< निर्गम 26 >
1 १ निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावेत. व त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढावेत.
and [obj] [the] tabernacle to make ten curtain linen to twist and blue and purple and worm scarlet cherub deed: work to devise: design to make [obj] them
2 २ प्रत्येक पडद्याचे मोजमाप एक सारखेच असावे म्हणजे लांबी अठ्ठावीस हात व रूंदी चार हात असावी;
length [the] curtain [the] one eight and twenty in/on/with cubit and width four in/on/with cubit [the] curtain [the] one measure one to/for all [the] curtain
3 ३ त्यांपैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसऱ्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;
five [the] curtain to be to unite woman: another to(wards) sister her and five curtain to unite woman: another to(wards) sister her
4 ४ जेथे एक पडदा दुसऱ्याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी करावीत, तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर
and to make loop blue upon lip: edge [the] curtain [the] one from end in/on/with set and so to make in/on/with lip: edge [the] curtain [the] outermost in/on/with joining [the] second
5 ५ एका पडद्याला पन्नास बिरडी कर व दुसऱ्या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावी;
fifty loop to make in/on/with curtain [the] one and fifty loop to make in/on/with end [the] curtain which in/on/with joining [the] second to receive [the] loop woman: another to(wards) sister her
6 ६ पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या साहाय्याने ते दोन भाग एकत्र असे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप तयार होईल.
and to make fifty clasp gold and to unite [obj] [the] curtain woman: another to(wards) sister her in/on/with clasp and to be [the] tabernacle one
7 ७ त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावेत. हे पडदे अकरा असावे.
and to make curtain goat to/for tent upon [the] tabernacle eleven ten curtain to make [obj] them
8 ८ हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे तीस हात लांब व चार हात रुंद अशा मापाचे बनवावेत.
length [the] curtain [the] one thirty in/on/with cubit and width four in/on/with cubit [the] curtain [the] one measure one to/for eleven ten curtain
9 ९ त्यातून पाच पडदे एकत्र जोडावे आणि सहा पडदे एकत्र जोडावे. सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूला दुमडावा.
and to unite [obj] five [the] curtain to/for alone and [obj] six [the] curtain to/for alone and to double [obj] [the] curtain [the] sixth to(wards) opposite face: before [the] tent
10 १० पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तशीच पन्नास बिरडी करावीत;
and to make fifty loop upon lip: edge [the] curtain [the] one [the] outermost in/on/with set and fifty loop upon lip: edge [the] curtain [the] set [the] second
11 ११ नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबू अखंड होईल.
and to make clasp bronze fifty and to come (in): bring [obj] [the] clasp in/on/with loop and to unite [obj] [the] tent and to be one
12 १२ या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धा भाग पवित्र निवासमंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील.
and excess [the] to remain in/on/with curtain [the] tent half [the] curtain [the] to remain to overrun upon back [the] tabernacle
13 १३ आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर या बाजूला व हातभर त्या बाजूला निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला लोंबते ठेवावे.
and [the] cubit from this and [the] cubit from this in/on/with to remain in/on/with length curtain [the] tent to be to overrun upon side [the] tabernacle from this and from this to/for to cover him
14 १४ तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व दुसरे समुद्र प्राण्याच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.
and to make covering to/for tent skin ram to redden and covering skin leather from to/for above [to]
15 १५ पवित्र निवासमंडपाला बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्यांचा आधार करावा.
and to make [obj] [the] board to/for tabernacle tree: wood acacia to stand: rise
16 १६ प्रत्येक फळीची लांबी दहा हात व उंची दीड हात असावी.
ten cubit length [the] board and cubit and half [the] cubit width [the] board [the] one
17 १७ प्रत्येक फळी दुसऱ्याशी जोडण्यासाठी दोन बाजूला दोन कुसे करावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात.
two hand to/for board [the] one to fit woman: another to(wards) sister her so to make: do to/for all board [the] tabernacle
18 १८ पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात.
