< निर्गम 23 >

1 खोटी अफवा पसरवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस.
Ungawuphathi umbiko wamanga, ungafaki isandla sakho lomubi ukuze ube ngumfakazi wobubi.
2 दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नकोस, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नकोस.
Ungalandeli abanengi ngezinto ezimbi, ungafakazi ecaleni ukuze weyamele kwabanengi uliphambule.
3 एखाद्या गरीब मनुष्याचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नकोस.
Lomyanga ungamzweli ecaleni lakhe.
4 आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्यास वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोड.
Uba uhlangana lenkabi yesitha sakho loba ubabhemi waso kuduha, uzakubuyisela lokukubuyisela kuso.
5 तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्यास सोडून जाऊ नकोस, तू अवश्य त्याच्याबरोबर राहून ते सोड.
Uba ubona ubabhemi walowo okuzondayo elele ngaphansi komthwalo wakhe, uyekele ukumkhulula, uzamkhulula lokumkhulula laye.
6 तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नकोस;
Kawuyikuphambula ukwahlulelwa komyanga wakho ecaleni lakhe.
7 कोणावरही खोटे दोषारोप करू नकोस; एखाद्या निष्पाप वा निरपराधी ह्यांचा वध करू नकोस. कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही.
Bana khatshana lendaba yamanga, ungabulali ongelacala lolungileyo, ngoba kangiyikumlungisisa okhohlakeleyo.
8 लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तू मुळीच घेऊ नकोस; लाच घेऊ नको कारण लाच डोळसास आंधळे करते; आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपरीत न्याय करते.
Njalo kawuyikwemukela isivalamlomo, ngoba isivalamlomo siphumputhekisa ababonayo, sonakalise amazwi abalungileyo.
9 परक्याला कधीही छळू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हास चांगली माहिती आहे; कारण तुम्ही देखील एके काळी मिसर देशात परके होता.
Futhi kawuyikumcindezela owezizwe; ngoba lina liyayazi imizwa yowezizwe, ngoba lalingabezizwe elizweni leGibhithe.
10 १० सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर; आणि तिचे उत्पन्न साठीव.
Njalo iminyaka eyisithupha uzahlanyela isiqinti sakho, ubuthe isivuno saso.
11 ११ परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक राहू दे. त्या वर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतूनाची वने यांच्या बाबतीतही असेच करावे.
Kodwa ngowesikhombisa uzasilalukisa sibe lifusi, ukuze abayanga besizwe sakho badle, lalokho okuseleyo inyamazana zeganga zikudle. Wenze njalo ngesivini sakho lemihlwathi yakho.
12 १२ तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजेतवाने वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.
Insuku eziyisithupha uzakwenza umsebenzi wakho, njalo ngosuku lwesikhombisa uphumule, ukuze kuphumule inkabi yakho labobabhemi bakho, kuvuselele-ke indodana yencekukazi yakho lowezizweni.
13 १३ मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत; इतर देवांचे नांव देखील घेऊ नका; ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका.
Lezintweni zonke esengizitshilo kini qaphelani, lebizo labanye onkulunkulu lingaliphathi, kaliyikuzwakala emlonyeni wakho.
14 १४ वर्षातून तीनदा तू माझ्यासाठी उत्सव करून सण पाळ.
Kathathu ngomnyaka uzangigcinela umkhosi.
15 १५ बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यामध्ये सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
Umkhosi wesinkwa esingelamvubelo uzawugcina, insuku eziyisikhombisa udle isinkwa esingelamvubelo njengokukulaya kwami, ngesikhathi esimisiweyo senyanga kaAbhibhi; ngoba kuyo waphuma eGibhithe; kabayikubonakala phambi kwami bengaphethe lutho.
16 १६ शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.
Lomkhosi wesivuno, izithelo zokuqala zomsebenzi wakho, owuhlanyeleyo ensimini; lomkhosi wokubutha ekupheleni komnyaka, lapho usubuthile umsebenzi wakho ensimini.
17 १७ वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर यावे.
Kathathu ngomnyaka bonke abesilisa bakho bazabonakala phambi kweNkosi uJehova.
18 १८ तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करू नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये.
Kawuyikunikela igazi lomhlatshelo wami kanye lesinkwa esilemvubelo. Lamafutha omkhosi wami angalali kuze kuse.
