< निर्गम 10 >
1 १ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे मन व त्याच्या सेवकांची मने मीच कठीण केली आहेत. माझ्या सामर्थ्याची चिन्हे त्यांच्यामध्ये दाखवावी म्हणून मी हे केले.
Un Tas Kungs sacīja uz Mozu: ej pie Faraona, jo Es esmu apcietinājis viņa sirdi un viņa kalpu sirdi, lai Es šās Savas zīmes daru viņu vidū.
2 २ मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे कशी केली हे तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे म्हणून मी हे केले. या प्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल.”
Un lai tu stāsti priekš savu bērnu un bērnu bērnu ausīm, ko Es Ēģiptes zemē esmu darījis, un Manas zīmes, ko Es tur esmu cēlis, un lai jūs atzīstat, ka Es esmu Tas Kungs.
3 ३ मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्याचे कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.
Tad Mozus un Ārons gāja pie Faraona un uz to sacīja: tā saka Tas Kungs, tas Ebreju Dievs: cik ilgi tu liedzies pazemoties priekš Mana vaiga? Atlaid Manus ļaudis, ka tie Man var kalpot.
4 ४ जर तू माझ्या लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील, तर उद्या मी तुझ्या देशावर टोळधाड आणीन.
Jo ja tu liegsies, atlaist Manus ļaudis, redzi, tad Es rītu vedīšu siseņus tavās robežās,
5 ५ ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील की तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्यास टोळ खाऊन टाकतील. शेतांतील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील.
Un tie apklās visu zemes virsu, tā ka zemi neredzēs, un tie ēdīs to pēdējo, kas jums atlicis un palicis no krusas, un noēdīs visus jūsu kokus, kas jums zaļo laukā.
6 ६ ते टोळ तुझी घरे, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, व्यापून टाकतील. तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत पाहिले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील.” नंतर मोशे फारोसमोरून निघून गेला.
Un tie piepildīs tavus namus un visu tavu kalpu namus un visu ēģiptiešu namus; tādus ne tavi tēvi, ne tavu tēvu tēvi nav redzējuši no tās dienas, kamēr tie virs zemes bijuši, līdz šim; un viņš griezās un aizgāja no Faraona.
7 ७ फारोचे सेवक फारोला म्हणाले, “हा मनुष्य आम्हावर कोठपर्यंत संकटे आणणार आहे? या इस्राएलांना आपला देव परमेश्वर ह्यांची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे. मिसराचा नाश झाला आहे हे तुम्हास अजून कळत नाही काय?”
Un Faraona kalpi sacīja uz viņu: cik ilgi tas mums būs par slazda valgu? Atlaid tos ļaudis, lai tie kalpo Tam Kungam, savam Dievam; vai tu vēl neredzi, ka Ēģiptes zeme iet bojā?
8 ८ मोशे व अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणले, तो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु कोण कोण जाणार आहेत?”
Tad Mozus un Ārons atkal pie Faraona tapa atvesti, un viņš uz tiem sacīja: ejat un kalpojiet Tam Kungam, savam Dievam! Kas tie visi ir, kas grib noiet?
9 ९ मोशेने उत्तर दिले, “आमची तरुण व वृध्द मंडळी, तसेच आम्ही, आमची मुले व कन्या, आमचे शेरडामेंढरांचे कळप व गुरेढोरे या सर्वांस आम्ही घेऊन जाणार. कारण आम्हांला परमेश्वराचा उत्सव करायचा आहे.”
Un Mozus sacīja: mēs iesim ar saviem jauniem un veciem, ar saviem dēliem un ar savām meitām; mēs iesim ar saviem maziem un lieliem lopiem, jo mums ir Tā Kunga svētki.
10 १० फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ दिले तर परमेश्वराची शपथ. सांभाळा, पाहा, तुमच्या मनात काहीतरी वाईट आहे.
Tad viņš uz tiem sacīja: lai Tas Kungs jums tā palīdz, kā es jūs un jūsu bērnus atlaidīšu! Redziet, kāds ļaunums jums prātā!
11 ११ नाही! फक्त तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. कारण तेच तर तुम्हास पाहिजे आहे.” त्यानंतर त्यांना फारोपुढून घालवून दिले.
Nē, nē, ejat jūs vīri un kalpojiet Tam Kungam, jo to jūs arī esat meklējuši. Un tos izstūma no Faraona vaiga.
12 १२ मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे टोळधाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.”
Tad Tas Kungs sacīja uz Mozu: izstiep savu roku pār Ēģiptes zemi siseņu dēļ, ka tie nāk pār Ēģiptes zemi un noēd visu zemes zāli, visu, ko krusa ir atlicinājusi.