and to make [obj] [the] board to/for tabernacle twenty board to/for side south [to] south [to]
19 १९ फळ्यांसाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे चांदीच्या दोन बैठका असाव्यात.
and forty socket silver: money to make underneath: under twenty [the] board two socket underneath: under [the] board [the] one to/for two hand his and two socket underneath: under [the] board [the] one to/for two hand his
20 २० पवित्र निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात;
and to/for side [the] tabernacle [the] second to/for side north twenty board
21 २१ आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात.
and forty socket their silver: money two socket underneath: under [the] board [the] one and two socket underneath: under [the] board [the] one
22 २२ पवित्र निवासमंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फळ्या कराव्यात;
and to/for flank [the] tabernacle sea: west [to] to make six board
23 २३ आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फळ्या कराव्यात.
and two board to make to/for corner [the] tabernacle in/on/with flank
24 २४ कोपऱ्याच्या फळ्या खालच्या बाजूला जोडाव्यात; त्यांच्यावरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील, दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे.
and to be twin from to/for beneath and together to be complete upon head: top his to(wards) [the] ring [the] one so to be to/for two their to/for two [the] corner to be
25 २५ पवित्र निवासमंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठ फळ्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे चांदीच्या सोळा बैठका असतील.
and to be eight board and socket their silver: money six ten socket two socket underneath: under [the] board [the] one and two socket underneath: under [the] board [the] one
26 २६ त्यांच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व
and to make bar tree: wood acacia five to/for board side [the] tabernacle [the] one
27 २७ दुसऱ्या बाजूस पाच अडसर असावेत; आणि त्यांच्या पाठीमागच्या म्हणजे पश्चिम बाजूस पाच अडसर असावेत.
and five bar to/for board side [the] tabernacle [the] second and five bar to/for board side [the] tabernacle to/for flank sea: west [to]
28 २८ मध्य भागावरील अडसर लाकडांच्या फळ्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.
and [the] bar [the] middle in/on/with midst [the] board to flee from [the] end to(wards) [the] end
29 २९ फळ्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात.
and [obj] [the] board to overlay gold and [obj] ring their to make gold house: container to/for bar and to overlay [obj] [the] bar gold
30 ३० मी तुला पर्वतावर दाखवल्याप्रमाणे पवित्र निवासमंडप बांधावा.
and to arise: raise [obj] [the] tabernacle like/as justice: custom his which to see: see in/on/with mountain: mount
31 ३१ तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढून घ्यावेत.
and to make curtain blue and purple and worm scarlet and linen to twist deed: work to devise: design to make [obj] her cherub
32 ३२ बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत;
and to give: put [obj] her upon four pillar acacia to overlay gold hook their gold upon four socket silver: money
33 ३३ सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;
and to give: put [obj] [the] curtain underneath: under [the] clasp and to come (in): bring there [to] from house: inside to/for curtain [obj] ark [the] testimony and to separate [the] curtain to/for you between [the] Holy Place and between Holy Place [the] Holy Place
34 ३४ परमपवित्रस्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.
and to give: put [obj] [the] mercy seat upon ark [the] testimony in/on/with holiness [the] holiness
35 ३५ अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला मेज ठेवावा; तो निवासमंडपाच्या उत्तर बाजूला असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.
and to set: make [obj] [the] table from outside to/for curtain and [obj] [the] lampstand before [the] table upon side [the] tabernacle south [to] and [the] table to give: put upon side north
36 ३६ “पवित्र निवासमंडपाच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करून त्यावर वेलबुट्टीदार पडदा बनवावा.
and to make covering to/for entrance [the] tent blue and purple and worm scarlet and linen to twist deed: work to weave
37 ३७ हा पडदा लावण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत व ते सोन्याने मढवावेत; त्यांच्याकरिता पितळेच्या पाच बैठका बनवाव्यात; हा पडदा अडकविण्यासाठी सोन्याच्या आकड्या कराव्यात.”
and to make to/for covering five pillar acacia and to overlay [obj] them gold hook their gold and to pour: cast metal to/for them five socket bronze