा घ्यावा आणि त्याचा दर्शनमंडपामधील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्चित्त दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.”
Uzimaj otkupni novac od Izraelaca i određuj ga za potrebe Šatora sastanka. Neka to bude Jahvi na spomen da se sjeća Izraelaca i da im bude milostiv.”
17 १७ परमेश्वर मोशेला म्हणाला,
Reče Jahve Mojsiju:
18 १८ “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हातपाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे.
“Napravi umivaonik od tuča i podnožje od tuča za umivanje. Postavi ga između Šatora sastanka i žrtvenika. Nalij u nj vode
19 १९ या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हातपाय धुवावेत;
pa neka Aron i njegovi sinovi peru svoje ruke i noge vodom iz njega.
20 २० दर्शनमंडपामध्ये व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील.
Kad moradnu ulaziti u Šator sastanka, ili kad se moradnu primicati žrtveniku za službu da spaljuju žrtve u čast Jahvi paljene, neka se vodom operu da ne poginu.
21 २१ अहरोन व त्याचे वंशज ह्याच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.”
Neka operu ruke svoje i noge svoje da izbjegnu smrti: to je trajna naredba Aronu i njegovim potomcima u sve naraštaje.”
22 २२ मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
Još reče Jahve Mojsiju:
23 २३ “तू उत्तम प्रकारचे मसाले घे; म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, पाचशे शेकेल सुगंधी बच,
“Nabavi najboljih mirodija: pet stotina šekela smirne samotoka, pola te težine - dvjesta pedeset - mirisavog cimeta, dvjesta pedeset mirisave trstike,
24 २४ आणि पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतूनाचे तेल घे,
pet stotina - prema hramskom šekelu - lovorike i jedan hin maslinova ulja.
25 २५ व त्याचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर;
Od toga napravi posvećeno ulje za pomazanje; da bude smjesa kao da ju je pravio pomastar. Neka to bude posvećeno ulje za pomazanje.
26 २६ या तेलाने दर्शनमंडप व साक्षीकोश,
Time onda pomaži: Šator sastanka i Kovčeg Svjedočanstva;
27 २७ तसेच मेज व त्यांवरील सर्व वस्तू, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी,
stol i sav njegov pribor; svijećnjak i sav njegov pribor; žrtvenik kadioni;
28 २८ तसेच होमवेदी व होमवेदीच्या सर्व वस्तू आणि गंगाळ व त्याची बैठक या सर्वांना अभिषेक करावा.
žrtvenik za žrtve paljenice i sav njegov pribor; umivaonik i njegov stalak:
29 २९ त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमपवित्र ठरतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.
posveti ih, i oni će tako postati posvećeni; i što god ih se dotakne, posvećeno će postati.
30 ३० आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून पवित्र कर. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;
Pomaži Arona i njegove sinove i posveti ih meni za svećenike.
31 ३१ इस्राएल लोकांस तू सांग की, पिढ्यानपिढ्या तुम्हास माझ्यासाठीच हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार.
Onda kaži Izraelcima ovako: 'Ovo je moje posvećeno ulje za pomazanje od koljena do koljena.
32 ३२ हे तेल कोणाही मनुष्याच्या अंगाला लावायचे नाही. व या प्रकारचे तेल कोणीही तयार करू नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्ही ह्याला पवित्रच मानावे.
Ne smije se polijevati po tijelu običnoga čovjeka; ne smijete praviti drugoga ovakva sastava! To je posvećeno i neka vam bude sveto!
33 ३३ जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा ते कोणा परक्याला लावील तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
Tko god takvo napravi, ili tko ga stavi na kojeg svjetovnjaka, neka se odstrani od svog naroda!'”
34 ३४ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी. या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात;
Jahve još reče Mojsiju: “Nabavi mirodija: natafe, šeheleta i helebene. Od ovih mirodija i čistoga tamjana,
35 ३५ आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून मिठाने खारावलेले, निर्भेळ शुद्ध व पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे;
sve u jednakim dijelovima, napravi tamjan za kađenje, smjesu mirodija kakvu pravi pomastar, opranu, čistu, svetu.
36 ३६ त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शनमंडपामधील ज्या साक्षकोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन तेथे ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.
Od toga nešto smrvi u prah i jedan dio stavi pred Svjedočanstvo, u Šator sastanka, gdje ću se ja s tobom sastajati. Držite ovu mirodiju presvetom!
37 ३७ हे परमेश्वरासाठी पवित्र लेखावे; त्यासारखे दुसरे धूपद्रव्य तुम्ही स्वतःसाठी तयार करू नये.
A miomiris koji napraviš prema ovome sastavu za svoju upotrebu ne smijete praviti. To drži za svetinju Jahvi!
38 ३८ सुवास घेण्याकरता कोणी असले काही तयार करील तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
Tko sebi napravi što takvo da mu miriše, neka se iskorijeni iz svoga naroda.”