< निर्गम 25 >

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
وَخَاطَبَ الرَّبُّ مُوسَى:١
2 “इस्राएल लोकांस माझ्यासाठी अर्पणे आणायला सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी.
كَلِّمْ بَنِي إِسْرَائِيلَ أَنْ يَأْخُذُوا لِي تَقْدِمَةً مِنْ كُلِّ إِنْسَانٍ يَحُثُّهُ قَلْبُهُ عَلَى ذَلِكَ.٢
3 त्यांच्याकडून तू माझ्याकरिता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी: सोने, चांदी, पितळ;
أَمَّا التَّقْدِمَاتُ الَّتِي تَأْخُذُونَهَا مِنْهُمْ فَهِيَ: ذَهَبٌ وَفِضَّةٌ وَنُحَاسٌ٣
4 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस;
وَأَقْمِشَةٌ زَرْقَاءُ وَبَنَفْسَجِيَّةٌ وَحَمْرَاءُ، وَمَنْسُوجَاتٌ كَتَّانِيَّةٌ وَشَعْرُ مِعْزَى،٤
5 लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
وَجُلُودُ كِبَاشٍ مُصَبَّغَةٌ بِالْحُمْرَةِ، وَجُلُودُ دَلافِينَ وَخَشَبُ السَّنْطِ،٥
6 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;
وَزَيْتٌ لِلْمَنَارَةِ، وَأَطْيَابٌ لِدُهْنِ الْمَسْحَةِ وَلِلْبَخُورِ الْعَطِرِ٦
7 एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने.”
وَحِجَارَةُ جَزْعٍ كَرِيمَةٌ وَحِجَارَةٌ كَرِيمَةٌ أُخْرَى لِتَرْصِيعِ رِدَاءِ الْكَاهِنِ وَصُدْرَتِهِ.٧
8 मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.
فَيَصْنَعُونَ لِي مَقْدِساً حَيْثُ أُقِيمُ فِيهِ بَيْنَهُمْ.٨
9 निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुला दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा.
تَصْنَعُونَهُ حَسَبَ مِثَالِ الْمَسْكَنِ وَالآنِيَةِ الَّتِي أُرِيكَ.٩
10 १० “बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.
يَصْنَعُونَ تَابُوتاً مِنْ خَشَبِ السَّنْطِ، طُولُهُ ذِرَاعَانِ وَنِصْفٌ (نَحْوَ مِتْرٍ وَرُبْعِ الْمِتْرِ)، وَعَرْضُهُ ذِرَاعٌ وَنِصْفٌ (نَحْوَ خَمْسَةٍ وَسَبْعِينَ سَنْتِيمِتْراً) وَارْتِفَاعُهُ ذِرَاعٌ وَنِصْفٌ (نَحْوَ خَمْسَةٍ وَسَبْعِينَ سَنْتِيمِتْراً).١٠
11 ११ तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा.
وَتَضَعُ عَلَيْهِ غِشَاءً مِنْ ذَهَبٍ نَقِيٍّ مِنَ الدَّاخِلِ وَالْخَارِجِ، وَاجْعَلْ لَهُ إطَاراً مِنْ ذَهَبٍ،١١
12 १२ त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावाव्या.
وَاسْبِكْ لَهُ أَرْبَعَ حَلَقَاتٍ مِنْ ذَهَبٍ تُثَبِّتُهَا عَلَى قَوَائِمِهِ الأَرْبَعِ حَلْقَتَيْنِ مِنْ كُلِّ جَانِبٍ،١٢
13 १३ बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढवावेत
وَتَصْنَعُ عَصَوَيْنِ مِنْ خَشَبِ السَّنْطِ تُغَشِّيهِمَا بِالذَّهَبِ،١٣
14 १४ कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा.
ثُمَّ تُدْخِلُهُمَا فِي الحَلَقَاتِ الَّتِي عَلَى جَانِبَيِ التَّابُوتِ لِيُحْمَلَ بِهِمَا.١٤
15 १५ हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत.”
وَتَبْقَى الْعَصَوَانِ فِي حَلَقَاتِ التَّابُوتِ، لَا تُنْزَعَانِ مِنْهَا.١٥
16 १६ देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोही त्या कोशात ठेवावा.
