< निर्गम 15 >

1 नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले, “मी परमेश्वरास गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे.
Then Moses and the children of Israel sang this song to Yahweh, and said, “I will sing to Yahweh, for he has triumphed gloriously. He has thrown the horse and his rider into the sea.
2 परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे. तो माझे तारण झाला आहे. मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजांचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.
Yah is my strength and song. He has become my salvation. This is my God, and I will praise him; my father’s God, and I will exalt him.
3 परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नाव परमेश्वर आहे.
Yahweh is a man of war. Yahweh is his name.
4 त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले; त्याचे निवडक अधिकारी तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.
He has cast Pharaoh’s chariots and his army into the sea. His chosen captains are sunk in the Red Sea.
5 खोल पाण्याने त्यांना बुडविले; ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.
The deeps cover them. They went down into the depths like a stone.
6 हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.
Your right hand, Yahweh, is glorious in power. Your right hand, Yahweh, dashes the enemy in pieces.
7 तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरूद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस; अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
In the greatness of your excellency, you overthrow those who rise up against you. You send out your wrath. It consumes them as stubble.
8 तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या. जलप्रवाह राशी सारखे उंच उभे राहिले, जलाशय सागराच्या उदरी थिजून गेले.
With the blast of your nostrils, the waters were piled up. The floods stood upright as a heap. The deeps were congealed in the heart of the sea.
9 शत्रू म्हणाला, मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन.
The enemy said, ‘I will pursue. I will overtake. I will divide the plunder. My desire will be satisfied on them. I will draw my sword. My hand will destroy them.’
10 १० परंतु तू त्यांच्यावर आपला फुंकर वायू सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले; ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल पाण्यात तळापर्यंत बुडाले.
You blew with your wind. The sea covered them. They sank like lead in the mighty waters.
11 ११ हे परमेश्वरा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे? पवित्रतेने ऐश्वर्यवान, स्तवनात भयानक, अद्भुते करणारा असा तुजसमान कोण आहे?
Who is like you, Yahweh, among the gods? Who is like you, glorious in holiness, fearful in praises, doing wonders?
12 १२ तू तुझा उजवा हात उगारला, पृथ्वीने त्यांना गिळून टाकले.
You stretched out your right hand. The earth swallowed them.
13 १३ तू उध्दारलेल्या लोकांस तू तुझ्या दयाळूपणाने चालवले आहेस; तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र आणि आनंददायी प्रदेशात नेले आहे.
“You, in your loving kindness, have led the people that you have redeemed. You have guided them in your strength to your holy habitation.
14 १४ इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील; पलिष्टामध्ये राहणारे लोक भीतीने थरथर कापतील.
The peoples have heard. They tremble. Pangs have taken hold of the inhabitants of Philistia.
15 १५ मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले. मवाबाचे नायक भीतीने थरथर कापत आहेत आणि कनानी लोक गलित झाले आहेत.
Then the chiefs of Edom were dismayed. Trembling takes hold of the mighty men of Moab. All the inhabitants of Canaan have melted away.
16 १६ तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील, आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत ते तुझ्या लोकांस काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;
Terror and dread falls on them. By the greatness of your arm they are as still as a stone, until your people pass over, Yahweh, until the people you have purchased pass over.
17 १७ तू तुझ्या लोकांस तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील; हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान हेच आहे. हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले तुझे पवित्र स्थान हेच.
You will bring them in, and plant them in the mountain of your inheritance, the place, Yahweh, which you have made for yourself to dwell in: the sanctuary, Lord, which your hands have established.
18 १८ परमेश्वर सदासर्वदा राज्य करील.”
Yahweh will reign forever and ever.”
19 १९ फारोचे घोडे, स्वार व रथ समुद्रात गेले, या प्रकारे परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.
For the horses of Pharaoh went in with his chariots and with his horsemen into the sea, and Yahweh brought back the waters of the sea on them; but the children of Israel walked on dry land in the middle of the sea.
20 २० त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने हाती डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;
Miriam the prophetess, the sister of Aaron, took a tambourine in her hand; and all the women went out after her with tambourines and with dances.
21 २१ मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले. “परमेश्वरास गीत गा; कारण त्याने महान कृत्ये केली आहेत. त्याने घोडा व स्वार यांना समुद्रात फेकून दिले आहे.”
Miriam answered them, “Sing to Yahweh, for he has triumphed gloriously. He has thrown the horse and his rider into the sea.”
22 २२ मोशे इस्राएल लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही.
Moses led Israel onward from the Red Sea, and they went out into the wilderness of Shur; and they went three days in the wilderness, and found no water.
23 २३ तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नावाच्या ठिकाणी पोहोचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांस ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव मारा पडले.
When they came to Marah, they couldn’t drink from the waters of Marah, for they were bitter. Therefore its name was called Marah.
24 २४ लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”
The people murmured against Moses, saying, “What shall we drink?”
25 २५ मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्या वेळी परमेश्वराने इस्राएल लोकांस विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.
Then he cried to Yahweh. Yahweh showed him a tree, and he threw it into the waters, and the waters were made sweet. There he made a statute and an ordinance for them, and there he tested them.
26 २६ तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे.
He said, “If you will diligently listen to Yahweh your God’s voice, and will do that which is right in his eyes, and will pay attention to his commandments, and keep all his statutes, I will put none of the diseases on you which I have put on the Egyptians; for I am Yahweh who heals you.”
27 २७ मग ते एलीम येथे आले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.
They came to Elim, where there were twelve springs of water and seventy palm trees. They encamped there by the waters.

< निर्गम 15 >