< निर्गम 20 >

1 देवाने ही सर्व वचने सांगितली,
And God spake all these words saying: —
2 मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले.
I, am Yahweh thy God, —who have brought thee forth out of the land of Egypt, out of the house of servants: —
3 माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.
Thou shalt not have other gods besides me.
4 तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस;
Thou shalt not make to thee an image, or any form, that is in the heavens above, —or that is in the earth beneath, —or that is in the waters beneath the earth:
5 त्यांची सेवा करू नको; किंवा त्यांच्या पाया पडू नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा विरोध करतात, त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
thou shalt not bow thyself down to them nor be led to serve them—For, I, Yahweh, thy God, am a jealous GOD, visiting the iniquity of fathers upon sons, unto three [generations] and, unto four, of them that hate me;
6 परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
but shewing lovingkindness unto thousands [of generations], —of them who love me, and keep my commandments.
7 तुझा देव परमेश्वर याचे नाव तू व्यर्थ घेऊ नकोस; कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
Thou shalt not utter the name of Yahweh thy God for falsehood, for Yahweh will not let him go unpunished who uttereth his name for falsehood.
8 शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;
Remember the sabbath day, to hallow it:
9 सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस;
Six days, shalt thou labour, and do all thy work;
10 १० परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशू, किंवा तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
but, the seventh day, is a sabbath unto Yahweh thy God, —thou shalt do no work, thou nor thy son nor thy daughter nor thy servant, nor thy handmaid, nor thy beast, nor thy sojourner who is within thy gates,
11 ११ कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
For, in six days, did Yahweh make the heavens and the earth, [and] the sea—and all that in them is, and rested on the seventh day, —for this cause, Yahweh blessed the sabbath day and hallowed it.
12 १२ आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
Honour thy father, and thy mother, —that thy days may be prolonged upon the soil, which Yahweh thy God is about to give unto thee.
13 १३ खून करू नकोस.
Thou shalt not commit murder.
14 १४ व्यभिचार करू नकोस.
Thou shalt not commit adultery.
15 १५ चोरी करू नकोस.
Thou shalt not steal.
16 १६ आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
Thou shalt not testify against thy neighbour, with a witness of falsehood.
17 १७ “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याचा दासदासी, बैल, गाढव, किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नकोस.”
Thou shalt not covet, thy neighbour’s house, —thou shalt not covet, thy neighbour’s wife nor his servant nor his handmaid nor his ox, nor his ass, nor anything which belongeth unto thy neighbour.
18 १८ लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला, शिंगाचा नाद होत आहे व पर्वतातून धूर वर चढताना पाहून भीतीने त्यांचा थरकाप झाला. ते दूर उभे राहिले.
And, all the people, were witnessing the voices and the torches, and the sound of the horn, and the mountain smoking, —so then the people were struck with awe and shrank back, and stood afar off.
19 १९ ते मोशेला म्हणू लागले आमच्याशी तूच बोल, आम्ही ऐकू; देव आमच्याशी न बोलो, तो बोलेल तर आम्ही मरून जाऊ.
And they said unto Moses, Speak, thou, with us, and we will hear, —but let not God speak with us lest we die.
20 २० मग मोशे लोकांस म्हणाला, “भिऊ नका, कारण तुमची परीक्षा करावी आणि त्याचे भय तुमच्या डोळ्यांपुढे राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे.”
And Moses said unto the people—Do not fear, for to the end he may prove you, hath God come, —and to the end the reverence of him may be upon your faces that ye sin not.
21 २१ मोशे, ढगांच्या दाट अंधारात, जेथे देव होता तेथे गेला, तोपर्यंत लोक पर्वतापासून लांब उभे राहिले.
So then the people stood afar off, and, Moses, approached unto the thick gloom, where God was.
22 २२ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, मी तुमच्याशी आकाशातून बोललो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे.
Then said Yahweh unto Moses, Thus, shalt thou say, unto the sons of Israel, —Ye yourselves, have seen that out of the heavens, have I spoken with you.
23 २३ माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.”
Ye shall not make [aught] beside me, —neither gods of silver, nor gods of gold, shall ye make to yourselves.
24 २४ माझ्यासाठी मातीची वेदी बांधा आणि तिजवर तुझी मेंढरे व तुझे बैल यांची होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; जेथे जेथे मी माझ्या नावाची आठवण व्हावी म्हणून मी सांगतो तेथे तेथे मी येऊन तुम्हास आशीर्वाद देईन.
An altar of earth, shalt thou make to me, then shalt thou offer thereupon thine ascending-sacrifices and thy peace-offerings, thy sheep, and thine oxen. In every place where I may mention my name, will I come in unto thee and will bless thee.
25 २५ तुम्ही जर दगडाची वेदी बांधणार असाल तर ती घडलेल्या चिऱ्याची नसावी; कारण तुम्ही आपले हत्यार दगडाला लावल्यास तो भ्रष्ट होईल.
But if, an altar of stones, thou wilt make to me, thou shalt not build them hewn, —for as soon as thou hast lifted, thy sharp tool, thereupon, thou hast profaned it;
26 २६ तुझ्या शरीराची नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू पायऱ्यांनी चढता कामा नये.
neither shalt thou go up, by steps unto mine altar, —lest by any means thy shame be discovered thereupon.

< निर्गम 20 >