< निर्गम 27 >
1 १ परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.
I naèini oltar od drveta sitima, pet lakata u dužinu i pet lakata u širinu, èetvorouglast da bude oltar, tri lakta visok.
2 २ वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे अंगचीच बनलेली असावी; मग वेदी पितळेने मढवावी.
I na èetiri ugla naèini mu rogove, iz njega da izlaze rogovi, i okovaæeš ga u mjed.
3 ३ वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.
I naèiniæeš mu lonce za pepeo i lopatice i kotliæe i viljuške i mašice; sve mu posuðe naèini od mjedi.
4 ४ तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.
I naèini mu rešetku od mjedi kao mrežu, i naèini u rešetke èetiri bioèuga od mjedi na èetiri ugla njezina.
5 ५ ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखाली, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.
I metni je ispod oltara unaokolo, da bude rešetka do sredine oltara.
6 ६ वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत.
Naèini i poluge oltaru, poluge od drveta sitima, i okuj ih u mjed.
7 ७ ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
I poluge da se provuku kroz bioèuge, da budu poluge s dvije strane oltaru, kad se nosi.
8 ८ वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूंना फळ्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.
Naèiniæeš ga od dasaka da bude iznutra šupalj; kao što ti je pokazano na gori tako neka naèine.
9 ९ निवासमंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर, तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी.
I naèiniæeš trijem šatoru na južnoj strani; zavjesi trijemu da budu od tankoga platna uzvedenoga, sto lakata u dužinu na jednoj strani.
10 १० तिच्याकरता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत.
I dvadeset stupova i pod njih dvadeset stopica od mjedi, a kuke na stupovima i pasovi njihovi od srebra.
11 ११ वेदीच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.
Tako i sa zapadne strane da budu zavjesi sto lakata dugi, i dvadeset stupova i dvadeset stopica od mjedi, na stupovima kuke i njihovi pasovi od srebra.
12 १२ अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.
A širina æe trijemu imati sa zapadne strane zavjese od pedeset lakata, deset stupova za njih i deset stopica pod njih.
13 १३ अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पन्नास हात असावी.
A na prednjoj strani prema istoku biæe trijem širok pedeset lakata.
14 १४ अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीची पडद्याची कनात असावी; या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात;
Od petnaest lakata neka budu zavjesi na jednoj strani, i za njih tri stupa i tri stopice pod njih;
15 १५ फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही पंधरा हात लांबीची पडद्याची कनात, व तिलाही तीन खांब व तीन खुर्च्या हे सर्व असावे.
Na drugoj strani zavjesi od petnaest lakata, i tri stupa za njih i tri stopice pod njih.
16 १६ अंगणाच्या फाटकासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वीस हात लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीदार विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.
A nad vratima od trijema zavjes od dvadeset lakata od porfire i od skerleta i od crvca i od tankoga platna uzvedenoga, vezen, i èetiri stupa za nj, i pod njih èetiri stopice.
17 १७ अंगणाच्या सभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
Svi stupovi u trijemu unaokolo da budu opasani srebrom, i kuke da su im srebrne a stopice od mjedi.
18 १८ अंगणाची लांबी शंभर हात असावी व पन्नास हात रुंद असावी; अंगणासभोवतीची पडद्याची कनात पाच हात उंच असावी व ती कातलेल्या तलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
U dužinu æe trijem imati sto lakata, u širinu pedeset svuda, a u visinu pet lakata, da bude od tankoga platna uzvedenoga, a stopice od mjedi.
19 १९ पवित्र निवासमंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणासभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.
Sve posuðe u šatoru za svaku službu, i sve kolje u njemu i sve kolje u trijemu da bude od mjedi.
20 २० इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे हाताने कुटलेले निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे;
I ti zapovjedi sinovima Izrailjevim da ti donesu ulja maslinova èistoga cijeðenoga za vidjelo, da bi žišci gorjeli svagda.
21 २१ अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शनमंडपामध्ये अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची व्यवस्था करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे.
U šatoru od sastanka pred zavjesom, koji æe zaklanjati svjedoèanstvo, neka ih Aron i sinovi njegovi spremaju da gore od veèera do jutra pred Gospodom. To neka je uredba vjeèna koljenima njihovijem meðu sinovima Izrailjevim.