< निर्गम 11 >
1 १ मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल; तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील,
耶和华对摩西说:“我再使一样的灾殃临到法老和埃及,然后他必容你们离开这地。他容你们去的时候,总要催逼你们都从这地出去。
2 २ तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.”
你要传于百姓的耳中,叫他们男女各人向邻舍要金器银器。”
3 ३ मिसरी लोकांची इस्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता.
耶和华叫百姓在埃及人眼前蒙恩,并且摩西在埃及地、法老臣仆,和百姓的眼中看为极大。
4 ४ मोशे लोकांस म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिसरातून फिरेन
摩西说:“耶和华这样说:‘约到半夜,我必出去巡行埃及遍地。
5 ५ आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील.
凡在埃及地,从坐宝座的法老直到磨子后的婢女所有的长子,以及一切头生的牲畜,都必死。
6 ६ मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल.
埃及遍地必有大哀号;从前没有这样的,后来也必没有。
7 ७ परंतु इस्राएल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील भुंकणार नाही यावरुन मी परमेश्वर इस्राएली व मिसरांच्यामध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल.
至于以色列中,无论是人是牲畜,连狗也不敢向他们摇舌,好叫你们知道耶和华是将埃及人和以色列人分别出来。’
8 ८ मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.
你这一切臣仆都要俯伏来见我,说:‘求你和跟从你的百姓都出去’,然后我要出去。”于是,摩西气忿忿地离开法老,出去了。
9 ९ परमेश्वराने मोशेला म्हटले, “फारो तुमचे ऐकणार नाही मी मिसर देशात पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्यात म्हणून असे होईल.”
耶和华对摩西说:“法老必不听你 们,使我的奇事在埃及地多起来。”
10 १० आणि मोशे व अहरोन यांनी सर्व आश्चर्ये फारोपुढे केली; परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्याच्या देशातून इस्राएल लोकांस बाहेर जाऊ दिले नाही.
摩西、亚伦在法老面前行了这一切奇事;耶和华使法老的心刚硬,不容以色列人出离他的地。