< एस्तेर 9 >
1 १ आता बाराव्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी लोकांस राजाच्या आज्ञेचे व हुकूमाचे पालन करायचे होते, यहूद्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर वरचढ होण्याची आशा धरली होती पण त्याच्या उलट झाले, जे यहूद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहूदी आता वरचढ झाले होते.
I tako dvanaestoga mjeseca, a to je mjesec Adar, trinaestoga dana, kad doðe da se izvrši rijeè careva i zapovijest njegova, istoga dana kad se neprijatelji Judejski nadahu da æe obladati njima, preokrenu se, te Judejci obladaše svojim nenavidnicima.
2 २ आपल्याला नेस्तनाबूत करु पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहूदी आपआपल्या नगरात एकत्र आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात जायची कोणामध्येच ताकद नव्हती म्हणून यहूद्यांना ते लोक घाबरले.
Skupiše se Judejci u svojim gradovima po svijem zemljama cara Asvira da dignu ruke na one koji im tražahu zlo; i niko ne mogaše stajati pred njima; jer strah od njih popade sve narode.
3 ३ शिवाय, सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार, आणि राजाचे कारभारी यांनी यहूद्यांना सहाय्य केले, कारण ते सगळे मर्दखयाला घाबरत होते.
I svi knezovi zemaljski, namjesnici i upravitelji i koji opravljahu poslove careve, podupirahu Judejce, jer ih popade strah od Mardoheja.
4 ४ मर्दखय राजवाड्यातील मोठा व्यक्ती असून त्याची किर्ती राज्यातील सर्वापर्यंत पोहचली होती, मर्दखयाचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.
Jer velik bijaše Mardohej u domu carevu, i slava njegova prolažaše sve zemlje, jer taj èovjek Mardohej bivaše sve veæi.
5 ५ यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा आपल्या इच्छेप्रमाणे समाचार घेतला.
I tako pobiše Judejci sve neprijatelje svoje maèem i potrše i istrijebiše, i uèiniše što htješe od nenavidnika svojih.
6 ६ शूशन या राजधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला.
I u Susanu carskom gradu ubiše Judejci i istrijebiše pet stotina ljudi.
7 ७ शिवाय त्यांनी पुढील लोकांस ठार केले. पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा,
I Farsandatu i Dalfona i Aspatu,
8 ८ पोराथा, अदल्या, अरीदाथा,
I Poratu i Adaliju i Aridatu,
9 ९ पर्मश्ता, अरीसई, अरीदय, वैजाथा,
I Farmastu i Arisaja i Aridaja i Vajezatu,
10 १० हे हामानाचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा पुत्र हामान यहूद्यांचा शत्रू होता. यहूद्यांनी या सर्वांना ठार केले खरे, पण त्यांची मालमत्ता लुटली नाही.
Deset sinova Amana sina Amedatina neprijatelja Judejskoga pobiše, ali na plijen ne digoše ruke svoje.
11 ११ तटबंदी असलेल्या शूशनमध्ये, त्यादिवशी किती जण मारले गेले ते राजाला सांगण्यात आले.
U onaj dan kad javiše caru broj pobijenijeh u Susanu carskom gradu,
12 १२ तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “हामानाच्या दहा पुत्रासहीत यहूद्यांनी शूशनमध्ये पाचशे लोकांस मारले. आता राजाच्या इतर प्रांतांत काय करावे अशी तुझी इच्छा आहे? तुझी काय विनंती आहे? ती मान्य करण्यात येईल. तुझी काय मागणी आहे? ती तुझ्यासाठी मान्य करण्यात येईल.”
Reèe car Jestiri carici: u Susanu carskom gradu pobiše i potrše Judejci pet stotina ljudi i deset sinova Amanovijeh, a šta su uèinili po ostalijem zemljama carevijem? Šta želiš? daæe ti se; i šta još moliš? biæe.