ثُمَّ تَضَعُ الشَّهَادَةَ الَّتِي أُعْطِيكَ فِي دَاخِلِ التَّابُوتِ.١٦
17 १७ मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी;
وَتَصْنَعُ غِطَاءً مِنْ ذَهَبٍ خَالِصٍ، هُوَ كُرْسِيُّ الرَّحْمَةِ، طُولُهُ ذِرَاعَانِ وَنِصْفٌ (نَحْوَ مِتْرٍ وَرُبْعِ الْمِتْرِ) وَعَرْضُهُ ذِرَاعٌ وَنِصْفٌ (نَحْوَ خَمْسَةٍ وَسَبْعِينَ سَنْتِيمِتْراً)١٧
18 १८ मग सोन्याचे घडीव काम करून दोन करुब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.
وَتَخْرِطُ كَرُوبَيْنِ (تِمْثَالَيْ مَلاكَيْنِ) مِنْ ذَهَبٍ وَتُقِيمُهُمَا عَلَى طَرَفَيِ الْغِطَاءِ.١٨
19 १९ एक करुब एका बाजूला व दुसरा करुब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत.
فَتَصْنَعُ كَرُوباً وَاحِداً عَلَى كُلِّ طَرَفٍ مِنَ الْغِطَاءِ، مَخْرُوطَيْنِ مِنَ الْغِطَاءِ نَفْسِهِ، وَقَائِمَيْنِ عَلَى طَرَفَيْهِ.١٩
20 २० त्या करुबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
وَيَكُونُ الْكَرُوبَانِ مُتَوَاجِهَيْنِ أَيْضاً، بَاسِطَيْنِ أَجْنِحَتَهُمَا إِلَى فَوْقُ، يُظَلِّلانِ بِهِمَا الْغِطَاءَ، وَيَتَّجِهَانِ بِوَجْهَيْهِمَا نَحْوَهُ.٢٠
21 २१ दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा;
وَتَضَعُ الْغِطَاءَ فَوْقَ التَّابُوتِ الَّذِي تَحْتَفِظُ بِدَاخِلِهِ بِلَوْحَيِ الشَّهَادَةِ الَّتِي أُعْطِيكَ.٢١
22 २२ तेथे मी तुला भेटत जाईन. दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील ठेवलेल्या दोन्ही करुबामधून मी तुझ्याशी बोलेन आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.
وَهُنَاكَ أَجْتَمِعُ بِكَ وَأُكَلِّمُكَ بِكُلِّ مَا أُوصِيكَ بِهِ لِتُبَلِّغَهُ لِبَنِي إِسْرَائِيلَ مِنْ عَلَى الْغِطَاءِ، مَا بَيْنَ الْكَرُوبَيْنِ اللَّذَيْنِ يَعْلُوَانِ تَابُوتَ الشَّهَادَةِ.٢٢
23 २३ बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.
وَكَذَلِكَ تَصْنَعُ مَائِدَةً مِنْ خَشَبِ السَّنْطِ طُولُهَا ذِرَاعَانِ (نَحْوَ مِتْرٍ) وَعَرْضُهَا ذِرَاعٌ (نَحْوَ خَمْسِينَ سَنْتِيمِتْراً) وَارْتِفَاعُهَا ذِرَاعٌ وَنِصْفٌ (نَحْوَ خَمْسَةٍ وَسَبْعِينَ سَنْتِيمِتْراً)٢٣
24 २४ ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठ करावा.
وَغَشِّهَا بِالذَّهَبِ وَاصْنَعْ لَهَا إِطَاراً عَالِياً مِنَ الذَّهَبِ،٢٤
25 २५ मग चार बोटे रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा.
وَاصْنَعْ لَهَا حَافَّةً حَوْلَهَا مِقْدَارُ عَرْضِهَا شِبْرٌ، وَاجْعَلْ لِمُحِيطِ الْحَافَةِ إطَاراً مِنْ ذَهَبٍ،٢٥
26 २६ मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना लावाव्यात.
وَاسْبِكْ لَهَا أَرْبَعَ حَلَقَاتٍ مِنْ ذَهَبٍ تُثَبِّتُهَا عَلَى زَوَايَا قَوَائِمِهَا الأَرْبَعِ،٢٦
27 २७ या कड्या मेजाच्या वरच्या भागा भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी या कड्यांमध्ये दांडे घालावे.
فَتَكُونُ الْحَلَقَاتُ المُثَبَّتَةُ عَلَى الْحَافَةِ، أَمَاكِنَ لِعَصَوَيْنِ تُحْمَلُ بِهِمَا الْمَائِدَةُ.٢٧
28 २८ मेज वाहून नेण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.
