< निर्गम 24 >
1 १ मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलापैकी सत्तरजण असे मिळून परमेश्वराकडे पर्वतावर चढून येऊन त्यास दुरूनच नमन करा;
I powiedział do Mojżesza: Wstąpcie do PANA ty i Aaron, Nadab i Abihu oraz siedemdziesięciu ze starszych Izraela i oddajcie pokłon z daleka.
2 २ मग मोशेने एकट्यानेच परमेश्वराजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”
Tylko sam Mojżesz zbliży się do PANA. Oni zaś nie zbliżą się ani lud nie wstąpi z nim.
3 ३ मोशेने लोकांस परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एका आवाजात म्हणाले, “परमेश्वराने जी वचने सांगितलेली त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू.”
Mojżesz przyszedł więc i opowiedział ludowi wszystkie słowa PANA i wszystkie prawa. I cały lud odpowiedział jednym głosem: Wypełnimy wszystkie słowa, które PAN powiedział.
4 ४ तेव्हा मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली, मोशेने पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभे केले.
Wtedy Mojżesz spisał wszystkie słowa PANA. A kiedy rano wstał, zbudował ołtarz u stóp góry i [ustawił] dwanaście słupów, według [liczby] dwunastu pokoleń Izraela.
5 ५ मग मोशेने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना परमेश्वरास होमबली व बैलाची शांत्यर्पणे अर्पण करायला पाठवले.
I posłał młodzieńców z synów Izraela, i ci ofiarowali całopalenia, i złożyli PANU cielce [jako] ofiary pojednawcze.
6 ६ मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे रक्त त्याने वेदीवर शिंपडले.
Potem Mojżesz wziął połowę krwi i wlał do czaszy, a drugą połową pokropił ołtarz.
7 ७ मग मोशेने कराराचे पुस्तक घेऊन लोकांस वाचून दाखविले आणि ते ऐकून लोक म्हणाले, “परमेश्वराने सांगितले आहे तसे आम्ही करू आणि त्याने दिलेल्या आज्ञा आम्ही पाळू.”
Następnie wziął księgę przymierza i czytał ludowi, a oni powiedzieli: Wypełnimy wszystko, co PAN mówił, i będziemy posłuszni.
8 ८ मग मोशेने रक्त घेऊन लोकांवर शिंपडले. तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी या वचनाप्रमाणे करार केला आहे असे हे त्या कराराचे रक्त आहे.”
Mojżesz wziął też krew i pokropił lud, mówiąc: Oto krew przymierza, które PAN zawarł z wami, według wszystkich tych słów.
9 ९ नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले.
I wstąpili Mojżesz, Aaron, Nadab i Abihu oraz siedemdziesięciu ze starszych Izraela;
10 १० तेथे त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; इंद्रनीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ होते
I widzieli Boga Izraela, [a] pod jego nogami [było] jakby dzieło z szafirowego kamienia jak niebo, gdy jest jasne.
11 ११ इस्राएलातील वडिलधाऱ्या मनुष्यांनी देवाला पाहिले, परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.
A na przywódców synów Izraela [PAN] nie wyciągnął swej ręki, choć widzieli Boga, jedli i pili.
12 १२ परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांच्या शिक्षणासाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”
Wtedy PAN powiedział do Mojżesza: Wstąp do mnie na górę i bądź tam, a dam ci kamienne tablice, prawo i przykazania, które napisałem, abyś ich nauczał.
13 १३ तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला.
Mojżesz wstał więc wraz z Jozuem, swoim sługą; i Mojżesz wstąpił na górę Boga.
14 १४ मोशे इस्राएलांच्या वडिलांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच थांबा, मी परत येईपर्यंत अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”
A do starszych powiedział: Zostańcie tu, aż wrócimy do was. A oto Aaron i Chur [będą] z wami. Kto by miał [jakąś] sprawę, niech idzie do nich.
15 १५ मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला;
Wtedy Mojżesz wstąpił na górę, a obłok zakrył górę.
16 १६ परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वराने मोशेला हाक मारली.
I chwała PANA spoczęła na górze Synaj, a obłok okrywał ją przez sześć dni. W siódmym dniu [PAN] zawołał na Mojżesza spośród obłoku.
17 १७ इस्राएल लोकांस पर्वताच्या शिखरावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे दिसत होते.
A wygląd chwały PANA w oczach synów Izraela był jak ogień pożerający na szczycie góry.
18 १८ मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.
I Mojżesz wszedł w środek obłoku, i wstąpił na górę. A był Mojżesz na górze czterdzieści dni i czterdzieści nocy.