13 १३ एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहूद्यांना आजच्यासारखेच उद्या करु द्यावे आणि हामानाच्या दहा पुत्रांचे देहही खांबावर टांगावे.”
A Jestira reèe: ako je ugodno caru, da se dopusti Judejcima u Susanu i sjutra da uèine po današnjoj naredbi i deset sinova Amanovijeh da objese na vješala.
14 १४ तेव्हा राजाने तशी आज्ञा दिली. शूशनमध्ये तोच कायदा दुसऱ्या दिवशीही चालू राहिला. हामानाच्या दहा मुलांना टांगले गेले.
I zapovjedi car da bude tako. I oglašena bi zapovijest u Susanu, i objesiše deset sinova Amanovijeh.
15 १५ अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशनमधील यहूदी एकत्र जमले आणि त्यांनी शूशनमधल्या तीनशे जणांना जिवे मारले पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही.
I Judejci koji bijahu u Susanu skupivši se i èetrnaestoga dana mjeseca Adara pobiše u Susanu tri stotine ljudi, ali na plijen ne digoše ruke svoje.
16 १६ त्यावेळी राजाच्या प्रांतांमधले यहूदीदेखील आपल्या संरक्षणासाठी एकत्र जमले आणि आपल्या शत्रुपासून त्यांना विसावा मिळाला. जे त्यांचा द्वेष करत होते त्या पंचाहत्तर हजार लोकांस त्यांनी ठार केले, पण त्यांनी ज्यांना ठार केले त्यांच्या मालमत्तेला हात लावला नाही.
A ostali Judejci koji bijahu po zemljama carevijem skupiše se da brane život svoj i da se smire od neprijatelja svojih; i pobiše sedamdeset i pet tisuæa nenavidnika svojih; ali na plijen ne digoše ruke svoje.
17 १७ अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहूद्यांनी विश्रांती घेतली आणि तो दिवस त्यांनी आनंदोत्सवाचा व मेजवाणीचा ठरविला.
To bi trinaestoga dana mjeseca Adara; a èetrnaestoga poèinuše, i praznovaše taj dan gosteæi se i veseleæi se.
18 १८ परंतु शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते. मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला. पंधरावा दिवस त्यांनी मेजवाणीचा व आनंदोत्सवाचा ठरविला.
A Judejci koji bijahu u Susanu skupiše se trinaestoga i èetrnaestoga dana istoga mjeseca, a poèinuše petnaestoga, i praznovaše taj dan gosteæi se i veseleæi se.
19 १९ म्हणून खेडोपाडी राहणारे जे यहूदी गावकूस नसलेल्या गावात राहतात ते अदारच्या चतुर्दशीला पुरीम हा सण साजरा करतात. त्यांचा सण चतुर्दशीला असतो. त्यादिवशी ते मेजवान्या देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.
Zato Judejci seljani, koji žive po mjestima neograðenijem, praznuju èetrnaesti dan mjeseca Adara veseleæi se i gosteæi se i blagujuæi, i šaljuæi dijelove jedan drugom.
20 २० मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहूद्यांना पत्रे पाठवली,
Jer Mardohej napisa ovo, i razasla knjige svijem Judejcima koji bijahu po svijem zemljama cara Asvira, blizu i daleko,
21 २१ दरवर्षी अदार महिन्याचा चौदावा आणि पंधरावा दिवसही अगत्याने पाळावा,
Nareðujuæi im da praznuju dan èetrnaesti mjeseca Adara i petnaesti dan istoga mjeseca svake godine;
22 २२ त्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा मिळाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहूद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात.
Prema danima u koje se smiriše Judejci od neprijatelja svojih i prema mjesecu kad im se pretvori žalost u radost i tuga u veselje, da te dane praznuju gosteæi se i veseleæi se i šaljuæi dijelove jedan drugom, i siromasima darove.
23 २३ मर्दखयाने त्यांना लिहिले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी सुरवात केली होती तो उत्सव त्यांनी पुढेही चालू ठेवला.
