< एस्तेर 6 >

1 त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला.
उस रात राजा को नींद नहीं आई, तब उसने आदेश दिया, कि इतिहास की पुस्तक लायी जाए, कि उसे राजा के सामने वाचन किया जाए.
2 राजा अहश्वेरोशाला राजद्वारावर पहारा करणाऱ्या बिग्थान आणि तेरेश या दोन सेवकांनी राजाचा वध करण्याचा कट रचला होता त्याच्याविषयी मर्दखयाने सांगितले होते अशी नोंद होती.
वहां पुस्तक में यह बात सामने आयी, कि राजा के दो द्वारपाल खोजा, बिगथान एवं तेरेश का राजा अहषवेरोष की हत्या का षड़्‍यंत्र मोरदकय द्वारा सूचित किया गया था.
3 त्यावर राजाने विचारले, “मर्दखयाचा त्याबद्दल सन्मान व गौरव कसा केला गेला?” तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “त्याच्यासाठी काहीच केले गेले नाही.”
राजा ने पूछा, “मोरदकय को इसके लिए कौन सा सम्मान अथवा पुरस्कार दिया गया?” राजा के परिचाराकों ने उत्तर दिया. “कुछ भी नहीं किया गया है, उसके लिए.”
4 राजा म्हणाला “चौकात कोण आहे?” हामान तर आपण जो खांब मर्दखयाला फाशी देण्यासाठी तयार केला होता ते राजाला सांगण्यास राजाच्या घराच्या बाहेरच्या अंगणात आला होता.
राजा ने पूछा, “कौन है इस समय आंगन में?” हुआ यह था, कि हामान ने इसी समय राजमहल परिसर के बाहर के आंगन में प्रवेश किया था, कि वह राजा से मोरदकय को उस स्तंभ पर लटकाने की चर्चा कर सके, जो उसने मोरदकय के लिए बनवाया था.
5 राजाचे सेवक त्यास म्हणाले, “हामान अंगणात उभा आहे” तेव्हा राजा म्हणाला, “त्याला आत घेऊन या.”
राजा के अधिकारियों ने उसे सूचित किया, “महाराज, हामान आंगन में ठहरे हुए हैं.” राजा ने आदेश दिया, “उसे यहां आने दो.”
6 हामान आत आला तेव्हा राजाने त्यास विचारले, ज्याचा राजाने सन्मान करावा असे राजाच्या मर्जीस आल्यास त्या मनुष्यासाठी काय करावे? हामानाने मनातल्या मनात विचार केला, “माझ्यापेक्षा कोणाचा अधिक मान करावा म्हणून राजाच्या मर्जीस येणार?”
हामान भीतर आ गया. राजा ने उससे प्रश्न किया, “यह बताओ, यदि राजा किसी व्यक्ति को सम्मान प्रदान करना चाहे, तो इसके लिए क्या-क्या उपयुक्त होगा?” हामान के मन में विचार आया: “मेरे अतिरिक्त राजा भला किसे सम्मानित करना चाहेंगे?”
7 तेव्हा हामान राजाला म्हणाला, “राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी हे करावे,
हामान ने राजा को उत्तर दिया, “राजा जिस व्यक्ति को सम्मान करना चाहें,
8 राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्रे आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुकुट आणावा.
उसके लिए वही राजसी पोशाक लाया जाए, जो स्वयं राजा पहना करते हैं, उसे वही घोड़ा दिया जाए, जिसका प्रयोग स्वयं राजा करते हैं, तथा उसके सिर पर राजसी मुकुट भी रखा जाए;
9 मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्रे आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्रे घालावीत आणि त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यावर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते.”
यह राजसी पोशाक एवं घोड़ा राजा के सर्वोच्च शासक को सौंपा जाए कि वह यह राजसी वस्त्र उस व्यक्ति को पहना दे, जिसे राजा आदर करना चाहते हैं. तब उस व्यक्ति को घोड़े पर सवार किया जाए और उसे इस तरह से नगर चौक में लेकर घुमाया जाए. यह करते हुए उसके आगे-आगे यह घोषणा की जाए: ‘राजा जिस व्यक्ति को आदर करना चाहते हैं, उसके साथ यही किया जाएगा.’”
10 १० मग राजा हामानाला म्हणाला, तू बोलला त्याप्रमाणे “लवकर वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखय यहूदी राजद्वाराजवळच बसलेला आहे त्याचे तसेच कर. जे सर्व तू बोलला आहेस त्यातले काही एक राहू देऊ नकोस.”
राजा ने हामान को आदेश दिया, “तुरंत वे राजसी वस्त्र तथा घोड़ा लो, जैसा सुझाव अभी तुमने रखा है और यहूदी मोरदकय के साथ वह सब करो, जो इस समय राजमहल के परिसर के द्वार पर बैठा हुआ है. तुमने जैसा जैसा सुझाव रखा है, उसमें कोई कमी न आने पाए.”
11 ११ मग हामानाने वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखयाला ते वस्त्र घालून त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यातून फिरवले. त्याच्यापुढे चालून त्याने घोषणा दिली, “राजाला ज्याचा सन्मान करण्यास आवडते त्या मनुष्यासाठी असे केले जाते.”
तब हामान ने राजसी पोशाक, वस्त्र लिया और घोड़ा लिया. उसने मोरदकय को वह राजसी पोशाक, वस्त्र पहनाया और उसे घोड़े पर सवार करके नगर चौक में घुमाया. वह उसके आगे-आगे यह घोषणा किये जा रहे थे: “उस व्यक्ति के साथ ऐसा ही किया जाएगा, जिसका राजा आदर करना चाहते हैं.”
12 १२ एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान आपले तोंड झाकून शोक करीत घाईने घरी गेला.
मोरदकय तो राजमहल परिसर द्वार पर लौट गया; किंतु हामान तुरंत अपने घर को विलाप करता अपने सिर को ढांप कर लौट गया.
13 १३ आपली पत्नी जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानाची पत्नी आणि त्यास सल्ला देणारे बुद्धीमान मित्र त्यास म्हणाले “मर्दखय यहूदी असेल तर त्याच्यावर तुमचे वर्चस्व होणे शक्य नाही. पण त्याच्यापुढे तुमचा अध: पात खचीतच होणार.”
उसने अपनी पत्नी ज़ेरेष तथा अपने मित्रों को उसके साथ जो हुआ सब कुछ कह सुनाया. यह सुन उसकी पत्नी ज़ेरेष तथा उसके बुद्धिमान दोस्तों ने उसे चेतावनी दी, “यदि मोरदकय, जिसके सामने तुम्हारे पतन की शुरुआत हो चुकी है, यहूदी मूल का है, जब तक तुम उसे पराजित न कर पाओगे-तुम्हारा पतन सुनिश्चित है.”
14 १४ हे सगळे त्याच्याशी बोलत असतानाच राजाचे खोजे आले. एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला हामानास आणायला त्यांनी घाई केली.
जब उनके मध्य यह वार्तालाप चल रहा था, वहां राजा के खोजा आ पहुंचे और हामान को तत्काल अपने साथ उस भोज के लिए ले गए, जिसे एस्तेर ने तैयार किया था.

< एस्तेर 6 >