19 १९ आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.
Ikhethelo lezithelo zokuqala zensimu yakho uzaliletha endlini yeNkosi uNkulunkulu wakho. Ungapheki izinyane echagweni lukanina.
20 २० पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.
Khangela, ngithuma ingilosi phambi kwakho ukuze ikulondoloze endleleni, ikuse endaweni engiyilungisileyo.
21 २१ त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक, आज्ञा पाळ आणि त्याच्यामागे चाल; त्याच्याविरुध्द बंड करू नकोस. कारण तो तुम्हास क्षमा करणार नाही; कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे.
Uqaphele phambi kwayo, ulalele ilizwi layo; ungayicunuli, ngoba kayiyikuthethelela iziphambeko zenu; ngoba ibizo lami liphakathi kwayo.
22 २२ जर तू त्याची वाणी खरोखर ऐकशील व मी सांगतो ते सर्व करशील तर मी तुम्हाबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शत्रूंचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन.
Kodwa uba ulalela lokulalela ilizwi layo, wenze konke engikutshoyo, sengizakuba yisitha sezitha zakho, ngiphambane labaphambana lawe.
23 २३ देव म्हणाला, माझा दूत तुमच्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन.
Ngoba ingilosi yami izahamba phambi kwakho, ikungenise kumaAmori lamaHethi lamaPerizi lamaKhanani lamaHivi lamaJebusi. Njalo ngizababhubhisa.
24 २४ परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नकोस; त्यांची सेवा करू नकोस, त्यांना जमीनदोस्त करावेस; आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावेस.
Ungakhothameli onkulunkulu babo, ungabakhonzi, ungenzi njengemisebenzi yabo; kodwa ubachithe lokubachitha, ubhidlize lokubhidliza izinsika zabo eziyizithombe.
25 २५ तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.
Lizakhonza-ke iNkosi uNkulunkulu wenu; njalo izabusisa ukudla kwakho lamanzi akho, njalo ngisuse isifo phakathi kwakho.
26 २६ तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुला दीर्घायुषी करीन.
Kakuyikuba khona okuphunzayo lokuyinyumba elizweni lakho. Ngizaphelelisa inani lensuku zakho.
27 २७ ज्या ज्या लोकांच्या विरूद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवयास लावीन.
Ngizathumela ukwesabeka kwami phambi kwakho, ngiphambanise bonke abantu ozafika kubo, ngenze izitha zakho zonke zikunike isiphundu.
28 २८ मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी, व हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळावयास लावतील.
Ngizathumela olonyovu phambi kwakho abazaxotsha amaHivi, amaKhanani lamaHethi phambi kwakho.
29 २९ मी त्यांना एका वर्षातच घालवून देणार नाही; कारण मी तसे केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग वनपशूंची वाढ होऊन ते तुला त्रास देतील.
Kangiyikubaxotsha phambi kwakho ngomnyaka owodwa, hlezi ilizwe libe ngamanxiwa, lenyamazana zeganga zikwandele.
30 ३० तुमची संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन.
Ngizabaxotsha phambi kwakho kancinyane kancinyane, uze wande, udle ilifa lelizwe.
31 ३१ “मी तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. तेथे राहणाऱ्या लोकांस मी तुझ्या हाती देईन व तू त्या सर्वांना तेथून घालवून द्याल.
Njalo ngizamisa imingcele yakho kusukela eLwandle oluBomvu kuze kufike elwandle lwamaFilisti, njalo kusukela enkangala kuze kufike emfuleni; ngoba ngizanikela esandleni sakho abakhileyo belizwe; uzabaxotsha phambi kwakho.
32 ३२ तू त्याच्याशी किंवा त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नकोस.
Ungenzi isivumelwano labo labonkulunkulu babo.
33 ३३ तू त्यांना तुझ्या देशात राहू देऊ नकोस; तू जर त्यांना तुझ्यामध्ये राहू देशील तर ते पुढे तुला सापळ्यासारखे अडकविणारे होतील, ते तुला माझ्याविरूद्ध पाप करायला लावतील व तू त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरुवात करशील.”
Kabayikuhlala elizweni lakho, hlezi bakwenze ukuthi wone kimi; uba ukhonza onkulunkulu babo, ngeqiniso kuzakuba yisifu kuwe.

< निर्गम 23 >