وَتَصْنَعُ الْعَصَوَيْنِ مِنْ خَشَبِ السَّنْطِ وَتُغَشِّيهِمَا بِالذَّهَبِ لِتُحْمَلَ بِهِمَا الْمَائِدَةُ.٢٨
29 २९ मेजावरची तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनव. ही शुद्ध सोन्याची असावीत.
وَأَمَّا صِحَافُ الْمَائِدَةِ وَصُحُونُهَا وَكُؤُوسُهَا وَأَبَارِيقُهَا الَّتِي يُسْكَبُ بِها، فَتَصُوغُهَا مِنْ ذَهَبٍ خَالِصٍ.٢٩
30 ३० माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी.
وَتَضَعُ أَمَامِي خُبْزَ التَّقْدِمَةِ عَلَى هَذِهِ الْمَائِدَةِ دَائِماً.٣٠
31 ३१ शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर, हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक व त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी.
وَاخْرِطْ مَنَارَةً مِنْ ذَهَبٍ خَالِصٍ، فَتَكُونَ قَاعِدَتُهَا وَسَاقُهَا وَكَاسَاتُهَا وَبَرَاعِمُهَا وَأَزْهَارُهَا كُلُّهَا مَخْرُوطَةً مَعاً مِنْ قِطْعَةٍ وَاحِدَةٍ.٣١
32 ३२ त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात.
وَتَتَشَعَّبُ مِنْ كُلِّ جَانِبٍ مِنْهَا ثَلاثَةُ أَفْرُعٍ،٣٢
33 ३३ प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या या कळ्याफुलांसह असाव्यात.
فِي كُلِّ شُعْبَةٍ ثَلاثُ كَاسَاتٍ بِبُرْعُمٍ وَزَهْرٍ، وَهَكَذَا إِلَى السِّتَّةِ الأَفْرُعِ الْمُتَشَعِّبَةِ مِنَ الْمَنَارَةِ.٣٣
34 ३४ या दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या कळ्या पाकळ्यासहीत असलेल्या फुलाप्रमाणे असाव्यात.
وَيَكُونُ عَلَى الْمَنَارَةِ أَرْبَعُ كَاسَاتٍ لَوْزِيَّةِ الشَّكْلِ بِبَرَاعِمِهَا وَأَزْهَارِهَا.٣٤
35 ३५ या दीपवृक्षावर निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा, त्याच्याखाली असलेले एकएक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी.
وَتَجْعَلُ تَحْتَ فَرْعَيْنِ مِنَ الأَفْرُعِ الْمُتَشَعِّبَةِ مِنَ الْمَنَارَةِ بُرْعُماً. هَكَذَا تَفْعَلُ لِلسِّتَّةِ الْأَفْرُعٍ.٣٥
36 ३६ त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा.
وَيَكُونُ سَاقُ الْمَنَارَةِ وَبَرَاعِمُهَا وَأَفْرُعُهَا كُلُّهَا قِطْعَةً وَاحِدَةً مَصْوغَةً مِنْ ذَهَبٍ خَالِصٍ.٣٦
37 ३७ मग या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल.
ثُمَّ اصْنَعْ سَبْعَةَ سُرُجٍ لِلْمَنَارَةِ، وَاجْعَلْهَا عَلَيْهَا بِحَيْثُ تُضِيءُ أَمَامَهَا.٣٧
38 ३८ दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
وَلْتَكُنْ مَلاقِطُهَا وَمَنَافِضُهَا مِنْ ذَهَبٍ خَالِصٍ.٣٨
39 ३९ हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहीत एक किक्कार शुद्ध सोन्याचा करावा;
فَيَكُونَ وَزْنُ الذَّهَبِ الْخَالِصِ الْمُصَاغِ لِصُنْعِ الْمَنَارَةِ وَجَمِيعِ أَوَانِيهَا وَزْنَةً وَاحِدَةً (نَحْوَ سِتَّةٍ وَثَلاثِينَ كِيلُو جِرَاماً)٣٩
40 ४० आणि मी तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.
وَاحْرِصْ أَنْ يَكُونَ كُلُّ مَا تَصْنَعُهُ مُطَابِقاً لِلْمِثَالِ الَّذِي أَظْهَرْتُهُ لَكَ عَلَى الْجَبَلِ.٤٠

< निर्गम 25 >