I primiše svi Judejci da èine što su poèeli i što im pisa Mardohej.
24 २४ हम्मदाथाचा पुत्र अगागी हामान सर्व यहूद्यांचा शत्रू होता. त्याने यहूद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहूद्यांच्या संहारासाठी त्याने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता.
Jer Aman sin Amedatin Agagej neprijatelj svijeh Judejaca namisli za Judejce da ih istrijebi, i baci Fur, to jest ždrijeb, da ih potre i istrijebi.
25 २५ परंतु राजासमोर ही गोष्ट आली तेव्हा त्याने अशी लिखीत आज्ञा काढली की, कपटी हामानाने यहूदी लोकांविरूद्ध रचलेल्या कारस्थानाचा दोष त्यांच्या माथी मारावा आणि त्यास व त्याच्या पुत्रांना फाशी देण्यात यावी.
Ali kad Jestira izide pred cara, on zapovjedi knjigom, te se zla misao njegova koju smisli na Judejce obrati na njegovu glavu, i objesiše njega i sinove njegove na vješala.
26 २६ यास्तव पूर या शब्दावरून “पुरीम” असे म्हणत, म्हणून या दिवसास “पुरीम” नाव पडले. कारण त्या पत्रामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी, त्यांनी पाहिलेले सर्व काही आणि त्याच्याबाबतीत जे घडले होते त्यामुळे यहूद्यांनी ही प्रथा स्विकारली.
Zato prozvaše te dane Furim od imena Fur; i radi svijeh rijeèi te knjige i radi onoga što vidješe, tako i radi onoga što im se dogodi,
27 २७ यहूद्यांनी नवीन रीत व कर्तव्य स्विकारले. ही रीत आपल्यासाठी, आपल्या वंशजासाठी व जो प्रत्येकजन त्यांना जोडलेले आहे तो. आपण हे दोन दिवस प्रत्येक वर्षी साजरे करावेत. ते त्यांच्या नियमानुसार आणि प्रत्येकवर्षी त्याच वेळी साजरे करावे.
Postaviše Judejci i primiše na se i na sjeme svoje i na sve koji se udruže s njima da je nepromjenito da slave ta dva dana kao što je napisano za njih i na vrijeme koje je za njih odreðeno, svake godine,
28 २८ प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसाची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व नगरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील.
I da se ti dani spominju i slave u svakom naraštaju, u svakoj porodici, u svakoj zemlji i u svakom gradu; i ti dani Furim da ne prestanu meðu Judejcima i spomen njihov da ne pogine u sjemenu njihovu.
29 २९ मग अबीहाईल ची कन्या राणी एस्तेर आणि यहूदी मर्दखय यांनी पुरीमविषयी एक फर्मान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ते फर्मान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले.
I pisa carica Jestira kæi Avihailova i Mardohej Judejac svakom tvrðom potvrðujuæi knjigu za Furim drugi put.
30 ३० राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील एकशेसत्तावीस प्रांतांमधील समस्त यहूद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्य वचने होती.
I Mardohej razasla knjigu svijem Judejcima u sto i dvadeset i sedam zemalja cara Asvira s rijeèima ljubaznijem i istinijem,
31 ३१ पुरीम साजरा करायला लोकांस सांगण्यासाठी मर्दखयाने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहूदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहूद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहूद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसाचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा.
Da tvrdo drže dane Furim na vrijeme kao što im je postavio Mardohej Judejac i carica Jestira i kao što sami postaviše sebi i sjemenu svojemu za spomen postu njihovu i vikanju njihovu.
32 ३२ पुरीमचे नियम एस्तेरच्या आज्ञेने ठरविण्यात आले. आणि या गोष्टींची लेखी नोंद ग्रंथात झाली.
Tako zapovijest Jestirina potvrdi uredbu za Furim, i bi zapisano u knjigu.