13 १३ मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले.
Tad Mozus izstiepa savu zizli pār Ēģiptes zemi, un Tas Kungs deva austriņu(austruma vējš) tai zemē cauru dienu un cauru nakti; un kad rīts ausa, tad tas austriņš uzveda siseņus.
14 १४ ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत.
Un siseņi uznāca pār visu Ēģiptes zemi un nolaidās visās Ēģiptes robežās lielā pulkā; priekš tiem tādu siseņu nav bijis, un pēc tiem vairs tādu nebūs.
15 १५ त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरातील कुठल्याच झाडाझुडपांवर एकही पान राहिले नाही.
Jo tie apklāja visu zemes virsu, un zeme tapa aptumšota, un tie noēda visu zemes zāli un visus koku augļus, ko krusa bija atlicinājusi, un tur nepalika vairs zaļuma ne pie kokiem, ne pie lauka zāles visā Ēģiptes zemē.
16 १६ फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध व तुम्हाविरुध्द मी पाप केले आहे.
Tad Faraons traucās aicināt Mozu un Āronu un sacīja: es esmu grēkojis pret To Kungu, jūsu Dievu, un pret jums.
17 १७ तेव्हा या वेळी माझ्या पापाबद्दल मला क्षमा करा आणि हे टोळ माझ्यापासून दूर करण्याकरिता तुमचा देव परमेश्वर याकडे प्रार्थना करा.”
Un nu piedod lūdzams manus grēkus tikai šo reiz, un lūdziet To Kungu, savu Dievu, ka Viņš šo nāvi gribētu atņemt no manis.
18 १८ मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
Un viņš aizgāja no Faraona un lūdza To Kungu.
19 १९ तेव्हा परमेश्वराने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.
Tad Tas Kungs deva ļoti stipru vakara vēju; tas pacēla tos siseņus un tos iemeta niedru jūrā, ka neviens sisenis neatlika visās Ēģiptes robežās.
20 २० तरी परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
Tomēr Tas Kungs apcietināja Faraona sirdi, un tas Israēla bērnus neatlaida.
21 २१ मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हास चाचपडत जावे लागेल.”
Tad Tas Kungs sacīja uz Mozu: izstiep savu roku pret debesīm, ka tumsa nāk pār Ēģiptes zemi, ka tumsu var sataustīt.
22 २२ तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारिला आणि तीन दिवस सर्व मिसर देशात निबिड अंधकार झाला.
Un Mozus izstiepa savu roku pret debesīm, tad cēlās bieza tumsa visā Ēģiptes zemē trīs dienas.
23 २३ कोणालाही काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस आपले घर सोडून गेले नाही; परंतु जिथे इस्राएली लोकांची वस्ती होती तेथे प्रकाश होता.
Neviens otru neredzēja, un neviens trejās dienās necēlās no savas vietas; bet visiem Israēla bērniem bija gaisma viņu mājokļos.
24 २४ तेव्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमचे कळप व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.”
Tad Faraons aicināja Mozu un sacīja: ejat, kalpojiet Tam Kungam, bet jūsu sīkiem lopiem un vēršiem būs palikt tepat; lai arī jūsu bērni iet jums līdz.
25 २५ मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यास यज्ञपशू व होमबली तू आमच्या हाती दिले पाहिजेत.
Bet Mozus sacīja: tev būs arī mūsu rokā dot kaujamus upurus un dedzināmos upurus, ko pienest Tam Kungam, savam Dievam.
26 २६ यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमची गुरेढोरेही आमच्याबरोबर नेऊ. एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमचा देव परमेश्वर याला यज्ञ व होमार्पण करण्यासाठी यातूनच घ्यावे लागेल आणि परमेश्वराची सेवा करण्यास आम्हांला काय लागेल ते आम्ही तेथे पोहचेपर्यंत सांगता येणार नाही;”
Mūsu lopiem arīdzan būs mums iet līdz; nevienam nadziņam nebūs palikt atpakaļ; jo no tiem mēs ņemsim, Tam Kungam, savam Dievam kalpot; jo mēs nezinām, kā mums Tam Kungam jākalpo, tiekams mēs turp nāksim.
27 २७ परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांस जाऊ देईना.
Bet Tas Kungs apcietināja Faraona sirdi, un tas negribēja tos atlaist.
28 २८ मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!”
Un Faraons uz viņu sacīja: ej nost no manis; sargies, ka tu vairs nenāci man priekš acīm; jo kurā dienā tu nāksi man priekš acīm, tev būs mirt.
29 २९ मोशे म्हणाला, “तू बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”
Tad Mozus sacīja: lai tā ir, kā tu esi sacījis; es tavu vaigu vairs neredzēšu.